Thanks

Warli Painting <i...@warli.in> wrote:

>*|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ ऑगस्ट २०१६ ||*
>
> 
>
>पारंपरिक ज्ञान, सांस्कृतिक मूल्य, निसर्ग पर्यावरण जतन करून मानव तसेच सगळ्या 
>जीवनश्रुष्टीला एक आदर्श दिशा म्हणून आदिवासी समाजा कडे आज जग आशेने बघत या 
>असताना. आज आदिवासी समाज एक नाजूक वळणावर आहे एकीकडे समाजाची स्वावलंबी 
>अर्थव्यवस्था नष्ट होते आहे, जल जंगल जमीन जीव वेग वेगळ्या मार्गाने हस्तांतरित 
>होते आहे, शैक्षणिक गुणवत्ता खालावते आहे, रोजगार डोळ्यासमोरून जात आहेत,  
>सांस्कृतिक ओळख नष्ट होते आहे.... (यादी खूप मोठी आहे)
>
> 
>
>असो, या सगळ्याचा सविस्तर अभ्यास करून *प्रत्येक क्षेत्रात समाज हित जपून 
>एकमेकांना पूरक रचनात्मक कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देऊन/प्रत्येक्ष उपक्रम 
>सुरवात करून/सहभागी होऊन आपण जर प्रयत्न केले आणि या समस्यांच्या मुळाशी जाऊन 
>कायमची उपाययोजना केली तर नक्कीच आपल्या पिढीला चांगले भविष्य देऊ शकतो. त्या 
>साठी वेग वेगळ्या पातळीवरून एकमेकांना पूरक कार्य करणारे 
>ग्रुप/संस्था/संघटन/उपक्रम यांचे जाळे मजबूत करून आदिवासी समाज हित जपण्यासाठी 
>प्रोत्साहन देवूया.*
>
> 
>
>आपल्या माहिती साठी आपण पारंपरिक ज्ञान (आदिवासी कला -वारली चित्रकला) उपक्रम 
>राबवतो आहोत, त्या विषयी माहिती
>
> 
>
>१) *वारली हाट विकास समिती* : आदिवासी कलाकार/संस्था प्रतिनिधित्व बाबत - अजून 
>उत्तर येणे बाकी आहे 
>
> केंद्र आणि राज्य शासनाने वारली चित्र संस्कृती संदर्भात आर्थिक तरतूद केल्या 
>नंतर, मनोर येथे विकसित करण्यात येणाऱ्या "वारली हाट" या प्रकल्पाच्या समितीत 
>आदिवासी कलाकार/संस्था यांची भूमिका मोलाची राहील. कारण समाजाचा प्रत्येक्ष सहभाग 
>प्लानिंग मध्ये झाल्याने उपक्रम निर्मिती आदिवासी हित साठी विविध सूचना देणे शक्य 
>होईल. या संदर्भात जिल्हाधिकारी- पालघर, प्रकल्प अधिकारी - एकात्मिक आदिवासी 
>विकास प्रकल्प डहाणू, अपर आयुक्त - आदिवासी विकास विभाग ठाणे, आयुक्त - आदिवासी 
>विकास विभाग नाशिक, सचिव - आदिवासी विकास विभाग मुंबई, मंत्री/पालक मंत्री - 
>आदिवासी विकास यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे. सदर विषय प्रत्येक्ष 
>आयुक्त - आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे यांची भेट घेऊन लेखी निवेदन 
>जमा केले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना पण निवेदन जमा केले आहे. अजून प्रतिसाद 
>मिळाला नाही 
>
>       
>
>२) *एक वेगळा अनुभव*
>
>परवा  "ग्रेट इंडियन बास्केट" या संकेत स्थळावरीची पहिली ऑर्डर डेहराडून येथे 
>पाठवली. (वारली चित्र असलेली जूट ची १ पिशवी). मुंबई येथे होणाऱ्या डॉक्टरांची 
>कॉन्फरन्स मध्ये सहभागी झालेल्याना वारली चित्र भेट देण्या बद्दल चर्चा चालू आहे, 
>अभिजित दा नी गोरेगाव येथे नमुना चित्र दाखवली आहेत त्यांना अंदाजे २०० चित्र हवे 
>आहेत लहान आकाराची. कला इंडिया संकेत स्थळावर १०० चित्रांची मागणी आहे एक 
>आठवड्यात त्या बद्दल अधिक विस्तृत माहिती कळवणार आहेत.  
