[email protected]

On 9/27/14, चेतन   Chetan <[email protected]> wrote:
> तयारी भौतिकशास्त्राची
>
> http://maharashtratimes.indiatimes.com/career/Physics/articleshow/43430838.cms
>
>>>प्रा. भालचंद्र भोमे
>
> बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी भौतिकशास्त्र अर्थात फिजीक्स म्हणजे अनेकांना
> कठीण जाणारा विषय. या विषयाची तयारी कशी करावी याबद्दल काही सोप्या टिप्स.
>
> दहावीला चांगले मार्क मिळाल्यावर अनेकजणं अकरावी सायन्सला प्रवेश घेतात.
> बहुसंख्यांना इंजिनिअरींग अथवा मेडिकलला जायचं असतं. इयत्ता ११ वी, १२ वी साठी
> शास्र शाखेत मंडळाच्या नियमानुसार भौतिकशास्र विषय जरी अनिवार्य नसला तरी
> व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेताना भौतिकशास्र विषय अनिवार्य आहे.
> गेल्या अनेक वर्षांच्या निकालावरून असं दिसतं की या विषयात विद्यार्थ्यांना
> कमी गुण मिळतात. त्याचं मुख्य कारण म्हणजे संकल्पना समजावून न घेता पाठांतरावर
> जोर देणं. त्यासाठी विषयाची तयारी कशी करावी, कोणकोणत्या गोष्टी माहित असणं
> आवश्यक आहे.
>
> भौतिकशास्र विषयाची प्रश्नपत्रिका ७० गुणांची व ३ तासांची असून
> प्रात्यक्षिकांसाठी (परीक्षेसाठी ) ३० गुण असतात. गुणनिहाय विभाजनानुसार
> प्रश्नपत्रिकेत एकूण ८ प्रश्न विचारलेले असतात. प्रश्नपत्रिकेतील ७० गुणांची
> विभागणी ज्ञान, आकलन, उपयोजन व कौशल्य यावर आधारित असून त्यामध्ये वस्तुनिष्ठ,
> लघुत्तरी व दीर्घोत्तरी प्रश्न विचारलेले असतात. प्रश्नपत्रिका विकल्पासह एकूण
> ९८ गुणांची असते. पाठ्यपुस्तकातील प्रत्येक घटकावर गुणविभागणीनुसार प्रश्न
> विचारलेले असतात. विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना घटकांसाठी ठेवलेल्या गुणांचा
> विचार न करता प्रत्येक घटकातील, प्रत्येक उपघटकांवर आधारित संकल्पनेचा
> बारकाईने अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिकेतील सर्व
> विचारलेल्या प्रश्नांची (विकल्पासह) उत्तरे योग्य पद्धतीने लिहिता येतील आणि
> स्पर्धात्मक परीक्षेसाठी फायदा होईल.
>
> इंजिनिअरिंग शाखेत प्रवेश घेण्यासाठी इ. १२ वीचं भौतिकशास्र, रसायनशास्र व
> गणित या विषयांचे गुण विचारात घेतलं जात असल्याने मंडळाच्या परीक्षेचं महत्त्व
> वाढलेलं आहे. भौतिकशास्र हा विषय पाठांतर करण्याचा नसून संकल्पना समजावून घेऊन
> त्यावर विचार करण्याचा आहे. विद्यार्थी संकल्पना समजावून न घेता परीक्षा देतात
> आणि मग त्यांना हा विषय अवघड वाटतो. प्रत्येक विद्यार्थ्यांची संकल्पना
> समजावून घेण्याची क्षमता सारखी नसते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला
> अभ्यासासाठी वेगवेगळा वेळ लागतो.
>
> भौतिकशास्र विषयाची तयारी करताना प्रत्येक घटकातील नियम, तत्त्वं, व्याख्या,
> संकल्पनांच्या आधारे तयार झालेली सूत्रं, आकृत्या यांची यादी तयार करावी.
