On Saturday, September 20, 2014 6:46:51 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva
Shakti wrote:
>
>
>
> खरच तुम्ही आदिवासी आहात ? कि फक्त सवलती पुरते? कि फक्त प्रमाण पत्रासाठी या
> मातीतील आम्ही आदिवासी, म्हणजे पूर्वी पासून राहत असलेली निवासी …. येथील
> पारंपारिक ग्रंथात आदिवासींचा उल्लेख नाही, इतिहासात उल्लेख हि नाही. कहर
> म्हणजे स्वतंत्र भारताच्या संविधानात "आदिवासी" शब्दच नाही. शालेय
> अभ्यासक्रमात आदिवासी परंपरा आणि संस्कृती नाही. आदिवासी समाजाचे पारंपारिक
> ज्ञान आणि सांस्कृतिक ओळख ठराविक पद्धतीने नष्ट होते आहे. आदिवासी बोली भाषा
> तर शेवटचा श्वास घेत आहेत. आदिवासी बहुल भागात हि सगळ्या जमिनी बिगर
> आदिवासींच्या नावावर. सगळे व्यवसाय आणि रोजगार बिगर आदिवासींच्या हातात. आश्रम
> शाळा आदिवासी हिता साठी नसून बिगर आदिवासी अधिकार विकास साठी. आदिवासी
> समाजाच्या चळवळी आणि संघटना राजकीय स्वार्थ साठीचे दुकाने. आदिवासी राजकारणी
> म्हणजे राखीव जागामुळे नाईलाजाने बसवलेले मुके बाहुले. आणि आता तर आम्ही मूळ
> मूळ म्हणून बिगर आदिवासींच्या संघटना आदिवासींना धडे शिकवत आहेत. सरकारी
> नोकऱ्या बोगस आदिवासींनी पळवल्या. आता आदिवासींची जमात चोरी होतेय. संयुक्त
> राष्ट्रात भारत काधी बोलातो आमच्या देशात आदिवासीच नाही कधी बोलतो ये देशातले
> सगळे आदिवासी आहेत. आम्हाला आदिवासी संस्कृती आणि इतिहासा पासून ठराविक
> पद्धतीने लांब नेवून याचा जय आणि त्याचा जय (सगळे बिगर आदिवासी) करवले जाते
> आहे…. अजून काय काय बघायला मिळेल कोण जाणे… संपवून टाका हा आदिवासी नावाचा
> प्राणी आणि घेवुन टाका सगळी सम्पती (जमीन / जंगल / खनिज / वायू / इ) असे हि एक
> एक करून नक्षलवादी सांगून संपवत आहातच… आता कुठे पेसा कायद्याची ची अंमलबजावणी
> आणि स्थानिक नोकर भरती (फक्त क आणि ड वर्ग) अंमलबजावणी ची घोषणा केली तर काय
> यांच्या पोटात कळा आल्या … हजारो वर्ष पासून आदिवासींनी खूप सहन केलेय, आणि
> अजून हि करतो आहे. पण आदिवासींचा या सहनशीलतेचा अंत बघू नये. आदिवासी संस्कृती
> आणि परंपरा या जगाला उत्कृष्ट उदाहरण आहे जर निसर्ग वाचवायचा,
> बायोदायवार्सिती, शांतात, एकात्मता आणि समानता याचे उदाहरण आहे. पण जावूदेत आज
> तर आदिवासी स्वतः पण आदिवासी संस्कृती विसरतोय याहून दुर्दैव ते काय… जरूर
> शांत राहून विचार करावा. आपण कोणते आदिवासी आहात ? प्रमाणपत्र वाले ? सवलती
> वाले? नोकरीवाले? राखीव जगावाले ? …. *कि आदिवासी संस्कृती जतन करून आदिवासी
> परंपरा पुढच्या पिढीत रुजवून आदिवासी एकात्मते साठी प्रयत्न करणारे?*
> www.jago.adiyuva.in
>
--
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for
"Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it
together!
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes):
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/62ec54ca-2f0d-4f85-8749-9668ba6737c1%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.