उलगुलान जारी रहे On 29-Mar-2017 9:11 am, "AYUSH | Adivasi Yuva Shakti" <[email protected]> wrote:
> *आज दि. 27/03 /2017, सोमवार च्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित > विशाल मोर्चावर एक दृष्टिक्षेप* > > *1) हा मोर्चा "दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल काॅरिडॉर हटाव - पालघर बचाव" या > मुख्य घोषवाक्यातून आयोजित केला होता.* > *2) दिल्ली - हरियाणा - राजस्थान - मध्यप्रदेश - गुजरात ते मुंबई व तेथून > रायगड - रत्नागिरी इथपर्यंत या काॅरिडॉरचा विस्तार आहे.* > *3)या काॅरिडॉरचा सर्वात महत्वाचा व मुख्य भाग (डोके) हा डहाणू येथील 'वाढवण > बंदर' हे मुंबई बंदरापेक्षा चारपट मोठे बंदर व त्या भोवती निर्माण होणारे > औद्योगिक क्षेत्र व शहर हा आहे.* > *3)वाढवण बंदर, तसेच या काॅरिडॉरचा कणा असलेला फ्रेट कॉरिडोर (स्पेशल मालवाहक > रेल्वे), मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे (बारा पदरी)(79 गावे बाधित), बुलेट ट्रेन, > सुसरी धरण (13 गावे विस्थापीत), वंकास-दापचरी इंडस्ट्रीय एरिया इ. मध्ये > प्रचंड प्रमाणात विस्थापीत होणाऱ्या भुमीपूत्रांचे अस्तित्व अबाधित > ठेवण्यासाठी "जापनीज झोन निर्माण" ज्याचे हे सर्व प्रकल्प एक भाग आहेत ते > कायमचे रद्द करावेत यासाठी हा मोर्चा आयोजित केला होता.* > *4) हा विराट मोर्चा म्हणजे दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल काॅरिडॉर डेव्हलपमेंट > कार्पोरेशन अंतर्गत होणाऱ्या "जापनीज झोन निर्माण SEZ" साठीच्या सरकारी > भूसंपादन व विस्थापनाच्या विरोधातील पालघर भुमीपूत्रांच्या मनात खदखदणाऱ्या > असंतोषाची उत्स्फूर्त प्रतिक्रीया होती.* > *5)या मोर्चात 15,000 (पंधरा हजार) पेक्षा जास्त भुमीपूत्र उत्स्फूर्तपणे > सहभागी झाले होते.* > *6)जमलेल्या प्रचंड जनसमुदायामुळे 'पालघर बंदची हाक नसताना सुद्धा पालघर बंद > सदृश परिस्थिती' निर्माण होऊन वाहतूक व्यवस्था कोलमडली.* > *7)मोर्चेकऱ्यांच्या रोषापुढे पोलीस यंत्रणा हतबल ठरली, प्रथम जिल्हाधिकारी > कार्यालयापासून 100मी.वरील बॅरिकेड तोडून नंतर 50 मी. वर पोलीसांचे कडे व > शेवटी दंगल नियंत्रण पथकाला न जुमानता जिल्हाधिकारी कार्यालयात धडक मारली.* > *8) भुमीपूत्रांचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी शेतकरी, कामकरी, वाडी कामगार, > आदिवासी,कोळी, कुणबी, आग्री, वाडवळ, भंडारी,इ. सर्वच भुमीपूत्र समाज मोठ्या > प्रमाणात सहभागी झाला.* > *9) एकदा वाढवण बंदर भुमीपूत्र एकतेने रद्द करण्यास भाग पाडले होते आणि > यावेळी सुद्धा भुमीपूत्रांची एकी वाढवण बंदर, फ्रेट कॉरिडोर, वडोदरा एक्सप्रेस > वे हे सर्व प्रकल्प समुद्रात बुडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हा खंबीर निश्चय > सर्व नेत्यांनी मांडला.* > *10) उत्तर कोकणातील औद्योगिक प्रयोजनासाठी निसर्गाची हानी करुन होणाऱ्या > भूसंपादनाविरोधात व भुमीपूत्रांच्या विस्थापनाविरोधात भुमीपूत्रांना वरदान > ठरलेले* > *i) पश्चिम घाट (सह्याद्री पर्वत रांगा) पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील > असल्याचा अहवाल* > *व* > *ii) डहाणू भाग पर्यावरणीय दृष्टीने संवेदनशील असल्याचा सुप्रीम कोर्टाने > निकाल देऊन या भागाला 'डहाणू नोटिफिकेशन' लागू करुन पर्यावरण घातक प्रकल्पांना > केलेला पायबंद* > *'या डहाणू नोटिफिकेशनचा पुनर्विचार करुन ऊद्योग बंदी उठवावी' म्हणून येथील > खासदार चिंतामण वनगा यांनी संसदे मागणी करुन भुमीपूत्रांचे अस्तित्व धोक्यात > आणल्याने खासदार वणगांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.