wish you the same!!!!!

2013/10/31 vijay bhoir <[email protected]>

> Happy diwali mazya saglys mitrana & family na
> On Oct 31, 2013 7:30 PM, "Sanchita Satvi" <[email protected]>
> wrote:
>
>> HAPPY  DIWALI
>>     अरे म्हणता म्हणता आली पण नाय का … ! एका  मित्राने मेल पाठवला "HAPPY
>>  DIWALI"  आणी लक्षात आले अरे हो आजपासून दिवाळी नाही का … ?तुमची आमची
>> सर्वांची आवडती दिवाळी ! बाहेर जल्लोष चालू आहे … फटाके ,आरास ,फराळाचा घमघमाट
>> । नी दिव्यांचा लखलखाट ! । पण माझे पण मात्र अंधारातच बुडालेय .. विचारांच्या
>> गर्तेत त्या लाखो दिव्यांचा प्रकाश पण मला अंधुकच वाटला . मी एकदम मागे म्हणजे
>> माझ्या बालपणात गेलो .
>>     घरी सगळी मंडळी जमलीत…बेरया पूजन चालू आहे …. . आजोबा कुलदैवताला
>> मातीच्या कोड्यात तेल भरून दिवे लावताहेत ,सर्वजण शेंदराच टीळा लावून वाकून
>> कपाळ टेकवून कुलदेवासमोर नतमस्तक होत आहे … आई ,आज्जी ह्या सर्व जणी
>> स्वयपाकघरात व्यस्त …अरे बापरे ! काय तो घरच्या चवळीचा नि पानमोडीचा घमघमाट
>> …आम्हा पोरांची आतुरता कि कधी हे सर्व ताटात पडेल … गावात सर्वच जणू दिवाळीमय
>> झालेले कुणी गरीब नाही कुणी श्रीमंत नाही,सर्व गावकरी एकमेकांना "चवल खाल के
>> नीही " असे  विचारात एकमेकांच्या आनंदात सहभागी होत आहेत  …. चार दिवसांच्या
>> दिवाळीत घरगडी पांडू पण राजा, नि घरमालक पण राजाच!कारण सर्वांच्याकडेच दिवाळी
>> आलेली असते …!
>>     आज पहिले तर ते "खळे "बेरया पूजनाची आतुरतेने वाट पाहतेय ,चकली
>> लाडवांच्या सुगंधात चवळीचा
>>      सुगंध मिसळून MORDEN झालाय ,लाखो दिवे ,अगदी दारापासून ते  अंगणात
>> पर्यत आहेत, पण त्या दिव्यांच्या प्रकाशातही शेजारच्या पांडूच्या घरचा अंधार
>> दिसत नाही आम्हाला !आजोबांची मातीची 'कोडी' तर माळ्यावर धूळ खात  पडलीत … आणी
>> आमचे काही बंधू  "आमची दिवाळी अजून दूर आहे …… " असे म्हणून आपली हतबलता
>> व्यक्त करताहेत , आपल्या मुलांची  समजूत काढताहेत ….
>>       फटाक्यांच्या आवाजाने भानावर आलो …. खरेच बालपणीची दिवाळी किती
>> उल्हासमय होती . ना फटाके न फुलबाज्या … दिवे तेही मातीचे, आजच्यासारखे विजेवर
>> चालणारे DISIGHNER दिवे नाहीत ,पण खरेच त्या दिव्यांनी घरचा अंधकार दूर
>> व्हायचा ,आजच्यासारखे फराळाचे खूप सारे मेनू नसायचे,पण घरची सर्व मंडळी मात्र
>> एकत्र यायची.  जसा एका ताटात  गोड फराळ ठेवावा, तसी हि सर्व मंडळी
>> गोडीगुलाबीने एकत्र यायची !
>> आज आपण मोठे झालो उच्च शिक्षण ,उच्च पद … म्हणून दिवाळीही मोठीच,मोठे फटाके
>> मोठी आरास ! खूप खरेदी !… आणी करायलाही हवे ,दिवाळी आहे । पण जरासा विचार त्या
>> घरगडी "पांडूच्या" मुलांचा पण केला तर …
>>       जेव्हा आपली मुले फटाके फोडत असतात, तेव्हा त्या फटाक्यांच्या नुसत्या
>> आवाजाने खूष होणारी हि मुले,यांची इच्छा नसेल होत फटके फोडायची …? आपली मुले
>> नवीन कपडे घालून मिठायीचा आनंद घेत असतात ,तेव्हा हीच मुले एका रुपयाच्या
>> नाण्यासाठी आयी वडीलांकडे रडून रडून सुकत असतात … थोडा विचार करा ,खरेच आपली
>> दिवाळी HAPPY आहे …? पूर्वी सारखे घरगडी आणी घरमालक दिवाळीत राजा आहेत ….?नाही
>> . आपण सधन आहोत, तर या आपल्या जातबांधवांना पण आपल्या आनंदात सामील करून घ्या
>> . मोठमोठ्या आरास करण्याएवजी त्यातील काही हिस्सा या पोरांना खावू साठी दिला
>> तर हि पोरे पण म्हणतील हैप्पी दिवाळी !
>>        एक मैल पाठवून WISH करण्यापेक्षा रोजच थोडा वेळ समाजासाठी दिला तर
>> येणाऱ्या दिवाळीत सर्वच खुश दिसतील नाही का …? फटक्यांनी धूर विकत
>> घेण्यापेक्षा तेच पैसे समाजाला उपयोगात आणता आले तर खऱ्या अर्थाने दिवाळी
>> साजरी होईल .
>>         जग MODERN होत असताना आपण मागे का राहावे, हेही खरे असले तरी
>> स्वतःच्या सामाजिक परंपरा व चालीरीतींना घेवून पुढे चालले तर आजोबांचे 'खळे'
>> आणी माळ्यावर पडलेली 'कोडी' यांनाही आपल्या दिवाळीत सामावून घेता येईल.
>>         उत्सव, सण  हे सर्वांसाठी आहेत, मग जर ऐन दिवाळीत आपल्या जातबांधव
>> अंधारात झोपत असेल तर आपल्या घरच्या लाखो दिव्यातला एक दिवा त्याच्या दारी
>> नेवून लावला तर …। खरेच असे होईल …? मला खात्री आहे नक्की होईल ,आपण करू .
>>         आणी हो एक सांगायचे राहिलेच कि ,  तुम्हा सर्वांना HAPPY  DIWALI
>>
>> --
>> -----------------------------------------------------------------------
>> Join AYUSH You tube Channel (Viewed more than 1,20,000 minutes):
>> http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
>>
>> Learn More about AYUSH online at :
>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>> ---
>> You received this message because you are subscribed to the Google Groups
>> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>> To post to this group, send email to [email protected].
>> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
>> To view this discussion on the web visit
>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAJrTJpdkNoDG_r8HRy2CdPqMYeTH5eFx%2BJwLE1%3D9rtHj8%3DOE5g%40mail.gmail.com
>> .
>>
>  --
> -----------------------------------------------------------------------
> Join AYUSH You tube Channel (Viewed more than 1,20,000 minutes):
> http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
>
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To post to this group, send email to [email protected].
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABMU%2Bxjtq97m%2B6LTT7nDbwMeOhEXXZLu0YU-OgodH9-E4hWXZA%40mail.gmail.com
> .
>

-- 
-----------------------------------------------------------------------
Join AYUSH You tube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CA%2BK1Paz5SEOoXDTjP6ovf8KitqqhDWOSaLb1abFSqS%2BX%3DpgtNw%40mail.gmail.com.

Reply via email to