Personal Experience Sharing …. <Palghar District Local Tribal Language mix > मी चेन्नई ला जाधेल तथच्या काही गोठी हाव. मी ह्युंदाई मोटर चे कारखान्यात जाधेल होतु क्रेटा बनवताहात त्याची क्वालिटी तपासाय. तथ ह्युंदाई चे २ प्लांट आहात. भारतातली सगळ्यात जास्त गाड्या निर्यात करणारी आणि देशातील २ नंबरची तसेच जगातली ५वि विक्री करणारी कंपनी आहे. चेन्नई च्या कारखान्यात अंदाजे १० हजार लोखा काम करताहात, वेग वेगले पद, वय, भाषा, आवड, रंग, गाव, राज्य, देश इत्यादी. माणसा, मशीन, रोबोट, कम्पुटर हारी हारीच सगली पटापट काम करीत. प्रत्येक जन आपला आपला काम प्रामाणिक आणि मन लावून करीत रेहे. प्रत्येक मिनटाला एक नवी कर तयार होय, अखे कंपनीत हजारो नवीन नवीन गाड्या तयार होत. जहाजात भरून आफ्रिका, युरोप, अखाती देसाना गाड्या निजत. ये कंपनीचे आजू बाजूला १५० कंपन्या आहात त्या वेग वेगले पार्ट अथचे कारखान्यात पाठवीत. ओढा म्होटा कारभार नंगला त फार हो बेस काम करायची पद्धत तयार करेल. प्रत्येक मानसाची मेहनत बेस बरी कार बनवाया मोलाची आहे. माझे मनात आला आपले आदिवासी समाजाचा हो असाच, फार लोखा फार वरसा पायसी काम करताहात. पन जर ते सगले मानसात एक दिसा रेहती त आज आपला समाज फार मोहरप जाता. त चलो जे विचार आवडतील जी संघटना आवडल त्याचे हरी काम कराजस पण प्रत्येक वेळेस आपले समाजाच्या हिता साठीच केला ना जव्हा समाजाचा प्रश्न होव तव्हा सगल्याही एक होन काम केला तर फारुच बेस. Lets do it together! <Marathi> गेल्या काही दिवसापूर्वी चेन्नई ला जायचा योग आला. “ह्युंदाई क्रेटा” तयार होत असताना डीझायीन क्वालिटी ची खात्री करण्याची जबाबदारी साठी गेलो होतो. सगळ्यात जास्त निर्यात करणारी आणि देशात २ क्रमांक आणि जगात ५ क्रमांक वरची वाहन कंपनी ह्युंदाई मोटर चे चेन्नई ला दोन प्लांट आहेत. येथे अंदाजे वेग वेगळी पद, वय, भाषा, रंग, आवड, गाव, राज्य, देश, इ असलेली अंदाजे १० हजार माणसे काम करत आहेत. माणसा सोबत, कम्पुटर, मशीन, रोबोट, इत्यादी २४ तास काम करत असतात. या कंपनी च्या अजून बाजूला अंदाजे १५० वेग वेगळ्या कंपन्या आहेत त्या कर चे पार्ट येथील प्लांट ला पुरवतात. प्रत्येक जन आपली जबाबदारी प्रामाणिक आणि चोख पणे पाळतो आणि प्रत्येक मिनटाला एक अशी तयार होणारी कार क्वालिटी च्या बाबतीत कुठेही तडजोड होत नाही आणि ठरवेलेल्या वेळेवर सगळे काम पूर्ण केले जाते. येथून युरोप, अखाती, आफ्रिकी देश निर्यात केल्या जातात. प्रत्येकाचा वक्तशीरपणा, शिस्त, प्रामाणिक पणा, मेहनत एक कार बनवण्यात मोलाची जबाबदारी पार पाडते. कारण प्रत्येकाचे कामाचे स्वरूप, शिक्षण, ज्ञान, जबादारी वेगळी असेल तरी प्रत्येकाची एक दिशा असते, एक उद्देश असतो, एक धेय्य असते. माझ्या मनात आले, आपल्या आदिवासी समाजा साठी पण कित्येक वर्षा पासून झटणारे हजारो माणसे आणि संघटना/संस्था/ग्रुप्स आहेत. पण जर या सगळ्यात जर आपण एक सूत्रता आणू शकलो, "आदिवासी समाज हित" हीच एक प्राथमिकता आणि उद्देश ठेवून आदिवासी समाजाची सांस्कृतिक मुल्य आणि निसर्गाचे जतन केले तर आपला एक हि प्रश्न जास्त काळ टिकणारा नाही. आपण प्रयत्न करतो आहोत "आयुश | आदिवासी युवा शक्ती" तर्फे आदिवासी समाजात एक कुटुंब हि भावना तयार करण्याचा. Lets Do it together!
........... dahanu calling!!! -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAB4%3DxgbhowAc0AwZx-Tt%3DSXhF%2BCJqsbJ5ssnSqUuxt5qAX6KWQ%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

