*From:* AYUSH main [mailto:[email protected]]
*Sent:* Thursday, 5 January, 2017 12:30 AM
*To:* AYUSH main
*Subject:* FW: लोकसहभागातून ग्रामविकासाकडेचा नारा ....श्रमदानातून होणार
आदिवासी गावाचा विकास









*From:* vijaykumar ghote [mailto:[email protected]
<[email protected]>]
*Sent:* Tuesday, 3 January, 2017 9:53 AM
*To:* AYUSH Adivasi Yuva Shakti
*Subject:* लोकसहभागातून ग्रामविकासाकडेचा नारा ....श्रमदानातून होणार आदिवासी
गावाचा विकास



 लोकसहभागातून ग्रामविकासाकडेचा नारा ......नवीन वर्षाचे  स्वागत  ग्रामस्वच्छता
अभियानाने ..! धागुर ता. दिंडोरी या गावात नवीन वर्षाचे स्वागत ग्रामस्वच्छता
अभियानाने केले  . गावातील सर्व नागरिक, परिसरातील काही सामाजिक संस्था ,मंडळे
 सहभागी झाले होते  .   धागुर हे नाशिक आणि दिंडोरी तालुक्याच्या सीमेवर
वसलेले साधारणता १२३० लोकवस्तीचे आदिवासी गाव . नाशिक शहरापासून अवघ्या १७
किलोमीटर अंतरावर आहे . परिसर शेतीविकासात आघाडीवर असला तरी गावात फारसा विकास
झालेला नाही . नागरिकांच्या मुलभूत गरजा आहे तश्याच आहेत . जानेवारी २०१७ पासून
" लोकसहभागातून विकासाकडे "  चा नारा देत विकासाच्या दिशेने पाउले पडली  .  धागुर
गावाच्या सर्व नागरिकांनी नवीन वर्षाचे स्वागत ग्राम स्वच्छता मोहिमेने केले .
 गावातील विविध समस्यांचा अभ्यास करून त्या समस्या शासकीय निधी व लोकसहभागातून
सोडवल्या जाणार आहेत त्यासाठी मानस फाऊंडेशन , नेचर क्लब ,या सामाजिक
संस्थांची मदत घेतली जाणार असून  महाराष्ट्रातील गड किल्ल्यांच्या
दुरुस्थिसाठी आघाडीवर असलेल्या " दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान नाशिक. या संस्थेचा
मोठा सहभाग असणार आहे .   गावाच्या परिसरात विविध विकासकामे पूर्ण केली जाणार
आहेत त्यात सार्वजनिक घन कचरा व्यवस्थापन केंद्र , गावातून निघणाऱ्या
कचऱ्यापासून सेंद्रिय खत प्रकल्प , गावाच्या  मालकीचा बायोगॅस प्रकल्प , गावाच्या
हद्दीत मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण , रोजगार हमी योजना आदी उपक्रम मोठ्या
प्रमाणात राबवले जाणार आहेत .   या मोहिमेत दुर्ग संवर्धन प्रतिष्ठान , नेचर
क्लब ,नाशिक , गोल्ड जिम नाशिक . आदीसह अनेक सामाजिक  संस्था  सहभाग  झाल्या
होत्या  . गाव विकासाबरोबर गावातील नागरिकांना गाव पातळीवर रोजगार निर्मिती
केली जाणार आहे . धागुर गावच्या सरपंच वर्षा निंबेकर , उपसरपंच भास्कर बुरुंगे ,
सदस्य  संगीता पडवळे , लक्ष्मण कुंदे , ग्रामविकास अधिकारी  श्रीमती
गवारे , संगीता
दोंदे , समाधान भोये , दुर्ग संवर्धन प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंदजी बोरा , भीमराव
राजोळे , आशिष बनकर ,आकाश जाधव , सागर घोलप , प्रेम जगताप ,  आदीसह  गावातील
सर्व नागरिक यात सहभागी झाले होते  . गावाचं www.gramdhagur.com  गावाची
संपूर्ण माहिती देणारे संकेत स्थळ लवकरच सुरु केले जाणार आहे . धागुर हे गाव
लवकरच स्मार्ट व डिजिटल विलेज म्हणून भारताच्या नकाशात चमकेल . गावाच्या
विकासात अनेक कंपन्याना सहभागी केले जाणार  असल्याची  माहिती गावातील सामाजिक
कार्यकर्ते विजय घोटे यांनी दिली .

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/d3a4fdd483ce0e382bb18e7e59e24d56%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to