@Ayush: U check first things before forwarding these contensious matters...
On May 12, 2015 6:55 AM, "vipul Dhodi" <vip.dh...@gmail.com> wrote:

> *अर्थक्रांती *
>
>
>  आपल्या खिशात भरपूर नोटा असाव्यात असं
> कोणाला वाटणार नाही ? पण आपल्या खिशात
> पन्नास रुपयापेक्षा मोठी नोट असणे हाच '
> इक़ॉनॉमिकल ' लोचा आहे. या मोठ्या नोटांमुळेच
> बेकारी, काळा पैसा, भ्रष्टाचार, महागाई
> आणि आर्थिक मंदी बोळाळलीय... हे सारे
> टाळण्यासाठी देशातील पन्नासच्या वरील सर्व
> नोटा बंद करा...
> ...असे सांगत गेली काही वर्षं औरंगाबादचा एक
> अर्थतज्ज्ञ देशभर हिंडतोय. आपले हे '
> अर्थक्रांती ' चे स्वप्न
> साकारण्यासाठी तो आपली ही थेअरी लेख, पुस्तके,
> टीवी, इंटरनेटच्या माध्यमातून तो लोकांपर्यंत
> पोहोचवतोय. त्याची ही थेअरी पाहून थेट पंतप्रधान,
> राष्ट्रपतीही चाट पडलेत. राष्ट्रपती प्रतिभाताई
> पाटलां व नरेंद्र मोदीनीं तर, ' जेव्हा मी या विधेयकावर सही करेन
> तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण
> असेल ' असे सांगितलेय....
> त्या क्रांतिवेड्या अर्थतज्ज्ञाचे नाव आहे... अनिल
> बोकील .
> अर्थशास्त्र म्हणजे काहीतरी किचकट, अगम्य असं
> समजून आपण कायमच त्याकडे दुर्लक्ष करतो. पण
> अनिल बोकील तो अधिकाधिक सोपा करून
> आपल्याला सांगण्याचा आटापिटा करताहेत. कारण
> पैसा हा आपल्या आयुष्याचा सर्वात
> महत्त्वाचा आणि आवडता भाग आहे. पण त्यामागचे
> अवघड गणित समजून घ्यायची आपली तयारी नसते.
> म्हणूनच त्यातला अवघडपणा काढला तर ते अधिक
> पारदर्शी होईल, असा बोकील यांना विश्वास आहे.
> आपल्याकडे पन्नासाहून मोठी नोट नको, असे बोकील
> पुन्हापुन्हा सांगतात. आपले हे म्हणणे पटवून
> देण्यासाठी ते एक सोपे उदाहरण देतात. ते म्हणतात,
> अमेरिकेला आपण प्रगत देश म्हणतो. अमेरिकेचे
> दरडोई उत्पन्न ४० हजार डॉलर आहे
> आणि त्यांची सर्वात मोठी नोट १०० डॉलर आहे.
> म्हणजेच त्यांच्या दरडोई उत्पन्नाचे
> मोठ्या नोटेशी असलेले प्रमाण हे ४०० पट आहे.
> तसेच ब्रिटन आणि जपानचेही पौंड
> आणि येनशी असेलेले प्रमाण हेदेखील ४०० पटीचे
> आहे. पण भारताचे दरडोई उत्पन्न २३ हजार
> आणि सर्वात मोठी नोट १००० रुपयाची आहे. म्हणजे
> हे प्रमाण फक्त २३ एवढे आहे. कशासाठी ?
> या कमी प्रमाणामुळेच देशात
> काळ्या पैशाची निर्मिती होते. आपल्याकडील
> व्यवहार रोखीच्या माध्यमातून होतात. लोक
> बॅकेच्या माध्यमातून व्यवहार
> करण्याऐवजी रोखीच्या माध्यमातून व्यवहार
> करतात. त्यामुळे या व्यवहारांची नोंद राहत
> नाही आणि काळा पैशावर आधारित भ्रष्ट
> अर्थव्यवस्था जन्माला येते. बोकील यांच्या मते
> आज आपल्या देशातील ८० टक्के व्यवहार
> रोखीच्या माध्यमातून होतात. तेच प्रगत देशात ९०
> टक्के व्यवहार बँकेच्या माध्यमातून
> होताना आढळतात.
