​*Dhangars* <http://en.wikipedia.org/wiki/Dhangars>

Dhangar <http://en.wikipedia.org/wiki/Dhangar> is one of the prominent
communities in Maharashtra. The rulers of Indore
<http://en.wikipedia.org/wiki/Indore>, the Holkar
<http://en.wikipedia.org/wiki/Malharrao_Holkar> family belong to this
community. The community is divided into categories including *hatkar
<http://en.wikipedia.org/wiki/Hatkar>*, *shegar
<http://en.wikipedia.org/wiki/Shegar>*, *ahir
<http://en.wikipedia.org/wiki/Ahir>*, *dange
<http://en.wikipedia.org/wiki/Dange>* and *kokani
<http://en.wikipedia.org/wiki/Kokani>*. The community is included in
the Nomadic
Tribe <http://en.wikipedia.org/wiki/Nomadic_Tribes_in_India> (NT)
classification by the Government of India. Ahilyabai Holkar
<http://en.wikipedia.org/wiki/Ahilyabai_Holkar>, Maharaja
<http://en.wikipedia.org/wiki/Maharaja> Yashwant Rao Holkar
<http://en.wikipedia.org/wiki/Yashwant_Rao_Holkar> are some notable Marathi
Dhanagrs.

*As per Wikipedia*

Thanks' & Regards,
Dhaval H. Raut.
*Parle Product PVT.LTD*.

(9930869119)


2014-08-19 1:26 GMT+05:30 AYUSH | Adivasi Yuva Shakti <[email protected]>:

>
> सध्या धनगर आरक्षणाचा विषय गाजतोय. धनगर समाजाचं
> म्हणणं आम्ही आदिवासी आहोत, पण
> त्यांची ही मागणी पूर्णतः॒चुकीची आहे. वारंवार
> मागणी करूनही त्यांना आदिवासींचा दर्जा मिळालेला नाही
> कारण त्यात काहीच तथ्य नाही. धनगर
> समाजाला अपुर्या आणि चुकीच्या माहितीच्या आधारे
> वेठीला धरलं जातंय. जे मान्यच होणार
> नाही त्यासाठी लढवलं जातंय. यात निव्वळ राजकीय
> स्वार्थ आहे. काही धनगर नेते स्वतःच्या राजकीय
> कारकिर्दीसाठी समाजाला फसवतायत, असंच चित्र
> सध्या आहे. तसंच सर्वच पक्षांचे
> राजकारणी धनगरांना॒आश्वासनं देत सुटलेत की,
> आम्ही सत्तेवर आल्यावर तुम्हाला आरक्षण देऊ…
> आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर
> सगळ्याच पक्षांनी॒आश्वासनांची खैरात वाटणं सुरू केलंय.
> त्यातूनच आज हा आरक्षणाचा विषय अजेंड्यावर
> आणला गेलाय. मराठ्यांना आरक्षण दिलं. आता धनगर
> सरसावलेत. त्यांनी तर थेट आदिवासींच्या ७ टक्के
> आरक्षणातच वाटा मागितलाय.॒धनगर
> समाजाची ही मागणी पूर्णतः चुकीची आहे.
> आरक्षणासाठी दांडगाई करून, मंत्र्यांची अडवणूक करून,
> शाईसम रसायन मंत्र्यांच्या अंगावर
> टाकायलाही कमी केलं गेलं नाही. ही कृत्य
> करणारा समाज आदिवासी असूच शकत नाही. मुळात
> आदिवासी कसा आणि कोण आहे? आदिम काळापासून
> वास्तव्यास
> असलेला तो आदिवासी अशी व्याख्या आदिवासींची के
> अतिदुर्गम भागात आदिवासींचं वास्तव्य असतं.
> शहरी जीवनाशी त्याचा लवकर संपर्क न आल्यामुळे
> तो मुख्य प्रवाहात येऊ शकला नाही. त्याच्यात
> कोणताही बदल झाला नाही. इंग्रजीत
> ‘अॅम्बॉरिजिनीझ्’ हा आदिवासीसाठी पर्यायी शब्द
> आहे. आदिवासी हा निसर्गपूजक आहे. झाडं, पशू
> यांची तो पूजा करत असतो. आदिवासींच्या प्रत्येक
> गावात वाघोबाचं मंदिर (ठाणे, पुणे जिल्ह्यात)॒असतं.
