आदिवासी होण्याची कुटिल स्पर्धा...

निवडणुका आल्यावरच आदिवासी होण्याची आत्यंतिक स्पर्धा राज्यात सुरु झाली आहे.

एक....नव्हे....दोन.....नव्हे तब्बल पन्नास जाती आज या स्पर्धेत जिंकण्यासाठी 
वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरत आहेत.

भारतीय कायदा जणु काही गुदमरतोय असेच चित्र येथे आहे.

पावसाचा कहर झेलत असताना जगण्यासाठी लढावं की आरक्षणाच्या अस्तित्वासाठी 
रस्त्यावर येवून आन्दोलन करावं असा अस्मानी पेच येथे आहे.

राजकीय नेत्यांनी तटस्थ राहून आपला योग्य तो निर्णय देवून या बंडाळीवर 
पूर्णविराम देणे अपेक्षित असताना मतांच्या राजकारणासाठी त्यांनी आश्वासने 
देवून विष कालवले.

आदिवासी जमाती 47 असताना यात अजुन 50 जाती घुसखोरी करण्याची बळजबरी करत आहेत. 
यात जर चुकुन या जाती यशस्वी झाल्या तर आदिवासी संस्कृती भविष्यात आपणास फक्त 
पुस्तकातून समजावून घ्यावी लागेल.

जगाच्या अनेक धर्मांचे तत्त्वज्ञान आदिवासी संस्कृतीतुन उदयास आले आहे. ही 
संस्कृती आणि या संस्कृतीचे पाईक असणारे हे आदिवासी जपणे जसे घटनेने बंधनकारक 
केले आहे...तसेच ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. परंतु असताना आज निव्वळ 
सरकारी मलिदा लाटन्याचा एक सोपा सहज मार्ग म्हणजे आदिवासी आरक्षण असा कुविचार 
अनेकजण जपताना दिसत आहेत.

सर्वसामान्य आदिवासी भोळा भाबडा, अबोल, त्रयस्थाबरोबर शक्यतो बोलण्याचे 
टाळनारा, प्रामाणिक, पापभीरु, दैववादी, परम्परागत जीवनदृष्टिचा, निसर्गात 
रमणारा, निसर्गावर प्रेम करणारा व जीवनाचा स्वछंदतेने उपभोग घेणारा असतो. तो 
नेहमी हसतमुख, आनंदी असतो. तो मूलनिवासी असला तरी त्याची राहणी त्याच्या 
निर्मळ अंत:करणाप्रमाणे साधी व स्वच्छ असते. त्याच्यातील आत्मीयता व सचोटी हे 
गुण लक्षात घेण्यासारखे आहेत. त्याची जीवनाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी आहे. 
त्याच्या जीवनात पैशाला फार स्थान नाही. जमिन, गुरेढोरे, बक-या, कोम्बड्या, 
मासे, खेकडे व श्रम यासाठी मजबूत हातपाय हीच त्याची संपत्ति आहे. आपणास हवे ते 
निसर्गातुन व सभोवतालच्या साधनान्तुन मिळविण्याचि शक्यता असेल तर आदिवासी 
स्वताला अत्यंत सुखी मानतो. असा हा निसर्गाच्या कुशीत सदाफूलीसारखा आपले जीवन 
जगणारा आदिवासी माळीनसारख्या नैसर्गिक आपत्तीबरोबरच धनगर, बंजारा, हटकर, कोळी 
यांच्या घुसखोरिच्या चक्रव्युहात अड़कला आहे.

मी विद्रोही आदिवासी जेव्हा या जंगल द-यांत फिरतो तेव्हा मला जाणवते की आरक्षण 
म्हणजे नेमके काय? त्याचा आपणास नेमका कसा फ़ायदा आहे? त्याच्यातुन आपण कशी 
प्रगती करू शकतो? अशा अगदी साध्या प्रश्नांची जाण नसलेला हा आदिवासी आज 
रस्त्यावर उतरून जोरदार निषेध करताना दिसत आहे.

