What is PESA? Sorry I haven't read any of your mails before. This is the first I read. Sounds interesting :-) Good information. Please answer. On 12 Oct 2015 19:02, "ekbhoye" <[email protected]> wrote:
> समज - गैरसमज > वर्षातून किमान किवा कमाल ग्रामसभा घेण्याची तरतुद पेसा गावाना लागू नाही > पेसा ग्राम सभेची नोटीस १५दिवस अगोदर देणे कायध्यानुसार बधनकारक आहे. > ग्राम सभेस गणसंख्या /कोरम आवश्यक असते . > गणसंख्येअभावी पहिल्या सभेत निर्णय झाला नाही तर ग्रामसभेची दुस-यांदा सभा > बोलवावी लागेल व त्या सभेस पुरेशी गणसंख्या नसल्यास बहुमताने निर्णय घेतला > जाइल . स्रीयाची गणसंख्या वेगली असते > ग्राम सभेचे अॉ फिस निश्चीत केलेले असते तेथे ग्रमसभा घेणे बंधनकारक असते > ज्या गावात ग्रामपंचायत नाही तेथे ग्रामसभा समाजमंदीर ,शाला किंवा सामान्य > व्यक्तीचे येथे घेणे कायध्यात नमूद आहे > प्रत्येक पेसा गावात ग्रामसभा असेल . इंग्रजी आध्य मुलाक्षराप्रमाणे सभा > घेण्याची पद्धत पेसा नियम व महाराष्ट्र ग्रामपंचायत कायध्यात नाही . > एकनाथ भोये > > ▶ > > > > > Sent from Samsung tablet > > > > -------- Original message -------- > From: AYUSH | adivasi yuva shakti <[email protected]> > Date: 11/10/2015 10:50 PM (GMT+05:30) > To: AYUSH | adivasi yuva shakti <[email protected]> > Subject: AYUSH | Gram Sabha Info : ग्रामसभा > > > ग्रामसभा > > जशी लोकसभा, विधानसभा तशी ग्रामसभा. लोकसभेचे सभासद खासदार असतात. विधानसभेचे > सभासद आमदार असतात. तसेच ग्रामसभेचे सभासद मतदार असतात. > > माणूस १८ वर्षाचा झाला कि त्याला मतदान करण्याचा अधिकार मिळतो. मग तो > प्रत्येक नागरिक आपोआपच ग्रामसभेचा सदस्य बनतो. एकदा सदस्य झाला कि तो > मरेपर्यंत सदस्य असतो. ग्रामसभेला निवडणूक नाही. गावातील प्रत्येक मतदार > नागरिक हा ग्रामसभेचा सदस्य आहे. > > ग्रामसभेत हजर राहण्याचा, ग्रामसभेत मत, विचार मांडण्याचा प्रत्येक नागरिकाला > अधिकार आहे. बहुमतांनी ठराव पास / नापास करण्याचा, मत देण्याचा अधिकार > प्रत्येक नागरिकाला आहे. > > जसे हे अधिकार आहेत तसेच हे अधिकार बजावण्याचे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य > आहे. गावातील ग्रामपंचायत आपण सांगतो तशी चालविणे, चालते कि नाही हे पाहणे हे > प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. > > ग्रामसभेत जे ठरेल, जे ठराव होतील त्याची अंमलबजावणी करणे ग्रामपंचायतीवर > बंधनकारक आहे. जर ग्रामसभेला गेलो नाही, आपण सांगतो त्याप्रमाणे ठराव करून > घेतले नाहीत, तर ग्रामपचायतीमध्ये ग्रामसेवक, सरपंच उपसरपंच व सदस्यांचा > मनमानी कारभार चालेल. > > अनेक गावात प्रत्यक्षात ग्रामसभा होत नाहीत. ग्रामसभेच्या ८ दिवस आधी > लोकांच्या सह्या घेतल्या जातात, किंवा खोट्या सह्या / अगन्ठे घेतात. व सरपंच > / ग्रामसेवक मनानेच खोटे ठराव घेवून पंचायत समितीत पाठवून देतात. यामुळे > प्रत्यक्षात गावात फार मोठा भ्रष्टाचार होवूनही लोकांना माहिती असू शकत नाही. > > वर्षातून किमान ६ ग्रामसभा घेणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे. ६ पेक्षा जास्त > घेतल्या तर हरकत नाही. पैकी ४ ग्रामसभांच्या तारखाही फिक्स आहेत. > > २६ जानेवारी - प्रजासत्ताक दिन > १ मे - कामगार दिन > १५ ऑगस्ट - स्वातंत्र्य दिन > २ ऑक्टोबर - गांधी जयंती > > या दिवशी ग्रामसभा भरविणे बंधनकारक आहे. ग्रामसभेची नोटीस हि सभेच्या > तारखेपूर्वी १० दिवस आधी बजावावी लागते. नोटीस हि ग्रामपंचायत कार्यालयात तसेच > सर्वाना पाहता येईल, व सहजपणे वाचता येईल अशा ठिकाणी लावून प्रसिद्ध करावी > लागते. तसेच सभेच्या ८ दिवस अगोदर व सभेच्या एक दिवस अगोदर अश दोन वेळा > प्रत्येक वार्डात, वाडीत सविस्तर दवंडी हि द्यावी लागते. > > सभेचा अध्यक्ष > > आर्थिक वर्षातील पहिल्या ग्रामसभेचा अध्यक्ष तसेच निवडणुकीनंतरचा पहिल्या > ग्रामसभेचा अध्यक्ष सरपंच असतो. सरपंचांच्या गैरहजेरीत उपसरपंच हा अध्यक्ष > असतो बाकी उर्वरित ग्रामसभेचा अध्यक्ष मतदारांनी बहुमताने निवडून दिलेला > व्यक्ती हा