On Monday, August 24, 2015 at 9:01:09 PM UTC+5:30, AYUSH | adivasi yuva
shakti wrote:
>
>
>
>
>
>
>
> विद्यार्थ्यांना शिक्षण सोडून प्राथमिक सुविधा मिळाव्यात यासाठी आंदोलन करावे
> लागते हाच सरकारचा पराभव! आदिवासी म्हटले की आजकाल सरकारला अडचण वाटत असणार
> त्यामुळे आंदोलन करणारे आदिवासी विनाविलंब तुरुंगात टाकण्याचा धडाका लावत आहे.
> जर आदिवासी विकास निधी लाटणाऱ्या भ्रष्ट प्रणाली विरुद्ध एव्हडी तत्परता
> दाखवली तर आदिवासी विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवण्यास हातभार लागेल यात शंका
> नाही ! www.jago.adiyuva.in
>
>
> On Sunday, August 23, 2015 at 9:53:05 PM UTC+5:30, AYUSH | adivasi yuva
> shakti wrote:
>>
>> आदिवासी विद्यार्थ्यांचा संघर्ष...
>>
>> शिक्षण ही आदिवासी मुलांची गंभीर समस्या...निसर्गातल्या फुलांचा विचार केला
>> तर खरी अडचण. जन्मत: खेळायला, बागडायला सोबत असणारा निसर्ग म्हणजे खरा गुरु
>> आणि प्रेरणेचा स्त्रोत. जगण्याच्या कला खरं तर निसर्गातुन सर्वोत्तम शिकता
>> येतात. परंतु अलीकडे आधुनिकतेच्या वा-यामध्ये मुलांना शाळेतले शिक्षण मिळाले
>> पाहिजे हा अट्टहास.
>>
>> शिक्षण म्हणजे साक्षरता होवू शकते पण ज्ञान नाही. ज्ञान मिळविण्याचा तो एक
>> मार्ग होवू शकतो. आई वडिल यांच्या पासून दूर...आपल्या जंगल अनुभूति विसरून चार
>> भिंतींच्या आत पुस्तकात डोके घालून शिकायचे म्हणजे आदिवासी मुलांना डोईजड
>> वाटले नाही तर नवलच....स्वच्छंदी जीवन जगणारी चिमुरडी मुलं झाडांच्या
>> अंगाखांद्यावर बागडताना खरे तर अनेक मुल्ये आत्मसात करत असतात. झाडे, फळे,
>> फुले, फुलपाखरे, वेली, प्राणी, साप अशा विविध सोबत्यांसोबत प्रेमाच्या अथांग
>> सागरात स्वताला झोकुन देतात. हे वास्तव सोडून एक दम आश्रमशाळेत ते पण बाजुला
>> उंच भिन्तिंचे कुंपण, शालेय शिस्त आणि त्यासाठी डोळे वटारून बघणारे शिक्षक यात
>> मुलं रमतील असे कोणतेच वातावरण नाही. जे निसर्गात सहज मिळतं ते इथं संघर्ष
>> करून बळजबरीने आत्मसाथ करावे लागते. ही मानसिकता आज पर्यन्त समजुन न घेणारे
>> दूर देशातील शिक्षक मग नेहमी आरडा ओरड करणार "ह्या मुलांना काही कळत नाही",
>> "ही मुले खुप गैरहजर असतात", "ह्या मुलांना शिस्त नाही", "पालकांना सुध्दा
>> काही कळत नाही", "काय यांचे कपडे मळालेले, फाटलेले", "दगड परवडले पण ही मुले
>> नको"...या न अशा विविध टिपन्या झेलत मुलांना मनावर दगड ठेवून पुस्तकातले जे
>> कधी त्यांना आपले वाटत नाही ते शिकावे लागते. मग जाते ते सर्व
>> डोक्यावरून...त्यात मुलांची काय चुक.
>>
>> पाठ्यपुस्तकातील धडा ओळखिचा वाटावा...आपुलकीचा वाटावा असे काही नसतेच
>> पुस्तकांत....सर्व काही शहरी....मुलांच्या दृष्टीकोनातुन कल्पनेतिल. भाषेचा
>> विचार केला तर अगदी नवखी. त्यात शिकवणारे शिक्षक हे त्या भाषेलाच चिकटून
>> असणारे कधी आदिवासी बोली भाषेला आपलेसे न माणणारे मग मुलांना ते पण परकेच
>> वाटणार....जिथे आपले काही आहे असे वाटत नाही, तिथे ज्ञान तरी मुलं कसे गृहण
>> करणार.