> त्याची पूजा केली जाते. आदिवासी तसा आत्ममग्न
> समाज म्हणावा लागेल. कोणाच्या वाटेला न जाणं.
> निसर्गात जे मिळेल त्यावर गुजराण करणं,
> अशी त्याची जीवनपद्धती… आदिवासी समाजात
> शेती केली जाते पण ती फारच थोडी असते.
> त्या त्या भौगोलिक प्रदेशानुसार छोटे उद्योग केले
> जातात. उदाहरणार्थ, जंगलातून वनौषधी गोळा करून
> विकणं, पण यात गोम अशी आहे की, आदिवासीला गंडवून
> कमीतकमी किमतीत त्याच्याकडून या मौल्यवान
> वनौषधी खरेदी करायच्या आणि त्या जास्तीतजास्त
> किमतीला विकून॒आपल्या तुंबड्या भरायच्या असा दलाल
> वर्षानुवर्षं सुरू आहे. आपण फसवलं जातोय याचं
> आदिवासीला भानच नाही. किंबहुना तो आत्मसंतुष्ट
> असतो. जेवढं मिळालंय तेवढं घ्या, याच
> त्याच्या स्वभावाचा फायदा धनदांडगे आजवर घेत आलेले
> आहेत. जंगलतोडीचा दोष बर्याचदा आदिवासींवर
> लावला जातो. खरंतर
> हा आदिवासी वनविभागाच्या माळ्याला (वनकर्मचार
> जितका घाबरतो तितका तो वाघालाही घाबरत नसेल, हे
> वास्तव आहे. मग हा नाहक दोष
> त्याच्या माथी का मारला जातो?
> ज्या सागाच्या पानाचा उपयोग करून तो घर बांधतो,
> त्याची मनोभावे पूजासुद्धा करतो असं
> असताना त्यालाच दोषी ठरवून आपले गुन्हे शाबूत ठेवण्याचं
> काम बदमाश लोकांकडून होत आहे.
> विकासाच्या नावाखाली जंगलतोड होत आहे.
> आदिवासींच्या डोळ्यांसमोर त्यांचं विश्व उद्ध्वस्त
> होतंय आणि मूकपणे पाहण्याशिवाय त्यांच्या हातात
> काहीच नाही…
> रूढीपरंपरा जपणारा हा समाज…
> त्याची संस्कृती त्यामुळेच भिन्न आहे.
> आदिवासी समाजात परंपरेला महत्त्वाचं स्थान आहे.
> एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे
> या परंपरा सोपवल्या जातात. त्यात नृत्य, गायन, कथा,
> काव्य या कलांचाही समावेश आहे. यामुळे त्यांच्यामध्ये
> एकजीनसीपणा आढळतो. आदिवासींमध्ये॒अंधश्रद्धेचं
> प्रमाणही खूप आहे. मांत्रिक, भगत,
> जादूटोणा यांच्या विळख्यात तो अजूनही अडकून
> पडलेला आहे.
> त्यांच्या या अंधश्रद्धेचा फायदाही घेतला जातो,
> त्याला नागवलं जातं. या अंधश्रद्धेच्या चक्रव्यूहातून
> आदिवासीला बाहेर काढण्याचं काम मोठ्या प्रमाणात
> करावं लागणार आहे.
> नाही म्हणायला काही समाजसुधारकांनी तसे प्रयत्न केले
> आहेत. उदाहरणार्थ, बाबा आमटे दाम्पत्य आणि संपूर्ण
> आमटे कुटुंबीय, डॉ. रवींद्र-स्मिता कोल्हे, डॉ. अभय-
> राणी बंग… डॉ. अभय बंग यांनी तर त्यांचं संशोधन
> सरकारला सादर केलंय. पण काही उपाययोजना सुचवून
> सरकार ढिम्म… काहीही केलेलं नाही यावर सरकारने…
> ‘कोवळी पानगळ’ गळतेच आहे.
> मेधा पाटकरांनी नर्मदा खोर्यातील
> आदिवासींसाठी काम केलं. त्या सरदार
> सरोवराची उंची वाढवू नये म्हणून आदिवासींना घेऊन
> पाण्यात उभ्या राहत असत… पण काय झालं?