ग्रामसभेचा अध्यक्ष असतो. > > ग्रामसभेत कसे बोलावे ? > > ग्रामसभेत मतदारांना बोलण्याचा अधिकार आहे. मतदारांनी ग्रामसभेच्या > अध्यक्षाची परवानगी घेवून बोलावे तसेच उभे राहून अध्यक्षांना अध्यक्ष महाराज > असे संबोधून त्यांचेकडे पाहून बोलावे. अध्यक्षांनी सुद्धा माहिती > विचारणाऱ्याकडे पाहून बोलावे. > > सभेत मतदारांच्या प्रश्नाला फक्त अध्यक्षच उत्तर देवू शकतात. इतरांना उत्तरे > देण्याचा अधिकार नाही. > > सभेचे कामकाज > > ग्रामसेवक हा ग्रामसभेचा सचिव असतो. ग्रामसभेचे इतिवृत्त सचिव तयार करून > व्यवस्थित ठेवतो. मात्र त्याच्या अनुपस्थित अध्यक्ष सांगेल तो शिक्षक, तलाठी, > अंगणवाडी सेविका या सारख्या शासकीय/ निमशासकीय / ग्रामपंचायत कर्मचारी तयार > करील. > > अत्यंत महत्वाचे - > > पुढील ग्रामसभेत ज्या विषयांचे ठराव व्हावेत असे आपणास वाटते, त्याचे निवेदन > तयार करून तसा विनंती अर्ज सभेच्या ८ दिवस आधी ग्रामपंचायतीत जमा करून त्याची > पोच घ्यावी. > > ग्रामसभेत ठराव मांडावा, त्यावर बहुमत घेण्यास भाग पाडावे. ठराव पास . नापास > झालेला प्रोसिडिंग बुक मध्ये लिहिला कि नाही. ठराव जसा झाला तसाच लिहिला कि > बदल करून लिहिला हे शिकलेल्या मुलाकडून मोठ्याने वाचून घ्यावे. अन्यथा ठराव > होवूनही प्रोसिडिंग बुकात न लिहिणे किंवा चुकीचा लिहिणे हे प्रकार सर्रास > घडतात. > > ग्रामसभेत आपण रस्ता, पाणी, गटार, वीज, शिक्षण, आरोग्य, शौचालये, रेशन, > रोजगार, घरकुले, असे कोणतेही नागरी, सार्वजनिक हिताचे प्रश्न उपस्थित करू शकतो > व त्यावर चर्चा घडवून आणू शकतो व ठराव करण्यास भाग पडू शकतो. > > आपण जर नियमितपणे ग्रामसभेत उपस्थित राहिलो व ग्रामसभेत सहभाग दिला व > ग्रामपंचायतीच्या कारभारात हस्तक्षेप केला तर आपणास गावातील कोणत्याही > अडचणीसाठी तालुका, जिल्ह्याच्या गावी जाण्याची गरज नाही. > > आर्थिक वर्षातील पहिली ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या कार्यालयात घेणे बंधनकारक > आहे. तसेच उर्वरित ग्रामसभा इंग्रजी मुळाक्षरांच्या (अल्फाबेटिकल्स प्रमाणे) > अद्याक्षरांप्रमाणे इतर वाडे, वस्तीवर घ्याव्यात. > > आपण जर निवेदन दिले कि, अमुक तारखेला अमुक वाजता, अमुक या ठिकाणी ग्रामसभा > घ्यावी, तर त्या प्रमाणे ग्रामसभा घ्यावी लागते. > > आपण जर ग्रामसभेला गेलो तर आपला रोज बुडेल असे वाटत असेल तर आदल्या > ग्रामसभेला पुढील ग्रामसभेची वेळ ठरवून घ्यावी. किंवा निवेदन देवून सांगावे. > > संध्याकाळी किंवा सकाळी लवकर देखील मतदारांच्या सोयीच्या वेळेत ग्रामसभा घेणे > बंधनकारक आहे. > > -- > Learn More about AYUSH online at : > http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to [email protected]. > To post to this group, send email to [email protected]. > Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit > https://groups.google.com/d/msgid/adiyuva/15fcbaf6-20e2-4d6c-8353-f7ab22fa4626%40googlegroups.com > <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/15fcbaf6-20e2-4d6c-8353-f7ab22fa4626%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer> > . > For more options, visit https://groups.google.com/d/optout. > > -- > Learn More about AYUSH online at : > http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to [email protected]. > To post to this group, send email to [email protected]. > Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit > https://groups.google.com/d/msgid/adiyuva/04ycc48j23wvyxln75t7ksgm.1444656024954%40email.android.com > <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/04ycc48j23wvyxln75t7ksgm.1444656024954%40email.android.com?utm_medium=email&utm_source=footer> > . > For more options, visit https://groups.google.com/d/optout. > -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CA%2BKRkopcUqf0ovygRn%2BoU1H4DyXgnodxyX3jWBRiNcqdUvizfA%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

