Shared from other group, ajay Gavit. भारत सरकारचे वरील सम्पूर्ण ओथेन्तिक रेकॉर्ड इंटरनेट वर् ही उपलब्ध आहे, क्रुपया आपल्या लोकांना सत्य अवगत करण्यात मदत करावी ही विनंती, कारण या देशात 'आदिवासीची जमीन हडप करण्यासाठी तसेच आदिवासीसाठीची विशेष प्रावधान कायद्यानेच खारिज करण्यासाठी बिगरआदिवासीनी जे प्रयत्न चालविले आहेत ते पुढील पुढीलप्रमाणे. 1.आदिवासीला वनवासी,गिरिजन, हे शब्द वापरून तसेच आदिवासी मुळात वेदिक धर्मातील(आजचा हिंदू धर्म) क्षुद्र वर्णांतीलच असल्याचे दाखविने म्हणजे आर्यपुर्व येथे कोणी आदिवासी नव्हते तर आर्य येथे आल्या नन्तर काही वेदिक समाजाचे लोकच जंगलात राहून मागास राहिले. यांचा मूळ हेतू म्हणजे 'आदिवासी,मुस्लिम,ईसाई' तत्सम सर्व मूळचे हिंदू, एकच असुन यांना वेगवेगळे कायदे सवलतीची गरज नाही तसेच समान नागरी कायदा असावा. ह्या प्रयत्नस ब्राह्मण,क्षत्रिय वैश्य या तीन वर्णाचा म्हणजे दलित व्यतिरिक्त बहुसंख्य समाजाचा 60% पाठीमबा आहे. 2.क्षुद्र वर्णने बौद्ध धर्म स्वीकारला असला तरि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य बरोबरचे सामाजिक स्थान त्यांना मिळू शकले नाहीँ व अजुनही त्यांचा सामाजिक स्तर कनिष्ठ असल्याचे त्यांच्या मनातील जखम अजूनही तशीच आहे. तसेच हिंदू सणउत्सव मधे सामील होऊन इतर वर्ण मिसळण्यचा व अनुसरण करण्याचा स्वार्थी मोहही त्यांना आवरत नाही, वेदिक व्यवस्थाचे ठेकेदार ब्राह्मण वर्ण म्हणून त्यांचा ब्राह्मण वर्णावर् पराकोटीचा संताप, त्यातून ब्राह्मण वर्ण हाच केवळ आयर्न असुन विदेशी आहेत, हे दाखवन्यासाठी 15% ब्राह्मण वगळता ऊर्वरीत 85%समाज हा मूळनिवासी(आदिवासीसह) आहे असे एकगठ बहुमत ब्राह्मण विरोधात उभे करण्याचा प्रयत्न. त्यात स्वतःला व आदिवासीला 85%लोकसंख्येसह 'मूळनिवासी' शब्द वापरण्याचा हेतू हा की 'आदिवासी'शब्द मान्य केला तर सुमारे 10 %आदिवासी वगळता इतर सर्वजण वेदिक धर्माचे हे सत्य दडपता येत नाही. व त्यओघाने आर्य म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र हे 4 वर्ण हे कटु सत्य आदिवासीना स्वतंत्रदर्जा (यूनीक)(सार्वभौम) समाज म्हणून सिद्ध करते.त्यामुळेच धर्म ठेकेदार ब्राह्मण वर्णने आदिवासीना कधीही अस्पृश्य मानले नाही. ही असूया देखील दलित समाजामधे आहेच. त्यामुळे आदिवासीची 'आदिवासी' ही ओळख मिटवण्यात दलित इतरांपेक्षा आघाडीवर आहेत बाम्सेफ व बाम्सेफ प्रेनित अनेक आदिवासी संघटना 85%मूळनिवासी या मुद्द्याचा अंजाणतेपणे की स्वार्थपोटी प्रसार करीत आहेत.फेसबुक whats up वर त्यात धादांत खोट्या गोष्टी सांगितले जात आहेत. अनेक आदिवासी संघटनचा त्यास स्वार्थपोटी मूक पाठीमबा असल्याचा संशय येतो. अशा प्रकारे सर्व बहुजन समाज (ब्राह्मण,क्षत्रिय वैश्य क्षुद्र ) यांना आदिवासीचे नावच बदलाय्चे आहे. आदिवासी महापुरुष चे उदात्तीकरण यांसाठीच होउ दिले जात नाही, राणा पुन्जा,राणी दुर्गावाति,खाज्य नाईक, जयपाल सिंह मुंडा यांचा apearence व कर्तुत्व आदिवासीमधे श्रेष्ठत्व व आत्मसन्मान उत्त्पन्न करणारे आहे. परंतु यांचे फोटो आदिवासी संघटन सहसा पुजत नाही, याउलट दलित समाजाने dr.