On Thu, 20 Nov 2014 21:03:05 +0530 AYUSH Adivasi Yuva Shakti wrote >
आदिवासी वारलखंड जनांदोलनकोचाई,सुत्रकार,आमगाव,बोरमल या गावातुन हायवोल्टेज विज वाहिनी टॅावर व सुपर फास्ट हायवे साठी आदिवासी जमीनी ताब्यात घेण्यासाठी नोटिस आली आहे,हायवोल्टेज विज वाहिनी टॅावरचे काम कसेतरी कुर्झे गावात थांबवले आहे पण सरकारी दबाव फार आहे,फार दिवस हे काम थांबवता येईल असे वाटत नाहीं,पोलिस स्टेशन,तहसीलदार पासुन कलेक्टर पर्यंत सर्वांना निवेदन दिले चर्चा केली प्रत्येकजण आश्वासन देतात,पण सरकारी माणसे असल्याने सरकारी काम पुर्ण करण्यासाठीच काम करतात,आदिवासींच्या बाजुने कायदा असुनही त्याचा विचारकेला जात नाहीं,सुपरफास्ट हायवे,नाशिक हायवे, NH8 रुंदिकरण,दापचरी प्रकल्पाच्या आदिवासी जमीनीवर MIDC उभारनेसाठी थर्मल पाँवर स्टेशन डहाणु वरुन स्पेशल विज वाहिनी टाकण्याचे काम चालु झाले आहे,बुलेट ट्रेन , मालवाहतुक रेलवे लाइन चे नियोजन पुर्ण झाले आहे हे रेलवे प्लॅनिंग आँफिसरकडुन समजले आहे,सुसरी डॅम(चारोटी-महालक्ष्मी) मध्ये 13 आदिवासी गावे बुडणार आहेत त्या गावातील लोकांचे पुनर्वसन लातुर या दुष्काळी व भूकंपग्रस्त जिल्हात होणार आहे विचार करा तेथे आदिवासी जगेल का ? उधवा-सायवनला निंबापुर येथे डॅम मंजुर झाला आहे,ऐना परिसरात एक डॅम होतोय,शहापुर,मुरबाड मोखाडा या डोंगराळ भागातील प्रत्येक नदिवर एकापेक्षा जास्त डॅम मंजूर आहेत, या सर्व धरणात आपला आदिवासीच बुडणार आहे,कुर्झे डॅमची उंची वाढवली जाणार आहे,मोडगाव,खुबाले,कुर्झे गावची माणसे उठवली जाणार आहेत,बारड डोंगर (नागझरी-आंबेसरी-गांगणगाव-करजगाव-वेवजी) सपाट करुन तेथे रिलायंसचा SEZ येणार आहे, डहाणु -उंबरगावपर्यंत आशियातील सर्वांत मोठे बंदर होउन धामणगाव येथे गोदी-गोडावुन होणार आहेत, आता सांगा आदिवासी कोठे जाणार....?? जगणार कि मरणार ?? फेसबुक,वाँटसअँप वर फक्त लाईक व अंगठे वर करुन स्वतला आणि समाजाला खोटी खोटि हिम्मत देण्याचे धंदे बंद करा , समाजाची व स्वतची फसवणुक करुन घेउ नका....! लढाई जमीनीची आहे, FB -WHATSAPP ची नाहीं म्हणुन जमीनी वर उतरा....आज आदिवासी एकता परिषद या सर्व आक्रमणाविरुद्ध खंबिरपणे लढत आहे,लढणा-या कार्यकर्त्यांना आदिवासींच्या हक्कासाठी लढता येऊ नये,आदिवासींना त्यांचे हक्क कळु नयेत व बिन बोभाटपणे आदिवासींच्या जमीनी लुटता याव्यात म्हणुन लढणा-या कार्यकर्त्यांना खोट्या-खोट्या केसमध्ये गुंतवुन तुरुंगात डांबले जात आहे.६००० वर्षांपुर्वी खैबर खिंडीतुन आर्य आले,त्यांच्या पाठोपाठ शक,कुशाण,मोघल,अरब,पारशी,पोर्तुगीज, डच,इंग्रज आले या सर्वांनी आदिवासींच्या जमीनीवर आक्रमण केले ,त्या-त्यावेळी त्या-त्या लोकांचे सरकार असल्याने त्यांनी आदिवासी जमीनी लुटुन अतिक्रमण करुन ताब्यात घेतल्या,आदिवासी लोकांना मागे मागे रेटत नेले , अगदी जंगल -डोंगर द-यात राहयला भाग पाडले....आजही ह्या परकिय लोकांचेच सरकार आहे व त्याचे आदिवासी जमीनी वरील आक्रमण आजही चालुच आहे,आदिवासींची पिछेहाट अजुनही थांबलेली नाहीं.स्वातंत्र्य ही केवळ भुलथाप आहे,स्वातंत्र्य फक्त आर्यादी शासनकर्त्या जमातीसाठीच आहे म्हणुन ती लोकं वाटेल त्या जमीनीवर अतिक्रमण आक्रमण करु शकतात,हे स्वातंत्र्य आदिवासींचे नाहीं ...राहिले असते तर आम्हि आमच्या जमीनीचे रक्षण करु शकलो असतो. On Thursday, November 6, 2014 11:44:09 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:आदिवासींच्या ठेकेदारांनो, तुम्ही आता सावध व्हा!कारण आता आदिवासी माणुससुध्दा विळ्याचा वापर भातपिक कापण्याबरोबर अन्याय कापायला करू लागला आहे.आदिवासींच्या ठेकेदारांनो, आता तुम्ही सावध व्हा!कारण आता आदिवासी मुलगीसुध्दा ऑस्कर पुरस्कार मिळवु लागली आहे.आदिवासींच्या ठेकेदारांनो, आता तुम्ही सावध व्हा!कारण आता आदिवासी मुलेही IAS होवू लागली आहेत.आदिवासी ठेकेदारांनो, आता तुम्ही सावध व्हा!कारण आता आदिवासी सुध्दा आपल्या वाणीने बोलू लागला आहे.©विद्रोही आदिवासी AYUSHonline teamhttp://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 Learn More about AYUSH online at : Regards Deu Mali malideu2...@rediffmail.com +919624020384 -- ----------------------------------------------------------------------- Biodiversity mechanism, Engineering & Management concepts, Health & Medicine science, Agricultural & Plant science, Human Values, art & handicrafts, music & dance all are Embeded in Tribal Culture. Todays urgent need to preserve this traditional knowledge to save our planet, Natuer & people. Lets do it together Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/546eeb9e.2310460a.732e.ffffd5f7SMTPIN_ADDED_BROKEN%40gmr-mx.google.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.