* > *12) त्याच बरोबर कोणतेही सरकारी प्रकल्प व त्या साठीचे भुमीसंपादन व > भुमीपूत्रांचे होणारे विस्थापन हे आपोआप येत नाही तर ते जनप्रतिनीधींच्या नजरे > खालून व त्यांच्या संमतीनेच संसदेत व विधिमंडळात पास होत असते. म्हणजेच संसद व > विधीमंडळात भुमीपूत्रांच्या विस्थापनाविरोधात आवाज उठवण्याऐवजी त्याला संमती > देणारे आमदार, खासदार व मंत्री हे भुमीपूत्रांचे नेते अथवा प्रतिनिधी नसून ते > फक्त एखाद्या राजकीय पक्षाचे गुलाम आहेत, भुमीपूत्रांचे हित न पाहता फक्त > पक्षाचा व सरकारचा अजेंडा राबवून, तुंबड्या भरुन भुमीपूत्रांना देशोधडीला > लावणाऱ्या सर्व पक्ष नेत्यांचा कठोर शब्दात निषेध करण्यात आला.* > *13) कलेक्टर साहेबांकडे भुमीपूत्रांच्या प्रश्नाचे उत्तर नसल्याने ते समोर > आले नाहीत यामूळे भुमीपूत्रांच्या मनातील सरकार विरुद्धचा राग अजून वाढला व > जसे आम्ही कलेक्टर कार्यालयावर येऊनही कलेक्टर तोंड दाखवत नसेल तर तसेच आमच्या > गावतही सर्व्हे व भूसंपादनासाठी तोंड दाखवू नका. अशा इशारा भुमीपूत्रांनी > दिला.* > *14) कलेक्टर उत्तर देत नाही तोपर्यंत एकाही गावात सर्व्हे होऊ दिला जाणार > नाही त्यामुळे सर्व्हे व भूसंपादनासाठी कलेक्टर साहेबांनी कोणाही अधिकाऱ्याला > पाठवू नये. सर्व्हे उधळून लावला जाईल व होणाऱ्या कायदा सुव्यवस्थेच्या > प्रश्नाला फक्त कलेक्टरसाहेब व प्रशासन जबाबदार राहील ही सक्त ताकीद > भुमीपूत्रांनी सरकारला दिली.* > *15) पेसा ग्रामसभांच्या ठरावांचे संविधानीक महत्व, भारतीय संविधानाची पाचवी > अनुसूची, समता जजमेंट, नियामगीरी - डोंगरिया कोंध विषयीच्या सर्वोच्च > न्यायालयाचे निर्देश याची काटेकोर अंमलबजावणी व्हावी. संविधान मोडणाऱ्या व > सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर 'देशद्रोहाचे' > गुन्हे दाखल करण्यात यावे. ही एकमुखाने मागणी करण्यात आली.* > *16) हा फक्त इशारा मोर्चा होता तरीही भुमीपूत्रांचा प्रचंड प्रतिसाद मिळून > मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला. परंतु खरी मोठी लढाई पुढे बाकी आहे. या अंतिम > लढाईसाठी सर्व भुमिपुत्रांनी एकी अबाधित ठेवुन हे 'भुमीपूत्र बचाव आंदोलन' > उत्तरोत्तर उग्र व तीव्र करावे. सहकार्य व एकी कायम ठेवावी.* > > *भुमीपूत्र एकजूटीचा विजय असो.* > *एक तीर एक कमान सारे भुमीपूत्र एकसमान.* > *सर्व भुमीपूत्र बंधू भगिनींना जिंदाबाद.* > > *'भुमीपूत्र बचाव आंदोलन' प्रसिद्धी करीता - विजेसर सरनोबत, आदिवासी एकता > परिषद, पालघर-ठाणे जिल्हा, महाराष्ट्र.* > > *सर्व उत्तर कोकणातील भुमिपुत्रांना फाॅरवर्ड करावे.* > > -- > Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ > ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to [email protected]. > To post to this group, send email to [email protected]. > Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/ > msgid/adiyuva/CAHMsEBvCGDU%2Bj8C_33fq0je5_AM6Od23zQ1zQndmL7X5z4m3FQ% > 40mail.gmail.com > <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBvCGDU%2Bj8C_33fq0je5_AM6Od23zQ1zQndmL7X5z4m3FQ%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> > . > For more options, visit https://groups.google.com/d/optout. > -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2QW9mWM5QnPkm8UwomWVLfOO1yBBYKu_qnHSLxFRoTetg%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

