best artical
2013/7/5 चेतन Chetan <[email protected]> > somthing to read > > *आपली "ओळख' ठरते तरी कशी?* > > > http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5004945646123805889&SectionId=2&SectionName=%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF&NewsDate=20130705&Provider=-&NewsTitle=%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%80 > > > मी त्याच्याहून जास्त शिकलेय, तरी केवळ जातीच्या आधारे तो वरचढ ठरावा आणि > त्याला मला नाकारायचा हक्क प्राप्त व्हावा? अनेक प्रश्न मनात घोंगावू लागले. > व्यक्ती म्हणून आपली ओळख तरी कोणती? > - मनस्विनी लता रवींद्र > > आमचं लग्न होणारच, असं मी गृहितच धरलं होतं. त्याच्या घरी मी जायचे. अनेकदा. > फक्त फर्मली सगळं बोलायचं बाकी आहे बास. एक दिवस तो हसत-हसत म्हणाला, "अगं, > काल बाबांनी विचारलं, की तुझी जात काय आहे? मला काही पडलेली नाही गं, पण लग्न > म्हटल्यावर विचारलं जातंच ना... काय गं काय जात तुझी?' मला त्या प्रश्नाचं > काहीच नाही वाटलं खरंतर. मी सरळ सांगितलं, "अरे, मी दलित आहे. तुला माहीत > नव्हतं का?' त्याचा चेहरा खर्रकन उतरला. "तुला बघून वाटत नाही,' असं तो > म्हणाला. मला राग आला खरंतर. मला बघून वाटत नाही म्हणजे? आपल्या > बोलण्या-चालण्यावर लिहिलेलं असतं का, आपली जात कोणती ते? आणि बोलणं, रीतीभाती > वेगळ्या म्हणजे त्या कमी दर्जाच्या, हे कोणी ठरवलं? मला कळायचं होतं ते कळलं. > त्यानंतर इकडतिकडच्या गोष्टी बोलून तो निघाला, या विषयाला सरळ टांग देत. > > नंतर त्याचा मोबाईल आला. त्यानं सुरवातच अशी केली, "आय लव्ह यू, पण... पण मला > वाटतं, की हे नाही शक्य. मी माझ्या आई-बाबांना कसं समजावू? ते जुन्या > विचारांचे आहेत. तू मला आधी कधीच का बोलली नाहीस. आपल्या आयुष्याचा प्रश्न > होता. तू तुझी जात लपवलीस वगैरे... आपण थांबू.' मी सगळं ऐकून घेतलं आणि त्याला > म्हटलं, "उद्या बोलू. आता मी कामात आहे.' मला खूप रडायला वगैरे आलं. सगळ्या > जुन्या आठवणी. मी जात कधीच लपवली नाही. पण जात इतकी महत्त्वाची असते, हे मला > माहीतच नव्हतं. लहान असताना आई-बाबांनी इतकंच शिकवलं, "तुमच्या शिक्षणावरून, > तुमच्या गुणवत्तेवरून तुमचा दर्जा ठरतो. तुमच्या हुशारीनं, वाचनानं, अभ्यासानं > तुमचं व्यक्तिमत्त्व खुलतं.' मला लहानपणापासून पुस्तकं मिळाली. आमच्या घरात > देव्हारा नव्हता, कुठल्या रीतीभाती नव्हत्या, अंधश्रद्धा नव्हत्या. "या देवाला > नवस केला तर हे मिळेल', अशी देवाला लाच देणं नव्हतं. त्यामुळे मला कधीच आपली > जात-धर्म याचा न्यूनगंड आलाच नाही. मोठी होत गेले, तसं डॉ. बाबासाहेब आंबेडकर, > महात्मा फुले, शाहू महाराज यांच्याबद्दल वाचनात आलं आणि मी कोणाला बिलॉंग करते > हे कळलं. आपली परंपरा, आपला वारसा हा किती मोठा आहे, वैचारिक आहे, याचा सल > वाटावं असं काहीच नव्हतं. उलट अभिमानच वाटत आला मला. > > माझ्या आई-वडिलांनी माझ्यासाठी "रिझर्व्हेशन' घेतलं नाही. खूप उत्तम > परिस्थिती होती असं नसलं, तरी ते माझ्या शिक्षणाचा खर्च करू शकत होते. पण जे > "रिझर्व्हेशन' घेतात ते का घेतात, हे मात्र सांगितलं. अनेक वर्षं जातीयतेच्या > उतरंडीत सतत उपेक्षा ज्यांच्या वाट्याला आली आहे, त्यांना समान हक्क प्राप्त > व्हायला बराच काळ जावा लागणार. तरी मी आईला म्हणायचे, "अगं, पण ज्यांना परवडतं > ते का घेतात "रिझर्व्हेशन?' आई म्हणायची, "अगं, हजारो-लाखो लोकांना ज्या > कायद्यानं फायदा होणार आहे, त्यात शे-दोनशे लोकं त्यांचा फायदा करून घेतात, > म्हणजे ती काही प्रातिनिधिक माणसं ठरत नाहीत. वरच्या जातीत कित्येक लोकांना > केवळ त्यांच्या जातीच्या जोरावर कितीतरी दालनं उघडी होतात. ऑफिशिअली, > अनऑफिशिअली. केवळ नाव ऐकून ही माणसं जातीनं वरची आहेत म्हणजे बुद्धिमत्तेनंही > सरसच असतील, असं मानलं जातं. पण आपल्याला ते सिद्ध करावं लागतं ना.' पण मला > वाटायचं, की "नाही, आता समाज बदललाय. आमची पिढी तरी इतकं सरसकट नाही बघत. > आम्हाला नाही फरक पडत आमच्या मित्र-मैत्रिणींमध्ये कोण खालच्या जातीचा आणि कोण > वरच्या.' मी भांडत होते आई-बाबांशी. पण आज जेव्हा माझ्या आयुष्यात असं घडलं, > खाडकन कोणीतरी पाण्याचा शिपकारे मारून गाढ झोपेतून जागं केल्यासारखं वाटलं > मला. > > माझा मित्र, सहचर, हमसफर हमनजर म्हणवणारा दोस्त- जो "ब्लॅक लिटरेचर'वर गप्पा > झोडतो आणि समांतर सिनेमाची दर दोन मिनिटांनी उदाहरणं देतो, "कसं जग बदलायला > पाहिजे', असे पुरोगामी म्हणावेत