Madhav Sarkunde <https://www.facebook.com/madhav.sarkunde> पुसद : एक भयस्वप्न
पुसद हे नाव घेताच तळपायाची आग मस्तकाला जाते गुलामीला जीवनाचे वैभव समजून राजसतेच्या पाया-यारावर माथा घासणारी इथली आदिवासी माणस मला माणसांचे भास वाटतात! इथल्या तथाकथित आदिवासी कार्यकर्त्याच्या मनाला कधीच बोचत नाही ६० हजार आदिम मतदाराचे स्न्गिध वेदना ! त्यांच्या स्वप्नाचा दर पाच वर्षांनी लिलाव करून स्वताच्या स्वार्थाला कलही चढवणारे दुरात्म्ये उजळ माथ्यानी सभा संमेलनात मिरवताना दिसले कि माणूस या संज्ञेची किळस वाट्याला लागते. एकदा मी एकाला विचारले इथली कार्यकर्ते इतकी कशी भयग्रस्त ! ? ते का करत नाहीत धाडस प्रस्थापित सत्तेला शह देण्याचे ?त्यावर तो म्हणाला: कुणी बंगल्याच्या विरोधात उभा झाला तर त्यांचे लोकं आपल्या लोकांना मारतात म्हणून कुणीच धाडस करत नाही. आणि ज्यांनी केले त्यांचे काय झाले सारेच्या सारे शेवटी शरण भाऊला गेले सेनापतीचे शोंग घेणारे शेवटी शत्रूच्या पक्षाला जावून मिळत असतील-- तर त्यांच्या मागच्या सैनिकांचा मृतू निश्चित असतो पुसद मध्ये दर पाच वर्षांनी ६० हजार सैनाकांची कत्तल केल्या जाते आणि त्यातून आम्हाला मिळते पंचायत समितीच्या सभापतीचा अथवा जि. प.च्या सदस्यत्वाचा शिळा तुकडा ! सीझर एकदा म्हणाला होता भित्री माणसं मृतुच्याअगोदर ब-याचवेळा मरत असतात पण शूर एकदाच चाखत असतात मृतूची चव ! पुसदमध्ये असाच एखादा शूर यावा जन्माला आणि त्यांनी लावावा शुरुंग "त्या" बुरुजाल तोच दिवस असेल खरा उलगुलान आणि तोपर्यंत जे चालू राहणार आहे ते असेल फक्त हुज-यांचे लाचार नाच तुकड्यासाठी ! 2013/10/18 AYUSH activities <[email protected]> > आदिवासी वारलखंड > जनांदोलन<https://www.facebook.com/AwajDoTribals?hc_location=stream> > आपण समस्त आदिवासी बांधव एका रक्ताचे भाऊ आहोत ! > जरी आपल्या जमातींची नावे,कुळांची नावे,गाव-पाडे वेगवेगळे > असले तरी आपण सर्व एकाच दैवी दांपत्याची मुले आहोत ! > महादेव-गांगगौरीची निर्मिती आहोत !देवाने आम्हास एकत्र > ठेवले पण परकीय आक्रमकांनी आमच्यात धर्म,पक्ष यासारख्या > विषारी आणि फुटिरतेची बीजे पेरली आणि गुन्या-गोविंदाने > जगणारा समाज धर्म,पक्षाचे झेंडे घेऊन आपल्याच आदिवासी > बांधवांची डोकी फोडत सुटला.मरणारा आणि मारणारा दोघेही > भाऊच होते,आपले नुकसान आपणच करत राहिलो मात्र आदिवासींना > धर्मा-पक्षाच्या नावाने भडकवणारा,माथी फिरवणारा,आपल्याच भावाला > आपल्या विरुद्ध भडकवणारा परका नेता मात्र शहरात आदिवासींच्या > नावावर पैसा कमावून ऐश आरामात जगत राहिला !अजूनही आपण परकीय > शक्तींच्या हातातले बाहूले बनून जगत राहिलो तर आपल्याच भावाच्या > हातून आपला विनाश अटल आहे !एका पक्षाच्या सभेत इतर दहा पक्षाचे आदिवासी > येणार नाहीत,एका धर्माच्या प्रार्थना-बैठकीला इतर दहा धर्म मानणारे अनुपस्तित > राहणार,मग सांगा आपल्या आदिवासींची एकी कशी होणार ?आदिवासी कोणत्याही > धर्म-पक्षाचा असला तरी त्यांच्या समस्या,अड़चणी एक सारख्याच > आहेत.ज़मीन,शिक्षण,रोज़गार हे प्रश्न सर्व आदिवासीना भेडसावत आहेत. > जर आमची सुख-दु:ख,अड़ी अड़चणी एक सारख्या असतिल तर आम्हि वेग-वेगळ्या गटात > राहुन त्या समस्या कश्या सूटतिल ? उलट त्या गंभीर होतिल ! > म्हणूनच आपण सर्वांनी आदिवासी समाजाच्या नावाने,एका संस्कृतीच्या नावाने एक > होणे ही काळाची गरज आहे! > धर्म-पक्ष आपण निर्माण केले नाही ते परकियांनी आणले आणि आम्हावर लादले > !धर्म-पक्ष हे बदलता येतात ! नाही पटले तर सोडता येतात, ते कायम स्वरूपी नाहीत > !नेता गेला की धर्म-पक्ष नष्ट व्हायला वेळ लागत नाही !शक-कुषाण आले आणि > गेले,बौद्ध-जैन सत्तेवर आले आणि गेले.