डहाणू तालुक्यातील कासा गावातील चंद्रकांत घाटाळ या होतकरु तरुणाने स्थापन केले अवकाश दर्शन केंद्र--पहा मी मराठीचा सविस्तर आढावा
Watch "Dahanu -* Aakash darshan kendra *on YouTube - https://youtu.be/hPGzoVfPJgo Chandrakanth Ghatal (Kasa) : 73501 31480 On Saturday, October 24, 2015 at 11:05:37 PM UTC+5:30, AYUSH | adivasi yuva shakti wrote: > > अवकाश निरिक्षणाची आवड असणा-यांसाठी डहाणूतल्या एक तरुणानं अनोखी संधी > निर्माण करुन दिलीय. डहाणू तालुक्यातील कासा गावातील चंद्रकांत घाटाळ या > तरुणानं महाशक्तिशाली दुर्बिण तयार केली आहे. > आतापर्यंत आपण आकाशाची भौगोलिक माहिती पुस्तकातून किंवा मग मुंबईतील नेहरू > तारांगण किवा इतरत्र जाउन पाहत होतो . मात्र डहाणू तालुक्यातील कासा गावातील > चंद्रकांत बुध्या घाटाळ या तरुणाने कोणतीही शासकीय मदत न घेता स्थानिक पातळीवरच > त्याने ही दुर्बिण तयार केली आहे. या भागातील विद्यार्थी ,पालक ,आणी > प्रेक्षकांमध्ये त्यामुळे एक कुतुहलाचे वातावरण निर्माण झालंय. दिवसेंदिवस > आकाशदर्शन करण्यासाठी शाळेतील विद्यार्थी आणि नागरिक गर्दी करत आहेत. > चंद्रकांतचे शिक्षण बीएबीएड झाले असून,मुंबईतील वरळीतून त्याने शिक्षण पूर्ण > केले. सुरुवातीपासूनच त्याला खगोलशास्त्राची आवड होती,त्यामुळे त्याने आपली > मिळालेली नोकरी सोडून खगोल शास्त्राकडे वळण्याचे निच्छित केले. ही आवड त्यानं > प्रत्यक्षात उतरवली आणि महाशक्तीशाली दुर्बिण साकारली. > चंद्रकांत घाटाळ याने कासा येथे अनुजा अवकाश निरिक्षण केंद्र स्थापन केले > असून .पालघर जिल्ह्यात हे पहिलेच केंद्र आहे, अतिशय मोठ्या महाशक्तिशाली > दुर्बीनीद्वारे आकाशातील चंद्र ,तारे,ग्रह,राशिचक्र ,नक्षत्र तसेच > खुजेतारे,राक्षसीतारे,न्यूट्रोन तारे,दैतितारे,रूपविकारी तारे,तेजोमेघ > ,दीर्घिका,नवतारे,अतिनवतारे,खुले तारकागुच्छ,बंदिस्त तारकागुच्छ ,गुणीततारे, > रयततारे ,कन्या दीर्घिका पुंज, पल्सार, इत्यादि बाबी निरिक्षण करण्याची संधि > उपलब्ध करुन दिली असून यासाठी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मुबलक > निरिक्षण फी द्वारे प्रवेश दिला जाणार आहे.अशी संधि या ग्रामीण भागातील कासा > सारख्या भागात एका आदिवासी तरुणाने उपलब्ध करुन दिल्याने विद्यार्थी पालक आणि > नागरिकांकडून चंद्रकांतचे कौतुक करण्यात येतेय.परंतु या सर्वाची दखल घेऊन > चंद्रकांत याला शासकीय मदत मिळणे देखील गरजेचे आहे > > > > > > > > > -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/e863157c-5a45-4781-a239-6d8c22603ce5%40googlegroups.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