> या रोखीच्या व्यवहारामुळेच काय घडू शकते, याचे
> उदाहरण द्यायचे तर भारतीय संसदेवर
> झालेल्या हल्ल्याचे देता येईल. ११ सप्टेंबर २००१
> मध्ये अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला.
> त्याच्यापोठापाठ १३ डिसेंबर २००१
> रोजी भारताच्या संसदेवरही हल्ला झाला.
> अमेरिकेला अल-कायदाचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यात
> यश मिळाले. पण भारतात मात्र संसदेवर
> हल्ला करणा-या लष्कर-ए-तोयबाचे नेटवर्क
> उद्ध्वस्त करता आले नाही. याचे कारण अमेरिकेने
> अल-कायदाची सारी अकाउंट्स सीझ केली. त्यामुळे
> अल्-कायदाची पैसा हीच ताकद संपल्याने नेटवर्क
> उद्ध्वस्त करता आली. पण भारतात
> बहुतांशी व्यवहार रोखीच्या माध्यमातून होत
> असल्याने अशी अकाउंट्स सीझ करण्याचा काहीच
> फायदा झाला नाही.
> अमेरिकेचे माजी अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी १४
> जुलै १९६९ रोजी १०० डॉलरवरील सर्व नोटा रद्द
> केल्या. याचे कारण अमेरिकेत प्रचंड
> काळा पैसा वाढला होता. तसेच भारतातही आज
> या समांतर काळ्या इकॉनॉमीने हातपाय पसरले
> आहेत. ती संपवण्यासाठी पन्नास
> रुपयांच्या वरची नोट बंद करणे हेच हिताचे ठरेल.
> भारतात रोजचे उत्पन्न २० रुपयांपेक्षा कमी असणा-
> यांची संख्या ७८ टक्के (८० कोटी लोक) आहेत.
> मात्र रिझर्व बँकेच्या अहवालानुसार १०० रुपये
> आणि त्यापेक्षा मोठ्या (५०० आणि १०००) नोटांचे
> प्रमाण ९२ टक्के आहे. २००१ मध्ये देशात हजार
> रुपयांच्या नोटा ९७ हजार ६७६
> कोटी इतक्या किमतीच्या झाल्या आहेत. याचा अर्थ
> रोखीने व्यवहार करायला सरकारच प्रोत्साहन देते
> आहे. हे फक्त या मोठ्या नोटा रद्द झाल्या तरच
> टाळता येणे शक्य आहे.
> हे जसे झाले नोटांचे, तसाच एक
> लोच्या आपल्या करप्रणालीचा आहे. मुळातच टॅक्स
> चुकवणे ही मानवी प्रवृत्ती बनली आहे. त्यामुळे
> डायरेक्ट टॅक्सपेक्षाही इन्डायरेक्ट टॅक्स वसूल
> करण्याचा सरकारचा प्रयत्न असतो. एक सामान्य
> भारतीय जवळपास ३०-३२ प्रकारचे टॅक्स भरत
> असतो.. तेही त्याच्या नकळत. म्हणजे जेव्हा आपण
> एखादा साबण घेतो तेव्हा त्याचे ४-५ रुपये आपण
> सरकारला विविध करांच्या रुपाने देत असतो.
> खरं तर एकंदरीतच भारतीय
> करप्रणाली कमालीची गुंतागुंतीची आणि दुर्बोध आहे.
> एखाद्या चार्टर्ड अकांउटलाही ती सहजसोपी करून
> सांगणे अवघड आहे. उदाहरण द्यायचे तर
> एका टीव्हीची किंमत मुंबईत ५००० हजार असेल तर
> पनवेलमध्ये ती ५५०० असू शकेल. कारण त्यात
> जकात लागू होते. तसेच जर तुम्ही तो मध्य प्रदेशात
> घ्याल तर तो तुम्हाला कदाचित ४५०० रुपयांना मिळू
> शकेल, कारण तेथील सेल्स टॅक्स स्ट्रक्चर वेगळे
> आहे. त्यामुळे एकच वस्तू देशाच्या विविध भागात
> विविध किमतींना उपलब्ध होते. त्यामुळेच
> काळाबाजार तेजीत येतो. त्याहूनही डोकेदुखीची बाब
> म्हणजे, आपल्याच रुपयाची किंमत आपल्याच देशात
> विविध ठिकाणी वेगळी ठरते.
