"युवा सत्याग्रहींचे प्रशिक्षण सत्र"
  100% स्थानिक आदिवासी नोकर भरती विषयक 9/6/2014 व 5/3/2015च्या 
राज्यपालांच्या GRची तातडीने काटेकोर अंमलबजावणी होऊन स्थानिक आदिवासी 
बेरोजगारांना नोक-या व रोजगार मिळावा,परजिल्ह्यातील व बिगर आदिवासींची छुप्या 
पद्धतिने होणारी नोकरभरती त्वरित थांबवुन त्या नोक-या बेरोजगारांना मिळाव्या 
म्हणुन सर्व स्थानिक आदिवासी बेरोजगार गुरुवार,दि.30/4/2015 रोजी पालघर येथे 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ऐतिहासिक  'बेमुदत ठिय्या आंदोलना'साठी 
बसणार आहेत. हे आंदोलन ऐतिहासिक असुन बेरोजगारी,गरीबी व अन्याय यांपासुन 
स्वातंत्र्यासाठी जणु दुस-या स्वातंत्र्यलढ्यासारखे आंदोलन आहे  ! त्यामुळे 
नोक-या मिळवुन इतिहास घडवायचा असेल तर अनेक दिवस चालणारा कठिण लढा दिल्याशिवाय 
पर्याय नाहीं  ! 
 
नोकरी मिळण्यासाठी लागणारे ज्ञान मिळवण्यासाठी आम्हि शाळा-कॅालेजात 10-15 वर्ष 
मन लावुन अभ्यास केला,आता प्रत्यक्ष नोकरी मिळवण्यासाठी काही दिवस , काही 
आठवडे तरी नक्कीच लढा द्यावा लागणार आहे ! यासाठी मानसिकता निर्माण 
व्हावी,मनाने व तनाने तयारी व्हावी ! 
लढ्याच्या मार्गातील खाच-खळगे समजावे व ते पार करण्याच्या युक्ता व क्लुप्त्या 
अनुभवी व्यक्ति कडुन समजुन घेण्यासाठी,कायदेशीर गोष्टिचा विचार विनिमय 
करण्यासाठी रविवार,दि.26/4/2015 रोजी कासा येथील आचार्य भिसे महाविद्यालयाच्या 
सभागृहात सकाळी 9:30-1:30 पर्यंत सर्व युवा सत्याग्रहींचे प्रशिक्षण व 
सशक्तिकरण सत्र आयोजित केले आहे तरी सर्व युवा वर्गाने व पालकांनी सत्रास हजर 
राहुन बेरोजगारी व अन्याय विरुद्ध चा हा लढा अधिक भक्कम करावा !! 
 
मैसेज सर्व ग्रुपला Forward करा ! आदिवासी,आएप !! 
www.fb.com/aep.mh | www.jago.adiyuva.in

-- 
सर्व शिक्षित/अशिक्षित बेरोजगार आदिवासी तरुण तरुणी साठी "स्थानिक आदिवासी 
बेरोजगार मेळावा" (30/04/2015 सकाळी 10.30 वाजता) स्थळ पालघर.
संपर्क | 9960 879 780 | 9272 275 794 | 9158 171 137 | www.jago.adiyuva.in 
(share with your friends) 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/77ec2e4a-d3bc-452e-8f61-cfe7c73aa051%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to