खूप खूप आभारी आहे , आपन चांगले काम केलात, मला एक सांगावे से वाटते की जास्त प्रमानात तलासरी भागात तील वारली कलाकार वारली पेंटिंग मधे ख्रिस्ती धर्मा च्या जनजीवन यावर पेंटिंग करतात आणि बहुतेक ख्रिस्ती कलाकार आहेत यावर काही उपाय आहेका





Sent from OPPO Mail
On AYUSH main <ay...@adiyuva.in>, 7 Feb 2017 8:38 pm wrote:

(डहाणू रोड चित्र सजावट दुरुस्ती)

जोहार !
आदिवासी संस्कृतीचे विद्रुपीकरण करणारी चित्रे या याबद्दल जागरूक आदिवासी नागरिक आणि संघटनांच्या मताची नोंद घेवून आयुश तर्फे सुशोभीकरण ची जबाबदारी असलेल्या मुम्बई येथील संस्था रोशनी फाउंडेशन आणि चैरिटेबल ट्रस्ट, प्रायोजक रिलायंस इंफ़्रा, पश्चिम रेल्वे, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, आदिवासी विकास विभाग याना लेखी तक्रार केली होती. त्याची त्वरित दखल घेऊन त्यांची टीम आज ६ फेब रोजी डहाणू येथे चर्चे साठी आले होते.

आदिवासी समाजाची सांस्कृतिक मूल्य टिकवून आणि संस्कृतीचे विद्रुपीकरण करणारे चित्र बदलावीत या साठी सविस्तर चर्चा रेल्वे पोलीस अधिकाऱ्या समक्ष झाली. यामध्ये पुढील विषयावर चर्चा झाली
१) आदिवासींची चित्रलिपी आणि संस्कृती मूळ स्रोत व इतिहास
२) रेल्वे स्टेशन ला चितारलेले आक्षेप व विद्रुपिकारणाचे चित्र आणि त्याचा समाजावर होणारा विपरीत परिणाम
३) वारली चित्रकलेचे बौद्धिक संपदा कायद्या अंतर्गत झालेली नोंदणी जीआय आणि मूळ उद्देश व उपक्रम यासंदर्भात ठोस भूमिका इ बाबत चर्चा झाली

यामध्ये आक्षेपहार्य चित्र मिटवून मूळ संस्कृतीची ओळख व ठेवा असणारे चित्र चितारने
१) रोशनी फौंडेशन ने जी आय चे नियम व आदिवासी पेंटिंग चा मूळ इतिहास पाहणे त्यानुसार पुढील पावले उचलणे
२) मूळ थीम चा बोर्ड बदलणे " आमची वारली आमची शान" यामध्ये अर्थपूर्ण शब्द घेणे (उदा. आमची आदिवासी वारली चित्रकला शान, आमची आदिवासी कला महान हीच आमची शान, इ)
३) विविध ठिकाणी पब्लिक प्लेस मध्ये काढलेल्या चित्रांवर 100% आक्षेप असेल व येणाऱ्या काळात अश्या विद्रुपीकरण करण्यात आलेल्या चित्रांवर कायदेशीर केस नोंद केली जावी
४) भारत सरकार बौद्धिक सम्पदा चे नियमाला धरून व अखत्यारीतील कॉन्ट्रॅक्ट/ काम नोंदणी धारक संस्था च्या कन्सर्न नेच द्यावे ज्यामुळे एक मार्गदर्शक तत्त्व ने चित्र चितारने, मूळ संस्कृती जतन होत राहील व मूळ कालाकारांना त्याचा फायदा होईल यासाठी राज्य केंद्र अश्या सर्व स्थरावर कार्यवाहीचा पुढील पाठपुरावा करण्यात येईल असे ठरले

समाजाच्या सामूहिक हक्काच्या या महत्वाच्या ऍक्शन मध्ये आज संपत ठाणकर सर, आप डॉ.सुनिल पऱ्हाड, आयु.वसंत भसरा आप. ढाक, आप.कीर्ती वरठा आणि आदिवासी एकता परिषद चे 50 ते 60 सक्रिय कार्यकर्ते यांनी सहभाग घेतला. ( विशेष म्हणजे महिलांचा सहभाग लक्षणीय होता). समाजाच्या अस्मिता टिकवण्याच्या या कार्यात सहभागी झालेल्यां सगळ्यांचे आभार आणि कौतुक.

सूचना - लवकरच "आदिवासी कला संस्कृती आणि भविष्य" (परंपरा, विशेषता, संधी,आव्हाने, समस्या, उपाय, भविष्य, रोजगार, समाजाची अस्र्थव्यवस्था इ) विषयी लेख संकलन करुण एक मार्गदर्शिक पुस्तिका प्रकाशित करण्याचा प्रयत्न आहे, संबंधित विषयावर लिखाण पाठवायचे असल्यास संपर्क करावा ९२४६ ३६१ २४९ किंवा i...@warli.in (निवडक लेख प्रकाशित केले जातील)

( संबधित घडामोडीच्या अप्डेट्स शेयर करण्यात येतील)

आयुश ऑनलाईन टीम
www.adiyuva.in
www.warli.in


2017-02-06 23:17 GMT+05:30 AYUSH main <ay...@adiyuva.in>:
डहाणू रेल्वे स्थानक सुशोभीकरण प्रकल्प अंतर्गत "आमची वारली आमची शान" उपक्रमात काढलेली चित्र कौतकास्पद प्रयत्न आहे.
त्या साठी रोशनी फाउंडेशन चैरिटेबल ट्रस्ट मुंबई आणि रिलायंस इंफ्रास्ट्रक्चर यांचे आभार!

आज वारली कला बघन्या/अनुभवण्यासाठी जगभरातून पर्यटक डहाणू त येतात त्यांच्यासाठी तसेच बिगर आदिवासी आणि युवा आदिवासी यांच्यासाठी ही चित्रे उत्सुकतेने बघण्यासाठी कमी येतील. तसेच आदिवासी समाजाचा आत्मविश्वास वाढी साठी येईल अशी अपेक्षा.

सार्वजनिक ठिकाणी हि चित्रे असल्या कारणाने त्यात पंथ/धर्म इत्यादीवर आधुनिक चित्रीकरण करण्या पेक्षा स्वयंपूर्ण आदिवासी संस्कृती/परंपरा आणि आधुनिक जगारुगता, पर्यावरण, निसर्ग, तंत्रयज्ञान, आरोग्य,शिक्षण, रेल्वे इत्यादी विषयावर चित्र काढणे उत्तम. या संदर्भात संबंधित संस्था यांना तक्रार केल्या नंतर त्यांनी त्वरित सुधारणा करण्यासाठी तयारी दाखवली आहे, या संदर्भात चर्चे साठी उद्या दिनांक ६ रोजी डहाणू रोड स्टेशन येथे त्यांची टीम येते आहे. समाजातील आपण जागरूकनागरिक म्हणून आपण पण या चर्चेत सहभागी व्हावे अशी विनंती! (६ फेब , सकाळी ११ वाजता )

आयुश । आदिवासी युवा शक्ती
www.adiyuva.in | www.warli.in


--
AYUSHonline Team
www.adiyuva.in | 09246 361 249

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscribe@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T2yDLLmvJ3owc5S1g1azzC%2BNvtj3-J5kDWNGaTH2wGUiQ%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.



--
AYUSHonline Team
www.adiyuva.in | 09246 361 249

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T2A%3DDc37jQak_WstWXV3Err1i5XAvr-hg3vWD%3D9Jgc7Mg%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

--
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/p0loh8qcbpl1h80hpkobna8k.1486543345248%40email.kingsoft.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to