>
> 
>
>३) *चलो आता उतरूया इ मार्केट मध्ये उतरून स्पर्धा करूया* 
>
>वारली चित्र/आदिवासी कला कृती विक्री साठी आपले स्वतःचे ए कॉमर्स संकेत स्थळ आहेच 
>(www.warlikala.com & www.warli.in ) सोबत, विविध कंपन्या सोबत केलेले करार 
>आपल्या कलाकृती साठी अधिक प्रभावी प्रसारा साठी उपयोगात येईल यात शंका नाही-
>
>- फ्लिपकार्ट (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)
>
>- अमेझॉन (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)
>
>- इबाय (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)
>
>- एक्स्पोर्ट्स इंडिया (नोंदणी/करार पूर्ण - कलाकृती विक्री तयार)
>
>- उंगली डील (नोंदणी/करार प्रक्रिया चालू आहे)
>
>- पेटीएम (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)
>
>- ciitrade.in (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)
>
>- Shilpakala.com (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)
>
>- artsofindia.com (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)
>
>- greatindianbasket.com (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)
>
>- loveknits.org (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)
>
>- indiakala.com (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)
>
>- theartbazaar.in (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)
>
>- BuffyFish (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)
>
>- Unexplora (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)
>
>- Puro Kraft (नोंदणी/करार चर्चा चालू आहे)
>
>->> यादी आणखीन वाढते आहे. 
>
> 
>
>सगळ्या आदिवासी कलाकारांनी या संधीचा उपयोग आपल्या कलाकृती जगभर पसरवण्यासाठी 
>उपयोगात आणावे. ज्या कलाकारांना आपल्या कलाकृती विक्री/मार्केटिंग साठी जमा 
>करायचे असल्यास त्वरित नोंदणी करून नमुना प्रोडक्ट्स वाघाडी येथील आयुश केंद्रात 
>जमा करावेत. नोंदणी साठी संपर्क करा (9246 361 249). आदिवासी कलाकारांनी सामुहिक 
>पद्धतीने काम करून एकमेकांना सहकार्य करून आदिवासी उद्योग/व्यवसाय मजबूत करून 
>नवीन पिढीला रोजगार निर्मिती आणि पारंपारिक ज्ञान चे जतन करणे अपेक्षित आहे.  
>Lets do it together! 
>
> 
>
>- आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे (TRTI – Tribal research & Training 
>Institute) येथे परिसरात असलेल्या आदिवासी कला विक्री केंद्र येथे "बहुउद्देशीय 
>आदिवासी सहकारी संस्था" या मार्फत कलाकृती विर्की साठी ठेवल्या जात आहेत. आदिवासी 
>कलाकार त्वरित नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी ठेवू शकतात. 
>
> 
>
>४) *जागतिक बौद्धिक संपदा संघ यांची आदिवासी शिष्यवृत्ती*
>
>जागतिक बौद्धिक संपदा संघ (World Intellectual Property Organisation - WIPO)  
>येथे बौद्धिक संपदा, पारंपरिक ज्ञान, सांस्कृतिक आणि जैव विज्ञान या विषयावर 
>आदिवासी समाजासाठीची जागतिक पातळीवर अभ्यास करून आंतरराष्ट्रीय नीती ठरविण्यासाठी 
>लागणारे विविध संशोधन या साठी "WIPO Indigenous Fellowship Program" हा प्रकल्प 
>आहे. त्या साठी अर्ज मागवले आहेत. या उपक्रमात एक वर्ष कालावधी साठी निवड होते.  
>२००९ पासून चालू झालेल्या या उपक्रमात अजून भारतातून कुणाची निवड झालेली नाही, 
>आपल्या पैकी बौधिक संपदा आणि कायदे या क्षेत्रात अभ्यास असल्यानी जरूर प्रयत्न 
>करावा. आपण मार्गदर्शना साठी नक्कीच प्रयत्न करू 
>
> 
>
>५) *माहिती साठी* - जिनेव्हा येथे १९ ते २३ सप्टेंबर २०१६ WIPO चे IGC होते आहे, 
>भारतातील काही आदिवासी संघटनांना यात सहभागी होण्याचे आमंत्रण आले आहे . 