> या गुंत्यामुळे लोक जकात चुकवून काळ्या बाजाराने
> व्यापार करतात. बिलं न घेता वस्तू खरेदी करतात.
> या समांतर आणि काळ्या अर्थव्यवस्थेमुळे
> देशाचा अब्जावधी रुपयांचा महसूल बुडतो. त्यामुळेच
> ही करप्रणाली सोपी करणे अत्यंत गरजेचे आहे.
> तसेच लोकांवरील टॅक्सचं ओझं कमी केलं गेलं तर
> टॅक्स टाळण्याची प्रवृत्तीही कमी होऊ शकते. कारण
> असा अवाढव्य टॅक्स कमी झाला आणि तर तो भरून
> ' गॅरेंटेड ' माल घेणे कोणीही पसंत करेल.
> यासाठी बोकील एक साधीसोपी करप्रणाली सुचवतात.
> दोन देशांमध्ये असलेली इम्पोर्ट
> ड्युटी वगळता देशातील सर्व म्हणजे केंद्र , राज्य ,
> स्थानिक स्वराज्य संस्थांचे टॅक्स रद्द करावेत.
> त्याऐवजी सरकारने बॅंकेतून होणा-या व्यवहारांवर
> काही विशिष्ट प्रमाणात (उदा. २ टक्के) ट्रॅन्झॅक्शन
> टॅक्स लागू करावा. हा टॅक्स थेट बॅंकेतूनच
> वजा होणार असल्याने दरवर्षी शेवटी टॅक्स
> भरण्यासाठी होणारा आटापिटाही बंद होईल.
>
> गरिबांवर
> करांचा बोजा नको म्हणून रोखीच्या व्यवहारांवर
> कुठलाही कर आकारला जाणार नाही.
> म्हणजेच समजा मी तुम्हाला चेकद्वारे १०० रुपये
> दिले. तर माझ्या अकाउंटमधून १०० रुपये वजा होतील
> पण तुमच्या अकांउटला मात्र ९८ रुपयेच
> जमा होतील. त्या दोन रुपयांपैकी ७० पैसे केंद्र
> सरकारला, ६० पैसे राज्य सरकारला, ३५पैसे
> महानगरपालिकेसारख्या स्थानिक
> संस्थेला आणि उरलेले ३५ पैसे
> बँकेला महसुलाच्या स्वरूपात मिळतील. यामुळे
> सरकारला आपल्या कामासाठी सतत महसूल उपलब्ध
> होत राहील आणि जनतेचीही टॅक्सच्या जंजाळातून
> सुटका होईल.
> या पद्धतीतून अनेक गोष्ट साध्य होतील. सर्वात
> महत्त्वाचे म्हणजे इन्डायरेक्ट टॅक्स संपल्यामुळे
> वस्तूंच्या किंमती कमी होतील. आपण आज जे
> चायनाच्या स्वस्त मार्केटचा बाऊ करतो,
> तो करण्याची वेळच येणार नाही. तसेच समानतेचे
> सूत्र पाळले जाईल. देशातील सर्व
> ठिकाणी एका वस्तूची किंमत समान राहील
> आणि त्यामुळे रुपयाचीही किंमत समान राहील.
> या करप्रणालीसोबतच बोकील म्हणतात की, २०००
> रुपयांवरील रोख व्यवहार बेकायदा ठरवावावेत.
> जेणेकरून बँकमनी वाढेल आणि बाजारात फक्त
> पैसा नाही तर भांडवलही वाढेल. कारण आपल्याकडे
> पैसा खूप आहे भांडवल नाही. आपल्याकडे
> असलेला पैसा हा योग्य हातात योग्य
> वेळी पडण्यासाठी असलेली यंत्रणाच कमकुवत ठरते
> आहे. त्यासाठीच
> आपल्या देशाला या अर्थक्रांतीशिवाय पर्याय नाही.
> अनिल बोकील ज्याला अर्थक्रांती म्हणतात ,
> ती थोडक्यात अशी आहे
> १) आयातकर वगळता देशातील सर्व म्हणजे केंद्र ,
> राज्य , स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर काढून
> टाकावेत.
> २) सरकारी खर्चासाठी (कराला पर्याय) बँकेतून
> होणा-या व्यवहारांवर काही विशिष्ट प्रमाणात
> (उदा. २ टक्के) व्यवहारकर हा एकमेव कर लागू
> करणे. ज्यांच्या नावावर बॅंकेत रक्कम जमा होते ,
> त्यांच्याकडून हा कर बॅंकेतूनच कापून घेतला जाईल.