> मोदींनी त्यांना हवं ते करून घेतलं
> आणि आदिवासींना लावलं देशोधडीला… ज्या डोंगराळ
> भागात आदिवासी राहतो, त्याच भागात
> शहरांना पाणीपुरवठा करणारी धरणं बांधली जातात. मग
> त्याला विस्थापित व्हावं लागतं. आपलं गाव सोडून जावं
> लागतं. किती यातना होत असतील त्याच्या मनाला…
> हा आदिवासी इतर बंधू-भगिनींना पाणी मिळावं म्हणून
> स्वतःच्या मातृभूमीचा त्याग करतो. पण कोणी ठेवतं
> का त्याच्या त्यागाची जाणीव? उलट आदिवासी म्हटलं
> की लोकांच्या डोळ्यांसमोर उघडा-
> वागडा,॒रापलेला चेहरा येतो, कधी तर कुचेष्टेनेही पाहिलं
> जातं त्याच्याकडे… बुजरेपणामुळेही तो इतर समाजापासून
> तुटलेला आहे. मात्र आताशा काही प्रमाणात
> हा आदिवासी समाज शिकू लागला आहे. पुणे, नाशिक,
> अहमदनगर जिल्ह्यांत याचं प्रमाण अधिक म्हणता येईल, पण
> गडचिरोली, चंद्रपूर इथे आजही भयानक परिस्थिती आहे.
> नक्षलवादाच्या विळख्यात आदिवासी सापडलेला आहे.
> सुरुवातीला सरकारच्या अन्यायी॒वागणुकीच्या विरोधा
> आदिवासीला नक्षलवादी बनवलं आणि आता वार्यावर
> सोडून दिलंय. किती निष्पाप आदिवासी मारले गेले
> आहेत.॒सरकार
> आणि नक्षलवाद्यांच्या धुमश्चक्रीत॒त्याची काही मोजद
> नाही.
> उपजिविकेसाठी आदिवासी शेती करतो ती अतिशय
> तुटपुंजी असते.॒त्यावरच त्याची वर्षभराची गुजराण होते.
> आदिवासी तसा काटक, मेहनती पण बुजरा… त्यामुळे
> त्याच्याकडे असलेल्या कलेचं, मेहनतीचं चीज होत नाही.
> त्याची कला कड्याकपारीत गोठून राहिलीय.
> ती जगापुढे आली नाही.
> शिक्षणाच्याबाबतीतही या वर्गाच्या बाबतीत खूप
> औदासीन्य आहे. ते जिथे राहतात तिथे
> शाळा असल्या तरी त्यांची गुणवत्ता काय असेल हे वेगळं
> सांगायला नको. आश्रमशाळा असतात
> त्यांच्या मुलांसाठी पण त्यांची गत जगजाहीर आहेच…
> तसं पाहिलं तर आदिवासींना चांगल्याप्रकारे
> संविधानिक संरक्षण आहे. त्यात शिक्षण, राजकीय
> आरक्षण तसंच अन्यही अनेक गोष्टींचा अंतर्भाव आहे.
> सोयीसवलती आहेत… आणि याच गोष्टींवर डोळा ठेवून
> धनगर
> आणि आता बंजारा समाजही आरक्षणासारखी मागणी
> लागले आहेत.
> भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४२ (१) नुसार संसदेने
> अनुसूचित जमातींची (Scheduled Tribes)
> यादी अधिसूचित केली आहे. महाराष्ट्रातील एकूण ४७
> जमाती आणि त्यांच्या तत्सम जमाती किंवा गट
> यांचा समावेश करण्यात आला आहे यात…
> १) आंध
> २) बैगा
> ३) बरडा
> ४) बावचा, बामेचा
> ५) भेना
> ६) भारिआ भुमिआ, भुईनहर भमिआ पांडो
> ७) भात्तरा
> ८) भिल्ल, भिल्ल गरासिआ, मेवासी भिल्ल,
> धोली भिल्ल, डुंगरी भिल्ल, डुंगरी गरासिआ, रावळ
> भिल्ल, तडवी भिल्ल, भगलिआ, भिलाला, पावरा,
> वसावा, वसावे
> ९) भुंजिआ
> १०) बिन्शवार
> ११) बिरहूल, बिरहोर
> १२) चौघरा
> १३) धनका, तडवी, तेटारीआ, वळवी
> १४) धानवार
> १५) धोडिआ
> १६) दुबळा, तलावीआ, हतपती
> १७) गामीत, गामता, गापीड, मावची, पाडवी
> १८) गोंड, राजगोंड, अरख, अराख, अगारिआ, असूर, बदी,
> भरिआ, बडा मारिआ, भटोला, भिम्मा, भुटा,
> कोईलाभुटा, कोईलाभुटी, भार, मारिआ, छोटामारिआ,
> दंडामी, धुरूधुरवा, धोबा, धुलिआ, दोरला, गैकी, गट्टा,
> गट्टी, गैता, गौड गोवारी, हील, कांद्रा, कालंगा,
> खटोला, कोईतर, कोया, खिरवार, कुचा, कुचकी,
> माडिआ, माना, मन्नेवार, मोघ्या, मोगीआ, मुडिआ,
> मुरिआ, नागरची, नाईकमोड, नागवंशी, ओझा, राज,
> शरेका, थाटिआ, थोट्या, वाडे, वडेमारिआ
> १९) हलबा, हलबी
> २०) कमार
> २१) कामोठी, कातकरी, ढोर काठोडी, ढोर कातकरी,
> सोन काठोडी, सोन कातकरी,
> २२) कवारस, कनवार, कौर, चेरवा, राठीआ, तनवार, छत्री
> २३) खैरवार
> २४) खारिआ
> २५) कोकणा, कोकणी, कुकणा
> २६) कोल
> २७) कोलम, मन्नेवारलू
> २८) कोळी ढोर, टोकरे कोळी, कोलचा, कोलघा.