गेल्या 60-65 वर्षात आदिवासींमध्ये एकाही जातीचा समावेश केला नाही. 
स्वातंत्र्यानंतर प्रगतीची पावले ब-यापैकी लोकांपर्यंत पोहचलेली असताना ऐन 
निवडनुकांच्या तोंडावर आदिवासी करण्याचे गाजर अनेक राजकीय पुढारी करताना दिसत 
आहेत. खरच महाराष्ट्र पुरोगामी आहे अशी लायकी तरी यातून आपणास दिसते का? असा 
प्रश्न सहज पडल्याशिवाय राहत नाही.

मतांच्या तीन पत्ती खेळात काय कायद्याचे हुकमी पत्ते आदिवासिंच्या बाजूने 
पडतील ?

काय जाती-पातीचे राजकारण करणारे भगवे पक्ष सत्तेत येवून आदिवासिंच्या मुळावर 
घाव घालतील?

आदिवासी घटनेच्या बळावर आपले रक्षण करू शकतील काय?

खरच महाराष्ट्र योग्य विचारांनी आपली प्रगतीची पावले टाकत आहे का?

निसर्गाची पूजा करणारा आदिवासी जर आपण नियोजनबध्द संपुष्टात आणला तर निसर्ग 
आपणास माफ करील का?

बघुयात निवडणुकिच्या आखाडयात निसर्गरूपी जिंकतो की धनाच्या जोरावर न्याय 
आपल्या पदरात पाडून घेणा-या कुटिल वृत्ती जिंकतात?

