सत्य परिस्थिती आहे विजकुमार. आपण तत्परतेने फोन करून जयराम रमेश यांना जाब
विचारला आणि त्यामुळे दोन्ही बाजू हि स्पस्त होण्यास मदत झाली. एक कि कोणीही
बिगर आदिवासी नेता आमच्या नेत्यांवर आरोप कसे करू शकतो तसेच त्या नेत्याला हि
जाणीव हि करून दिली कि आता आदिवसी हे जबाबदार झाले आहे आणि जाब विचारू शकतात.
दुसरे हे कि त्यांनी त्यांचे observation सांगितले कि आपले नेत फक्त
बुजागावाण्यासारखे उभे आहेत. आदिवासींसाठी त्यांच्याजवळ  future plan / blue
print  नाही. मला वाटते हे लोक तर निवडणुकीच्या  वेळेसहि कोणीतरी लिहून दिलेले
भाषांच पाठ करून बोलत असतील.
खरे तर आपल्या नेत्यांनी रात्र दिवस एक करून माझा समाज पुढे कसा येईल याचाच
विचार केला पाहिजे पण होतेय उलटे आपल्या समाजातील सुजाण व्यक्तीच याबाबतीत
आपल्या पातळीवर काम करताहेत आणि नेते मंडळी फक्त पार्ट्या झोडताहेत.

2015-02-11 22:59 GMT+05:30 AYUSH Adivasi Yuva Shakti <[email protected]>:

>
> आदिवासिंच्या विकासाचा भक्कास कारभार !
>
> आदिवासींच्या आजच्या गरीब आणि दारिद्र्याला आदिवासी मंत्री आणि आमदारच (
> लोकप्रतिनिधी ) कारणीभूत आहेत “माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांचे हे
> वक्तव्य मोठ्या राष्ट्रीय दैनिकाने लोकसभेच्या पूर्वसंध्येला छापले होते.खरं
> तर त्यांची हि प्रतिक्रिया माझ्या पचनी पडणारी नव्हती ,कारण येथे आमच्या
> आदिवासी नेत्यांवर एका प्रकारे आरोप केला गेला होता. ती बातमी वाचली आणि
> “जयराम रमेश “ यांचा मोबाईल नंबर शोधून तावातावात कॉल केला मात्र समोरून
> मोबाईल रिसीव्ह झाला नाही मग मी त्या नंबर ला ( कॉलिंग फ्रॉम विजयकुमार घोटे ,
> रिपोर्टर ,नाशिक , महाराष्ट्रा ) असा मजकूर मेसेज केला जरी बोलणे झाले नव्हते
> तरी एका खेड्यातून एका आदिवासी माणसाने एका केंद्रीय मंत्र्याच्या फोन ची घंटी
> वाजवली होती याचा आनंद होता . चला बोलू पुन्हा कधी तरी या विचाराने पुन्हा
> कामाला लागलो .साधारण एका तासाभरात जयराम रमेश यांच्या मोबाईल वरून कॉल आला मी
> माझी पूर्ण माहिती सांगितली आणि मी आदिवासी युवक आहे हे देखील सांगितले आणि
> महत्वाचे म्हणजे ज्या दैनिकात त्यांचे “स्टेटमेंट ” आले होते त्या विषयी
> बोलायचे आहे असे सांगितले . राजकारणी आणि पत्रकारीतेतले दिग्गज सोडून मला
> कुणीतरी सामान्य व्यक्तीने कॉल केलाय आणि तोही नाशिक मधून तुमचे स्वागत आहे ,
> बोला मी आपली काय सेवा करू शकतो श्या वाक्यात आणि त्यांच्या हिंदी भाषेत
> माझ्याशी बोलायला सुरुवात केली . तेव्हा मी महत्वाचा मुद्दा बोललो कि , “
> ट्रायबल डेव्हलपमेंट नही हो रहा उसके लिये ट्राईबल मिनिस्टर , एम पी और एम.एल.
