On 27 Aug 2014 23:42, "AYUSH | Adivasi Yuva Shakti" <[email protected]> wrote:
> Sunil Khobragade wrote a new note: धनगर खरेच > आदिवासी आहेत काय ? > धनगर समाजाला आदिवासींच्या यादीत > समाविष्ट करून आरक्षण > देण्याची मागणी धनगर जातीकडून > जोरदारपणे करण्यात येत आहे. धनगरांकडून ऐन > निवडणुकीच्या तोंडावर > ही मागणी आक्रमकपणे करण्यात येत आहे तर > दुसरीकडे आदिवासी जमातींच्या नेत्यांनी > धनगरांच्या मागणीला तेवढ्याच पखरपणे > विरोध सुरुकेला आहे. निवडणुकीच्या तोंडावर > जाती-जातींमध्ये भांडणे लाऊन त्यावरुन > सत्तेचा सोपान चढणे हा महाराष्ट्रातील > मराठा सत्ताधारी आणि रा.स्व.संघ > संचालित, भाजप-शिवसेना या राजकीय > पक्षांचा जुना फंडा आहे. > येत्या विधानसभा निवडणुकीसाठी तो > पुन्हा वापरण्यात येत आहे.धनगरांची अनुसूचित > जमाती पवर्गात समाविष्ट > करण्याची मागणी व > त्याला आदिवासी नेत्यांकडून करण्यात येत > असलेला विरोध हा केवळ राजकीय > धिंगाणा आहे की खरेच > धनगरांची मागणी न्याय्य आहे > याची शहानिशा केली पाहिजे. > धनगरांची मागणी न्याय्य असेल तर > त्यांच्या घटनादत्त > अधिकारांची अंमलबजावणी सरकारने > करावी, म्हणून त्यांच्या पाठीशी उभे > राहिले पाहिजे.जर तसेच नसेल > आणि ही मागणी निव्वळ राजकीय हेतूतून > धनगरांची मते > मिळविण्यासाठी केलेला उपद्व्याप असेल तर > त्याचा सर्व स्तरातून विरोध होणे आवश्यक > आहे. > धनगरांच्या मागणीचे स्वरुप > धनगर आरक्षणाच्या मागणीबाबत > पसारमाध्यमातून जे काही पसिद्ध होत आहे, > त्यावरुन धनगर > समाजाला आदिवासींच्या यादीत > समाविष्ट करुन आरक्षण दिले पाहिजे, > यासाठी धनगरांचे आंदोलन सुरु > असल्याचा समज होतो. यासंदर्भात धनगर > समाजातील काही अभ्यासकांशी व धनगर > आंदोलनाच्या नेत्यांशी चर्चा केली असता, > त्यांच्या मागणीचे स्वरुप असे नाही हे स्पष्ट > झाले. धनगर जातीला महाराष्ट्रात > भटक्या जमाती (क) म्हणून 3.5 टक्के आरक्षण > देण्यात आलेले आहे. मात्र > त्यांना भटक्या जमाती म्हणून देण्यात आलेले > आरक्षण अमान्य आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार > महाराष्ट्रात धनगरांना अनुसूचित > जमातीचा समावेश अनुसूचित जमाती आदेश > 1950 नुसार तयार करण्यात > आलेल्या राज्यातील अनुसूचित > जमातीच्या यादीत अनुकमांक 36 वर > केलेला आहे. मात्र या अनुकमांकावर नमूद > केलेल्या ओरान, धनगड या नावामध्ये `धनगर' > ऐवजी `धनगड' असे चुकीने लिहिण्यात आले आहे. > हा `र' चा `ड' झाल्यामुळे > धनगरांना आदिवासी असल्याचे पमाणपत्र > मिळत नाही. म्हणून या यादीमध्ये `धनगड' > ऐवजी `धनगर' > अशी दुरुस्ती करावी अशी धनगरांची मुख्य > मागणी आहे. > धनगरांची मागणी न्यायोचित आहे काय? > भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 341 व अनुच्छेद > 342 नुसार अनुसूचित > जाती किंवा जमातीच्या यादीत > एखाद्या जातीचा समावेश करण्याची बाब > भारताच्या राष्ट्रपतीच्या अखत्यारित आहे. > याविषयी सर्वोच्च न्यायालयाने > वेळोवेळी दिलेल्या निर्णयात अनुसूचित > जाती व जमातीच्या यादीमध्ये काना, > मात्रा, अनुस्वार, स्वल्पविराम > असा कोणताही बदल करण्याचे अधिकार > कोणतेही न्यायालय अथवा राज्य > सरकारला नाही. > एखाद्या जातीचा समावेश, यादीतून नाव > वगळणे, नावात बदल करणे, काना, मात्रा, > अनुस्वार, स्वल्पविराम याची भर घालणे, > यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहात > विधेयक पारित करुन व त्यास > राष्ट्रपतीची मंजूरी घेऊन > असा कोणताही बदल करता येऊ शकतो. ए.