।। आयुश उपक्रम माहिती २६ सप्टेंबर २०१८।।
आपल्या माहितीसाठी *१) ओडिशा त कलाहंडी डायलॉग मध्ये सहभाग* जागतिक पातळीवरचे स्कॉलर, नेतृत्व, विकासक, संशोधक, सामाजिक उपक्रमांना दिशा देणारे, पॉलिसी बनवणारे, इत्यादींना एका प्लॅटफॉर्म वर आणण्यासाठी ओडिशा त कलाहंडी डायलॉग् २८ ते ३० सप्टेंबर या ३ दिवशीय चर्चा सत्र आयोजित केले आहे. या नामांकित आणि महत्वाच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातून डॉ सुनिल दा पऱ्हाड सहभागी होत आहेत. आज त्यांनी प्रवास सुरु केला, सहभागासाठी शुभेच्छा! या कार्यक्रमा बद्दल थोडक्यात. Kalahandi Dialogue is designed to learn from, contribute to, shape & inspire the Global Development Discourse by 'talking about development where it matters the most!' Kalahandi Dialogue is a unique platform to bring together and engage world leaders, policymakers, development practitioners, entrepreneurs & social entrepreneurs, investors & impact investors, public intellectuals and the youth to discuss, debate, collaborate on global development discourse; and to draft the Kalahandi Declaration as a glocal action plan for the coming years. *२) NIFT मुंबई विद्यार्थ्यांची कलानिर्मिती दौरा* नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ फॅशन डिझाईन मुंबई येथील विद्यार्थ्यांनी कलाकृती निर्मिती दौऱ्यावर डहाणू येथे आल्या आहेत. आज कल्पेश दा वावरे यांनी त्यांच्या सोबत चर्चा केली. उद्यापासून ४ दिवस (२८ ते १ oct) संदिप दा भोईर, कल्पेश दा वावरे, अविनाश दा शेलार, किरण दा गोरवाला यांच्या सोबत वर्कशॉप घेत आहेत. जून महिन्यात पहिला दौरा केला होता त्या बद्दल, नॅशनल फॅशन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथील १२ विद्यार्थीनी आणि त्यांचे प्रशिक्षक १ आठवड्यांच्या अभ्यास दौऱ्यासाठी डहाणू येथे आले होते. वारली चित्रकला चे मोटिव्ह आणि आदिवासी सांस्कृतिक संपदा जाणून घेतली. ते वारली चित्रकला आणि फॅशन संदर्भात डिझाईन प्रस्ताव बनवत आहेत. वेती येथे संदीप दा भोईर, कल्पेश दा वावरे, दिलीप दा विघ्ने, सदानंद दा पुंजारा, किरण दा गोरवाला, शांता दि भोईर, पुष्कर भोईर, सचिन दा सातवी यांनी मार्गदर्शन केले. फोटो लिंक - https://www.facebook.com/media/set/?set=a.2019705244766221.1073741854.112669762136455&type=1&l=580f39ab4e *३) आदिवासी कलाकार एकत्रीकरण * स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती उपक्रम उद्देशाने बैठक आयोजित केली आहे. ३०/९/२०१८ रविवारी, बिरसामुंडा सभागृह, कासा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर येथे आयोजित केली आहे. सहभाग नोंदविण्यासाठी फॉर्म भरावा. *४) मुंबई युनिव्हर्सिटीतील विद्यार्थी अभ्यास दौरा* वारली चित्रकलेचे विविध पैलू, इतिहास, सांस्कृतिक मूल्य, वारली चित्रकलेतून सामाजिक परिवर्तन या विषयावर अभ्यास दौरा करणार आहेत. इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. प्रकाश मसराम त्यांच्या विद्यार्थी सोबत येत आहेत. ३० तारखेच्या कासा येथील कलाकार एकत्रीकरण बैठकीत सहभाग घेणार आहेत. आदिवासी युवकांचे आर्थिक स्वावंलब हेतू, पर्यायी व्यवस्था मजबुतीकरणा चा प्रयत्न करतो आहोत. आयुश हा आदिवासी अस्तित्व, अस्मिता आणि आदिवासीत्व जतन करण्यासाठी एक *उदाहरण म्हणून लहानसा प्रयत्न आहे*. जल जंगल जमीन जीव सोबत आपली स्वायत्त आदिवासी अर्थव्यवस्था मजबूत करूया. *आपण पण आपल्या परिसरात आवडीच्या क्षेत्रात आपल्या पद्धतीने यापेक्षा अधिक उत्तम उपक्रम करावे किंवा अशा उपक्रमात अधिक प्रभावी करण्यासाठी मार्गदर्शन/सहकार्य/सहभाग घेऊया*. Lets do it together! जोहार ! आयुश । आदिवासी युवा शक्ती www.adiyuva.in | 0 9246 361 249 | ay...@adiyuva.in -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBtkbgbirKP%3DEwkp%3D5VXU%2BzpnScMxcN4fk%2Ba%3Dez%3DKyhqLg%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.