आदिवासी विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात..

रस्ता रुंदीकरण होईना : तलासरीतील सर्व्हिस रोड रखडला

आम्हालाच दुजाभाव का?

तलासरी : आय.आर.बी.च्या मनमानी कामामुळे तलासरीत आदिवासी विद्यार्थ्यांना जीव 
मुठीत धरून रस्त्याने चालावे लागत आहे. याबाबत आय.आर.बी.च्या अधिकार्‍यांकडे 
विचारणा केली असता याबाबत आपण राष्ट्रीय महामार्गाकडे तक्रार करा असे 
सांगण्यात आल्याने आदिवासी विद्यार्थ्यांचा बळी पडल्यावर तलासरीतील सर्व्हिस 
रोडची रूंदी वाढवणार का? असा संतप्त सवाल आदिवासी जनतेने केला आहे. 
राष्ट्रीय महामार्गाचे काम करणार्‍या आय.आर.बी.ने तलासरीत मनमानी पध्दतीने काम 
केल्याने याचा फटका मात्र गावातील जनतेला व विद्यार्थ्यांना बसत आहे. 
आय.आर.बी.ने महामार्गाचे काम करताना महामार्गावर अनावश्यक कट ठेवले. प्रत्येक 
हॉटेलात जाताना अनावश्यक कट व सर्व्हिसरोड दिले. मात्र महामार्गावरून तलासरीत 
येताना तसेच उंबरगाव, सिल्व्हासा येथे जाण्यासाठी ठेवलेला सर्व्हिस रोड हा 
फक्त एक पदरी व अरूंद ठेवला असल्याने वाहनचालकांना तसेच नागरिकांना हा रस्ता 
त्रासाचा झाला आहे.
तलासरी गावात महामार्गावरून येणारा सर्व्हिस रोड अरूंद ठेवला आहे. या सर्व्हिस 
रोडलगतच आदिवासी विकास विभागाच्या मुलांचे व मुलींचे वसतिगृह आहे. या 
वसतिगृहात जवळपास ५00 विद्यार्थी राहून शिक्षण घेतात. हे विद्यार्थी 
महाविद्यालयात या सर्व्हिस रोडवरून जातात. परंतु याच सर्व्हिस रोडवरू न मोठय़ा 
प्रमाणात अवजड वाहनेही भरधाव जात असतात.
या मार्गावरून भरधाव जाणारी वाहने यामुळे येथे नेहमी अपघातही होतात. याच 
सर्व्हिस रोडला लागलेल्या जाळय़ाही तुटून मार्गावर आलेल्या आहेत. परंतु 
आय.आर.बी. या जाळय़ा तसेच सर्व्हिस रोडची रूंदी वाढविण्यास टाळाटाळ करते. इतर 
सर्व ठिकाणी सर्व्हिस रोड रूंद असतात. मात्र तलासरीत प्रवेश करणारा सर्व्हिस 
रोडच अरूंद का, हा प्रश्न जनतेने विचारला आहे.
याबाबत आय.आर.बी.चे अधिकारी मगर यांच्याकडे विचारणा केली असता याबाबत आम्ही 
काहीही करू शकत नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तक्रार करा असे 
सांगितले. 
महामार्गावरील हॉटेलात जाण्यासाठी हॉटेलच्या फायद्यासाठी अनावश्यक कट, 
सर्व्हिस रोड ठेवणार्‍या आय.आर.बी.च्या अधिकार्‍यांना तलासरीत प्रवेश करणारा 
मार्ग महत्त्वाचा वाटला नाही का, असा संतप्त सवाल जनतेने केला असून 
विद्यार्थ्यांच्या जिवाच्या सुरक्षेसाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला 
आहे.(वार्ताहर) हॉटेल मालकांना सवलत मिळाली परंतु सामान्य नागरिकांचे काय, असा 
प्रश्न परिसरातून उपस्थित होत आहे. रस्ता रुंदीकरण करताना स्थानिक ग्रामपंचायत 
व महसूल विभागाशी चर्चा करणे आवश्यक होते. या परिसरातील वाहतूक लक्षात घेता 
आयआरबी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांनी हा सर्व्हिस रोड 
अधिक रुंद करणे गरजेचे आहे.




