१0 दिवसांत दुकाने खाली करण्याचे आदेश
कासा : डहाणू तालुक्यातील चारोटी व कासा बाजारपेठेतील रस्त्यालगत दुकानदारांना वनविभागाने नोटिसा बजावल्या आहेत. ही दुकाने वनजमिनीवर उभारल्याने ती दहा दिवसांत स्वखर्चाने खाली करावी, असे नोटिसांमध्ये नमूद केल्याने कासा, चारोटी बाजारपेठेतील दुकानदार धास्तावले आहेत. परिक्षेत्र वनअधिकारी कासा यांनी सदर नोटिसा चारोटी व कासा बाजारपेठेतील दुकानदारांना व टपरीचालकांना बजावल्या आहेत. सुमारे १00 दुकानदार व टपरीचालकांना सदर नोटिसा पाठविल्या आहेत. आपण उभारलेले दुकान व कॅबिन हे संरक्षित वनक्षेत्राच्या जागेवर बेकायदेशीररीत्या उभारलेली असून नोटीस मिळाल्यानंतर दहा दिवसांच्या आत आपण स्वत:हून सदर अतिक्रमण स्वखर्चाने मोकळे करावे, असे नोटीसमध्ये नमूद केले आहे. तसेच ठाणे जिल्हय़ातील अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणांबाबत जनहित याचिकेवर उच्च न्यायालयाने सुनावणीअंती दिलेल्या आदेशाप्रमाणे शासकीय वनजमिनींवर अतिक्रमण हे बेकायदेशीर असून सुनावणी घेऊन ते नष्ट करण्याचे आदेश आहेत. (वार्ताहर) ■ परिसरातील बाजारपेठेतील दुकानदार व टपरीचालक १५ ते २0 वर्षांपासून दुकाने व टपरी चालवतात. काही दुकानदारांनी तर परस्परांकडून मोठय़ा रकमा देऊन विकत घेतल्या आहेत. ■ सदर दुकानदार नियमित बाजार कर भरत आहेत. तसेच गेल्या दोन वर्षांपूर्वीही नोटिसा बजावून कारवाईचे आदेश दिले होते. मात्र दुकानदारांच्या प्रखर विरोधानंतर कारवाई रोखण्यात आली होती. -------------------------- डहाणूत फेरीवाल्यांचा घेराव नगरसेवकही नाराज : अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध सोमवारी होणार अंतिम निर्णय डहाणू : डहाणू नगरपरिषदेने गेल्या पंधरा दिवसांपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरु केल्याने रस्त्याच्या कडेला बसणार्या भाजी, कडधान्य, फळ, फूल विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. याविरोधात आज सुमारे दोनशे संतप्त फेरीवाल्यांनी डहाणू पालिकेला घेराव घालून जाब विचारला, मात्र याबाबतीत येत्या सोमवारच्या सर्वसाधारण सभेत निर्णय घेतला जाईल, असे नगरपालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून नुकतेच अतुल पिंपळे हे रुजू झाले आहेत. त्यांनी नगरपरिषद हद्दीतील येणार्या जाणार्या लोकांना त्रास होऊ नये तसेच वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरु केली. शिवाय इराणी रोड, थर्मल पावररोड, सागरनाका या परिसरात कर्मचारी तैनात करुन माल जप्त करुन दंडात्मक कारवाई सुरु केल्याने रस्ते मोकळे झाले. दरम्यान, रस्त्याच्या कडेला नगरपरिषद प्रशासन बसू देत नसल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून फळ, भाजी विक्रेत्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. (वार्ताहर) नागरिकांच्या सोयीसाठी आणि वाहतूक सुरळीत होण्यासाठी फेरीवाला हटाव मोहीम हाती घेण्यात आली आहे. मात्र सध्या स्थानिक नगरसेवकांकडूनही या फेरीवाला मोहिमेविरोधात नाराजी व्यक्त होत आहे. फेरीवाल्यांनी आपले निवेदन सादर केले असून, त्यांच्यासाठी पर्यायी जागेचा विचार करण्यात येईल. - अतुल पिंपळे, मुख्याधिकारी, डहाणू संतप्त फेरीवाल्यांनी डहाणू नगरपरिषदेला घेराव घातल्याने काही काळ तणावाचे वातावरण बनले होते. -- ----------------------------------------------------------------------- This mail is sent you by AYUSHgoogle group AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in We are online group of youth who want to take initiative for awareness about Tribal empowerement & Developement, Let us do it together Our Online contact points : Google us as "adiyuva" Home Page : www.adiyuva.in Join AYUSH : www.join.adiyuva.in Let us do it together : www.do.adiyuva.in Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in Face book profile : www.facebook.com/adiyuva Face book page :www.facebook.com/adiyuva1 You Tube : http://youtube.com/adiyuva twitter : http://twitter.com/adiyuva Linked In : www.linkedin.com/in/adiyuva --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/f9221c66-f5ec-4c07-b2fe-99837869ae4f%40googlegroups.com.

