आदिवासी संस्कृती
वाहरु सोनवणेजी
_________________________
@/ श्रम , समुह , सहकार्य
आदिवासीँची जीवनमुल्ये./@
=>आदिवासी संस्कृती हा जीवनाचा पाया
मानून आदिवासी आपले जीवन जगत आहेत.
प्राचीन काळापासून आदिवासी श्रम, समूह,
आणि सहकार्य याच मानवी जीवनमुल्यांच्या
आधारे आपले जीवन जगत आहे. आजही
आदिवासीँच्या जीवनातील प्रत्येक हालचाल
किँवा जीवन व्यवहार, श्रम, समुह आणि
सहकार्य याच्याच आधारे होत असते, होत आहे.
सण, उत्सव, लग्न, समूहनृत्य, समूहगीते, गाव
पंचायतीद्वारे न्याय- निवाडा, गावदिवाळी,
होळी आदिप्रसंगी पुजाविधी अशाप्रकारे
आदिवासीँचे जीवन आहे.
प्रचीन व्यवस्थेत आदिवासी टोळी करुन समूह
जगत होता. प्राचीन काळात आदिवासीला
अन्न शोधायचे असेल किँवा शिकारीला
जायचे असेल तरी समुहानेच जावे लागत असे.
एखाद्या हिँस्र प्राण्यापासून संरक्षण करायचे
असेल किँवा प्रतिकार करायचा असेल तर
टोळीनेच प्रतीकार करु शकत होता.
थोडक्यात म्हणचे त्या काळात आदिवासीँचे
जीवन सुख-दु:ख सारे जीवन समूहाने एकवटले
होते. त्या काळात आदिवासीला
समूहाशिवाय जीवनच नव्हते.
आदिवासी समाजात आज समूह जीवणाचे अनेक
पैलू आहेत .ते लक्षात घेतले तर आदिवासी
संस्कृती मानवी मूल्यांनी कीती प्रगल्भ आहे
याची प्रचिती येईल.
@ 'लाहे'ची परंपरा @
आदिवासीत लाहेची परंपरा आहे. या परंपरेत
एखाद्या आदिवासीचे घर बांधायचे असेल
किँवा शेत नांगरायचे असेल तेँव्हा असा
आदिवासी गावात 'लाहे' बोलवितो म्हणजे
सामूहिकपणे मदतीसाठी बोलवितो 'लाहे'
बोलविल्यावर गावातील आदिवासी स्वत:ची
कामे बाजूला सारुन ते 'लाहे' (मदतीला)
जातात. दिवसभर ते 'लाहे' बोलवणार्या
आदिवासीँचे विनामोबदला काम करतात. घर
बांधतांना किँवा शेत नांगरतांना ते मजूरी घेत
नाहीत. ही सहकार्याची परंपरा आदिवासी
समाजात आजूनही अस्तित्वात आहे.
@ पंचांच्या उपस्थितीत विचारविनिमय @
आदिवासी गावात भांडण-तंटा झाला किँवा
एखादा प्रश्न उद्भवला तर त्याचा
न्यायनिवाडा करण्यासाठी किँवा त्या
प्रश्नासंबंधी विचार करण्यासाठी गावात पंच
बसतात आणि प्रश्नाच्या बाबतीत सामूहीक
विचार- विमर्श होतो.
@ लग्नात सर्व समान @
आदिवासी लग्न कार्यक्रमात कोणी मोठा
वा कोणी लहान असा भेदभावपुर्ण व्यवहार
नसतो. लग्नाच्या मंडपात अंथरलेल्या पट्टीवर
सर्व समान असतात आणि सर्व सन्मानाने
बसतात.
@ दु:खात सहभागी होते सारे गाव @
आदिवासी समाजात कुणाचा मृत्यू झाला तर
सारे गाव त्या दु:खात सहभागी होते. त्या
दिवशी गावात कुणीही पाणी भरत नाही.
चूल पेटवत नाही आणि अंगणही झाडत नाही.