On Friday, January 31, 2014 3:07:13 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:
>
>
> *४0 वर्षानंतरही : आदिवासी गावपाड्यांना सुविधा नाहीत*
>
> कासा : डहाणू तालुक्यातील सायवन भागातील आदिवासी गावपाडे व वस्त्या आजही वीज, 
> पाणी, रस्ते, आरोग्य आदी प्राथमिक सुविधांपासून वंचित असून ४0 वर्षानंतरही सदर 
> भागातील नागरिकांना समस्याग्रस्त जीवन जगण्याला सामोर जावे लागत आहे.
> तालुक्यातील सायवन भागातील दिवशी, दाभाडी, किन्हवली, चळणी, आष्टा, रायपुर, 
> सुकटआां, गडचिंचले आदी गावे डोंगराळ भागात वसलेली आहेत. तर गावातील पाडे 
> एकमेकांपासून दूरवर दर्‍याखोर्‍यात वसलेली आहेत. त्यामुळे काही पाड्यामध्ये 
> जाण्यास साधा कच्चा रस्ताही नाही. नागरीकांना पायवाटेने जावे लागते. त्यामुळे 
> सदर पाड्यांचा पावसाळ्यात गावांशी संपर्क तुटतो. सायवन भागातील सदर गावेही 
> कासा बाजारपेठेपासून १५ ते २0 कि.मी अंतरावर आणि तालुक्याच्या ठिकाणापासून ३५ 
> ते ४0 कि.मी अंतरावर आहेत. आरोग्य, पाणी, रस्ते आदी समस्या सदर भागात मोठय़ा 
> प्रमाणात भेडसावत आहेत. एखाद्या गंभीर आजारी रुग्णास कठीण परिस्थितीत 
> आरोग्यसेवेसाठी २0 ते ३५ कि.मी अंतरावर न्यावे लागते. त्यामुळे काही रुग्णास 
> आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना घडल्यात तसेच शैक्षणिक सुविधांचाही अभाव 
> आहे. रोजगाराचा प्रश्न गंभीर असल्याने मोठय़ा प्रमाणात नागरिक दरवर्षी शहराकडे 
> स्थलांतर करतात.
> पावसाळ्यात नदी नाल्यांना पूर येत असल्याने आठ-दहा दिवस कासा, डहाणू, सायवन, 
> तलासरी, बाजारपेठा व आजुबाजूच्या भागाशी संपर्क तुटत असल्याने सदर भागातील 
> नागरिकांची मोठी अडचण होते. तसेच बरेच कर्मचारी पावसाळयात पंधरा ते वीस दिवस 
> जाण्यास गैरसोय होत असल्याचे कारण पुढे करत दांड्या मारतात. त्यामुळे 
> आरोग्यविषयक, शैक्षणिक समस्या निर्माण होतात.
>
> सदर गावे ही तालुका मुख्यालय व बाजारपेठ यांच्यापासून दूरवर आहेत. त्यामुळे 
> विकासावर परिणाम होत आहे.
> - एकनाथ मेरे, ग्रामसेवक, दिवशी
>
> सायवन भागातील गावे प्राथमिक सुविधेपासून वंचित आहेत. डहाणू तालुक्यात अनेक 
> सोयी सुविधा झाल्या असल्या तरी सायवनवासी मात्र दुर्लक्षितच राहिले आहेत. 
> - रमेश रावरे, ग्रामस्थ, दिवशी
>
> Original at : 
> http://marathi.yahoo.com/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BF%E0%A4%A4-185102080.html
>  
>
> On Wednesday, January 29, 2014 2:48:04 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:
>>
>>
>>
>>
>>
>> On Tuesday, January 28, 2014 7:59:50 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:
>>>
>>>
>>>
>>> <https://lh4.googleusercontent.com/-B4pzcuVcivM/Uue-rysF7tI/AAAAAAAAHNs/Bc4WYp6J_9s/s1600/Slide1.GIF>
>>>
>>>
>>> <https://lh5.googleusercontent.com/-jvmiK0PphgI/Uue-w0O2s0I/AAAAAAAAHN0/fCvyjRdWE1s/s1600/Slide3.GIF>
>>>
>>>
>>> <https://lh3.googleusercontent.com/-J2tU8TQ-AIQ/Uue-1T8CLKI/AAAAAAAAHN8/E9rq6pSFvNI/s1600/Slide2.GIF>
>>>
>>>
>>>
>>>
>>>
>>>
>>> On Wednesday, January 8, 2014 7:39:14 PM UTC+5:30, AYUSH activities 
>>> wrote:
>>>>
>>>>
>>>>  
>>>>
>>>> *We* Are The *People Of India* 
>>>> Too.<https://groups.google.com/forum/#!searchin/adiyuva/we$20are$20people$20of$20india/adiyuva/JU5u1Jy02Po/hG76VRs6ry8J>
>>>>
>>>>
>>>> Can anyone tell us why the Indian State did not deliver justice to us, 
>>>> who snatched our resource in the name of development? Why there is no 
>>>> electricity in my village even today? Why my people do not get water for 
>>>> their field whose lands were taken for the irrigation projects? Why there 
>>>> is no electricity in those houses, who have given their land for the power 
>>>> project? And why people are still living in small mud houses whose lands 
>>>> were taken for the steel plants? It seems that the Adivasis are only born 
>>>> to suffer and other to enjoy over our graves.
>>>>
>>>> [image: Inline image 1]
>>>>
>>>>
>>>> [image: Inline image 2]
>>>>  · 
>>>>
>>>> [image: Inline image 3]
>>>>
>>>>
>>>>
>>>> [image: Inline image 5]
>>>>
>>>> Read more at  
>>>> https://www.facebook.com/adiyuva/media_set?set=a.652617874763953.1073741837.100000472403313&type=1
>>>>  
>>>>  
>>>> AYUSH | adivasi Yuva Shakti | www.adiyuva.in
>>>>
>>>> To know more about us just Google as “adiyuva”
>>>>  
>>>>  
>>>>
>>>>  
>>>>
>>>>
>>>>

-- 
-----------------------------------------------------------------------
AYUSH Big Achievement! : Soon Tribal Community will get Intellectual Property 
Rights for Warli Art, Its in final Stage now (know more at www.warli.in)

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/16608d13-1837-499d-aed5-b7524a2d55f6%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.

Reply via email to