एस. > नागेंद्र विरुद्ध कर्नाटक सरकार (2005 (10) > एस.सी.सी. (301)) या पकरणात सर्वोच्च > न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार > अनुसूचित जाती/जमाती आदेश 1950 > च्या परिशिष्टात नमूद यादीमध्ये > कोणताही बदल करावयाचा झाल्यास > त्यासाठीची शिफारस > करण्याचा अधिकार भारतीय > संविधानाच्या अनुच्छेद 338 अन्वये केंद्रीय > अनुसूचित जाती आयोग अथवा केंद्रीय > अनुसूचित जमाती आयोग यांनाच आहे. सन > 2008 मध्ये केंद्र सरकारने > आदिवासी जमातींच्या यादीमध्ये नवीन > जमातींची भर अनुसूचित जमाती धोरण अंतिम > झाल्यानंतर त्या धोरणानुसार > करण्याची घोषणा केली आहे. केंद्र > सरकारची ही घोषणा, सर्वोच्च > न्यायालयाचे निर्णय आणि भारतीय > संविधानातील तरतूद पाहता,`धनगड' > ऐवजी `धनगर' असा बदल करणे ही बाब राज्य > सरकारशी कोणत्याही पकारे संबंधीत > नाही.या पार्श्वभूमीवर धनगरांचे आंदोलन > न्यायोचित असल्याचे दिसत नाही. धनगरांचे > महाराष्ट्र सरकारच्या विरोधात सद्या सुरु > असलेले आंदोलन, मंत्र्यांना घेराव घालणे, काळे > फासणे या बाबी म्हणजे केवळ निवडणुकांचे > वातावरण > तापविण्यासाठी केलेला खटाटोप आहे. > एवढेच नव्हे तर भारतीय संविधान, सर्वोच्च > न्यायालय यांनी घालून दिलेल्या व्यवस्थेचे > उल्लंघन आहे,असे स्पष्ट होते. > अनुसूचित जमातींच्या यादीचा आधार > भारतामध्ये सामाजिक व शैक्षणिक > मागासलेल्या जातींसाठी ( > स्वातंत्र्यापूर्वी अस्पृश्य किंवा दलित > नावाने ओळखल्या जाणाऱया जाती) स्वतंत्र > यादी तयार करण्यात आली आहे.यास > अनुसूचित जातीची यादी म्हटले जाते. > अनुसूचित जातीच्या यादीत समाविष्ट > असण्याचा मुख्य आधार या जाती हिंदू धर्म > व्यवस्थेअंतर्गत अस्पृश्य असणे हा आहे. दुर्गम, > जंगली, भागात काही विशिष्ट भूभागात > वास्तव्य करणाऱया आणि मुख्य समाज > प्रवाहापासून वेगळी भाषा, संस्कृती, > चालीरीती असलेल्या समाज > समूहांची (स्वातंत्र्यापूर्वी आदिवासी, वन्य > जमाती, प्रीमिटिव्ह ट्राइब्स > इत्यादी नावाने > ओळखल्या जाणाऱया जाती) > वेगळी यादी तयार करण्यात आली आहे. > या यादीला अनुसूचित > जमातींची यादी म्हटले जाते. > अशा जमातींची संख्या सर्व राज्यात मिळून > जवळपास आठशे आहे. अनुसूचित > जमातीच्या यादीत समाविष्ट > असण्याचा मुख्य आधार > त्यांची जीवनपद्धती व वास्तव्याचे स्थान > हा आहे. ब्रिटिशांनी त्यांचे राज्य भारतात > स्थापित झाल्यानंतर विविध मानववंश > शास्त्रज्ञ व जनगणना विशेषज्ञ > यांच्यामार्पत भारतातील लोकसंख्येचे व सर्व > जातींचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाचे अहवाल > व तज्ञ अभ्यासकांनी संशोधन करुन लिहिलेले > ग्रंथ या आधारे डोंगराळ पदेशात, > जंगली भागात > राहणाऱया जमातीच्या विकासासाठी > तसेच त्यांची विशिष्ट > संस्कृती जपण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात > काही कायदे पारित > केले.