विद्रोही 
आदिवासी संघर्ष

On Wednesday, July 30, 2014 1:33:43 AM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti 
wrote:
>
> पुरोगामी महाराष्ट्रात जाती पातीच्या भिंती अस्पष्ट होत असताना फक्त 
> सत्तेच्या लालसेने धनगर आणि आदिवासी असा वाद विनाकारण सूरु करून आदिवासी 
> समाजाला वेठीस धरण्याचा जो किळसवाणा प्रकार मला दिसला तो बघून मला बालपणी आजी 
> भीती दाखवायची त्या भोकाडिची आठवण झाली.
>
> मी ज्यावेळेस घराच्या उम्ब-याबाहेर पडण्याचे धाडस करायचो त्यावेळेस आजी मला 
> भोकाड़ी आली आहे असे सांगुन भीती घालत असे. यामुळे माझ्या घराबाहेर पडण्यास 
> नकळत पायबंद येत असे. यात आजीचा त्रास कमी होणे हां एकमेव स्वार्थ असे. 
>
> आज तथाकथित राजकारणी व्यक्तींनी धनगर नावाची भोकाड़ी आदिवासिंच्या घराबाहेर 
> उभी केली आहे. यातून त्यांना आपला एकच स्वार्थ साधायचा आहे तो म्हणजे आदिवासी 
> याला घाबरून परत जंगलात गेला पाहिजे. समाजाच्या विकासाच्या प्रवाहातील 
> आदिवासींचे आजचे योगदान कदाचित यांना मान्य नसावे. आज ग्लास्गो येथील 
> कॉमनवेल्थ स्पर्धेत आदिवासी खेळाडू पदकांची कमाई करू लागलेत यासारख्या अनेक 
> गोष्टी यांना कदाचित नजरेत सलत असाव्यात. म्हणून आदिवासी संपुष्टात आनन्यासाठी 
> यांनी धनगर समाजाच्या खांद्यावर बन्दुक ठेवून निशाना साधण्याचा प्रयत्न केला.
>
> राजकीय नेत्यांनी खेळलेला डाव आज त्यांच्याच अंगात आल्यासारखे दिसत आहे. कारण 
> आजपर्यंत कधीही रस्त्यावर येवून सरकारच्या विरोधात न जाणारा आदिवासी समाज आज 
> उलगुलान करत आहे. आदिवासी विचार एकत्र आले तर खुप काही करू शकतात याचे चित्र 
> आज तरी उभे राहिले आहे. त्यामुळे राजकीय आखाड़े दात पडलेल्या म्हाता-या 
> आजीसारखे वायफळ तोंडाच्या वाफा दवडत आहेत.
>
> आदिवासी आता जागा झाला आहे....नक्कीच येथून पुढे तो सदा आपल्या हिताच्या 
> दृष्टीने आक्रमक असेल. म्हणजे यांच्या एकीचा एक दबाव सरकारला नेहमी विचारात 
> घ्यावा लागेल.
>
> प्रामाणिकपणा हा आदिवासिंचा नैसर्गिक गुणधर्म....यातून देशाच्या विकासात 
> आदिवासी युवकांचे योगदान खुपच महत्त्वपूर्ण आहे. परंतु आपल्या समाजाची राजकीय 
> कोंडी मुद्दाम केली जात असल्याचे पाहून हा तरुण समाजाच्या कोणत्याही घटकाशी 
> सरळ भिडायला तयार झाला आहे. एकुणच सामाजिक स्वास्थ्याचा प्रश्न भविष्यात यातून 
> पुढे येईल.
>
> सामाजिक स्वास्थ्य हे सर्वांच्या एकीवर अवलंबून असते. परंतु आजची ही राजकीय 
> हरामी मंडळी या एकीवर कु-हाड चालवत आहेत. ज्यांनी सावरायला हवे तेच बोटं 
> समाजाची लक्तरे वेशीवर टांगत आहेत.
>
> वास्तविक आरक्षण हा विषय या राजकारणी व्यक्तींचा नाहीच मुळी....तो लोकसभेच्या 
> अखत्यारित आहे. हे माहीत असतानाही फक्त आणि फक्त सामाजिक स्वास्थ्य 
> बिघडविण्यासाठी जणु काही हे नेते प्रयत्नशील आहेत.
>
> परकीय शक्तिन्नी आपल्या देशात येवून एखादा खुप मोठा विनाशकारी प्रयत्न करावा 
> या प्रकारचे कार्य काही नेते करत आहेत.
>
> जंगलचा राजा म्हणजे आदिवासी.....आज जागा झालाय हे चित्र आता स्पष्ट झाले आहे. 
> पण त्याने कुणाची शिकार करू नये असे वाटत असेल तर त्याला डिवचण्याचा प्रयत्न 
> करू नये.
>
> विद्रोही 
> आदिवासी संघर्ष
>
>
>
> On Tuesday, July 29, 2014 9:14:13 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti 
> wrote:
>>
>>
>>
>> On Tuesday, July 29, 2014 9:12:59 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti 
>> wrote:
>>>
>>>
>>>
>>> Tribal representatives with president of India for protecting tribal 
>>> community from bogus Adivasi and political motivated moves in Maharashtra.
>>>
>>> आदिवासी समाज हितार्थ आणि येणाऱ्या राजकीय स्वार्था साठी येवू घातलेल्या 
>>> विविध घटकांनी अनुसूचित जमाती मध्ये समाविष्ट करावे या साठी दबाव आणि सामाजिक 
>>> तणाव निर्माण केला जात आहे या संदर्भात सर्वपक्षीय आदिवासी लोकप्रतिनिधींचे 
>>> शिष्टमंडळ (१८ आमदार आणि मंत्री आणि २ खासदार) राष्ट्रपतींना निवेदन 
>>> देताना खासदार हरिश्चंद्र चव्हाण
>>> शिष्टमंडळ : आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, विधान सभा उपाध्यक्ष वसंत 
>>> पुरके, सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे, युवक आणि क्रीडा मंत्री पद्माकर 
>>> वाळवी, आदिवासी विकास राज्य मंत्री राजेंद्र गावित, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, 
>>> खासदार चिंतामण वनगा, आमदार विष्णू सवरा आणि इत्तर आमदार
>>>  
>>>
>>>
>>>
>>>
>>>
>>> On Tuesday, July 29, 2014 5:28:46 PM UTC+5:30, Rahul Khandate wrote:
>>>>
>>>>
>>>>
>>>> Today's Lokmat,Hello Amravati....
>>>>
>>>> Regards,
>>>> Rahul Khandate
>>>> JAI ADIVASI....!
>>>> ​
>>>>
>>>>
>>>> 2014-07-29 2:57 GMT+05:30 AYUSH Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in>:
>>>>
>>>>> Tribals leaders at Delhi
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>> नवी दिल्ली: खोटी जात सांगत असल्याचा आरोप माझ्यावर होतो. मात्र जो हा 
>>>>> आरोप करतो,
>>>>> त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी करा, जर खोटं आढळल्यास मला 
