Happy diwali mazya saglys mitrana & family na On Oct 31, 2013 7:30 PM, "Sanchita Satvi" <[email protected]> wrote:
> HAPPY DIWALI > अरे म्हणता म्हणता आली पण नाय का … ! एका मित्राने मेल पाठवला "HAPPY > DIWALI" आणी लक्षात आले अरे हो आजपासून दिवाळी नाही का … ?तुमची आमची > सर्वांची आवडती दिवाळी ! बाहेर जल्लोष चालू आहे … फटाके ,आरास ,फराळाचा घमघमाट > । नी दिव्यांचा लखलखाट ! । पण माझे पण मात्र अंधारातच बुडालेय .. विचारांच्या > गर्तेत त्या लाखो दिव्यांचा प्रकाश पण मला अंधुकच वाटला . मी एकदम मागे म्हणजे > माझ्या बालपणात गेलो . > घरी सगळी मंडळी जमलीत…बेरया पूजन चालू आहे …. . आजोबा कुलदैवताला > मातीच्या कोड्यात तेल भरून दिवे लावताहेत ,सर्वजण शेंदराच टीळा लावून वाकून > कपाळ टेकवून कुलदेवासमोर नतमस्तक होत आहे … आई ,आज्जी ह्या सर्व जणी > स्वयपाकघरात व्यस्त …अरे बापरे ! काय तो घरच्या चवळीचा नि पानमोडीचा घमघमाट > …आम्हा पोरांची आतुरता कि कधी हे सर्व ताटात पडेल … गावात सर्वच जणू दिवाळीमय > झालेले कुणी गरीब नाही कुणी श्रीमंत नाही,सर्व गावकरी एकमेकांना "चवल खाल के > नीही " असे विचारात एकमेकांच्या आनंदात सहभागी होत आहेत …. चार दिवसांच्या > दिवाळीत घरगडी पांडू पण राजा, नि घरमालक पण राजाच!कारण सर्वांच्याकडेच दिवाळी > आलेली असते …! > आज पहिले तर ते "खळे "बेरया पूजनाची आतुरतेने वाट पाहतेय ,चकली > लाडवांच्या सुगंधात चवळीचा > सुगंध मिसळून MORDEN झालाय ,लाखो दिवे ,अगदी दारापासून ते अंगणात पर्यत > आहेत, पण त्या दिव्यांच्या प्रकाशातही शेजारच्या पांडूच्या घरचा अंधार दिसत > नाही आम्हाला !आजोबांची मातीची 'कोडी' तर माळ्यावर धूळ खात पडलीत … आणी आमचे > काही बंधू "आमची दिवाळी अजून दूर आहे …… " असे म्हणून आपली हतबलता व्यक्त > करताहेत , आपल्या मुलांची समजूत काढताहेत …. > फटाक्यांच्या आवाजाने भानावर आलो …. खरेच बालपणीची दिवाळी किती > उल्हासमय होती . ना फटाके न फुलबाज्या … दिवे तेही मातीचे, आजच्यासारखे विजेवर > चालणारे DISIGHNER दिवे नाहीत ,पण खरेच त्या दिव्यांनी घरचा अंधकार दूर > व्हायचा ,आजच्यासारखे फराळाचे खूप सारे मेनू नसायचे,पण घरची सर्व मंडळी मात्र > एकत्र यायची. जसा एका ताटात गोड फराळ ठेवावा, तसी हि सर्व मंडळी > गोडीगुलाबीने एकत्र यायची ! > आज आपण मोठे झालो उच्च शिक्षण ,उच्च पद … म्हणून दिवाळीही मोठीच,मोठे फटाके > मोठी आरास ! खूप खरेदी !… आणी करायलाही हवे ,दिवाळी आहे । पण जरासा विचार त्या > घरगडी "पांडूच्या" मुलांचा पण केला तर … > जेव्हा आपली मुले फटाके फोडत असतात, तेव्हा त्या फटाक्यांच्या नुसत्या > आवाजाने खूष होणारी हि मुले,यांची इच्छा नसेल होत फटके फोडायची …? आपली मुले > नवीन कपडे घालून मिठायीचा आनंद घेत असतात ,तेव्हा हीच मुले एका रुपयाच्या > नाण्यासाठी आयी वडीलांकडे रडून रडून सुकत असतात … थोडा विचार करा ,खरेच आपली > दिवाळी HAPPY आहे …? पूर्वी सारखे घरगडी आणी घरमालक दिवाळीत राजा आहेत ….?नाही > . आपण सधन आहोत, तर या आपल्या जातबांधवांना पण आपल्या आनंदात सामील करून घ्या > . मोठमोठ्या आरास करण्याएवजी त्यातील काही हिस्सा या पोरांना खावू साठी दिला > तर हि पोरे पण म्हणतील हैप्पी दिवाळी ! > एक मैल पाठवून WISH करण्यापेक्षा रोजच थोडा वेळ समाजासाठी दिला तर > येणाऱ्या दिवाळीत सर्वच खुश दिसतील नाही का …? फटक्यांनी धूर विकत > घेण्यापेक्षा तेच पैसे समाजाला उपयोगात आणता आले तर खऱ्या अर्थाने दिवाळी > साजरी होईल . > जग MODERN होत असताना आपण मागे का राहावे, हेही खरे असले तरी > स्वतःच्या सामाजिक परंपरा व चालीरीतींना घेवून पुढे चालले तर आजोबांचे 'खळे' > आणी माळ्यावर पडलेली 'कोडी' यांनाही आपल्या दिवाळीत सामावून घेता येईल. > उत्सव, सण हे सर्वांसाठी आहेत, मग जर ऐन दिवाळीत आपल्या जातबांधव > अंधारात झोपत असेल तर आपल्या घरच्या लाखो दिव्यातला एक दिवा त्याच्या दारी > नेवून लावला तर …। खरेच असे होईल …? मला खात्री आहे नक्की होईल ,आपण करू . > आणी हो एक सांगायचे राहिलेच कि , तुम्हा सर्वांना HAPPY DIWALI > > -- > ----------------------------------------------------------------------- > Join AYUSH You tube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): > http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 > > Learn More about AYUSH online at : > http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To post to this group, send email to [email protected]. > Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit > https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAJrTJpdkNoDG_r8HRy2CdPqMYeTH5eFx%2BJwLE1%3D9rtHj8%3DOE5g%40mail.gmail.com > . > -- ----------------------------------------------------------------------- Join AYUSH You tube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABMU%2Bxjtq97m%2B6LTT7nDbwMeOhEXXZLu0YU-OgodH9-E4hWXZA%40mail.gmail.com.