यापैकी पहिला कायदा म्हणजे Scheduled > District Act - 1874,होय.या कायद्यानुसार > शेड्युल्ड्य एरिया निश्चित करुन > त्या पदेशावरील नियंत्रण थेट > गव्हर्नरच्या अखत्यारित राहिल, असे > निश्चित केले गेले.त्यानंतर माँटेग्यू- चेम्स्फर्ड > समितीने आदिवासींना सर्वसामान्य कायदे > लागू करुन त्यांच्यावर पशासन करणे अयोग्य > असल्याची शिफारस केली. यानुसार > Government Of India Act 1919, मध्ये > आदिवासींच्या संदर्भात विशेष > तरतूदी करण्यात आल्या. त्यानंतर 1931 > साली करण्यात > आलेल्या जनगणनेच्या वेळी तत्कालिन > जनगणना आयुक्त डॉ. जे. एच. हटन > यांनी आदिवासी जमातींची काही > वैशिष्ट्ये निश्चित करुन ती वैशिष्ट्ये > असलेल्या व ठराविक कसोट्या पूर्ण > करणाऱया लोकसमुहांची वेगळी जनगणना केली > व त्यांना`आदिम' जमाती असे नाव दिले. डॉ. > हटन यांनी निश्चित > केलेल्या कसोट्यांच्या आधारे आदिम > जमाती म्हटल्या गेलेल्या जमातींचा समावेश > Government Of India Act 1935 , Excluded and Partly > Excluded Areas Order under the Government of India > Act, 1935 ( Scheduled Tribes Order 1936 ) मध्ये > करण्यात आला. या जमाती म्हणजेच > आताच्या आदिवासी किंवा अनुसूचित > जमाती होत. ब्रिटिशांनी तयार केलेले > कायदे व शासकीय आदेशांच्या आधारे > आताचा अनुसूचित जमाती आदेश 1950 तयार > करण्यात आलाआहे. अनुसूचित > जमातींच्या यादीचा मुख्य आधार Excluded > and Partly Excluded Areas Order under the Government > of India Act, 1935 ( Scheduled Tribes Order 1936 ) > हा आहे. > आदिवासी जमात असण्याच्या किमान > अटी कोणत्या? > स्वातंत्र्यपूर्व काळात भारतात > राहणाऱया आदिम जमातींच्या यादीत > कोणत्या जातींचा समावेश > करावा यासाठी त्या जमाती आदिम > (primitive) असणे ही मुख्य अट होती. 1931 > च्या जनगणनमध्ये तत्कालीन जनगणना आयुक्त > डॉ. जे.एच.हटन यांनी आदिम जमात म्हणून > ज्या जमातींचा उल्लेख करण्यात > येतो त्यांना आदिमपणाच्या खालील तीन > कसोट्या लावल्या होत्या 1) > अशा जमाती ज्यांचे वास्तव्य परंपरेने > डोंगराळ, जंगली, दुर्गम भागात आहे. 2) > अशा जमाती ज्या डोंगराळ, जंगली,दुर्गम > भागात वास्तव्य करीत नाहीत परंतु > ज्या बहुसंख्य समाज > समुहापेक्षा वेगळ्या पद्धतीने जीवनयापन > करतात. ज्यांच्या परंपरा मुख्य समाज > प्रवाहातील लोकांपेक्षा वेगळ्या आहेत.जे > मुख्य समाजधारेत एकजीव न होता स्वतंत्र > संस्कृतीचे पालन करतात. 3) > अशा जमाती ज्या कोणत्याही > मान्यताप्राप्त धर्माचे परंपरेने पालन करीत > नाहीत. त्यांचा स्वत:चा आदिम धर्म > किंवा धार्मिक > समजुती आहेत.