> ३) या मार्गाने जमा होणा-या कराचे वाटप केंद्र ,
> राज्य , पालिका-महापालिका असे निश्चित करून
> ती रक्कम त्या सरकारच्या नावावर जमा होईल.
> ४) रोखीच्या व्यवहारांवर
> मर्यादा आणण्यासाठी पन्नास
> रुपयांच्या वरच्या नोटा चलनातून काढून टाकण्यात
> येतील.
> ५) विशिष्ट मर्यादेपर्यंतच (उदा. रु. २०००) रोख
> व्यवहारास सरकारी मान्यता मिळेल. त्यापुढील
> रोखीचे व्यवहार बेकायदा मानले जातील.
> ६) गरिबांवर करांचा बोजा नको म्हणून
> रोखीच्या व्यवहारांवर कुठलाही कर न नसेल.
> या पद्धतीमुळे आता असलेला काळा पैसाही मुख्य
> प्रवाहात येईल. एकंदरीतच
> अर्थव्यवस्था शुद्धिकरणाची प्रक्रिया यातून साध्य
> होईल. कारण आज निवडणुकीपासून सर्व व्यवहार
> काळ्यापैशावर आधारीत आहे . हे
> राजकारणी काळ्या पैशाची निर्मिती करत नाही पण
> त्याचा वापर करतात . सामान्य
> जनताही या प्रक्रियेत प्रत्यक्ष-
> अप्रत्यक्षरित्या सहभागी होत असते. ते
> रोखण्यासाठी २००० रुपयांवरील प्रत्येक
> व्यवहाराची नोंद ठेवणारी हा पद्धत ' जादुई ' ठरू
> शकेल.
> अनिल बोकील मांडत असलेली ही थेअरी या देशात
> क्रांती घडवायला सज्ज आहे. पण कोणताच बदल
> लगेच न स्वीकरणा-या या देशाला उत्क्रांतीवर
> जास्त विश्वास आहे, याचे पूर्ण भान
> बोकीलांना आहे. त्यांना जेव्हा विचारले जाते,
> की तुमची ही पद्धत क्रांतिकारी आहे, तर तातडीने
> स्वीकारली का जात नाही ? तर ते एक गोष्ट
> सांगतात...
> आपण सारे एका जहाजावर आहोत. या जहाजावर
> मजले आहेत. तळातल्या मजल्यावर सामान्य माणूस
> आहे, त्यावर श्रीमंत, उद्योगपती आहेत
> आणि सर्वात शेवटच्या माळ्यावर कायदा करणारे
> राजकारणी आहेत. पण या जहाजाला खालून भोक
> पडलंय... कुणी कुठेही असला तरी जहाज बुडणार
> आहे. त्यामुळे खालचे मेले तरी वरच्यांनाही मरावेच
> लागेल. त्यामुळे भोक
> बुजवण्यासाठी राजकारण्यांनाही झुकावेच लागेल.
> फक्त प्रश्न केव्हा याचाच आहे ?
> बोकीलांचा हा आशावादच आपल्याला उभारी देणार
> आहे. कारण दिवाळीच्या मुहूर्तावर दिवाळं
> निघाल्याची बोंब मारत जागतिक मंदी आली असली..
> तरी पुढे फक्त अंधारच नाही.. तर अर्थक्रांतीचे
> आशेचे किरणही आहेत....
>
> -    भ्रस्ताचाराला आळा घालण्यास आणि पारदर्शक कारभारास हि कर प्रणाली
> अवलंबणे खूप आवश्यक आहे. तेव्हा भारताची खरी प्रगती होईल. त्यामुळे जास्तीत
> जास्त लोकापर्यंत हि कर प्रणाली पोहचावा आणि भारताला विकसित करूया.
> It is revolutionary idea please share this your friends.
>
>  link- http://www.arthakranti.org/vision-mission
>
>
>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAN4uC%3DRiOe--hbcyUbFiYcOfa%2BNHL3VUNXUiJeGha90u-U5b8g%40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAN4uC%3DRiOe--hbcyUbFiYcOfa%2BNHL3VUNXUiJeGha90u-U5b8g%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADnEKGyDvvDiq7mLkA4vx7dcrcsM7mQAP8ucTp-a7BsK2fzYag%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to