> हि जिम्मेदार है | तो आप एकदम हमारे लोगो को कैसे टार्गेट कर सकते हो | तेव्हा
> त्यांनी मला प्रतीउत्तर केले. “ देखो रिपोर्टर साहब ..आप अपने विकास के लिये
> अपने लोगो को वोट देते हो , आप के हि लोग “ट्रायबल मिनिस्टर” होता है पुरा
> “ट्रायबल डीपार्टमेंट” आप के हि लोग संभालते है सेन्ट्रल गव्हरमेंट जो आप के
> लिये आप के विकास के लिये पैसा देती है | तो आप के लोगो का काम है कि अपनी
> निगरानी मी सारी स्कीम बनाये और ओ स्कीम लोगो तक पहुंचाये सेन्ट्रल गव्हरमेंट
> ये देखणे के लिये हर आदिवासी के घर तो नाही जा सकती कि आप को स्कीम मिली है या
> नही | ओ सारा काम आप के एम पी ,एम एल ए , ने देखना चाहिये मगर आपके हि लोग आप
> को अमीर नहि देखना चाहते | आप किसी ट्रायबलमिनिस्टर को ये सवाल करो कि आप ने
> ट्रायबल डेव्हलपमेंट कि कीस तरह ब्लू प्रिंट बनाई है | उनके पास जवाब नही होगा
> |आप के सारे लोग पहले राजनीतिक पार्टीयोंकी गुलामी करना छोडे तो आप कभी भी
> गरीब नही रहोगे | बराच वेळ ते माझ्याशी बोलले आणि माझ्या मनातील आमच्या
> नेत्यांच्या झालेला अपमानाचे चित्र निघून जात , एक भयानक भावना निर्माण झाली
> खरच आपल्या आदिवासी माणसांना दारिद्र्यात ठेवायला आपलेच लोक किती कारणीभूत
> आहेत याचा विचार मनात आला आणि त्याच दिवसापासून महाराष्ट्राच्या आदिवासी विकास
> मंत्रालयाचा अभ्यास करायला सुरुवात केली महाराष्ट्रात १ कोटी २३ लाखाच्या
> आसपास आदिवासी समाज आहे , आदिवासी विकासाचे एका वर्षाचे बजट कमीत कमी ४०० कोटी
> आहे . दरवर्षी फक्त १५०/ २०० कोटी रुपये खर्च होतात . व्यक्तिगत लाभाच्या
> योजनाचा अभ्यास केला तर एकूण खर्चा पैकी फक्त १० % निधी व्यक्तिगत योजनेवर
> खर्च होतो बाकी सर्व रस्ते ,धरणे , पाणी , आपत्ती व्यवस्थापण , आश्रम
> शाळांच्या मोठमोठ्या ईमारती बांधण्यासाठी बांधकाम विभागाचा पैसा असतानी देखील
> आदिवासी विकासाचा निधी तिकडे वळवला जातो . आमच्या आदिवासींच्या जमिनीत धरणे
> होतात ,धरणे बांधण्यासाठी जलसंपदा मंत्रालय आहे त्यांचा निधी वेगळा आहे मात्र
> तरीही आमच्या हक्काचा पैसा तिकडे वर्ग केला जातो . रस्ते तयार करण्यासाठी
> बांधकाम विभाग आहे त्यांच्याकडेही वेगळा कुबेर खजाना आहे ,मात्र
> रस्त्यांसाठीही आमचे पैसे वापरले जातात . आणि आमच्या प्रत्यक्ष विकासासाठी ३
> म्हशी ,२ गायी , ५० कोंबड्या ,३० बकऱ्या , ७ हजार रुपये किमतीचे डिझल इंजिन ,
> १० हजार रुपयाचा वीज पंप , गिरणी साठी २० हजार , ताडपत्री साठी ५ हजार , देश
> प्रगतीच्या मार्गावर चालाय आणि आदिवासी विकास विभाग आजही आम्हाला “ गवंडी “
> काम शिकवतंय , केस कापायचे प्रशिक्षण देतेय , विळ्या खुरप्यांना धार लावायला
> शिकवतेय , आम्हाला चार आण्याची कोंबडी देवून बारा आण्याचा मसाला मात्र यातील
> सर्व दलाल , आमदार ,नेते ,पुढारी आणि मंत्री खातात . कसं भरणार आमच पोट , असे
> जाणार आमचे कुपोषण , कालचा कुपोषित आदिवासी विकासमंत्री एकाच वर्षात त्याला
> त्याच्या गाडीच्या दरवाजात घुसता येत नाही आणि आम्ही आहे तिथेच. महाराष्ट्रात
> आज आदिवासी जमातीतले २५ आमदार आहेत पण एकही आमदार आदिवासी विकासावर लढा
> उभारताना दिसत नाही . निवडून येण्यापुरतेच हे आदिवाशी आहे पण सत्य म्हणजे
> कुणाला कॉंग्रेस ने पाळलाय , कुणी शिवसेनेची गुलामगिरी करतोय , कुणी बीजेपी चे
> पाय चाटतोय तर कुणी राष्ट्रवादीच्या “दादा” समोर दादा दादा करत लोटांगण घालतोय
> . सर्वांची पक्षीय निष्ठा दिसतेय मात्र आपण ज्या समाज्यात जन्मलो ,ज्या
> समाज्याने आपल्याला मोठे केले असा विचारही येत नाहीं आणि समाजनिष्ठा देखील
> दिसत नाही . आज एकाही आदिवासी आमदाराकडे आदिवासी विकासाबद्दल ठोस असा कोणताही
> निर्णय नाही , कारण या सर्वांचे विचार पक्ष्याच्या अजेंड्याखाली कण्हत बसलेत
> पक्ष आणि पक्षप्रमुख ठरवेल तो आपला आणि आदिवासी समाज्याचा विकास याच जाळ्यात
> आदिवासी विकास अडकून बसलाय अगदी आदिवासी विकासमंत्री पदासाठी लिलाव केला जातो
> वर्षाला ६० ते १०० कोटी देवून मंत्री पद विकत घेतले जाते आणि मग विविध योजना ,
> कंत्राट , यातून मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेवून वसुली केली जाते , एका