इंग्रज-पोर्तुगीज आले आणि > गेले,भाजपा-कॉंग्रेस सत्तेवर येतात आणि जातात ! पण एकच समाज इथे होता आणि कायम > राहिला तो म्हणजे आदिवासी समाज व आदिवासी माणूस ! > धर्म-पक्ष बदलता येतात पण एकच गोष्ट बदलता येणार नाही ती म्हणजे आपली > जमात,आपले आदिवासी रक्त ! > आदिवासी वारलखंड जनांदोलन त्याच रक्ताची हाक आहे हरवलेल्या -विखुरलेल्या रक्त > बंधूंना एकत्र येण्याची ! धर्मा-पक्षाची पांघरुणे घेऊन झोपलेल्या समाजाला जागे > करून त्याचे डोळे उघडण्याची ! धर्म-पक्ष सोडून पहा सर्व समाज एक दिसेल ! > आपल्या माणसाकडे धर्मा-पक्षाच्या चश्म्यातून न पाहता एक आदिवासी विचारांच्या > आरशातून पहा समोरच्या आदिवासी बंधुत आपलीच स्वतःची प्रतिमा दिसल्याशिवाय > राहणार नाही !हेच स्वप्न उराशी > जपून हाक देतोय वारलखंडाची ! एक सत्य इतिहसातून प्रेरणा घेऊन एक होण्याची ! > जय वारलखंड !! > > <https://www.facebook.com/photo.php?fbid=634475906597822&set=a.540072489371498.1073741827.100001062545289&type=1&relevant_count=1&ref=nf> > > > > On Thursday, September 19, 2013 12:30:05 AM UTC+5:30, AYUSH activities > wrote: >> >> तिमीर भेद / वेध २०१४ चे >> >> जागो युवा जागो, भागो नही बदलो. >> >> >> >> >> >> संधी दिलेल्या प्रतिनिधींनाच पुन्हा -पुन्हा संधी किती ? >> >> पैसा,दबाव,दादागिरीला बळी पडणार किती ? >> >> वारसाची वारसदारी,खुर्चीची मक्तेदारी पेलणार किती? >> >> मतदार विभागाच्या विकासाचे वाटोळे करणार किती? >> >> खऱ्या विकासाची लोकशाहीची वाट दावणार कधी? >> >> आतातरी हो वेळीच जागा! नेता नव्हे निवड तू विकासाचा धागा !! >> >> >> >> पाच वर्षांची ह्यांच्यासाठी मधुशाला ! >> >> साहेब,राव,दादा-भाईंची हुजरेगिरीत मुका,आंधळा,बहिरा ! >> >> न देखा, न सुना, न बोला, अभ्यासाचा तर बोलबाला ! >> >> कार्यशून्य बुजगावण्याला समजते एकच भाषा!! >> >> त्याचेच काम आणि काहीही, देईल जो जास्त "पैसा"! (काही अपवाद)! >> >> आतातरी हो वेळीच जागा! नेता नव्हे निवड तू विकासाचा धागा !! >> >> >> >> कुंभकर्ण आता जागा होईल, घेवून >> >> मोठ मोठे पोस्टर अन प्रचाराचा आधार >> >> नोटा बंडलांचा, मदिराचा उपहार >> >> पैसाला भुलू नको! देणारा आला तर सोडू नको!! >> >> तू खरा जाणकार, शिकारी !बनणार नाही भिकारी!! >> >> आतातरी हो वेळीच जागा! नेता नव्हे निवड तू विकासाचा धागा !! >> >> >> >> धागा,असुदे तो गरीब मात्र असावा श्रीमंत ज्ञान -शिक्षणाने ! >> >> डोळस ,सज्ञान,कार्य-कर्त्यव्यतत्पर, यशस्वी! >> >> समाजासाठी झगडणारा,अन्यायाविरुद्ध लढणारा तेजस्वी! >> >> समाज राष्ट्र विकास अन परिवर्तनासाठी झोकून देणारा तपस्वी! >> >> सच्चा सामान्य नागरिक आपल्यातलाच आपला! >> >> आतातरी हो वेळीच जागा! नेता नव्हे निवड तू विकासाचा धागा !! >> >> >> >> ऐसा खरा प्रतिनिधी तोच आपला ! >> >> जो पैसा ,बाटली अन बाईला नाही भाळला ! >> >> जान समस्यांची अन तंत्र सोडवणुकीचे अवगत आहे त्याला ! >> >> आत्मसात करण्यास हृदय आणि बुद्धी आहे ज्याला ! >> >> आतातरी हो वेळीच जागा! नेता नव्हे निवड तू विकासाचा धागा !! >> >> जागो युवा जागो ,भागो नही बदलो!!! >> >> >> >> वसंत एन भसरा >> >> (MSW) >> >> Email:[email protected] >> >> M.8087546675. >> > -- > ----------------------------------------------------------------------- > Get regular updates at facebook like our page : www.facebook.com/adiyuva1 > Learn More about AYUSH online at : > http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To post to this group, send email to [email protected]. > Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit > https://groups.google.com/d/msgid/adiyuva/0159e620-b622-483f-b445-f5d21dd25f93%40googlegroups.com > . > -- ----------------------------------------------------------------------- AYUSH Big Achivement! : Its in Final Stage now, Soon Tribal Community will get Intellectual Property Rights for Warli Art (know more at www.warli.in) Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBto%2B1Fu7RaGvL9znkCQezsCTpXOqCa4CxqvYOQkcFtmDg%40mail.gmail.com.