पण इतर जातीत किँवा शहरीभागात असे दिसून
येते की, गावात किँवा शहरात शेजारी कुणी
मेले तरी शेजारी दरवाजा बंद करुन जेवण करतो
तर काहीजण तर पक्वाने, अन्न तळून खातात.
यात मानवता कोणत्या संस्कृतीत आहे हे
लक्षात घेतले पाहीजे.
@...तर आहेर स्वीकारला जातो @
आदिवासी लग्न व्यवहारात आदिवासी प्रधान
पुंजारो (आदिवासीँचे लग्न लावणारा) लग्न
मंडपात उभा राहून पंचामध्य आहेर करतांना
विचारतो -उच्चारतो 'देखा पंजस्तवन
वडगाववाला रुमाल्या नाईक वहिनी करता
देडसो रुपयानी साडी लिवनास,' कबूल? लग्न
मंडपातले बसलेले पंच 'कबूल' असा होकार जाहीर
करतात तेव्हा ते बजवत असलेले आहेर स्वीकारले
जाते. म्हणजे आदिवासीँचा प्रधान आहेर
स्वीकारतांना पंचाची संमती घेतो.
म्हणजे आदिवासी लग्नव्यवहारात लोकशाही
आहे. तर अन्य लग्न व्यवहारात न समजणारे
श्लोक म्हणतो आणि येथे पैसे ठेव, तेथे पैसे ठेव, इथे
पाणी सोड, तिथं पाणी सोड, याच्या पाया
पड, त्याच्या पाया पड, अशा तर्हेने हूकूम सोडत
असतो. आदिवासी प्रधानासारख्या पंचाची,
लोकांची सहमती घेत नाही. इथे आपण
लोकशाहीवर विश्वास ठेवणारी लग्नपद्धती
ठेवायची की हूकूमशाहीवर आधारलेली
वर्चस्ववादी मुल्ये जपणारी लग्नपद्धती
ठेवायची याचा विचार केला पाहीजे.
@ आई नसलेल्या मुलाची जबाबदारी समाज
स्वीकारतो @
आदिवासीँमध्ये अशी परंपरा आहे की, बाळंतपण
झाल्यावर आई मेली तर राहिलेल्या मुलाचे
संगोपन करण्याची जबाबदारी आदिवासी
समाज स्वीकारतो. त्या गावात लहान मूल
असलेली महिला असेल तर ती आपल्या
मुलासारखे दूध पाजते. गावात अनेक महिला
असतील तर त्या आळीपाळीने त्या मुलाला
दूध पाजतात. पण इतर जातीतल्या समाजात
अशी परंपरा नाही.
@ जावयाचा मान @
आदिवासी समाजात लग्न किँवा मृत्यू किँवा
उत्तरकार्याचा कार्यक्रम होत असेल तेथे
कोणी पाणी भरतांना, लाकडे फोडतांना,
किँवा विडे वाटतांना दिसत असेल की,
समजायचे की तो घरचा जावई आहे.
आदिवासीँमध्ये अशी परंपरा आहे की,
अशाप्रसंगी जावयाला लाकडे फोडणे, विडा
वाटणे आदि कामे सोपवतात आणि हे काम
जावई आनंदाने स्वीकारतात. एवढेच नाही तर
चुकून एखाद्या जावयाला काम सोपवले गेले
नसेल तर तो जावई रुसून बसतो. कुणी विचारले
तर तो रुसलेला जावई म्हणतो मी काय त्यांजा
जावई आहे का? असे म्हणून राग व्यक्त करतो.
थोडक्यात अशा प्रसंगी अंगमेहनतीचे काम करणे
प्रतीष्ठेचे मानले जाते.
तर इतर जातीँमध्ये लग्नात जावयाला आदर
सन्मानाने बसवले पाहीजे, अशी परंपरा आहे.
लग्नाच्या पहिल्या पंक्तीत बसवले नाही तर
जावई रुसून बसतो.
पण आदिवासी समाजामध्ये श्रमाला
प्रतिष्ठा आहे.
धन्यवाद!



AYUSHonline team
www.adiyuva.in

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBv06-jRbY%3DzCMmCTKE3EYqZJ%2BUEpYKsJrnAbTp2D_tNQg%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to