> प्रकल्प कार्यालयातून एका आर्थिक वर्षात ५० लाखाचे टार्गेट ठेवून सर्व कारभार
> केला जातो म्हणजे एका प्रकल्प अधिकार्याने वर्षाला ५० लाख रुपये मंत्र्याला
> दयायचे ( हे सर्व खोटे आहे असे म्हणणारा कुणी धुतल्या तांदळाचा आदिवासी विकास
> मंत्री असेल तर त्याला माझे आव्हान आहे ,तो म्हणेल तिथे पाहिजे तेव्हा मी समोर
> जाईल ) एका माजी आदिवासी विकास मंत्र्याने १०० कोटीचे बारदान खरेदी केले होते
> तर एकाने स्वताच्या पुतण्याच्या नावावर महाराष्ट्रातील आदिवासी आश्रमशाळांना
> १५ कोटी रुपयांचा कॉम्पुटर पुरवठा केला होता ज्या कॉम्पुटर ची किंमत ३० हजार
> रुपये आहे तो कॉम्पुटर ५० हजारात खरेदी केला गेला . आदिवासी विकासाचे कामकाज
> व्यवस्थित चालते कि नाही हे पाहण्यासाठी आपल्या आमदारांची एक कमिटी सर्व अहवाल
> तपासते . अहवाल निमित्त असते हे सर्व फक्त मजा मारायला आणि पॉकेट गोळा करायला
> फिरतात ( एका एका आमदाराला २ हजार रुपयांची चप्पल आणि ५०० /५०० रुपयांचे
> अंतर्वस्र ( अंडरप्यांट ) घेवून द्यावी लागते . आदिवासी विकासाच्या पैशातून
> अश्या प्रकारे या लोकांची बोळवण केली जाते . आज आदिवासी विकासावर जवळपास ७०
> हजार कोटी रुपये खर्च झाले असतील आणि महाराष्ट्रातल्या आदिवासींच्या लोकसंखेचा
> विचार केला तर प्रत्येक व्यक्तीला १६ लाख २३ हजार रुपये मिळायला हवे मात्र
> अजूनही आदिवासी विकासाच्या योजनांपासून ७० % आदिवासी समाज वंचित आहे .
> ज्याच्या हाती ससा तोच पारधी अशी अवस्था सध्या आदिवासी नेत्यांनी करून ठेवलीय
> .स्वताचा विकास कसा होईल या गोष्टीकडे सर्व राजकारणी लोकांचे लक्ष आहे .
> आदिवासी विकासाच्या योजना आहेत मात्र त्या राबवण्यासाठी अजेंडा नाही . शिवाय
> या सार्या गोष्टी आमच्या लक्षात येवू नये म्हणून परतेक वर्षी आदिवासी आणि “
> बोगस “ हा मुद्दा सरकार दरबारी काढून आमचे लक्ष विचलित केले जात आहे .
> व्यक्तिगत लाभाच्या योजना वाढवायला आदिवासी विकास विभाग तयार नाही कारण
> व्यक्तिगत योजनामधून खायला मिळत नाही . आज महत्वाचे म्हणजे व्यक्तिगत लाभाच्या
> योजना वाढवल्या तर आदिवासी समाज्यातली दारिद्र्यता खूप झपाटयाने कमी होईल
> शिवाय आदिवासी विकासाकडे असणारा आदिवासी विकासनिधी हा फक्त आदिवासिंवरच खर्च
> करण्यात यावा असे प्रयत्न व्हायला हवे यासाठी यासाठी आदिवासींमधील सुशिक्षित
> समुदयाने एकत्र येवून हि मागणी वाढवायला हवी शिवाय आदिवासी विकासाचा आलेख
> तपासण्यासाठी सर्व आदिवासींनी एकत्र येवून “ जनसुनवाई “ घ्यायला हवी . या
> जनसुनवाई मध्ये सर्व आदिवासी आमदार , आदिवासी विकास विभागाचे मंत्री , आदिवासी
> सचिव , ४ अप्पर आयुक्त आणि सर्वच्या सर्व २४/२५ प्रकल्प अधिकारी यांना आदिवासी
> जनतेसमोर बोलावून सुनवाई घ्यायला हवी प्रश्न ,अडी अडचणी मांडायला हव्या तरच
> आदिवासी समाजाचा विकास होईल . अन्यथा आदिवासी विकासाचा भक्कास कारभार कायम
> चालू राहील .आंधळे दळतील आणि आमचे कुत्रे ( नेते आणि पुढारी ) पीठ खात राहतील .
>
> विजयकुमार घोटे ( पत्रकार ) 09623701709
>
>  --
> Interested Candidates for Tribal Entrepreneusrhip Training Program submit
> form at :www.event.adiyuva.in (share with your friends)
>
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to [email protected].
> To post to this group, send email to [email protected].
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/70fe2f49-eb22-4105-88a1-6b661d3d9785%40googlegroups.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/70fe2f49-eb22-4105-88a1-6b661d3d9785%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>



-- 
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: [email protected]
           [email protected]

-- 
Interested Candidates for Tribal Entrepreneusrhip Training Program submit form 
at :www.event.adiyuva.in (share with your friends) 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2TVzVL5Cwz_mLheah14Wk57ohhL_xShbDEX3w%2BtJtuMvg%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to