Madhav Sarkunde <https://www.facebook.com/madhav.sarkunde?fref=nf> 

आदिवासी सेवक पुरस्कार : घोडे आणि गधे एकाच पागेला

आदिवासी क्षेत्रात भरीव काम कारण-यां कार्यकर्त्यानां आदिवासी विभाग नाशिक 
येथून आदिवासी सेवक पुरस्कार दिल्या जाते. पूर्वी हा पुरस्कार देताना अथवा 
पुरस्कार ज्या व्यक्तीला द्यायचा त्या व्यक्तीचे या क्षेत्रातले भरीव काम 
लक्षात घेऊनच दिल्या जात असे. तथापि मागील तीन वर्षापासून हा पुरस्कार 
कुण्याही ऐ-या, गै-या नथ्थु खै -याला दिल्या जात आहे.धाडसानेच बोलायचे झाल्यास 
असे म्हणता येईल कि काही समाज कंटकालही हा सन्मान दिल्या जात आहे .पुढे चालून 
, व्यश्या, गुंडे , वेड्यांच्या इस्पितळातील रुग्ण आणि नक्षली ह्यांना हा 
पुरस्कार सरकार देते कि काय हीच भीती मला वाटत आहे. आमच्या विकृत राजकारणाने 
या पुरस्कारचे महत्व अत्यंत सवंग करून टाकले आहे

कोण्या कोण्या व्यक्तींना हे पुरस्कार कसे कसे दिले ह्या विषयीचे भरपूर किस्से 
माझ्याकडे आहेत.आपण ते सर्व पुस्तकाच्या स्वरुपात मांडणार आहे. एक व्यक्ती 
आपल्या नेत्याच्या सांगण्यावरून समाज संघटन होऊच देणार नाही असे चौक चौकात 
सांगत असे. केवळ सांगत नसे.तर सतत समाज विघटनाचे कुकर्म तो करत असे. अशा 
व्यक्तीला सुद्धा आदिवासी सेवक पुरस्कार मिळाला.

On Monday, June 30, 2014 9:28:13 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti 
wrote:
>
>
>
> आज माझ्या ओळखीतिल एका व्यक्तीला आदिवासी जनसेवक पुरस्कार मिळाला....
>
> आदिवासी समाजासाठी आरोग्य, शिक्षण, न्याय, कृषि, जनजागृती, कुपोषण, साहित्य 
> आदी क्षेत्रात भरीव कामगिरी करणा-या व्यक्तीला तो मिळावा अशी माझीही प्रामाणिक 
> इच्छा...!
>
> आदिवासी विकास विभाग हा सन्मान मोठ्या दिमाखात पार पाडत असल्याचे मनस्वी 
> समाधान नेहमीच मला आहे.
>
> परंतु एखाद्या व्यक्तीला फक्त राजकीय फायद्यासाठी असा पुरस्कार बहाल करणे 
> म्हणजे त्या पुरस्काराची किंमत केल्यासारखे आहे.
>
> आदिवासी समाजाला न्याय मिळवुन देणा-या सर्व मान्यवरांनी आदिवासी जनसेवक 
> पुरस्काराला न्याय मिळवुन द्यावा ही अपेक्षा..!!
>
> आदिवासी जनसेवक हा पुरस्कार जनतेला पथदर्शी असेल तर आदिवासी विचारांचे चीज 
> झाल्याचे समाधान जनमाणसात दिसले पाहिजे.
>
> आदिवासी जनसेवक पुरस्काराची रक्कम वाढविण्याचा मा.मधुकरराव पिचड यांनी 
> घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. मा.वसंतराव पुरके यांनी आपल्या विचारान्तुन 
> पूर्णपणे आदिवासी जनहित व्यक्त करण्याचे काम केले याचे समाधान अनेकांच्या 
> चेह-यावर स्पष्ट दिसत होते. 
>
> एकंदरीत कार्यक्रम उत्साहात पार पडला.
>
> आदिवासी जनसेवक पुरस्कार प्राप्त व्यक्ति 
> सन 2014-2015
>
> 1)सोमनाथ मेंगाळ- देवठान, अकोले
> 2)मंगलदास भवारी- राजुर, अकोले 
> 3)श्रावणा हिले- साकिरवाडी, अकोले
> 4) तुळशिराम भोईर- मढ, जुन्नर, पुणे 
> 5) मधुकर लांडे- त्र्यंबकेश्वर, नाशिक 
> 6)हिरामण खोसकर- वाडगाव, नाशिक
> 7) भिवा महाले- शिरसगाव, त्र्यम्बकेश्वर, नाशिक
> 8) डॉ.मच्छीन्द्रनाथ बर्डे- सटाणा, नाशिक
> 9) दादाराव टेकाम - नागापुर, किनवट, नांदेड
> 10) चंद्रभान उदे- करंजी, केळापुर, यवतमाळ
> 11) विमल गडबोरिकर- मेटीखेडा, कळम्ब, यवतमाळ
> 12) मारू आड़े- आयता, आर्नी, यवतमाळ
> 13)मदन मडावी- फराडा, चामोर्शी, गडचिरोली
> 14)दिवाकर पेंदाम- वार्ड चंद्रपुर, चंद्रपुर
> 15)रमाकांत पाटील- सोमेश्वर नगर, नंदुरबार
> 16) कमलाकर हिलम- हेदोशी, पेण, रायगड
> 17)कृष्णा गवारी- तिरपाड, आंबेगाव, पुणे
> 18)शालिग्राम घरतकर- सुकळि, अर्जुनी मोरगाव, गोंदिया
> 19)वामन सिडाम- पांढरकवडा, यवतमाळ
> 20) मिनाताई शामराव पाटिल- पारगाव, पालघर, ठाणे
> 21)संतोष शेळके- शिरपुर, बुलढाना
> 22)वामन शेळमाके- भंडारा
> 23)देवराम खिरारी- भुतमोखाडा, नाशिक
> 24)आनंदराव चौधरी- पिम्प्री अंचला, दिंडोरी, नाशिक
> 25)चिंतामन गावित- काठीपाडा, सुरगाणा, नाशिक
>
> आदिवासी सेवा संस्था पुरस्कार 2014-2015
> 1) मराठा विद्या प्रसारक समाज, नाशिक
> 2)प.पु.शेषराव महाराज व्यसनमुक्ति संस्थान शिरपुर, बुलढाणा
> 3) आदिवासी जंगल कामगार शिक्षण संस्था, गडचिरोली 
>
> आदिवासी जनसेवक पुरस्कार प्राप्त सर्व जनसेवक व्यक्ति आणि संस्थांचे आयुश! 
> आदिवासी युवा शक्ति परिवाराकडून खुप खुप अभिनंदन...!
>
> Lets do it together
> Ayush! Adivasi yuva shakti
>
>

-- 
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for 
"Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it 
together!

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/4682d391-91dd-4be5-b9fd-009c310e8744%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to