या कसोट्याच्या आधारे 1931 > च्या जनगणनेत आदिम जमात म्हणून समाविष्ट > करण्यात आलेल्या लोक समूहांचा समावेश > Scheduled Tribes Order 1936 मध्ये करण्यात आला व > त्यांच्या उन्नतीसाठी विशेष > तरतुदी करण्यात आल्या. या यादीत > आणखी काही जमातींचा समावेश करून > Scheduled Tribes Order 1950 ही अनुसूचित > जमातींची यादी तयार करण्यातआली. 1953 > साली आंध्र प्रदेश राज्याची व1956 > साली मध्यपदेश > राज्याची निर्मिती झाली. राज्य > पुनर्रचना आयोगाच्या शिफारशीनुसार 1960 > साली महाराष्ट्र, गुजरात व त्यानंतर पंजाब > आणि हरियाणा राज्याच्या निर्मितीनंतर > अनेक जातीसमुह आपला समावेश अनुसूचित > जाती किंवा अनुसूचित जमातीमध्ये करावा, > अशी मागणी करू लागले. यामुळे > या प्रश्नाचा निकाल लावण्यासाठी केंद्र > सरकारने 1 जून 1965 च्या आदेशान्वये बी.एन. > लोकूर > यांच्या अध्यक्षतेखाली एका त्रिसदस्यीय > समितीची स्थापना केली.या समितीने अनेक > संस्था, सामाजिक संगठना, स्वतंत्र नागरिक, > संसद सदस्य, विधिमंडळ सदस्य यांच्याकडून > निवेदने मागवून जवळपास 800 जातीसमुहांचे > दावे तपासले. यानंतर आपला अहवाल > सरकारला सादर केला.महाराष्ट्रातील धनगर > समाजाच्या संगठनेने > अथवा प्रतिनिधींनी त्यांच्याजातीचा > समावेश अनुसूचित जाती किंवा जमातींमध्ये > व्हावा यासाठी लोकूर > समितीला त्यावेळीनिवेदन सादर केलेले > नाही. लोकूर समितीने > एखाद्या लोकसमूहाला आदिवासी > समजण्यासाठी कोणते निकष असावेत > यासंदर्भात पुढीलप्रमाणे शिफारस > केली आहे.`1931 ची जनगणना व 1935 > चा कायदा व त्यानुसार तयार करण्यात > आलेली आदिम जमातींची यादी यामध्ये > मुख्यत: जमातीचे आदिमत्व यावर भर देण्यात > आला आहे. 1950 चा अनुसूचित > जमाती अध्यादेश व त्यात 1956 > साली केलेली सुधारणा यामध्ये > आदिमपणा सोबतच जमातीचे मागासलेपण > विचारात घेण्यात आले आहे. > ही समिती एखाद्या लोकसमूहाला > आदिवासी समजण्यासाठी त्यांचे आदिमत्व, > पृथगात्म संस्कृती, वास्तव्याचा भौगोलिक > वेगळेपणा, प्रगत समाजामध्ये > मिसळण्या विषयीचा बुजरेपणा आणि > मागासलेपणा या बाबींचा प्रामुख्याने > विचार करावा अशी शिफारस करते.' > ज्या जमाती प्रगत समाजाच्या सतत > संपर्कात येउन या समाजाची संस्कृती स्वीकृत > केली आहे अशा जमातींना अनुसूचित > जमातींच्या यादीत समाविष्ट करू नये > अशी शिफारस लोकूर समितीने केली आहे. > (पृ.क्र.7 लोकूर समिती अहवाल)लोकूर > समितीने अनेक राज्यातील काही जाती व > जमातींना यादीतून वगळण्याची शिफारस > कारणासहित केली आहे. महाराष्ट्रात > अनुसूचित जमातीच्या यादीत अनुक्रमांक 36 > वर नमूद असलेल्या ओरान/ओरांव,धनगड > जमातीची लोकसंख्या 1961 च्या जनगणनेत > केवळ 1 इतकी आहे. यामुळे या जमातीचे > अस्तित्व महाराष्ट्रात नाही. > या कारणास्तव ओरान/ओरांव, धनगड > जमातीला महाराष्ट्रातील अनुसूचित > जमातीच्या यादीतून वगळण्याची शिफारस > केली होती. लोकूर समितीच्या बहुतांश > शिफारशी सरकारने स्वीकारल्या. > त्यानुसार Scheduled castes order 1950 व Scheduled > Tribes order 1950 मधून काही जाती व > जमातींना वगळण्यात आले व > काही जाती जमातींचा नव्याने समावेश > करण्यात आला.