Manatale Bolala sir tumi................................................

On 8/7/15, AYUSH | Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in> wrote:
> AYUSHonline team
> www.adiyuva.in
>
>
> ---------- Forwarded message ----------
> From: vijaykumar ghote <vijaykumar...@gmail.com>
> Date: 2015-08-07 17:41 GMT+05:30
> Subject:
> To: AYUSH Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in>
>
>
> जागतिक आदिवासी " दीन " मुक्त होईल का ?
>
>
> भारताला स्वतंत्र होऊन साठी गाठली आहे मात्र् आजही ८० टक्के आदिवासी समाज
> पारतंत्र्यात जगात आहे बोटांवर मोजता येईल इतक्या लोकांनी आरक्षण ,सवलती
> ,मिळून
> स्वतःला सावरून घेतलं मात्र मागे गरिबीत खितपत पडलेल्या आपल्या समाज
> बांधवांकडे कधीच लक्ष दिल नाही सवलती आणि आरक्षण हा मुद्दा समोर आला कि
> निर्लज्ज माणसालाही समाज आठवतो फक्त फायदा समोर असला कि आदिवासी आदिवासी
> म्हणणारे खूप आहेत. आदिवासी दिन 'असला कि आमच्या पुढार्यांना ,सामाजिक
> कार्यकर्त्यांना संघटना ,संस्था ,यांना आमची आठवण येते खर तर आज ९०टक्के
> आदिवासी समाजाला आदिवासी दिन काय आहे हेच माहित नाही, आणि जे हा दिन साजरा
> करतात त्यांचे खिसे भरलेत ,नोकरी आहे सर्व काही व्यवस्थित चालू आहे फक्त आत्ता
> प्रसिद्धी कसी मिळेल आणि आपल्या पाठीशी भाऊ, दादा ,साहेब ,आन्ना  , तात्यां
> यांची शाबासकी कसी मिळेल , आपण साहेबांच्या कसे जवळ जाऊ हाच विचार करतात.
> आदिवासी आदिवासी म्हणून पूर्ण आदिवासी समाज्याला तमाश्या करून ठेवलाय "आदीवासी
> दिन "साजरा करून शक्ती प्रदर्शन करणे हाच उद्देश असेल तर त्याच फलित काय ?
> आदिवासी
> सामाज्यला न्याय मिळेल का ? कि फक्त दिवसी दिन आदिवासी दिन म्हणत आदिवासींच्या
> टाळूवरच लोणो खात बसायचं …
> आदिवासींसाठी काम करणाऱ्या अनेक आदिवासी संस्था ,संघटना ,सामाजिक कार्यकर्ते
> ,नेते
> पुढारी झालेत प्रत्येक गावात ५/१० आदिवासी पुढारी ,२/५ संघटना ,आणि गटारीत
> पडलेल्या दुकरांसारखे कार्यकर्ते व त्यांची पिल्लावळ; आहे हा सर्व प्रकार
> पहिला कि अस वाटत आत्ता आदिवासी सामाजिक प्रश्न संपले मात्र् एकमेकांचे पाय
> खेचण्याच्या नादात मूळ उद्देश बाजूला राहतोय. महाराष्ट्रात  आदिवासींच्या ४५
> जमाती आहेत  प्रत्येक जमातीत १०/१५ संघटना आहेत प्रत्येकाचे स्वतंत्र गट आहेत
> , प्रत्येक गटाचा एक स्वतंत्र नेता आहे , या येत्यांनी प्रत्येक शहरात  कट्टर
> कार्यकर्तारूपी पाळलेला एक कार्यकुत्रा आहे .हेच कार्यकुत्रे  सामाज्यासाठी
> लहान मोठ्ठे आंदोलन करतात आणि प्रतेक आंदोलनात वापरल्या जाणार्या फलकांवर
> यांच्या नेत्यांचे फोटो असतात मग जर हे सामाजिक आंदोलन आहे समाज्याच्या
> हितासाठी आहे तर प्रत्येकवेळी नेत्यांची प्रसिद्धी का याचा मात्र उलगडा अध्याप
> झालेला नाही .  नेत्यांना समोर ठेऊन आंदोलने करून  स्वताला सामाज्याचे तारणहार
> समजणार्या कार्यकर्त्यांनी जरा ग्रामीण भागात जाऊन समाजाची परिस्थिती पाहिलीय
> का ?आम्ही आहोत म्हणून हा समाज आहे असा पोकळ विचार करणाऱ्यांची अवस्था  ….
