He is posted at Nanded
On 4 मार्च 2015 9-29 AM, "sudheer joglekar" <[email protected]> wrote:

> Abhinandan..
> Where is he posted now?
> Sudheer Joglekar
>
> 2015-03-03 23:54 GMT+05:30 AYUSH | Adivasi Yuva Shakti <[email protected]>:
>
>> मना बी पोरा एक दिन कलेक्‍टर हुई...
>>
>> हां लेख सामोडे गावातील आदिवासी समाजाचा पहिला जिल्हाधिकारी डॉ.राजेन्द्र
>> भारुडे....जरूर वाचा !
>>
>>     पहिला दिवस मला आजही लख्ख आठवतोय... मी सकाळपासून रडत होतो. पाटी,
>> पेन्सिल, पुस्तक एका नायलॉनच्या पिशवीत टाकून माय मला घेऊन शाळेकडे निघाली.
>> माझं रडणं सतत चालूच होतं. मध्येच मायच्या हाताला जोराचा झटका देत, मी
>> मोठमायच्या घराकडे धावत सुटलो... मोठमायच्या घरात जाणं म्हणजे आगीतून निघून
>> फुफाट्यात सापडणं होतं, हे त्या वेळी माझ्या बालमनाला समजत नव्हतं. मोठमाय
>> म्हणजे महाकाली. तिने सरळ मला उचललं आणि मायला सोबत घेऊन थेट मला
>> हेडमास्तरांकडे घेऊन गेली. मी निषेध म्हणून जमिनीवर पडून गडबडा लोळत होतो. पण
>> या दोघीही माझ्याकडे जराही ढुंकून न पाहता घरी निघून गेल्या...
>>
>> धुळे जिल्हा हा एक आदिवासीबहुल जिल्हा... याच जिल्ह्यातील आणि तालुक्यातील
>> सामोडे गावात एका भिल्ल कुटुंबात माझा जन्म झाला. घरामध्ये कर्ता पुरुष कोणीही
>> नसला तरी दोन खमक्या बायका होत्या... माय, मोठमाय (मावशी), मोठा भाऊ, मोठी
>> बहीण आणि एक म्हैस असा आमचा कुटुंबकबिला. आमच्या भिलाटीमध्ये शिक्षण, शाळा
>> याचा कित्येक वर्षे कुणाचाही दुरान्वये संबंध आला नव्हता. चुकून कधीतरी एखादा
>> मुलगा फाटका सदरा आणि ठिगळ लावलेली चड्डी घालून मध्येच कळपातून चुकलेल्या
>> वासरासारखा शाळेत जाताना दिसे, पण तेवढाच... त्यानंतर पुन्हा ये रे माझ्या
>> मागल्या. अशा परिस्थितीत मोठमाय आणि मायने शाळेत माझे नाव घातले. तिथेच माझ्या
>> आयुष्याच्या बदलाला सुरुवात झाली. मावशी आणि आई निरक्षर असली तरीही शिक्षणाचे
>> महत्त्व त्यांना कळले होते. कदाचित त्याचमुळे मला शाळेत पाठवण्याचा अट्टहास
>> होता...
>> पाठीवर बि-हाड घेऊन फिरणारी आम्ही भिल्ल समाजातील माणसं... पोट नेईल तिथं
>> जायचो. असेच आमचे पूर्वज कधीतरी सामोड्यामध्ये येऊन स्थिरावले... काही
>> भिल्लांची स्वत:च्या मालकीची जमीन असली तरी पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे
>> शेवटी मजुरीसाठी परप्रांतात जावंच लागत असे. बहुतेककरून आमच्या खान्देशातील
>> भिल्ल गुजरातेत जात असत. बहुसंख्यांकडे ना स्वत:चा व्यवसाय ना शेतजमीन;
>> रानावनात राहणारे आम्ही, मासे पकडणे अथवा दारू गाळणे हा व्यवसाय करीत असू.