>
>Sessions of the WIPO Intergovernmental Committee commence with indigenous 
>panels - presentations by a panel of representatives of indigenous and local 
>communities. 
>
> 
>
>Intergovernmental Committee (IGC)
>
>The WIPO Intergovernmental Committee on Intellectual Property and Genetic 
>Resources, Traditional Knowledge and Folklore is, in accordance with its 
>mandate, Mandate of the IGC, undertaking text-based negotiations with the 
>objective of reaching agreement on a text(s) of an international legal 
>instrument(s), which will ensure the effective protection of traditional 
>knowledge (TK), traditional cultural expressions (TCEs) and genetic resources 
>(GRs).
>
> 
>
>६) *सहकार्य आणि सहभाग*:
>
>सदर रोजगार निर्मितीच्या उपक्रमला मजबूत करण्या साठी आपण विविध मार्गाने सहभागी 
>होवू शकता. (मार्गदर्शन, माहितीची देवाण घेवाण, सेवा, तंत्र सहाय, इत्यादी) 
>संपर्क करून सहभागी होवू शकतात. सदर उपक्रमात इच्छुक छायाचित्रकार/चित्रकार/फोटो 
>एडिटिंग सहभाग घेवून सहकार्य करू शकतात.  
>
> 
>
>*# वारली चित्रकला विषयक विविध उपक्रमांच्या माहिती साठी येथे क्लिक करावे* : 
>https://groups.google.com/forum/#!tags/adiyuva/Warli
>
>आयुश च्या विविध उपक्रमात सहकार्य करण्या करिता येथे (www.in.adiyuva.in) नोंदणी 
>करून सहभागी होवू शकता
>
>आयुश मार्फत आपण काही प्रायोगिक तत्वावर उपक्रम राबवतो, जेणे करून सामाजिक 
>जबाबदारीची जागृती आणि आदिवासी हिता साठी काम करणाऱ्याना  प्रोत्साहन मिळू शकेल. 
>*"आपले ज्ञान आणि कौशल्य समाज हिता साठी उपयोगात आणण्याची सवय"* हाच आयुश चा 
>उद्देश आहे. उद्या आयुश नसेल हि कदाचित पण समाजा साठी स्वतःहून पुढाकार घेण्याची 
>सवय लावून घेऊया, ज्यामुळे प्रामाणिक आणि निस्वार्थ समाजाच्या हिता साठी एकत्रित 
>प्रयत्न होत राहतील. जे आपल्याना समाज हिता साठी योग्य वाटते त्यात सहभाग/मदत 
>करायला सुरवात करूया. *आपल्या ज्ञानाचा/कौशल्याचा उपयोग समाज हिता साठी व्हावा 
>हेच आयुश चे धेय्य आहे !*
>
>Lets do it together!   
>
> 
>
>AYUSHonline team
>
>www.adiyuva.in | www.warli.in
>
>Warli Painting is registered geographical Indication, Its Traditional 
>knowledge and cultural Intellectual of Adivasi community!
>
> 
>
>Aim of our Initiative through Warli Painting
>
>माती  : Land – Preserve our Cultural Intellectual & Traditional Knowledge
>
>पानी : Water – Earn competitiveness by Skill Development and promote 
>Traditional knowledge through New technology
>
>चावूल: Rice – Enable Artisan and Adivasi community for strengthening its 
>sustainable economy by employment generation
>
>-- 
>Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>--- 
>You received this message because you are subscribed to the Google Groups 
>"AYUSH | adivasi yuva shakti" group.
>To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an 
>email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>To view this discussion on the web visit 
>https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBvB3EiEnog5PJ--ki%3D8_0PS5045p0Of1Hu%3DvNYj3szNUg%40mail.gmail.com.
>For more options, visit https://groups.google.com/d/optout.

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/36frjl199mkyxghtj16313ng.1473015522539%40email.android.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to