आदिवासी सांस्कृतिक कला महोत्सव 2018

आदिवासी संस्कृतिचे कला दर्शन पाहण्याची संधी आता पुणेकरांना. आदिवासी 
सांस्कृतिक कला महोत्सव 2018 दिनांक 15 मार्च 2018 ते 19 मार्च 2018 या 
दरम्यान आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था,पुणे येथे होणार आहे. 

प्रवेश मोफत

आदिवासींच्या हस्तकला प्रदर्शन व विक्री - 
दिनांक 15 मार्च ते 19 मार्च 2018
वेळ : रोज सायं. 04.00 ते 09.00

आदिवासी पारंपरिक नृत्य स्पर्धा
दिनांक :16 मार्च 2018
वेळ : सायं. 04.00 ते 09.00 पर्यंत

आदिवासी लघुपट महोत्सव
दिनांक: 17 मार्च व 18 मार्च 2018
वेळ: सायं. 07.00 ते 09.00 पर्यंत

आदिवासी हस्तकला विक्री, आदिवासी नृत्यस्पर्धा, आदिवासी लघुपट महोत्सव तसेच 
आदिवासी पद्धतीचे खाद्यपदार्थ यांचा आस्वाद घेण्याची संधी पुणेकरांना आहे.

आदिवासी कला महोत्सव 
"आदिवासींच्या कल्याणासाठी आदिवासी कला जोपासण्यासाठी"
एक वेळ नक्की भेट द्या. 
पत्ता: आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे (TRTI),28, क्वीन्स गार्डन, 
जुन्या सर्किट हाऊस जवळ , पुणे  fb event 
https://www.facebook.com/events/208186243249951/


On Tuesday, March 13, 2018 at 11:53:06 PM UTC+5:30, AYUSH | adivasi yuva 
shakti wrote:
>
> ।। आयुश उपक्रम  मिनी बुलेटिन १३ मार्च २०१८ ।।
>
> *१) आदिवासी सांस्कृतिक महोत्सव मध्ये सहभाग* :
> पुणे येथे आयोजित आदिवासी सांस्कृतिक महोत्सवात कला प्रदर्शनात एकात्मिक 
> आदिवासी प्रकल्प डहाणू तर्फे ८ कलाकार सहभागी होत आहेत. उद्या पुण्याच्या 
> प्रवासा साठी निघत आहेत. आदिवासी हस्तकला,  वारली चित्रकला, लाकडाच्या वस्तू, 
> जूट च्या वस्तू, गवताच्या वस्तू इत्यादी विक्रीसाठी ठेवण्यात येतील. संजय दा 
> पऱ्हाड (खंबाळे),  शर्मिला ताई घाटाळ (कोकणेर), कल्पेश दा गोवारी (कुताड), 
> संदीप दा भोईर (वेती), चिंतू दा राजड (गंजाड), विजय दा वाडु (नवनाथ),  कल्पेश 
> दा वावरे (रावते), गंगाराम दा चौधरी (निंबापूर) सहभागी होत आहेत. 
> पुण्य जवळील वाचकांनी जरूर भेट द्यावी. आपल्या संपर्कात आसलेल्याना जरूर भेट 
> देण्यास सांगावे. 
> कलाकृती सॅम्पल नमुने - https://warli.imgbb.com/albums 
>
> *आयोजक* : आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे
> *दिवस* : १५ ते १९ मार्च २०१८
> *ठिकाण* : आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे
>
> *२) सोशियल मेडिया महा मित्र - संवाद सत्र* :
> १५ मार्च रोजी पालघर येथे विभागीय माहिती कार्यालय आयोजित संवाद सत्रात डहाणू 
> पालघर मधून १० सभासदात सचिन सातवी यांची निवड झाली आहे. काही कार्यलयीन 
> जबाबदारीमुळे हैदराबाद येथे असल्याने सहभागी होता येणार नाही 
>
> *३) वारली चित्रकला पुस्तक निर्मिती* :
> आयुश तर्फे वारली चित्रकलेविषयी जागृती करण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास 
> प्रकल्प डहाणू यांच्या सहकार्याने एक पुस्तिका बनविण्याचे कार्य सुरु करण्यात 
> आले आहे. माहिती संकलन/संपादन/चित्र रेखाटणी/डिजिटल कन्व्हर्जन संदर्भात 
> सहकार्य किंवा सहभागी होऊ इच्छित असल्यास जरूर कळवावे. 
>
> आदिवासी युवकांचे आर्थिक स्वावंलब हेतू विविध पर्यायी व्यवस्था मजबुतीकरण 
> प्रयत्न करतो आहोत. *आयुश हा आदिवासी अस्तित्व, अस्मिता आणि आदिवासीत्व जतन 
> करण्यासाठी एक उदाहरण म्हणून लहानसा प्रयत्न आहे*. आपण पण आपल्या परिसरात  
> आवडीच्या क्षेत्रात आपल्या पद्धतीने यापेक्षा अधिक उत्तम उपक्रम करावे किंवा 
> अशा उपक्रमात *अधिक प्रभावी करण्यासाठी मार्गदर्शन/सहकार्य/सहभाग घेऊया. Lets 
> do it together!*
>  
> आयुश । आदिवासी युवा शक्ती
> www.adiyuva.in | 0 9246 361 249 | ay...@adiyuva.in
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/b0e0292c-0131-4ab0-ab6f-663ff04c0ce3%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to