महाराष्ट्राच्या पूर्व > भागाला (तत्कालीन भंडारा,चंद्रपूर व नागपूर > जिल्हा) लागून असलेल्या मध्यप्रदेश व > त्यालगतच्या ओरिसा राज्यातओरान/ > ओरांव, धनगड > जमातींची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात > आहे. ओरान/ओरांव, धनगड जमातीचा मुख्य > व्यवसाय सालकरी किंवा सालगडी म्हणून > शेतावर राबणे हा असल्यामुळे या राज्यातून > या जमातीचे लोक लगतच्या महाराष्ट्र > राज्यात स्थलांतरित होऊन > महाराष्ट्राच्या सदर सीमा भागात > स्थायिक होत असतात. हे लक्षात घेऊन > महाराष्ट्राच्या यादीतून ओरान/ओरांव, > धनगड या जमातीला वगळण्यात येऊ नये, > अशी मागणी काही खासदारांनी संसदेत > केली. यामुळे > या जमातीला महाराष्ट्राच्या अनुसूचित > जमातीच्या यादीतून त्यावेळी वगळण्यात > आले नाही. > धनगर जात ओरान/ओरांव, धनगड > जमातीचा भाग आहे काय? > धनगर जात ओरान/ओरांव,धनगड जमातीचेच दुसरे > नाव आहे किंवा धनगड आणि धनगर यात फक्त > उच्चाराचाच फरक आहे > या धनगरांच्या दाव्याला कोणताही > ऐतिहासिक, संशोधनात्मक > अथवा भौगोलिक परिस्थितीजन्य आधार > नाही.धनगर जातीचा हा दावा म्हणजे > अनुसूचित > जातीच्या सवलती मिळविण्यासाठी ओढून- > ताणून केलेली शुद्ध बनवाबनवी आहे. धनगर जात > परंपरेने मेंढपाळ व्यवसाय करणारी जात > आहे.भारतामध्ये मेंढपाळाचा व्यवसाय > करणाऱया जातींचे प्रादेशिकत्वानुसार तीन > भागात वर्गीकरण केलेले आहे. 1) उत्तर > भारतातील मेंढपाळ जाती (गडरीया, पाल, > नाबर, कंचन, गैरी, गैरा,गायरा) यांच्या एकूण > 84 उपजाती आहेत 2) तत्कालीन मुंबई प्रांत, > वऱहाड व पश्चिम भारतातील मेंढपाळ > जाती (अहिर, धनगर, धेनुगर, गावडा इत्यादी) > 3) द्रविडी किंवा दक्षिण भारतातील > मेंढपाळ जाती (कुरुमवार, कुरमार, कुरुबा, > कुरुंबा) यापैकी महाराष्ट्रातील मेंढपाळ > जातीना धनगर या नावाने संबोधले जाते. > महाराष्ट्रातील धनगरांचे > त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणानुसार 1) > अस्सल धनगर (पुणे व पश्चिम महाराष्ट्र ) 2) > मराठे धनगर (पश्चिम महाराष्ट्र, > खानदेश,मराठवाडा व पश्चिम > विदर्भाचा पदेश) 3) डांगे धनगर (गुजरातमधील > डांग विभाग व सह्याद्रीघाट आणि कोकण > विभाग) असे मुख्य पोटभेद आहेत. > व्यवसायाच्या आधारे > त्यांच्या साडेबारा पोटजाती अशा ः- > हाटकर, शेगर, सनगर, थिलारी/खिलारी, > अहिर, बारगे/बारगीर/बांडे धनगर,गाडगे, कनगर, > खुटेकर, लाड धनगर, मेंढे धनगर, उतेगर, खाटिक > (अर्धी जात). (The Tribes and Castes of Bombay, > Volume 1 By Reginald E. Enthoven he.314-315 ) > या साडेबारा जातींमध्ये कोठेही ओरान / > ओरांव /धांगड यानावाचा उल्लेख नाही. > अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट > असलेल्या ओरान/ओरांव/धांगड > जमातीच्या चालीरीती, संस्कृती, > बोलीभाषा व महाराष्ट्रातील धनगर > जातीची चालीरीती, संस्कृती, > बोलीभाषा यामध्ये कोणतेही साम्य > नाही.ओरान/ओरांव /धांगड जमात इंडो- > द्रविडीयन समूहातील जमात > आहे.या समूहातील > मुंडा,संथाल,हो,खारीया या आदिवासी > जमातींशी ओरान /ओरांव /धांगड > या जमातीचे साधर्म्य आहे.या जमातीचे मूळ > वसतीस्थान छोटा नागपूरचे पठार व > दंडकारण्याचा भाग > होय.