>> घरातील लहान-थोर सर्वच दारू पीत. त्यामुळे दारू हे व्यसन वाईट असून ते करू
>> नये, असे सांगणारे घरात कुणीच नाही. अशा वातावरणात मी वाढलो. मी आईच्या पोटात
>> असतानाच वडील गेले. गर्भपात करून घेण्यासाठी प्रचंड दबाव असताना माझ्या आईच्या
>> बाजूने ठामपणे उभ्या राहणा-या मावशीने आईला आणि माझ्या दोन्ही भावंडांना
>> तिच्या घरी आणले. आमच्या सामोड्यामध्येदेखील अभिजनांची शाहू वस्ती होती. तेथील
>> मुले शाळेत जात.
>> ...माझी शाळेमधली प्रगती उत्तरोत्तर उंचावत गेली. पुस्तकी अभ्यासाबरोबरच इतर
>> गोष्टींमध्ये मला गती होती. आता शाळेतील शिक्षक घरी येऊन माझी प्रगती सांगत
>> होते. मी प्रगती करतो म्हणजे काय, हे जरी कळत नसलं तरी मी काही तरी चांगलं
>> करतोय आणि म्हणूनच शाळेतले शिक्षक घरी येताहेत, इतकंच मायला आणि मोठमायला कळत
>> होतं. मी दहावीत असतानाच, माझ्या ब-याचशा मित्रांची लग्नं झाली होती. म्हणजे
>> 15-16व्या वर्षीच माझ्या मित्रांची लग्नं होऊन ते भिलाटीतील इतरांसारखे
>> मजुरीवर जात होते. शाळा शिकाऊन पो-याला कोठे नोकरी लागाऊ शे? घर राही त पैसा
>> तरी कमाई, असा साधारण सगळ्यांचा सूर होता. खरे तर त्या पालकांचे म्हणणे बरोबर
>> होते. कारण गरिबीमुळे शिक्षण अर्धवट सोडून कुटुंबाला हातभार लावणे, ही त्या
>> क्षणाची गरज होती.
>> अगदी माझ्या मामा, काका यांची पोरंसुद्धा कधीच शाळेत गेली नाहीत. या
>> सर्वांचा खरा शत्रू गरिबी होती असं नव्हे; तर अज्ञान होतं, असंच मला वाटतं.
>> कदाचित हेच आमच्या मायला आणि मोठमायला कळलं होतं आणि म्हणूनच गावातल्या
>> शाळेतून नंतर मला ‘नवोदय’ या अक्कलकुव्याच्या शाळेत शिक्षकाच्या आग्रहाखातर
>> पाठवले. माझ्या आयुष्यात सुदैवाने चांगली माणसे आली. बारावीनंतर इंजिनिअरिंगला
>> प्रवेश घ्यायचा, असं मनात होतं. कारण गणितामध्ये चांगले मार्क मिळत होते.
