|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : एप्रिल २०१६ ||
आदिवासी समाजाचे स्वावलंबन टिकविण्या साठी जल जंगल जमीन जतन करून कौशल्य विकास आणि रोजगार निर्मिती चे उपक्रम या साठी समाजातून सकारात्मक आणि रचनात्मक पुढाकार घेण्याची गरज आहे. आदिवासी जीवनमूल्य आणि पारंपरिक ज्ञान यांच्याकडे जग आदर्श मार्ग म्हणून बघत असताना या विषयी जागरुकता होणे गरजेचे आहे. आणि त्या साठी वेग वेगळ्या पातळीवरून एकमेकांना पूरक आणि सकारात्मक कार्य करणारे ग्रुप/संस्था/संघटन/उपक्रम यांचे जाळे मजबूत करून आदिवासी जीवन मुल्य जतन करून समाज हित जपण्यासाठी प्रयत्न करूया. आपल्या माहिती साठी 1) ९एप्रिल २०१६ रोजी रायतली येथे चित्रकारां सोबत आयुश चे उपक्रम आणि आदिवासी कला आणि रोजगार निर्मिती (अडचणी आणि संधी) यावर चर्चा झाली अंदाजे २५ कलाकार सहभागी झाले होते. २) १० एप्रिल २०१६ रोजी जीतगाव येथे संपत ठाणकर गुरुजी यांची भेट आणि सांस्कृतिक संपदा या विषयावर सविस्तर चर्चा झाली ३) आदिवासी कला आणि पारंपारिक ज्ञान यांच्या आधारे विविध रोजगार निर्मिती अभ्यासक्रम निर्माण करण्या हेतू १२ एप्रिल २०१६ रोजी कोलकता येथे झालेल्या मिटिंग मध्ये केंद्रीय कौशल्य आणि इंतरप्रेनरशिप विकास विभाग तर्फे आयुश ला अभ्यास भेट देण्या साठी उच्च अधिकारी गट मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात डहाणू - वाघाडी येणार आहे असे ठरले आहे. सदर विषयी चर्चेत सहभागी होण्या साठी इच्छुक अभ्यासकांनी संपर्क करावा ४) भारतीय बौद्धिक संपदा विभागा मार्फत आयुश तर्फे आदिवासी कलाकारांना दिल्ली येथे होणाऱ्या २० ते २३ एप्रिल रोजी प्रदर्शनात वारली चित्रकलेचे डेमो देण्या साठी आमंत्रित केले आहे. तरी इच्छुक कलाकार आणि अभ्यासक यांनी संपर्क करावा (तेथे इंग्रजी मधून माहिती देणे अपेक्षित आहे). प्रवास भत्ता आणि राहण्याची सोय आयोजका मार्फत केले जायील. ५) वारली चित्रकला वस्तू विविध संकेतस्थळावर विक्री साठी शर्मिला ताई घाटाळ यांच्या वस्तूंचे छायाचित्रीकरण वाघाडी येथे करण्यात आले. ज्या कलाकारांना आपल्या कलाकृतीचे छायाचित्रण करावयाचे असल्यास कलाकृतीचे नमुने वाघाडी येथील आयुश संपर्क केंद्रात आणून द्यावे. ६) आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे येथे परिसरात असलेल्या आदिवासी कला विक्री केंद्र येथे "बहुउद्देशीय आदिवासी सहकारी संस्था" या मार्फत कलाकृती विर्की साठी ठेवल्या जात आहेत. आदिवासी कलाकार त्वरित नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी ठेवू शकतात. ७) आदिवासी कला वस्तू विक्री साठी स्वतंत्र संकेत स्थळा सोबत विविध कंपन्या सोबत करार/नोंदणी करण्यात आले आहेत. (फ्लिपकार्ट, अमेझोन, स्नाप डील, इंडिया कला, इ बाय, पेतीएम, आर्ट बाझार , अल्मा म्याटर बीज, संस्कृती, इत्यादी) आदिवासी कलाकार आयुश सोबत त्वरित नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी ठेवण्या साठी. नोंदणी साठी संपर्क करा (9246 361 249).आता आदिवासी कलाकारांनी सामुहिक पद्धतीने काम करून एकमेकांना सहकार्य करून आदिवासी उद्योग/व्यवसाय मजबूत करून नवीन पिढीला रोजगार निर्मिती आणि पारंपारिक ज्ञान चे जतन करणे अपेक्षित आहे. Lets do it together! # आयुश च्या विविध उपक्रमात सहकार्य करण्या करिता येथे (www.in.adiyuva.in) नोंदणी करून सहभागी होवू शकता आयुश मार्फत आपण काही प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवतो, जेणे करून सामाजिक जबाबदारीची जागृती आणि आदिवासी हिता साठी काम करणार्यांना प्रोत्साहन मिळू शकेल. "आपले ज्ञान आणि कौशल्य समाज हिता साठी उपयोगात आणण्याची सवय" हाच आयुश चा उद्देश आहे. उद्या आयुश नसेल हि कदाचित पण समाजा साठी स्वतःहून पुढाकार घेऊन काम करणारी मंडळी तयार करूया, जे प्रामाणिक आणि निस्वार्थ समाजाच्या हिता साठी स्वताहून प्रयत्न करत राहतील. जे आपल्याना समाज हिता साठी योग्य वाटते त्यात सहभाग/मदत करायला सुरवात करूया. हेच आयुश आहे. Lets do it together! AYUSHonline team www.adiyuva.in | www.warli.in Warli Painting is registered geographical Indication, Its Traditional knowledge and cultural Intellectual of Adivasi community! Aim of our Initiative through Warli Painting Mati : Land – Preserve our Cultural Intellectual & Traditional Knowledge Pani : Water – Earn competitiveness by Skill Development and promote Traditional knowledge through New technology Chavul : Rice – Enable Artisan and Adivasi community for strengthening its sustainable economy by employment generation -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBvXDKa4BZtxxmyP0BL14Xsg0VfO6X-_guNDY7-_7MQ3vA%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