> २९) कोळी महादेव, डोंगर कोळी
> ३०) कोळी मल्हार
> ३१) कोंध, खोंड, कांध
> ३२) बोरकु, बोपची, मौआशी, निहाल, नाहूर, बोंधी,
> बोदेआ
> ३३) कोया, भिने कोया, राज कोया
> ३४) नागेशिआ, नागिशीआ
> ३५) नाईकडा, नायका, चोलीवाला नायका, कपाडिआ
> नायका, मोटा नायका, नाना नायका,
> ३६) ओरान, धांगड
> ३७) परधाम, पाथरी, सारोटी
> ३८) पारधी, अडवी चिंचेर, फणस पारधी, फासे पारधी,
> लांगोली पारधी, बहेलीआ, चिता पारधी, शिकारी,
> टाकनर, टाकीआ
> ३९) पारजा
> ४०) पटेलिआ
> ४१) पोमला
> ४२) राठवा
> ४३) सवार, सवारा
> ४४) ठाकूर, ठाकर, का ठाकूर, मा ठाकूर, का ठाकर,
> मा ठाकर
> ४५) थोटी
> ४६) वारली
> ४७) विटालीआ, कोतवालिआ, बरेडिआ
> उपरोक्त आदिवासींच्या जातिंमध्ये कुठेही धनगर
> जातिचा उल्लेख नाही. ज्या धांगड
> जमातिचा दाखला धनगर समाजाचे नेते देत आहेत
> ती ओरान या जमातीची उपजमात आहे. नाम
> साधर्म्याचा फायदा घेऊन आंदोलनं मोर्चे काढले
> जातायत.
> जेव्हा एखाद्या जमातीला आदिवासीचा दर्जा दिला
> आणि व्यक्ती वैशिष्ट्यांची दखल घेतली जाते
> आणि ही वैशिष्ट्यं आदिवासी संशोधन
> समिती आणि मानववंश सर्वेक्षण यांचेकडून सप्रमाण सिद्ध
> झाल्याशिवाय आणि जनजाती सल्लगार समितीने (T A
> C) तिला मान्यता दिल्याशिवाय असा बदल संविधान
> स्वीकारू शकत नाही. याच कारणास्तव धनगरांनी केंद्र
> सरकारकडे केलेले आदिवासींमध्ये समाविष्ट करून
> घेण्यासाठीचे प्रस्ताव स्वीकारले गेलेले नाहीत.
> तरीही आताची आंदोलनं आणि बाकीच्या कुरापती सुरूच
> आहेत. अनुसूचित जमातीच्या यादीत नवीन अनुसूचित
> जमातींचा/गटांचा किंवा उपगट यांचा अंतर्भाव करणं,
> त्यात दुरुस्ती करणं किंवा एखाद्या गटास/उपगटास
> वगळण्याचा अधिकार हा राज्यघटनेने संसदेला दिला आहे.
> कोणत्याही राज्य सरकारला किंवा केंद्र
> सरकारला तो अधिकार नाही.
