मी मडावी, 
गडचिरोलीच्या जंगलातून बोलतो आहे....
.
हे जंगल 
पशुपक्षी, प्राणिमात्राचे,
व खनिज निसर्ग संपदाचे नंदनवन आहे,
इथेच, 
असंख्य मानवी सांगळे सापडलेले आहे,
ते हडप्पा संस्कृतीशी जुडले आहे....

या जंगलात,
कारगिल युद्धभूमी नसली तरी,
युद्ध्योन्तर अशांतीव सन्नाटा पसरलेला असते ,
येथे युद्धनौका नसल्यातरीही,
अफाट आरमार उभारलेले असते,
युद्धाचे सारन वाजत नसले तरीही,
अघोषित कर्फ्यू लागलेला असते,
युद्धकैदी म्हणून एथेच
पोलीस व नक्षलि दोहोबाजूने,
आदिवासीच्याच हत्या होत असते …

येथील आदिवासी 
आपल्याच घरात बंदिस्त असतात 
खबऱ्याची जीभ, भाकरी देनाऱ्याचे हात,
छाटल्या जाते,
भूक्याला भाकर, तहानलेल्या पाणी 
देणाऱ्याचे हाथ छाटले जाते..,
तर गर्भातल्या बालकांना 
गर्भातच पिचकून मारल्या जाते......

येथे बुद्धाच्या
सत्य, अहिंसा, दु:ख, करुणावर बंदी आहे,
घटनेत लिहिलेले, 
न्याय, समता, बंधुत्वांचे तत्वे,
कागदावर कोरलेले शिल्प बनले आहे,
येथील लोक विधायकाना 
संसदेत भाकर व हत्येचा मुद्धा,
मांडण्यास अघोषित बंदी आहे......

काल त्यांची हत्या,
आज माझी,
उद्या तुमची होणार आहे ..
पण या हत्याचे पुरावे नाहीत 
शेवटी 
माझ्याच हत्येचा हत्यारा मीच ठरणार आहे,
मी मडावी, 
गडचिरोलीच्या जंगलातून बोलतो आहे...

'' लटारी मडावी ''  Latari Kawadu Madavi 

-- 
Interested Candidates for Tribal Entrepreneusrhip Training Program submit form 
at :www.event.adiyuva.in (share with your friends) 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/7d557314-b556-406e-8d2f-fb75e53b8d9f%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to