या जमातीची `कुरुख'नावाची स्वतंत्र > बोलीभाषा आहे. ओरान /ओरांव /धांगड > या जमातीचा स्वतंत्र धर्म आहे. ज्याला ते > सरण धर्म म्हणतात.याचे सर्वोच्च दैवत धरमेश > (महादेव) आहे. तर सर्वोच्च > देवता छालापाचोदेवी आहे.ओरान /ओरांव / > धांगड जमात पांढरा रंग पवित्र मानते. ते साल > वृक्षाची पूजा करतात.यांच्या > पुजास्थानाला सरण स्थळ किंवा जाहेर > या नावाने ओळखले > जाते.यांच्या युवागृहाला`धुम्कुडिया/ > धुमकुटीया/धांगडिया' असे नाव आहे ( Tribes > and castes of central India,volume 4 पृष्ठ. 299-321) > यांच्या सर्व धार्मिक समारंभ व > पूजाविधीमध्ये पांढऱया रंगाची फुले, > पांढऱया बोकडाचा बळी देणे, > पांढऱया वस्तूचा पसाद वाटणे > अशा पथा पाळल्या जातात. > या जमातीचा पुजारी पांढरी वस्त्र धारण > करतो.त्यास मुंडा असे नाव > आहे.या जमातीचा मुख्य व्यवसाय > सालकरी किंवा सालगडी म्हणून > वर्षभराच्या कराराने शेतीमध्ये > राबणे,शेतमजूरी करणे हा आहे. > वर्षभराच्या कराराने काम > करणाऱया शेतमजुरांना रोख > रक्कमेऐवजी `धान' (कोंडा न काढलेला भात) > मजुरी म्हणून देण्याची पथा आहे.त्यामुळे > धानासाठी काम करणारे ते `धांगड' > या अर्थाने या जमातीला`धानगड/धांगड' > असे नाव देण्यात आले आहे. (Tribes & Castes Of > North Western India - W.Crooke - पृष्ठ. 263-264) > ओरान/ओरांव/धनगर/धांगड जमात मध्यपदेश, > छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्र,पश्चिम बंगाल > या राज्यांमध्ये अनुसूचित > जमातीच्या यादीमध्ये समाविष्ट आहे. > या राज्यांमध्ये असलेली जमात मुलत: > छोटा नागपूरच्या पठारावरुन इतर > राज्यांमध्ये स्थलांतरीत > झाली असल्याचा निष्कर्ष अनेक मानववंश > शास्त्रज्ञांनी तसेच आदिम > जाती अभ्यासकांनी संशोधनातून > काढला आहे. > इतर राज्यातील धनगर/धनगड व > महाराष्ट्रातील धनगर यांच्यातील फरक > धनगर अथवा धनगड ही जात अनेक राज्यांमध्ये > अनुसूचित जातींच्या यादीमध्ये समाविष्ट > आहे. बिहार,झारखंड, पश्चिम बंगाल > या राज्यांमध्ये ही जात डोम > जातीच्या समानार्थी जात > समजली जाते.डोम जातीचा मुख्य व्यवसाय > मृत व्यक्तीला जाळण्यासाठी लागणारी > लाकडे फोडणे व स्मशानातील > व्यवस्था पाहणे हा आहे.या राज्यांमध्ये > असलेली धनगड जात मृताचा सांगावा सांगणे, > शेताची राखण करणे,शेतामध्ये सालगडी म्हणून > राबणे हा मुख्य व्यवसाय करते. उत्तर पदेश तसेच > उत्तराखंड राज्यात धनगर जमात अनुसूचित > जातींमध्ये समाविष्ट आहे.या राज्यातील > मेंढपाळाचा व्यवसाय > करणाऱया गडरीया जातीच्या लोकांनी > धनगर ही गडरीया/पाल जातीची पोटजात > आहे, असा दावा करुन अनुसूचित जातीमध्ये > समाविष्ट > करण्याची मागणी केली होती.धनगर > या इंग्रजीतील शब्दाचा हिंदी अनुवाद > धनगड असा करण्यात येत असल्यामुळे धनगर > आणि धनगड हे एकच जातीसमुह > आहेत.यासाठी जातीचा उल्लेख धनगड म्हणून > असला तरी त्यांना अनुसूचित जातीचे > पमाणपत्र देण्यात > यावे,अशीही मागणी गडरीया/पाल > जातींनी केला होता. यासंदर्भात अखिल > भारतीय धनगर समाज महासंघाने अल्हाबाद > उच्च न्यायालयात रिट याचिका क. > 40462/2009 दाखल > केली होती.