>>>>> मुंबईत फाशी द्या, असं थेट आव्हान राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड यांनी दिलं 
>>>>> आहे. ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते. धनगर समाजाच्या आरक्षणाच्या 
>>>>> मागणीविरोधात आज आदिवसी समाजातील 18 आमदार आणि 2
>>>>> खासदारांनी दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेतली. यामध्ये 
>>>>> राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड,
>>>>> क्रीडामंत्री आणि आदिवासी नेते पद्माकर वळवी , माजी शिक्षणमंत्री वसंत 
>>>>> पुरके आदींचाही समावेश होता.
>>>>> राज्यघटनेत धनगर समाजाला आधीच आरक्षण देण्यात आलं आहे. त्यामुळे 
>>>>> आदिवासींच्या कोट्यातून
>>>>> आता पुन्हा आरक्षण देऊ नये, असं पिचड यांनी यावेळी सांगितलं. मी आदिवासी 
>>>>> आहे, त्यामुळे या समाजाचं संरक्षण करणं माझ कर्तव्य आहे, असंही पिचड यांनी 
>>>>> नमूद केलं. तर धनगर समाजाला आदिवासींच्या कोट्यातून आरक्षण देऊ नका, अन्यथा 
>>>>> रस्त्यावर उतरु असा इशारा यावेळी क्रीडामंत्री आणि आदिवासी नेते
>>>>> पद्माकर वळवी यांनी दिला. तिकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 
>>>>> धनगर समाजाच्या बाजूने भूमिका घेतल्याचा आरोप करत नंदुरबारमध्ये आदिवासी 
>>>>> समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडव
>>>>> त्यामुळे अनुसूचित जमातींमध्ये समाविष्ट करून घेण्याच्या मागणीसाठी 
>>>>> बारामतीमध्ये ठाण
>>>>> मांडलेल्या धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांना आदिवासींनी आता आव्हान दिलं 
>>>>> आहे. धनगर समाजाला आरक्षण द्या. पण त्यासाठी आदिवासींच्या आरक्षणाला धक्का 
>>>>> लावू नका असा पवित्रा आदिवासी संघटनांनी घेतला आहे.
>>>>>
>>>>>
>>>>>
>>>>> On Monday, July 28, 2014 2:20:51 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:
>>>>>>
>>>>>> You may see Andolan pics/VDO/News at www.adiyuva.in 
>>>>>> Sign online petition & share with your friends! 
>>>>>>
>>>>>> Web album :  https://plus.google.com/photos/107070737410562446083/
>>>>>> albums/6040298094084191777 
>>>>>>
>>>>>> On Sunday, July 27, 2014 10:55:30 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva 
>>>>>> Shakti wrote:
>>>>>>>
>>>>>>>  Ankush Mali
>>>>>>>
>>>>>>> चला चला तळेघर श्रावणी पहिल्या सोमवारी दिनांक २८/७/२०१४ सकाळी ११ 
>>>>>>> वाजता रस्ता रोको आदिवाशिंच्या अस्तित्वासाठी हजारोंच्या संखेने उपस्थित 
>>>>>>> राहा 
>>>>>>> आपले ताकत सरकारला दाखवा नि जे घुसखोर आहेत त्यानाही दाखवा कारण जो पर्यंत 
>>>>>>> आपण 
>>>>>>> गप्प आहोत तो पर्यंत हे आपल्यावर असाच अन्याय करत अन्याय राहणार
>>>>>>> आपल्या शिरूर लोकसभा मतदार संघाचे खासदार धनगर समजाला आरक्षणासाठी 
>>>>>>> पाठींबा दिलाय तेव्हा मी त्यांना विचरतो कि तुम्ही निवडून अदिवाशी भागातून 
>>>>>>> आले 
>>>>>>> असताना पाठींबा अदिवशीन द्याला हवा होता तर तुम्ही धनगरांच्या पाठीशी का 
>>>>>>> ज्या 
>>>>>>> जुन्नर आंबेगाव खेड अदिवाशी भागतील जनता कधी तुम्हाला माफ नाही करणार 
>>>>>>> माननीय खासदार साहेब अगोदर तुम्ही जनतेचे प्रतिनिधी आहात नंतर 
>>>>>>> पक्ष्याचे जर पक्ष्याचा पाठींबा धनगर समाज्याला असेल तर तुम्ही ज्या 
>>>>>>> अदिवाशी 
>>>>>>> भागाचे खासदार आहात त्या अदिवाशी सामाज्याच्या पाठीशी न राहता 
>>>>>>> दुसर्यांच्या 
>>>>>>> पाठीशी 
>>>>>>> ज्या अदिवशी बांधवानी तुम्हाला आपला प्रतिनिधी म्हनून निवडून दिल 
>>>>>>> त्यांच्याच विरोधात मग तुम्ही पक्ष्याला आधी महत्व देता अस वाटत नि मग 
>>>>>>> जनता .
>>>>>>> तुम्ही आज अदिवाशी बांधवांच्या पाठीशी उभ राह्यला पाहिजे होत हीच 
>>>>>>> अपेकश्या होती कारण आम्ही तुमच्यावर विस्वास ठेवला होता . 
>>>>>>> तेव्हा आता तयार रहा येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी
>>>>>>>
>>>>>>>
>>>>>>>
>>>>>>> On Sunday, July 27, 2014 10:52:13 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva 
>>>>>>> Shakti wrote:
>>>>>>>>
>>>>>>>>
>>>>>>>>
>>>>>>>> Dear ,
>>>>>>>> It’s my Genuine request to all my Brothers & Sisters to remove your 
>>>>>>>> precious time & come together to show our Unity on this important 
>>>>>>>> issue. 
>>>>>>>> Our Maharashtra Leaders are very Strong they are fighting on their 
>>>>>>>> Level 
>>>>>>>> Best in Front Level. Now, it’s our turn to show our Support to them.
>>>>>>>> As, per my Knowledge “Dhangar Samaj” is not so strong But, they are 
>>>>>>>> together& have good funds, they have capture all Social Media 
>>>>>>>> Resources.
>>>>>>>> Now, How to fight with them???
>>>>>>>> Some Methods:-
>>>>>>>> 1) Please, try to attend all Sabha & Rally regularly and show our 
>>>>>>>> maximum presence.
>>>>>>>> 2) Capture all Local Cable area network of your Area for 
>>>>>>>> Advertisement of Sabha& Rally…
>>>>>>>> Eg: DEN Network Manoranjan Channel, etc…
>>>>>>>> 2) Paste Pamphletof Sabha on each Bus Stop, Railway Station, 
>>>>>>>> backside of each Bus, Rickshaw, etc…