>> परंतु इंजिनिअर झालास तर केवळ तुझा आणि तुझ्या कुटुंबीयांचाच फायदा होईल; आणि
>> डॉक्टर झालास तर संपूर्ण समाजाला त्याचा फायदा होईल. शिवाय डॉक्टर झाल्यानंतर
>> प्रशासक झालास तर अधिक व्यापक प्रमाणात लोकसेवा करता येईल, हे माझ्या देवरे
>> सरांनी समजावून सांगितले... जी. एस. मेडिकलसारख्या नावाजलेल्या कॉलेजमध्ये मला
>> प्रवेश मिळाला. सामोड्यातील नवोदयसारख्या ग्रामीण भागातील शाळेमध्ये कधी
>> जातीवरून माझी क्षमता जोखली गेली नव्हती. मात्र मुंबईसारख्या आधुनिक
>> विचारांच्या शहरामध्ये असा अनुभव आला. खरे तर मला त्यांची कीव वाटली होती. पण
>> या गोष्टी उराशी कवटाळून, मला माझी प्रगती रोखायची नव्हती... सामोड्यातून
>> ‘केईएम’मध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी आलेला एक आदिवासी मुलगा उत्तम
>> गुणांनी डॉक्टर झाला होता. ज्या ‘केईएम’मध्ये सुरुवातीला तुच्छतेची वागणूक
>> मिळाली होती, त्याच ‘के ईएम’मध्ये ‘बेस्ट स्टुडंट अवॉर्ड’ मिळवून मी स्वत:ला
>> सिद्ध केले. त्या वेळच्या मुलाखतीदरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा
>> देऊन समाजाची सेवा करणार असल्याचे मी सांगितले होते. पहिल्या प्रयत्नात माझी
>> ‘इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस’साठी निवड झाली होती; परंतु ‘आयएएस’ बनण्याचे
>> ध्येय पक्के असल्याने मी पुन्हा एकदा प्रयत्न करून 2012मध्ये केंद्रीय लोकसेवा
>> आयोगाची परीक्षा दिली आणि अखेर आयएएस झालो... एक ध्येय गाठले...
>> आयुष्य एका नव्या वळणावर उभे असताना मला लहानपणी घडलेला   प्रसंग आठवतोय...
>> भिलाटीमध्ये आमच्या घरी घरखर्चाला हातभार लावण्यासाठी आम्ही आमचा दारू
>> विकण्याचा पारंपरिक व्यवसाय करीत असू. गावातील लोक दारू पिण्यासाठी घरीच येत
>> असत. ब-याच वेळेस आम्हा लहान मुलांना त्यांना चखणा वगैरे आणून द्यावे लागत असे.
>> माझी परीक्षा असली की साहजिकच मी ही कामं करायला तयार होत नसे, यावरून
>> आमच्या एका गि-हाइकाने, तो-यात ‘जाय थोडं काम करीये, शिकसीन मोठा
>> डाक्टर-कलेक्टर व्हनार शे’ असं हिणवून मला चखणा आणायला सांगितले. मी रडू
>> लागलो, तेव्हा आईने त्या गि-हाइकाला सांगितले, ‘मना बी पो-या एक दिन
>> डाक्टर-कलेक्टर हुई. तुम्ही चखणा आज दुस-या कडतीनं मांगडा, आनी याले अभ्यास
>> करू द्या!
>>
>> --
>> Interested Candidates for Tribal Entrepreneusrhip Training Program submit
>> form at :www.event.adiyuva.in (share with your friends)
>>
>> Learn More about AYUSH online at :
>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>> ---
>> You received this message because you are subscribed to the Google Groups
>> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
>> email to [email protected].
>> To post to this group, send email to [email protected].
>> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
>> To view this discussion on the web visit
>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBufPZXxZJ6bDb%2Bae6_8GxM5xW5ZVCXCZrO29kJ6jrft%2BA%40mail.gmail.com
>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBufPZXxZJ6bDb%2Bae6_8GxM5xW5ZVCXCZrO29kJ6jrft%2BA%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>> .
>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>
>
>
>
> --
> sudheer joglekar
>
> --
> Interested Candidates for Tribal Entrepreneusrhip Training Program submit
> form at :www.event.adiyuva.in (share with your friends)
>
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to [email protected].
> To post to this group, send email to [email protected].
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAF%2BQUwxSgbVK_VurvDMfRkgptE%2B%2Bcq6P3NaC%2BHuG1AZqPnK2SA%40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAF%2BQUwxSgbVK_VurvDMfRkgptE%2B%2Bcq6P3NaC%2BHuG1AZqPnK2SA%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Interested Candidates for Tribal Entrepreneusrhip Training Program submit form 
at :www.event.adiyuva.in (share with your friends) 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAKEVB_1-RFqoJKBO6J4rmqwM1i6Z0NgvcR1HGMGFyKO9V50AgQ%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to