On Wednesday, September 10, 2014 8:46:38 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva
Shakti wrote:
>
>
>
> 'पेसा'ची काटेकोर अंमलबजावणी करा
> केंद्रातील वाजपेयी सरकारच्या काळात संमत करण्यात आलेल्या पेसा कायद्याच्या
> अंमलबजावणीसाठी अठरा वर्षे लागली. आदिवासींना हक्क मिळवून देण्यासाठी संमत
> करण्यात आलेल्या या कायद्याची प्रभावी व काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे,
> असे प्रतिपादन राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी डहाणू केले.
>
> आदिवासी दुर्गम भागातील आरोग्य, शिक्षण, रोजगार, दळणवळण, पाणी इत्यादी सुविधा
> व वनहक्क कायद्याची अंमलबजावणी यासंबंधीचा आढावा घेण्यासाठी राज्यपालांनी
> पालघर जिल्ह्यातील डहाणू भागाचा एक दिवसाचा दौरा केला. त्यांच्या सोबत आदिवासी
> व पाणलोटक्षेत्र विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित, खासदार चिंतामण वनगा, कोकण
> महसूल आयुक्त राध्येश्याम मोपलवार, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, जिल्हा
> परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, पोलिस अधीक्षक महमद हक
> होते.
>
> आधीच्या राज्यपालांनी प्रशासनामार्फत राज्यातील वनहक्क पट्टेधारकांना जमिनी
> ताब्यात देण्यासाठी अतिशय उत्तम कामगिरी केली असल्याचा उल्लेख करून त्याचा लाभ
> येथील सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. जमीन, पाणी, शेत,
> शिक्षण, आरोग्य इत्यादी प्रष्न सोडविण्यासाठी एनजीओ सामाजिक संघठनांची मदत
> घेतली जाईल असेही त्यांनी सूचित केले. यावेळी राव यांच्या हस्ते प्रातिनिधीक
> स्वरूपात आदिवासींना त्यांच्या वनहक्कपट्टयाच्या जमिनींचे सातबारा उतारे व
> शेती औजारांचे वाटप करण्यात आले.
>
> सौराष्ट्र एक्स्प्रेसने मंगळवारी सकाळी त्यांचे डहाणू स्टेशनला आगमन झाले.
> त्यानंतर आशागड येथील शांती सेवा संस्थेच्या कन्या शाळेला भेट देऊन तेथील
> विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या आहाराबद्दल
> चौकशी करताना निधीअभावी पूरक आहार देण्यात येत नसल्याचे आढळून आल्यावर त्यांनी
> आश्चर्य व्यक्त केले. अंगणवाडी केंद्राला भेट देऊन तेथील कुपोषित बालकांची
> माहिती घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन माता व बालरूग्णांची विचारपूस
> केली.
>
>
> http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/RAO/articleshow/42117896.cms
>
>
>
> AYUSHonline team
> www.adiyuva.in
>
>
--
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for
"Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it
together!
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes):
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/bf273329-1d4a-41d9-a48f-e5a58a32a6bb%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.