> प्रत्येक घटक वर्गात शिकविण्यापूर्वी पाठ्यपुस्तकातून (समजला नाही तरीसुद्धा)
> वाचून जावा. पाठ्यपुस्तकातील प्रत्येक पानाचं सखोल वाचन किमान एकदा तरी होणं
> अपेक्षित आहे. सखोल वाचन झाले असेल तरच, प्रश्नपत्रिकेतील वस्तुनिष्ठ
> प्रश्नांची कमी वेळात योग्य उत्तरं देता येतात. वस्तुनिष्ठ प्रश्नांसाठी
> प्रत्येकी साधारण एक मिनिट पुरेसा असतो. प्रत्येक घटकातील संकल्पना समजावून
> घेतल्यानंतर त्यावर उपयोजनाच्या बाबतीत विचार करावा. प्रत्येक सूत्र सिद्ध
> करण्याची पद्धती (पुस्तकातून न पाहता) लिहून पहावी व त्यासाठी लागणारा वेळ
> प्रश्नांसाठी ठेवलेल्या गुणांच्या आधारे असावा (साधारणपणे १ गुणासाठी ३
> मिनिटे). अशा पद्धतीने सराव करीत असताना ज्या पायऱ्या लिहिता येणं शक्य नाही
> तेवढ्या पुस्तकात पाहण्यास हरकत नाही. प्रत्येक घटकातील सर्व आकृत्या योग्य
> प्रकारे, योग्य वेळेत काढता येतात की नाही याचा सराव करावा. आकृत्या काढून
> झाल्यानंतर पाठ्यपुस्तकात पाहून स्वतः तपासाव्यात व योग्य ती दुरुस्ती
> (असल्यास) करावी. संकल्पना समजल्यानंतर गणितं सोडवणं अतिशय सोपं असतं. गणित
> सोडवण्याचा सराव करण्यापूर्वी पुस्तकात सोडवून दाखवलेली सर्व गणितं समजावून
> घेऊन वाचावीत. दिलेल्या व विचारलेल्या राशींचा संबंध असलेल्या सुत्राचा विचार
> करावा. दिलेल्या सर्व राशींची एककं एकाच पद्धतीत आहेत याची खात्री करावी
> अन्यथा एकाच पद्धतीत प्रतीयोजन करण्यापूर्वी रुपांतरीत करावीत. सुत्र जुळत
> असल्यास किंमती घालून लॉग - टेबलच्या (आवश्यक असल्यास) सहाय्याने उत्तर काढावं
> व योग्य ते एकक लिहावं. एकक नसल्यास लिहू नये. सुत्रांआधारे सामग्री बरोबर
> जुळत नसल्यास संबधित सुत्रं एकत्र करून नवीन सुत्र तयार करावं जेणेकरून दिलेली
> व विचारलेली आधारसामग्री जुळेल. सुत्रे एकत्र करताना असं पहावं की न दिलेली व
> न विचारलेली राशी नवीन सुत्रात नसेल.
>
> ज्या संकल्पना बारावीत समजायला कठीण जातील त्या अकरावीतच जास्त जोर देऊन समजून
> घ्या. अशा पद्धतीचा अभ्यास प्रत्येक घटकाच्या बाबतीत करणं अपेक्षित आहे.
> दिवसाच्या वेळापत्रकात सर्व विषयांना वेळ देणं आवश्यक आहे तरी सुद्धा भौतिक
> शास्राची तयारी कमी पडत असेल तर अभ्यासाचा जास्त वेळ याच विषयाला द्यावा.
> पाठ्यपुस्तकातील प्रत्येक उपघटकांची तयारी करीत असताना पूर्वी तयार केलेले घटक
> / उपघटक यांची आवश्यकतेप्रमाणे उजळणी करावी.
>
> इ. १२ वीच्या परीक्षेची काठीण्यपातळी स्पर्धात्मक परीक्षेएवढी नसल्याने
> जास्तीत जास्त गुण मिळवणं सहज शक्य असतं. इ. १२ वीच्या परीक्षा सर्व
> विद्यार्थ्यांसाठी असते तर स्पर्धात्मक परीक्षा सर्वांना अनिवार्य नसते.
> पाठ्यपुस्तकात दिलेल्या वेबसाईटस रून थोडी जास्त प्रमाणात माहिती करून घेण्यास
> हरकत नाही. १५ सप्टेंबर २०१४ पर्यंत काही घटकांची तयारी पूर्ण झालेली असेल तरी
> ३१ डिसेंबर १०१४ पर्यंत सर्व घटकांची तयारी झालीच पाहिजे अशा पद्धतीने अभ्यास
> करावा. सर्व तयारी झाल्यानंतर प्रश्नपत्रिका वेळेत सोडविण्याचा सराव
> अत्यावश्यक आहे. वरील प्रमाणे तयारी केल्यास इ. १२वी भौतिकशास्त्र विषयात
> पूर्ण गुण मिळतील याची खात्री बाळगण्यास हरकत नाही.
>
> --
> चेतन व. गुराडा.
> Chetan V. Gurada.
>
> Assistant Professor,
> University Department of Physics (Autonomous),
> University of Mumbai
> Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
> mobile - 9869197376
> e-mail: [email protected]
>            [email protected]
>
> --
> -----------------------------------------------------------------------
> Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for
> "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do
> it together!
>
> Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes):
> http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
>
> Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to [email protected].
> To post to this group, send email to [email protected].
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2RYSkva%3DZ9UxK0A%2Bcf6EM07x7BKj%3D0DizmLNqK%3Dkk-Zpw%40mail.gmail.com.
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for 
"Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it 
together!

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHoBB0AirTgE5FccQp449V%3DwfRiCM_b_3zH_3R2oOsiTFpEBkw%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to