> राष्ट्रपती संसदेच्या मान्यतेशिवाय अधिसूचना जाहीर करू
> शकत नाही. या गोष्टींचा अभ्यास न
> करता एखाद्या समाजाला कसं गंडवलं जातं याचंच हे
> उदाहरण आहे. आधी ओबीसींमध्ये नंतर एन टी प्रवर्गात
> समावेश असताना अजून एस टी या प्रवर्गातच
> यांना कशाला घुसायचं आहे. तर त्यालाही कारण आहेच…
> आदिवासींमध्ये उच्च शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे.
> त्यामुळे अनुशेष राहतो. त्या अनुशेषावर या धनगर
> समाजाच्या नेत्यांचा डोळा आहे. त्यासाठीच
> हा एवढा सगळा खटाटोप चाललेला आहे. पण
> आता आदिवासी जागा होतोय. तो हे सर्व होऊ देणार
> नाही. आपल्याला महाभारतातील अंगठा कापून
> देणारा एकलव्य, भिल्ल माहीत असेल, इंग्रज
> सरकारला सळो की पळो करून सोडणारा तंट्या भिल्ल
> पण माहीत असेल. मात्र शांत
> समजला जाणारा हा समाज एकदा पेटून
> उठला की त्याला आवरणं कठीण जाईल हेही तितकंच
> खरंय… जे आदिवासींचं आहे ते त्यांचंच राहावं, त्यात
> वाटेकरी होऊ नये. आधीच त्यांच्याकडचं, त्याचं असलेलं
> येनकेनप्रकारे ओरबाडलं गेलंय. त्यात अजून धनगर
> समाजाची भर नको. धनगर
> समाजाची मागणी घटनाबाह्यच आहे. त्यामुळे
> त्यांनी दुसर्या कुठल्या मार्गाकडे जावं,
> आदिवासींच्या ताटातला घास हिसकावून घेऊ नये,
> अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आता आदिवासींमधून उमटू
> लागल्या आहेत. ही या दोन्ही समाजातील
> वादंगाची नांदी ठरू नये, एवढीच अपेक्षा…!
> - कुसूम भोईर
>  On 18 Aug 2014 07:15, "Deepak Gawali" <[email protected]> wrote:
>
>> आदिवासींनी आता हाती शस्त्र घेतले तर याला जबाबदार फक्त हे सरकार राहील
>> On 17-Aug-2014 7:02 PM, "Santosh Gedam" <[email protected]> wrote:
>>
>>> pfa a letter sent by NCP chief to PM supporting Dhangar Issue.
>>>
>>> --
>>> -----------------------------------------------------------------------
>>> Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for
>>> "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do
>>> it together!
>>>
>>> Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes):
>>> http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
>>>
>>> Learn More about AYUSH online at :
>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>> ---
>>> You received this message because you are subscribed to the Google
>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send
>>> an email to [email protected].
>>> To post to this group, send email to [email protected].
>>> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
>>> To view this discussion on the web visit
>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADnEKGzVLo2ib62XTzcsu_vHqvQKktLTvDiitmopUPyf0FC_yQ%40mail.gmail.com
>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADnEKGzVLo2ib62XTzcsu_vHqvQKktLTvDiitmopUPyf0FC_yQ%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>> .
>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>>
>>  --
>> -----------------------------------------------------------------------
>> Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for
>> "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do
>> it together!
>>
>> Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes):
>> http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
>>
>> Learn More about AYUSH online at :
>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>> ---
>> You received this message because you are subscribed to the Google Groups
>> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
>> email to [email protected].
>> To post to this group, send email to [email protected].
>> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
>> To view this discussion on the web visit
>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAK6z%3DxS8_u0kdT-TtSPbOfX4gDLovSzvZxuFFx-fAm53QJ55oA%40mail.gmail.com
>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAK6z%3DxS8_u0kdT-TtSPbOfX4gDLovSzvZxuFFx-fAm53QJ55oA%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>> .
>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>
>  --
> -----------------------------------------------------------------------
> Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for
> "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do
> it together!
>
> Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes):
> http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
>
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to [email protected].
> To post to this group, send email to [email protected].
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBvdg_9oHgzJ1VQmPsWqryUKQT%2BZWKP22MGrdfZHffAcDA%40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBvdg_9oHgzJ1VQmPsWqryUKQT%2BZWKP22MGrdfZHffAcDA%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
>
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for 
"Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it 
together!

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAE5trk-nKS4E_0xfQ6WGJDevqzT1wimWYaTRO3GV0FEmH742Pg%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to