आंबेडकर यांचे कर्तुत्वाचे महती सर्व दलित समाजात पसरवून त्यांना दलित समाजात दैवत म्हणून पुजले जाते. त्यामुळे त्यांच्या दलित समाजात पराकोटीचा आत्मसम्मान उत्पन्न करण्यात आला आहे. Dr.आम्बेडकर नेहमी सूटबूट वापरत; त्यावर त्यांचे म्हणणे असे होते की माझ्या समाजालाही माझ्यासारखे सूटबुट मधे येण्यास प्रेरणा मिळावी. म्हणजे त्यांची प्रत्येक क्रुति समाजाला अपलिफ्ट करण्याची होती, शाहू फुले आम्बेडकर शिवाजी महाराज,यांचे कर्तुत्व निर्विवाद आहे, परन्तु गेल्या 20वर्षात त्यांचे जे दैवतिकरन व उदात्तीकरण केले गेले.तेवढे त्यापूर्वी कधीही झाले नाही.त्याचा परिणाम म्हणूनच आज दलित समाज व बहुजन समाज भयंकर संघटीत आहेत.त्यांनी गेल्या 15वर्षात जबरदस्त मुसंडी मारून ब्राह्मण वर्णस राजकारण व प्रशासन मधे अल्पसंख्यक बनवून ठेवले आहे. ह्याच पद्धतीने आदिवासी महापुरुषानचे दैवतीकरण उदात्तीकरण करणे आवश्यक आहे. त्यशिवाय आदिवासी समाज हा (,यूनिक,सार्वभौम) आहे याची प्रचिती आदिवासीना येणार नाही.व आदिवासीमधे आत्मसम्मान उत्पन्न होणार नाही. Dr.आम्बेडकर हे महामानव आहेत, परन्तु त्यांनी आदिवासी करिता काय योगदान दिले हे शोधले पाहिजे व तसे काही असेल तर मांडले पाहिजे. जयपाल सिंह मुंडा यांनी आदिवासीकरिता काय केले हेही माहीत करून घेऊन मांडले पाहिजे. वर उल्लेख केलेले आदिवासीची ओळख मिटवण्यसाठीचे प्रयत्न पाहता; आदिवासीवर काय बिम्बवायचा प्रयत्न करीत आहेत? त्यासाठी कोणत्या प्रतिकाचा वापर करीत आहेत? आपण त्यांचीच री ओढत आहोत का ? आपण जर त्यांचीच री ओढणार् असू प्रत्यक्ष् व अप्रत्यक्षरित्या वरील दोन मुद्द्याना खतपाणी घालत असू तर 'आदिवासींचे बेगडी समाजकरण' ह्यापलिकडे काय उरते. ठाणे जिल्ह्यातील आदिवासी विरोधात उभे ठाकलेले बिगरआदिवासी हे 'शाहू फुले आम्बेडकर'वादी बाम्सेफ वादी आहेत, एरवी आपल्याला त्यांच्या कार्यक्रमात टाळ्या वाजवायला किंवा आपल्यतील काहींना सत्कार देऊन खुश करायला, कुठेतरी कोपऱ्यात बिरसा मुंडा यांचा लहानसा ब्लॅक& व्हाईट फोटॊ लावणारे दलित संघटनाच ठाणे जिल्ह्यात आदिवासीविरोधात आहेत. आणि तेथे मात्र बिरसा मुंडा यांचा फोटो त्यांनी हटवलेला आहे. त्यात चुकीचे काय त्यांचा बिरसा मूंडा यांच्याशी सम्बंध असण्याचे काहीच कारण नाही. कोणत्या प्रतिकाच्या वापर कशासाठी करायचा असतो, व कोणत्या प्रतीकामुळे समाजात काय संदेश जातो,हे पाहणे अत्यंत आवश्यक असते, नाहीतर आधीच भोळा व प्रामाणिक आदिवासीच्या मनात गोंधळ उत्पन्न होऊन तो भलत्याच वाटेला लागेल.
-- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBv9pL%3DaVFbb%3DJzVhxqPCaaPvwYMOan6PZX6TNB%2BPXBPPg%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

