On Sunday, October 25, 2015 at 12:21:29 PM UTC+5:30, AYUSH | adivasi yuva shakti wrote: > > > > > > > > > > > > > घटनेनेच नाकारले आम्हाला > म.टा. प्रतिनिधी, नागपूर > > भारतीय संविधानातच आमचा आदिवासी म्हणून उल्लेख नाही. भारतीय संविधान > आदिवासीला अनुसूचित जमाती म्हणते. मूळनिवासी किंवा आदिवासी असा शब्दप्रयोग > करण्याची गरज असताना घटनेनेच आम्हाला नाकारले आहे, अशी खंत आदिवासी समाजाचे > नेते एल. के. मडावी यांनी व्यक्त केली. > > यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान नागपूर विभागीय केंद्राच्यावतीने शंकरनगर चौकातील > राष्ट्रभाषा संकुलात शनिवारी 'आदिवासी कोण? मूळनिवासी, हिंदू की वनवासी?' या > विषयावर खुल्या चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. बहुजन संघर्ष मासिकाचे संपादक > नागेश चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या चर्चेत डॉ. विनायक तुंबडाम, > रमेश बोरकुटे, प्रा. डॉ. प्रमोद मुनघाटे आदी अभ्यासकांनी सहभाग घेतला. आम्ही > या देशाचे मूळ नागरिक आहोत, हा मुद्दा आदिवासी नागरिकांनी यावेळी ठासून मांडला. > > जगातील कुठल्याही आदिवासींना धर्म नाही. आदिवासींना काय म्हणावे, यावर १९४९ > मध्येही चर्चा रंगली होती. संविधानात मूळनिवासी किंवा आदिवासी शब्दप्रयोग > करण्याची गरज आहे. घटनेनुसार आदिवासी हिंदू नाही. हिंदू कोड बिल आदिवासींना > लागू होत नाही, मात्र आदिवासींवर ते लादल्या जाते. आदिवासींमध्ये लग्नात > मंगलाष्टक आणि सात फेरे होत नाहीत. त्यामुळे आम्ही हिंदू नसल्याचे मडावी > म्हणाले. > > 'वनवासी'वर आणा कायदेशीर बंदी > > आदिवासींना वनवासी म्हणणे म्हणजे आदिवासींची मूळ ओळख पुसण्याचा प्रयत्न आहे. > वनवासी म्हणजे ज्याला कुठलीही संस्कृती नाही. आदिवासी या देशाचे मूळ निवासी > आहेत. २०१६ मध्ये आदिवासी धर्म स्वीकारण्याचा प्रयत्न असल्याचे डॉ. तुंबडाम > म्हणाले. रामाला, पांडवांना वनवासात पाठविण्यात आले. म्हणजे वनवासी हा शब्द > शिक्षेच्या संदर्भात वापरण्यात आला. त्यामुळे आदिवासींना वनवासी म्हणणे चुकीचे > असल्याचे मत डॉ. मुनघाटे यांनी जागतिक भाषातज्ज्ञ गणेशदेवी यांच्या पुस्तकातील > संदर्भ देऊन मांडले. वनवासी या शब्दावर कायदेशीर बंदी आणा, अशी मागणी मडावी > यांनी केली. जनगणना करताना आदिवासींना हिंदू धर्म लिहिण्याशिवाय पर्याय > नसल्याचे मत प्रमोद मून यांनी मांडले. हिंदू हा धर्म नाही तर संस्कृती आहे, > असे म्हटले जाते. शासकीय अर्जांवर धर्म म्हणून हिंदू हा शब्द का वापरला जातो, > असा सवाल चौधरी यांनी उपस्थित केला. > > अर्थ चुकीचा घेतला > > आदिवासी म्हणजे 'सर्वांत प्रथम' असा अर्थ होतो. वनवासी म्हणजे वनात राहणारे. > वनवासीचा चुकीचा अर्थ काढून वाद निर्माण करण्यात आला. त्यामुळे वनवासी असा > उल्लेख करण्यात काहीच गैर नसल्याचे मत श्रीराम बढे यांनी व्यक्त केले. डॉ. > श्रीधर जोशी यांनी १८५७ च्या लढ्याचा उल्लेख करता या विषयावर प्रकाश टाकला. > भारतीय समाजात दुफळी निर्माण करण्याच्या उद्देशाने इंग्रजांनीच ब्राह्मण व > ब्राह्मणेतर असा वाद निर्माण केल्याचे डॉ. जोशी म्हणाले. असे गैरसमज दूर > करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. >
-- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/41ed9adc-d3e9-46ee-a8e5-a978b86d2f2c%40googlegroups.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