> बैलगाडी
> खालून चालणार्या कुत्रा जसा मीच गाडी ओढतोय असा आव आणतो त्या कुत्र्यासारखी
> झालीय  आदिवासी समाजासाठी काम करणार्या जास्तीत जास्त संघटना ह्या नेत्यांनीच
> उभ्या केल्या आहेत शिवाय अश्या संघटना नेत्यांच्या उदो उदो शिवाय अधिक काही
> करतांना दिसत नाहीत . अश्या संघटना समाजाचे प्रश्न घेऊन  सत्तेच्या खुर्चीला
> साहेबांचे पाय चाटत बसल्यात …मग आदिवासी माणसाने करायचे काय …… आदिवासी दिनाची
> तयारी जोरात सुरु आहे …. श्रेय लाटण्यावरून हमरीतुमरी सुरु आहे … शहरात
> आदिवासी दिनाची तयारी जोरात झालीय तर अगदी नाशिक च्या जवळ १२/१५ किलोमीटर
> अंतरावर असलेल्या आदिवासी गावांना “ आदिवासी दिन” काय असतो याची साधी कल्पनाही
> नाही मग अश्या आदिवासी दिनामधून समाज्याला काय मिळणार.  आदिवासी दिनाला अगदी
> शेवटच्या पाड्यातील आदिवासी माणसाचा सहभाग असेल का … आदिवासी दिन आहे म्हणून
> आम्ही तो साजरा करायला शहराच्या दिशेने येणार असेल तर ग्रामीण आदिवासींचा यात
> सहभाग काय ?
> ९ तारखेला जागतिक आदिवासी दिन साजरा होतो आदिवासींच्या एकजुटीला अश्या
> दिवसांची नितांत गरज आहेच मात्र यात ग्रामीण आदिवासींचा जो पर्यंत सहभाग येत
> नाही किंवा शहरात साजरे होणारे असे आदिवासी उत्सव ग्रामीण आदिवासींपर्यंत
> पोहचत नाहीत तो पर्यंत त्याला अर्थ उरत नाही .  शहरात साजऱ्या होणाऱ्या
> कार्यक्रम पाहिला कि हा आदिवासी दिन नसून एकमेकांच्या सत्काराचा कार्यक्रम आहे
> असेच असेच वाटते . आज खेड्यांवर कुपोषण वाढत असतांना आदिवासी दिनाला स्वताचा
> सत्कार करून घेणाऱ्या आणि नेत्यांचा  सत्कार करणाऱ्या आदिवासी समाजसेवकांनी जर
> अतिदुर्गम भागातील पाड्यात जाऊन श्रमदानातून एखाद्या गरीबाची झोपडी उभी करा मग
> स्वताला आदिवासी सामाज्याचे तारणहार समजा …। रात्रंदिवस आपल्या शेतात
> चीखलापाण्यात काम करणाऱ्या आदिवासी माणसांची किंमत तुम्हाला शहरात राहून
> "आम्ही आदिवासींसाठी काहीही करू "अस म्हणून कळेल का …. खूप दूर न जात नाशिक
> जावा ५५ किमी असलेल्या ठाणापाडा परिसरातील आदिवासी माणूस कसा जगतोय हे अभ्यासा
> मग छाती मोठ्ठी करा ….