>>
>> आता दुरदर्शनच्या युगात आदिवासी गावे थोड़ी जागृत व्हायला लागली आहेत. पूर्वी
>> जे दिले जायचे तेच आमच्या नशिबात आहे असे मानून सारा अन्याय सहन केला जायचा.
>> परंतु आता जगाचा अभ्यास करणारी दृष्टी विकसीत होवू लागली आहे. आपल्याला काय
>> मिळायला हवे याचा विचार करणारी पीढ़ी पुढे येवू लागली आहे. नेमका याचाच त्रास
>> आता प्रशासनाला होताना दिसतोय.
>>
>> ज्यांच्या घरी खायला नाही त्यांना आम्ही खायला देतोय असा आव आणणारे आदिवासी
>> विकास खाते आणि त्यांची वसतिगृहे आता संघर्षाची केंद्रे बनत आहेत. कारण पूर्वी
>> निसर्गात वाढणारी ही मुले शाळेत, वसतिगृहात मुकाट्याने सारं काही सहन करत असत.
>> परंतु आता ह्या कोंडवाड्यान्ना भेदुन बाहेर पडण्याचा विचार मुलान्मध्ये रुजत
>> आहे. तूटपूंज्या सुविधा देवून मालदार झालेले अधिकारी यांना मुलांचा आजचा
>> विद्रोह सलत आहे. काही अधिकारी तर आगीत तेल ओतून मुलांना त्यांनी केलेल्या
>> आंदोलनासाठी तुरुंगात डाम्बत आहेत. जो आवाज इंग्रज दाबू शकले नाहित....तो
>> उलगुलान दाबण्याचा प्रयत्न करणा-या समाजद्रोही विकृती वेळीच ठेचन्याची गरज
>> आहे. जे हक्काचे आहे ते लुबाडून विद्यार्थ्यांना कायद्याच्या बेडित अडकवणारे
>> हे धाडस करू शकतात, कारण आमच्यातला तो बिरसा, राघोजी, तंट्या, झलकारीबाई आम्ही
>> विसरून स्वकेंद्री जीवन जगु लागलो आहोत.
>>
>> स्वातंत्र्याची चिंगारी ज्या आदिवासींनी पेटविली आज त्यांचे वारस असे
>> शांत....हा सर्व खेळ जे परकीय शिक्षण आम्ही घेतले त्याचाच आहे. मला काय त्याचे
>> ही प्रवृत्ती वाढली. नोकरीला असणारे, कायद्याची जाण असणारे अनेक आहेत आदिवासी
>> समाजात...आज त्यांच्या समर्पणाची, त्यागाची गरज आहे.
>>
>> पनवेल येथील मुलांनी आपणास सुविधा मिळाव्यात म्हणून आन्दोलन केले. त्यांचे
>> काय चुकले? याचा विचार अगोदर होणे गरजेचे आहे. आमच्या ताटातील हिसकावून घेणारे
>> अधिकारी माज आल्यागत कायद्याची भाषा करत आहेत. खरे तर यांच्यावर अनुसूचित
>> जमातीच्या विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक अपु-या सुविधा पुरविल्या म्हणून
>> atrocity अंतर्गत गुन्हे नोंदविले गेले पाहिजेत.
>>
>> हा संघर्ष आम्हाला करावाच लागेल...कारण जे शिक्षण आश्रमशाळेत दिले जात आहे,
>> त्याचे विदारक चित्र आपण पाहिले आहे. वसतिगृहे, आश्रमशाळा यातील सुविधा या
>> खुपच तूटपूंज्या आहेत. आदिवासींनी जसे धनगर आरक्षण विरोधात उलगुलान केले तसा
>> प्रखर लढा यासाठी देणे गरजेचे आहे. कारण यातूनच उद्याचा सक्षम आदिवासी समाज
>> उभा राहणार आहे.
>>
>> -आदिवासी स्पंदनं
>>
>>
--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/0edf2f11-526a-4c76-b7dd-65a95b4f762d%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.