'आदिवासी विकास विभागात विकेंद्रीकरण करणार'
[image: Facebook]
<http://epaper.esakal.com/esakal/20130626/5701631334984875398.htm#>[image:
Google]  
<http://epaper.esakal.com/esakal/20130626/5701631334984875398.htm#>[image:
Twitter] <http://epaper.esakal.com/esakal/20130626/5701631334984875398.htm#>
 [image: ईमेलने पाठवा]

- सकाळ न्यूज नेटवर्क

मुंबई - आदिवासी विकास विभागांतर्गत चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळांतील विविध
वस्तूंच्या खरेदीप्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी खरेदीप्रक्रियेचे
विकेंद्रीकरण करण्यात येणार असल्याचे सांगून काही दिवसांतच आश्रमशाळांसाठी 7
हजार शिक्षकांची भरती करणार असल्याची माहिती आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड
यांनी दिली. मंत्रालयातील आपल्या दालनात ते पत्रकारांशी बोलत होते.

आश्रमशाळांतील शिक्षक भरतीसाठी घेण्यात येणारी सामायिक परीक्षा बंद करण्याचा
विचार आहे. त्याऐवजी गुणवत्तेच्या आधारे शिक्षक भरती करून आदिवासी विभागातील
अनुभवासाठी अतिरिक्‍त 10 गुण ग्रहित धरले जातील व काही दिवसांतच 7 हजार
शिक्षकांची भरती करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. आदिवासींच्या
आश्रमशाळांना यापुढे खुल्या बाजारातून शिधा खरेदी करण्याची पद्धतही बंद
करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या सर्व आदिवासी आश्रमशाळांना यापुढे
खुल्या बाजारातून नव्हे; तर सार्वजनिक वितरण यंत्रणेच्या माध्यमातूनच शिधा
खरेदी करावा लागणार आहे. यामुळे शिधा खरेदीतल्या अपहाराला मोठ्या प्रमाणात आळा
बसेल, असा दावा त्यांनी केला. यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याशी
आपली चर्चा झाली असून, पवारांनी याबाबतचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले
आहेत. केंद्राकडे प्रस्ताव गेल्यास रेशनिंगच्या कोट्यात वाढ करण्याचे आश्‍वासन
पवार यांनी दिल्याची माहिती पिचड यांनी दिली.

गेल्या आठवड्यात सर्व आदिवासी आमदारांची बैठक पिचड यांनी बोलविली होती. या
वेळी आदिवासी भागात अनेक सिंचन प्रकल्प असतानाही पाण्याच्या टंचाईचा सामना
करावा लागतो. त्यामुळे अशा प्रकारच्या पाण्यावर आदिवासी कल्याणच्या हेतूने
रॉयल्टी आकारण्यात यावी, अशी मागणी बैठकीत आमदारांनी केली. आदिवासी भागातल्या
खनिज संपत्तीवर आदिवासी योजनांसाठी रॉयल्टी आकारली जाते. त्याच धर्तीवर
पाण्यावर देखील रॉयल्टी आकारावी आणि ही रॉयल्टी संबंधित पाणीपुरवठ्याचा लाभ
घेणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेने भरावी, अशी भूमिका अनेक आमदारांनी या
बैठकीत मांडली. यावर तातडीने निर्णय घेण्याची हमी आदिवासी विकास मंत्री मधुकर
पिचड यांनी दिली.

आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी शिक्षण मिळावे, यासाठी नवीन इंग्रजी
शाळांऐवजी सध्या अस्तित्वात असलेल्या आश्रमशाळांमध्येच इंग्रजी शिक्षण
बंधनकारक करण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला.

Ref : http://epaper.esakal.com/esakal/20130626/5701631334984875398.htm

------------------------------------------------------


We hope
आश्रमशाळांसाठी 7 हजार शिक्षकांची भरती : Will give maximum job opportunity
to local tribal D ed / B Ed holders.

-- 
-----------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
Group of professionals who want to take initiative to develope tribal 
community, Let us do it together 

Our Online contact points : 
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in 
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in 

Face book profile : www.facebook.com/adiyuva 
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva 
twitter : http://twitter.com/adiyuva 
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.


Reply via email to