देश मजबुत होताना आदिवासी अस्तित्व धोक्यात का आले ?? गेली ६६ वर्ष आम्हि आदिवासी लोकशाही प्रजासत्ताक व्यवस्थेवर विश्वास ठेऊन "निवडणुक व मतदान प्रक्रियेत" भाग घेत राहिलो,आमचे जनप्रतिनीधी पंचायतीपासुन संसदेपर्यंत पाठवत राहिलो,तथाकथित "लोकशाही" मजबूत करत राहिलो,स्वातंत्र्यानंतर भारत देश उत्तरोत्तर अधिकाधिक मजबूत व विकासीत होत राहिला,आदिवासीसुद्धा या लोकशाहीचा भाग होता मग तो सुद्धा त्याच प्रमाणत मजबूत व विकसित झाला पाहिजे होता,त्याचे जीवन,त्याचे अस्तित्व,संस्कृति,जगण्याची संसाधने म्हणजे जल,जमीन,जंगल यांवरील त्याचा हक्क व दावेदारी अधिक मजबूत व्हायला हवी होती.आदिवासी जीवन सुनिश्चित,सुरक्षित व स्थिर झाले पाहिजे होते.परंतु खरी परिस्थिति अशी आहे की देश विकासाच्या शिखराकडे वाटचाल करत असताना आदिवासी मात्र रसातळाला जात आहे.त्याचे जगण्याचे साधन हिसकावुन घेतले आहे,रोजगारासाठी होणारी भटकंती अजुनही थांबलेली नाहीं,आश्रमशाळातील शिक्षणाचा दर्जा अजुनही तसाच आहे,आपआपल्या पुर्वजांच्या प्रदेशात स्थीर जीवन जगणारा आदिवासी धरणे,हायवे,रेल्वे,औद्योगिक पट्टे,कारखाने,खनिजकर्म,अभयारण्य अश्या अनेक सबबीखाली विस्थापित करुन त्यांना भटके व अस्थिर जीवन जगण्यासाठी मजबूर केले जात आहे.आदिवासी अस्तित्वाचे संसाधन जमीन,जल जंगल हिसकावुन धेतले जात आहे.जर स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या 66 वर्षात सरकारने आम्हांला लुटन्याचेच काम केले असेल तर एवढी वर्ष लोकशाही प्रक्रियेत भाग घेऊन,मतदान करुन कोणाला मजबूत करत होतो ? .....आमच्या लुटारुंनाच मजबूत करत होतो, आजही निवडणुकीत उभे राहण्यासाठी,तिकीट मिळवण्यासाठी आमच्या नेत्यांच्या उड्या पडतात ! काय भलं करणार आहेत हे ?? फक्त लुटारु सरकारला मजबूत करणार आहेत बस्स !! आज आम्हि सुजाण आदिवासी विचारवंतांनी गांभीर्याने विचार करावा, चिकित्सक अभ्यास करावा व या ठोकशाही लुटारु व्यवस्येस विरोध करुन राजकारण बाजुला सारुन सकारात्मक व कन्स्ट्रक्टिव्ह समाजकारणात सहभागी व्हावे,आपली पारंपरिक व्यवस्था,संस्कृति मजबूत करुन संविधानाच्या 5 व्या व 6 व्या अनुसूचित आदिवासी समाजाला दिलेली पारंपरिक स्वायत्त शासन व्यवस्था मिळवुन घेण्यासाठी तीव्र आंदोलनाची तयारी करावी !! आदिवासी वारलखंड जनांदोलन -आदिवासी एकता परिषदेसह , जोहार जिंदाबाद। !!
Adivasi Ekta Parishad <https://www.facebook.com/aep.mh> कोसबाड गावातील आदिवासी बांधवांनी शासकीय अनास्थेच्याविरोधात मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला,अन्याय्य व भ्रष्ट व्यवस्था नाकारण्याचा निर्णय आपश्री अमेश ढाक व सहकारी आएप कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला व १००% यशस्वी केला.BDO पासुन तहसीलदार पर्यंत सर्व अधिकारी वाटाधाटीसाठी आले पण जागृत गावक-यांनी सर्वांना धुडकावुन लावुन अक्षरशः 0% मतदान झाले. जोहार जिंदाबाद। !! FB Link : https://www.facebook.com/aep.mh Home Page : http://www.adivasiektaparishad.org/ -- ----------------------------------------------------------------------- Biodiversity mechanism, Engineering & Management concepts, Health & Medicine science, Agricultural & Plant science, Human Values, art & handicrafts, music & dance all are Embeded in Tribal Culture. Todays urgent need to preserve this traditional knowledge to save our planet, Natuer & people. Lets do it together Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/763d53f1-6d04-41f7-a743-bb178b76c922%40googlegroups.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