> भूक, बेकारी , भ्रष्ट्राचार , अन्याय , अत्याचार या पंचाम्हाभूतानी आमची
> पारंपारिक आदिवासी जगणे नष्ट केलेय … आधुनिकीकरणाच्या , विकासाच्या  नावाखाली
> आमच्या जमिनी लुटल्या जात आहेत . महाराष्ट्रातील आदिवासींच्या विकासासाठी
> आदिवासी विकास विभागाचे बजट ५००० कोटी आहे आणि महाराष्ट्रातील आदिवासींची
> लोकसंख्या १ कोटी ३० लाखाच्या आसपास शिवाय यातील १५ % लोक नोकरी ,व्यवसाय ,
> उद्योग आणि श्रीमंतीच्या जवळ आहेत . सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून
> गब्बर झालेत  मात्र आजही ८५ % आदिवासी समाज आदिवासी विकासाच्या योजनांपासून
> कोसो दूर आहे , शिवाय आदिवासी विकास विभाग आदिवासींच्या विकासासाठी २० कोंबडया
> , १० बकऱ्या , २ म्हशी , अश्या फालतू योजना राबवत आहे कि ज्यातून आदिवासी
> माणूस जगणार देखील नाही आणि मरणारही नाही . आदिवासींच्या वाट्याला २० कोंबडया
> आणि बिगर आदिवासी भागाच्या विकासासाठी आदिवासिंच्या विकासाचा करोडो रुपये निधी
> खर्च केला जातो . प्रतेक आदिवासी दिनाला आदिवासी विभागामार्फत एक दिवसासाठी
> १५ ते २० लाख रुपये खर्च केला जातो , मात्र त्याचं फलित काय .  देशभरात ५३०
> इतकी आदिवासी आमदारांची संख्या आहे हे स्वतंत्र पक्ष काढू शकतात किव्हा
> स्वतंत्र विचारमंच स्थापन करू शकतात … पण गुलामगिरीचं आणि लाचारीचं  जगणे
> आमच्या पुढारी, आमदार ,खासदार , नेते यांच्या वाट्याला आल्याने आदिवासी समाज
> आजही आहे तिथेच आहे .,… आमच्या नेत्यांच्या पुढार्यांच्या पोटाचा लोंबकळत
> असणारा घेर पाहिला कि सरकारला वाटते आदिवासींची स्थिती सुधारली ,
>  आदिवासी दिनाला जंगलामध्ये राहणारा ,कुपोषणाने पिडीत झालेला ,आरोग्य सुविधा
> नसलेला ,वीज, पाणी ,अश्या कोणत्याच सुविधा नसलेला आदिवासी माणूस येईल का ?
> किंवा अश्या ग्रामीण  गरिबीत खितपत पडलेल्या आदिवासी माणसाला या झागामागाटाचा
> काय उपयोग होणार . आदिवासी माणसांच्या नावचं  भांडवल करून आमचे स्वयंघोषित
> पुढारी ,तारणहार ,यांचा एकाच उद्देश आहे व्यासपीठावर बड्या नेत्यांना  बसवायचं
> सत्कार करायचा …. सत्कार करून घ्यायचा …. आणि आमची संस्था , संघटना ,
> साहेबांसाठी
> काहीहि करू शकते व आमची पावर काय आहे हे दाखून द्यायचं …. कार्यक्रम संपला कि
> “ आम्ही मोठा कार्यक्रम साजरा केला ” म्हणून छाती ठोकून लाल करायची . रोज
> भूक ,बेकारी
> ,कुपोषण , यांचे बळी ठरलेल्या आदिवासी समाज्याला या दिनाचा काय उपयोग होईल
> राजकारण्यांसाठी काम करणाऱ्या संस्था , संघटना ह्या फक्त साहेबांच्या जवळ
> जाण्यासाठी आदिवासी आदिवासी जप करतील … आणि स्वार्थासाठी आदिवासी माणसाचा
> विश्वास साहेबांना मतदानासाठी विकतील …. नेते मंडळी या माणसांचा वापर तिकीट
> मिळवण्यासाठी करतील आणि असे कितीही आदिवासी दिन साजरे झाले तरी आदिवासी
> दिनामधून या आदिवासी समाज्याला मिळणार काही नाही ….सत्कार होतील सत्कार करून
> घेतले जातील … जो तो आपली पावर दाखून देईल …मात्र  तरीही  आदिवासी समाजाला  ….
> "
> दीनातून " मुक्त होण्यासाठी स्वताच लाडावं  लागेल नाहीतर हे पांढरपेशी आपली
> गरिबी पण विकतील …।
>
>
>
> विजयकुमार घोटे ( मुक्त पत्रकार )
>
> आदिवासी समाजातील अभ्यासक , आदिवासी सामाजिक कार्यकर्ता ,
>
> मो .न. ९६२३७०१७०९
>
> --
> Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBvkDXuk5yAMht11nHjZzaR61O2TP%3DFjLYT2Cg7KMRMgtg%40mail.gmail.com.
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHwXp-5k2s2fZ1%2B0LuSS8Jbet%3DDoa%3Dke%2BkMMkjJ4STvCErMeOg%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to