अशी वक्तव्यं करत राहतो- तो मुलगा आज माझी जात > कळल्यावर असा कसा रिऍक्ट झाला? काय फरक आहे त्याच्यात आणि माझ्यात? आणि > आपल्याला काय माहीत कोणाच्या कुठल्या संकरातून आपले पूर्वज जन्माला आले आहेत. > सगळे हिशेब काढायचेत का आता? मग त्यांच्या भाषेत म्हणायचं झालं तर पवित्र असू > आपण? मी त्याच्याहून जास्त शिकलेय, तरी केवळ जातीच्या आधारे तो वरचढ ठरावा, > आणि त्याला मला नाकारायचा हक्क प्राप्त व्हावा? अजून कुठलंही कारण असतं ना, तर > मी एक वेळ सहन करू शकले असते; पण हे? आपण ओळखण्यात चुकलो. मी शांत व्हायला > पेपर उघडला. उगीच सकाळी वाचायच्या राहून गेलेल्या बातम्या चाळू लागले, तर एक > आख्खी पुरवणी विवाहोत्सुकांची. "वर अडतीस, शिक्षण एमबीए, अपेक्षा - गोरी, > कमावती, तिशीच्या आतली वधू हवी. एससी-एसटी क्षमस्व.' बापरे! अजून काही वाचूच > नये असं वाटलं. > > अंगावर गार गार पाणी घेतलं आणि म्हणतात ना, पूर्वी आमची सावली पडली, तरी हे > लोक अंघोळ करायचे, तशी मी अंघोळ करून टाकली आणि शुचिर्भूत झाले आणि गाढ झोपून > गेले. सकाळी उठून मी त्याच्या आई-वडिलांना फोन केला. त्यांना सगळी परिस्थिती > सांगितली आणि म्हटलं, "आमचा लग्नाचा विचार होता; पण आता मला ते शक्य नाही > होणार. कारण तुमच्या मुलाचे विचार ऐकून मला त्याच्यासोबत आयुष्य काढणं अवघड > वाटतंय. तो आत्ताच इतका घाबरलाय तर पुढे तो कशी साथ देईल मला?' त्याची आई > म्हणाली, "मी समजू शकते. अगं मी दलित नसले, तरी यांच्यापेक्षा खालच्याच > जातीतली होते आणि त्याबद्दल आयुष्यभर ऐकावं लागलंय मला. त्यामुळे तू हा निर्णय > का घेतला असशील हे मला कळू शकतं. फक्त इतकंच सांगते- कोणी चुकलं म्हणून > त्यांचा दुःस्वास करू नकोस. सोडून दे. आणि हो सासर म्हणून नसलं, तरी हे घर > तुझ्यासाठी कायम उघडं आहे.' मला खूप छान वाटलं मोकळं-मोकळं. जगात सगळंच > निराशाजनक नाहीये... असं काहीतरी... खरंच गोष्टी बदलतील. हळूहळू का होईना, पण > नक्कीच... > -- > चेतन व. गुराडा. > Chetan V. Gurada. > > Assistant Professor, > University Department of Physics, > University of Mumbai > Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India) > mobile - 9869197376 > e-mail: [email protected] > [email protected] > > -- > ----------------------------------------------------------------------- > This mail is sent you by AYUSHgoogle group > AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in > Group of professionals who want to take initiative to develope tribal > community, Let us do it together > > Our Online contact points : > Home Page : www.adiyuva.in > Join AYUSH : www.join.adiyuva.in > Let us do it together : www.do.adiyuva.in > Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in > Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in > > Face book profile : www.facebook.com/adiyuva > Face book page :www.facebook.com/adiyuva1 > You Tube : http://youtube.com/adiyuva > twitter : http://twitter.com/adiyuva > Linked In : www.linkedin.com/in/adiyuva > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To post to this group, send email to [email protected]. > Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit > https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2QkLuKytMtNp6hjGUf1wC4X_1Yw_veZd_6zDRoitVBDPw%40mail.gmail.com > . > > > -- ----------------------------------------------------------------------- This mail is sent you by AYUSHgoogle group AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in Group of professionals who want to take initiative to develope tribal community, Let us do it together Our Online contact points : Home Page : www.adiyuva.in Join AYUSH : www.join.adiyuva.in Let us do it together : www.do.adiyuva.in Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in Face book profile : www.facebook.com/adiyuva Face book page :www.facebook.com/adiyuva1 You Tube : http://youtube.com/adiyuva twitter : http://twitter.com/adiyuva Linked In : www.linkedin.com/in/adiyuva --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAGBNGdwZ0uLU6z6mW1oCo79POeG3gi2V3a5jn2xkWpsTXQCUWQ%40mail.gmail.com.