या याचिकेचा निकाल 14 > मार्च, 2012 रोजी लागला. या निकालात > अनुसूचित जातीत समाविष्ट असलेले धनगर व > महाराष्ट्रातील धनगर हे एकमेकांपासून भिन्न > जातीसमुह असल्याचे स्पष्ट केले आहे. बिहार, > झारखंड, प.बंगाल, उत्तर पदेश, उत्तराखंड > या राज्यांमध्ये वास्तव्य करणाऱया धनगर > जातींना अस्पृश्य समजण्यात येते. > या राज्यातील धनगर जातींचा मुख्य > व्यवसाय शेळी-मेंढी पालन करणे हा नाही. > महाराष्ट्रातील धनगर जातीला अस्पृश्य > समजण्यात येत नाही.हे पहाता इतर > राज्यातील अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट > असलेले धनगर व महाराष्ट्रातील धनगर > या जाती एकमेकांपासून पूर्णत: > वेगळ्या असल्याचे सिद्ध होते. > एखाद्या जातीला किंवा जमातीला > अनुसूचित > जातीच्या किंवा जमातीच्या यादीत > समाविष्ट करणे ही बाब भारतीय > संविधानानुसार संसदेच्या अखत्यारीत > आहे.धनगरांनी आपली मागणी केंद्र > सरकारला पटवून दिल्यास केंद्र सरकार राज्य > सरकारचे मत मागवून त्यावर निर्णय घेऊ शकते. > यामुळे धनगरांनी त्यांचा अनुसूचित > जमातीच्या यादीत समावेश > करण्याच्या किंवा त्यांना ओरांन, धनगर > या अनुसूचित जमातीच्या समकक्ष > समजण्याच्या मागणीचा पाठपुरावा केंद्र > सरकारकडे करावा. केंद्र सरकारने > धनगरांची मागणी तत्वत: मान्य करून राज्य > सरकारचे मत मागविल्यास त्यावेळी राज्य > सरकारने जर प्रतिकूल मत दिले तर मात्र राज्य > सरकारशी संघर्ष > करावा.अन्यथा या मागणीच्या पाठी > निव्वळ राजकीय हेतू आहे असे समजावे लागेल. www.jago.adiyuva.in > > -- > ----------------------------------------------------------------------- > Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for > "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do > it together! > > Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): > http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 > > Learn More about AYUSH online at : > http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to [email protected]. > To post to this group, send email to [email protected]. > Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit > https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBvfXn%3DMb0_ujbh8TizOLk61J7L2iTcf07zXz26EpJvLAA%40mail.gmail.com > <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBvfXn%3DMb0_ujbh8TizOLk61J7L2iTcf07zXz26EpJvLAA%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> > . > For more options, visit https://groups.google.com/d/optout. > -- ----------------------------------------------------------------------- Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it together! Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAH3ejSmnO-DSF35JNuK1BYryKCTe_-90q_%2Biokm7U7x61P7BNA%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

