आमचा गाव.... आम्हीच सरकार ... महाराष्ट्राच्या पूर्वेकडील चारही बाजूने घनदाट जंगलांनी वेढलेले आदिवासी जिल्हा गडचिरोली , गडचिरोली म्हटले कि, समोर येते ती रक्तरंजित होळी ,जाळपोळ बंदुकींचा आवाज आदिवासी ...नक्षलवाद... नक्षलवादी अशी ओळख झालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात वसलेले माडिया गोंड आदिवासी जमातीचे मध्यभारतातील एक लहानसे गाव “ मेंढा लेखा ” मेंढा लेखाच्या आजूबाजूचं जंगल , नक्षलवाद्यांच्या बंदुकांनी सतत घुमत असतं ५०० च्या जवळ लोकसंख्या असलेल्या मेंढा ( लेखा ) गावच सरकार देशात पूर्ण वेगळं आहे . नैसर्गिक साधनसंपदा या गावाला भरभरून मिळालीय १८०९.६१ हेक्टर वनक्षेत्रावर साग ,बांबू , तेंदू म्हणजेच टेंभरून अश्या स्वरूपाची वनराई सर्वदूर पसरलीय. जंगल हा आदिवासींचा जगण्याचा मुख्य आधार असतो , गावपातळीवरची सरकारव्यवस्था ग्रामसभेद्वारे त्यांच्या हातात आली . मेंढा लेखा गावचा लोकलढा गेल्या पंधरा वीस वर्षापासून ग्रामसभेच्या माध्यमातून सुरु झाला तो आजपर्यंत यशस्वी सुरु आहे. गावच्या हद्दीतील जल ,जंगल, जमीन हि ग्रामसभेच्या मालकीची झाली आहे ...! आज अवघ्या ५०० च्या आसपास लोकसंख्या असलेल्या गावचे सर्व वार्षिक उत्पन्न ग्रामसभेच्या खात्यात बँकेत जमा होते . मेंढालेखा ग्रामसभा ” नावाचे pan card त्यांना देण्यात आले आहे . गावच्या विकासाचे नियोजन ग्रामसभेत केले जाते ....नक्षलवादी , वनवासी , जंगली , गरीब ,म्हणून ज्या आदिवासींकडे पाहिले जाते त्याच आदिवासींनी आपल्या कला ,संस्कृती, परंपराच्या माध्यमातून जगाला वेगळेपण शिकवले आहेच मात्र जगात सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र असलेल्या भारत देशाला “ लोकशाही ” काय असते कायदयाची अमलबजावणी कशी करायची हे दाखवून दिले आहे ....... Panchayat Extension to Scheduled Area Act 1996 म्हणजेच पेसा कायदा १९९६ ... अनुसूचित जमाती व परंपरागत वननिवासी अधिनियम २००६ची प्रभावी अमलबजावणी केली जाते. गावाने देशात सर्वात प्रथम खऱ्या अर्थाने लोकशाही मेंढा लेखाने स्वीकारली . मेंढालेखाच्या नागरिकांचे सरकार “ ग्रामसभा “आहे .सरपंच ,ग्रामसेवक ,पोलिसपाटील किंवा कोणत्याही सरकारी अधिकार्याला ग्रामसभेच्या अधिकारात,नियंत्रणात राहून काम करावे लागते . आज बांबू ,सागवान , तेंदू पत्ता ,आदी विविध वनोपाजांच्या विक्रीतून या गावचे वार्षिक उत्पन्न कोटींच्या वर पोहचले आहे उत्पन्नाची सर्व रक्कम ग्रामपंचायत ऐवजी ग्रामसभेच्या खात्यावर बँकेत जमा आहे . मेंढा लेखाच्या ग्रामसभेत एक महत्वपूर्ण निर्णय होऊन केंद्र सरकारचे तत्कालीन पर्यावरण मंत्री जयराम रमेश , व महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना ग्रामसभेने गावात प्रवेश नाकारला होता . मेंढा लेखाची न्याय व्यवस्था ग्रामसभा आहे ...महिन्यातून ३ ते ४ वेळा ग्रामसभा होते. ग्रामसभेचा निर्णय अंतिम मानला जातो याच ग्रामसभेने सामुदायिक वनशेतीचा प्रयोग उत्कृष्ट वन केला आहे . लागवडीसाठी लागणारे बांबू ,जांभूळ ,टेंभरून , मोह , अर्जुन ,सागवान अश्या जंगली झाडांची स्वताची रोपवाटिका सुरु केली असून याच रोपवाटिकेतल्या रोपांची लागवड श्रमदानातून केली जाते . ग्रामसभेमुळे मेंढालेखा हे नाव देश तसेच जागतिक पातळीवर पोचलय... आमच्या गावात आम्ही सरकार हा नारा देऊन मेंढालेखा चा विकास येथील नागरिकांनी ग्रामसभेच्या माध्यमातून करून घेतला . कोणत्याही सरकारी कर्मचारी , अधिकारी ,नेते , पुढारी यांना ग्रामसभेच्या परवानगी शिवाय गावात प्रवेश करता येत नाही . भाषण अन आश्वासन देणार्यांना ग्रामसभेच्या परवानगीशिवाय गावात येता येत नाही . आमच्या गावात असलेले ग्रामपंचायत कार्यालय व्यवस्थित नसते येथे ग्रामसभेचे भव्य व पूर्ण कॉम्पुटराईज असे कार्यालय पहावयास मिळते ...हे शक्य झाले ते फक्त पेसा कायदा ,अन वन हक्क कायदा यांच्या अंमलबजावणीमधून . दिल्ली मुंबईत आमचे सरकार ह्या ओळी येथे गावात जातांनाच वाचायला मिळतात .
( “आमचा गाव आम्हीच सरकार” या विषयावर माहितीपट करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात फिरत असतांना येथील सामाजिक कार्यकर्ते “ देवाजी तोफा ” यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली , देवाजींना मी या आधी २ वेळा भेटलो होतो पण एकत्र बसून २ दिवस एकाच विषयावर चर्चा करायला संधी पहिल्यांदाच मिळाली . “ आमचा गाव आम्हीच सरकार ” या माहितीपटाचे काम आज पूर्ण झाले, हा माहितीपट गावविकासासाठी अन ग्रामसभा स्थापन करण्यासाठी सर्वांना प्रेरणादायी ठरेल यात शंकाच नाही . माहितीपट शूटिंगसाठी नाशिकवरून प्रा. संजय सावळे , मा.एकनाथ भोये , चंद्रकिरण सोनवणे ,बाळासाहेब जाधव ,प्रभाकर फसाळे ,तर घनशामजी मडावी ( गडचिरोली ) प्रमोद बोरीकर ( चंद्रपूर ), विलास मडावी ( चंद्रपूर ) यांचे सहकार्य लाभले .. सर्वांचे आभार ...! विजयकुमार घोटे मो.न.९६२३७०१७०९ -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/b98a3de9-5d32-45d5-a227-142fc6900ac7%40googlegroups.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.