'आदिवासी मुख्य प्रवाहात' आला पाहिजे असे मत व्यक्त करताना . मुख्य प्रवाह
म्हणजे काय हाच प्रश्न कोड्यात आहे कारण
मुख्य प्रवाह म्हणजे
१ आपला निसर्ग धर्म सोडून हिदूची चातूवर्ण स्विकारण्
२ .मिशनरिचा धर्म प्रचार करून धर्मांतरण करणे
 हा मुख्य प्रवाह खरच स्विकारण्यालायक आहे का?

2015-08-20 23:30 GMT+05:30 AYUSH | adivasi yuva shakti <[email protected]>:

> मुख्य प्रवाह...
>
> आदिवासी विकासाच्या योजना (गप्पा) जेव्हा जेव्हा माझ्या कानावर पडतात, तेव्हा
> बहुतेक तज्ञ व्यक्ति 'आदिवासी मुख्य प्रवाहात' आला पाहिजे असे मत व्यक्त
> करतात. मुख्य प्रवाह म्हणजे काय असा जर उलट प्रश्न केला तर बोलणा-या
> व्यक्तिच्या नजरा पुणे, मुंबई अशा मायावी नगरांकडे जातात. आता हा मुख्य प्रवाह
> खरच स्विकारण्यालायक आहे का?
>
> शहरी भाग म्हटला की बेरोजगारी, गुन्हेगारी, संस्कृतीचा -हास, मुलींची गर्भात
> केली जाणारी हत्या, पैसा म्हणजे सर्वस्व, स्वार्थी जीवनशैली अशा अनेक बाबी
> ज्या सामान्य जीवनाला काळिमा फासण्याचा प्रयत्न करत असतात. अलीकडे बलात्कार,
> अपहरण, बाल गुन्हेगार, व्यसने अशा विकृती वाढत आहेत. शिक्षण शहरात चांगले असते
> असे म्हटले जाते, मग याच शिक्षणात या समस्या कमी होतील यावर काही उपाय सापडत
> नाही.
>
> वरील समस्या आज तथाकथित मुख्य प्रवाहाचा अविभाज्य भाग बनलेल्या आहेत. याच
> प्रवाहात न्याय या गोष्टीला पैशात तोलले जात आहे. समाधान ही बाब या प्रवाहातुन
> अगदी संपुष्टात आलेली आहे.
>
> आता विचार करा मित्रांनो, स्वताच्या पदरात काही नाही पडले तरी चालेल परंतु
> आपला शेजारी, आपले कुटुंब, आपला गाव, आपला समाज सुखात असला पाहिजे ही आदिवासी
> संस्कृती. निसर्गाला आपला पाठीराखा मानून त्याचे जतन आणि संवर्धन हेच
> संस्कार....खिशात रुपया नसला तरी काही फिकिर नाही...खरे तर खिसा असतोच कुठे
> हां मोठा प्रश्न...वस्तू विनिमय आणि मदतीची भावना यामुळे पैशाची गरजच नसते.
> दोन घास आपल्या पोटात गेल्यावर घरातील कुत्रे, मांजरे, गाई, जनावरे, पक्षी
> यांचाही विचार आमचे आदिवासी बांधव करतात. आम्ही यालाच देव मानले आहे.
>
> जगण्याचे दोन्ही प्रवाह आपल्या समोर आहेत. आदिवासींना मुख्य प्रवाहात आणायचे
> म्हणजे नक्की काय तर त्यांना अनंत समस्यान्च्या गराड्यात सोडून द्यायचे
> सडत-कुढ़त मर मर जगण्यासाठी....काही लागले असतीलही नोकरीला....परंतु
> संस्कृतीविना त्यांचे समाजमुल्य तरी काय? काडी मात्र किंमत नसणारे जीवन जिथे
> नशिबात येणार असा मुख्य प्रवाह जाणिवपूर्वक तर चर्चेत आणुन राबविला जात नसेल
> ना असाही विचार करण्याची गरज आज आदिवासी बांधवांसमोर आहे.
>
> मुख्य प्रवाहातील समस्या सोडवयाच्या असतील तर त्याला एक प्रभावी मार्ग आहे
> आणि तो म्हणजे आदिवासी संस्कृती...परंतु असे असताना आदिवासी वनसंपत्ती, जमीन,
> जल यावर डोळा ठेवून असणारे कारखानदार आदिवासींना मुख्य प्रवाहात आणण्याचा कट
> करून आदिवासीला मारण्याचा खुलेआम प्रयत्न करत आहेत.
>
> जगात प्रगतीबरोबर शांतीच्या मार्गाने समाधानाचे जीवन जगायचे असेल तर आदिवासी
> संस्कृतीचा मार्ग मुख्य प्रवाहातील लोकांनी आत्मसात करणे गरजेचे आहे.
>
> -आदिवासी स्पंदनं
> www.vidrohiadivasi.in
>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to [email protected].
> To post to this group, send email to [email protected].
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/c3a8db51-39f9-4c36-bdd1-16b5e34d88e0%40googlegroups.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/c3a8db51-39f9-4c36-bdd1-16b5e34d88e0%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAAgR8ncDcarVjZT2tS8xJ85u2FjpM_2Wva%3DXfOK9BrZgRSpD_g%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to