Dear Ayush
I asked for a report by the way.
Regards

On Sat, 28 Apr 2018, 19:11 AYUSH | Adivasi Yuva Shakti, <ay...@adiyuva.in>
wrote:

> आपण काय करू शकतो?
>
> [स्थानिक आदिवासी बोली भाषा]
> "इया य्या करां त्या करां, असा कराय पायज तसा कराया पायज, स्वतःचा काम
> करायचां का या करीत रेहायचां. जेमतेम कोठं आथां हलूं हलूं नोकरी लागलीहे त्यात
> कोठसीं घर नांगु का समाज समाज करीत बसूं ... निसतां डोक्याला ताप दसा ये पोराच
> मेसेज". असा वाटत होवा का काय काहींना. तय मन थोडां लिहून पाठवीतुं. संभालून
> घिजास....
>
> [साधारण मराठी भाषा]
> सध्या नोकरी व्यवसाय करून आर्थिक चांगल्या परिस्थितीत असलेल्यांची संख्या जरी
> वाढत असली तरी एकूण समाजाचा विचार केल्यास हे प्रमाण खूप नगण्य आहे. असो पण
> यांची भूमिका खूप महत्वाची आहे, या अश्यानी समाजासाठी म्हणून काही करायचे
> ठरवल्यास खूप काही होऊ शकते.
>
> जर यांनी प्रामाणिक मनाने (वयक्तिक/राजकीय/आर्थिक इ च्या इगो/महत्वाकांक्षे
> पेक्षा समाज हित यांना प्राथमिकता देऊन) तर नक्कीच चित्र खूप बदलू शकते.
> आपल्या कडे खूप मोठ्या प्रमाणात युवा वर्ग बेरोजगार आहे (मुबलक मनुष्यबळ),
> विविध क्षेत्रातले अनुभवी एक्सपर्ट आहेत (क्नॉलेज पूल), बऱ्यापैकी जमिनी आणि
> नैसर्गिक साधने आहेत (रिसोर्सेस, दुर्दैवाने हळू हळू जात आहेत आपल्या
> हातातून), नोकरी व्यवसाय करणाऱ्यांकडे आर्थिक धन आहे (भांडवल. सध्या बरेच जण
> फ्लॅट, जमिनी, गाड्या इत्यादी मध्ये गुंतवतात), सामाजिक उपक्रमात काम
> करणाऱ्यांकडे दिशा आणि उद्देश आहे (व्हिजन आणि मिशन आणि कार्याचा अनुभव. पूरक
> आणि रचनात्मक कामाची सवय करावी लागेल), राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांकडे
> पॉलिसी मेकिंग मध्ये आवाज मांडण्याची संधी (पॉलिसी मेकिंग आणि गव्हर्नन्स,
> प्रभावी उपयोगात आणायला हवे). साशकीय तरतूद, योजना आणि निधी (पूरक कामांसाठी,
> त्या त्या तरतुदींसाठी प्रभावी पणे उपयोगात आणायला हवे)
>
> या सगळ्यांची योग्य प्रकारे आपण "आदिवासी समाज हित" या वैचारिक दिशेने सांगड
> घालून एक सोशियल इंटरेप्रेनरशिप चे मॉडेल तयार करू शकतो. जे स्थानिक पातळीवर
> मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करेल, आपले रिसोर्सेस टिकवेल, आर्थिक
> गुणवणूकदारांना (नोकरदार) सध्या पेक्षा जास्त मोबदला देईल, सामाजिक उपक्रमांना
> बळ देईल, राजकीय आणि सामाजिक प्रामाणिक नेतृत्व बळकट करेल, शासकीय तरतुदी
> योग्य राबवल्या जातील. आपण आर्थिक/सामाजिक/राजकीय स्वावलंबी बनू शकतो. एक
> ट्रायल म्हणून एका जिल्ह्यात/तालुक्यात प्रयोग करूया जर यशस्वी झाला तर त्यात
> ठराविक बदल करून इतरत्र प्रत्येक अनुसूचित क्षेत्रात आपल्यानं राबवता येईल.
>
> (हजार-पाचशे किलोमीटर वरून इत्तर लोक आपल्याकडचे सगळे व्यवयास करून दबाव गट
> तयार करून सगळ्या पक्षात प्रभाव टाकतात, त्यांची लोकसंख्या ठराविक ठिकाणी
> वाढवत असतात, जमिनी घेतात, झोपडपट्ट्या वाढवतात, वरून गुन्हेगारी वाढवण्यासाठी
> प्रवृत्त करतात. असो सोबत ते मेहनत पण खूप करतात, आपण नेमके मेहनत करण्याचे
> विसरून गेलो आणि खेकडा वृत्ती वाढवून बसलो भांडत आपल्या आपल्या माणसात.
> उदाहरणासाठी अनुसूचीत क्षेत्रातील प्रत्येक
> नाक्यावर/स्टेशन/हायवे/बाजार/तालुका/जिल्ह्याची ठिकाणे वेवस्तीत निरीक्षण करा.
> उदाहरण - डहाणू, वाणगाव, पालघर, बोईसर, तलासरी, आशागड, वरोती, कासा, चारोटी,
> मनोर, जव्हार, उधवा ... अशी मोठी यादी बनवता येईल.)
>
> जर आपण आपले उद्योग/व्यवसाय चे मजबूत जाळे बनवून एकत्रित उभे राहिलो तर
> कुणाची हिम्मत आहे आपल्याकडे वाकड्या नजरेने बघायची?
> पण त्यासाठी आपल्याना खूप विचार पूर्वक नियोजन करून वेळ देऊन हे प्रयत्न
> करावे लागतील. समाज हितासाठी आपले वयक्तिक अजेंडा पेक्षा जास्त महत्व द्यावे
> लागेल.
>
> जल जंगल जमीन जीव टिकवून आर्थिक स्वावलंबनासाठी आपल्यानं मोठे पाऊल उचलावेच
> लागेल. बरीच वर्ष वेळ/मेहनत/आर्थिक खर्च करावा लागेल. पण हे सगळ्यासाठी
> आपल्यात एक परिवार म्हणून भावनिक आणि सामाजिक नाते आणि आपली दिशा स्पष्ट
> होण्या इतका सवांद आणि विश्वासाचे वातावरण तयार करावे लागेल. गेले ११ वर्ष
> आयुश मार्फत हेच प्रयत्न करीत आहोत. व्हाल सहभागी तुम्ही पण?
>
> सध्या विचाराधीन उपक्रम क्लस्टर : भाजीपाला, वनोपज, शेतीउत्पन्न, आर्ट आणि
> क्राफ्ट, औषधी वनस्पती.
> सहभागी होण्यासाठी या लिंक वर फॉर्म भरावा  - www.in.adiyuva.in
>
> आपले अभिप्राय / मार्गदर्शन ऊर्जादायक आहेतच. सक्रिय सहभाग घेऊन हे एक उदाहरण
> यशस्वी करूया !
> Lets do it together !
>
> जोहार !
>
>
>
> AYUSHonline team
> www.adiyuva.in
>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBtfAt_CXG4ey8Xvde572t40QQyCHqFqC5%3DspSd_xEg%3Dvw%40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBtfAt_CXG4ey8Xvde572t40QQyCHqFqC5%3DspSd_xEg%3Dvw%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABrtR5RbzBm4K8YJyONMiGchhBcuLiY_ZzW2ZKrGt%3DnHKo84XA%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to