>>>>>>>> 3) Pamphlet Insertion in Newspaper/ Newspaper Advertising…
>>>>>>>> 4) Television Advertisement if, possible…
>>>>>>>> 5) Door to Door House to HousePamphlet Insertion…
>>>>>>>> 6) Word of Mouth & Public Speaking…
>>>>>>>> 7) Telephone calls to friends & relatives of Sabha & Rally…
>>>>>>>> 8) Make SMS Group, Whatsapp Group, and Facebook Group & give 
>>>>>>>> current updates of each News.
>>>>>>>> Please, other state Aadivasi show your Support.
>>>>>>>> “Today it’s taking Place in Maharashtra tomorrow it may take place 
>>>>>>>> in your state”
>>>>>>>> “Today Dhangar Samaj is asking for reservation tomorrow may other 
>>>>>>>> Samaj will ask for Reservation”
>>>>>>>> Yours,
>>>>>>>> Jai Aadivasi…
>>>>>>>>
>>>>>>>>
>>>>>>>>
>>>>>>>>
>>>>>>>> On Sunday, July 27, 2014 10:31:13 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva 
>>>>>>>> Shakti wrote:
>>>>>>>>>
>>>>>>>>>  
>>>>>>>>>
>>>>>>>>>
>>>>>>>>> On Sunday, July 27, 2014 10:24:00 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva 
>>>>>>>>> Shakti wrote:
>>>>>>>>>>
>>>>>>>>>>
>>>>>>>>>>
>>>>>>>>>>
>>>>>>>>>> *Jai ADivasi महामोर्चा मंगळवार दिनांक २९ जुलै २०१४ रोजी सर्व 
>>>>>>>>>> आदिवासी बांधव,विद्यार्थी ,कर्मचार्यांनी या महामोर्च्यास ऊपस्थीत 
>>>>>>>>>> राहुन 
>>>>>>>>>> आदीवासी समाजाची खरी ताकद दाखवा-......... क्रुपया हा मेसेज सर्व 
>>>>>>>>>> आदिवासी 
>>>>>>>>>> बांधवांपर्यंत पोहचवा क्रुपा करा.... मोर्च्याचे ठिकाणः- तहसील 
>>>>>>>>>> कार्यालय अकोले*
>>>>>>>>>>
>>>>>>>>>>
>>>>>>>>>> On Sunday, July 27, 2014 10:20:24 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva 
>>>>>>>>>> Shakti wrote:
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>> *Now *
>>>>>>>>>>> *28th July @ Nanded!*
>>>>>>>>>>> *1st July @ Palghar*
>>>>>>>>>>> *9th July @ Jawhar*
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>> *Please arrange similar events at your Locations & share *
>>>>>>>>>>> *information*
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>> On Sunday, July 27, 2014 1:59:49 AM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva 
>>>>>>>>>>> Shakti wrote:
>>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>> On Sunday, July 27, 2014 1:59:04 AM UTC+5:30, AYUSH Adivasi 
>>>>>>>>>>>> Yuva Shakti wrote:
>>>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>>> On Sunday, July 27, 2014 1:57:53 AM UTC+5:30, AYUSH Adivasi 
>>>>>>>>>>>>> Yuva Shakti wrote:
>>>>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>>>> On Thursday, July 10, 2014 11:10:50 PM UTC+5:30, AYUSH 
>>>>>>>>>>>>>> Adivasi Yuva Shakti wrote:
>>>>>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>>>>> ---------- Forwarded message ----------
>>>>>>>>>>>>>>> From: Ravindra Talpe <ravita...@gmail.com>
>>>>>>>>>>>>>>> Date: Thu, Jul 10, 2014 at 2:41 PM
>>>>>>>>>>>>>>> Subject: Fwd:
>>>>>>>>>>>>>>> To: satish Lembhe <satishlem...@gmail.com>
>>>>>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>>>>>
>>>>>>>>>>>>>>>  
>>>>>>>>>>>>>>> Thanks & Regards,
>>>>>>>>>>>>>>> Ravindra U Talpe
>>>>>>>>>>>>>>> ==============================
>>>>>>>>>>>>>>> Cell: 98227 65531
>>>>>>>>>>>>>>> ==============================
>>>>>>>>>>>>>>>  
>>>>>>>>>>>>>>>  -- 
>>>>> -----------------------------------------------------------------------
>>>>> Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule 
>>>>> for "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. 
>>>>> Lets 
>>>>> do it together!
>>>>>  
>>>>> Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): 
>>>>> http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 
>>>>>  
>>>>> Learn More about AYUSH online at : 
>>>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>>>> --- 
>>>>> You received this message because you are subscribed to the Google 
>>>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>>>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send 
>>>>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>>>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>>>>> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
>>>>> To view this discussion on the web visit 
>>>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/76a5a8c8-1a2a-4ea9-951e-e66db3c64845%40googlegroups.com
>>>>>  
>>>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/76a5a8c8-1a2a-4ea9-951e-e66db3c64845%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>>>> .
>>>>>
>>>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>>>>
>>>>
>>>>

-- 
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for 
"Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it 
together!

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/6ca6fc3b-40b9-426d-8113-44fee34ed11c%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.
        • AYUSH | Re: D... AYUSH Adivasi Yuva Shakti
          • AYUSH | R... AYUSH Adivasi Yuva Shakti
            • AYUS... AYUSH Adivasi Yuva Shakti
              • ... AYUSH Adivasi Yuva Shakti
              • ... AYUSH Adivasi Yuva Shakti
              • ... AYUSH activities
              • ... AYUSH Adivasi Yuva Shakti
              • ... AYUSH Adivasi Yuva Shakti
              • ... AYUSH Adivasi Yuva Shakti
              • ... AYUSH Adivasi Yuva Shakti
              • ... AYUSH Adivasi Yuva Shakti
              • ... Dr. Pradeep Valvi
              • ... AYUSH Adivasi Yuva Shakti
              • ... AYUSH Adivasi Yuva Shakti
              • ... AYUSH | Adivasi Yuva Shakti
              • ... AYUSH | Adivasi Yuva Shakti
              • ... 'adiwasi satta' via AYUSH | adivasi yuva shakti
              • ... AYUSH Adivasi Yuva Shakti
  • Fw: AYUSH | Re: Dhanagar r... shriramlande7

Reply via email to