Great सचिन दा On Tue, Feb 5, 2019, 12:45 AM AYUSH main <ay...@adiyuva.in wrote:
> ।। काळाघोडा : *आदिवासी ३D आर्ट* ।। > > > > _काळाघोडा आर्ट फेस्टिवल येथे *आदिवासी वार्षिक कालचक्र* या थीम वर ३D आर्ट > आकर्षणाचे केंद्र बनत आहे. नक्की भेट देऊन बघावे. काही कारणाने बघता आले > नसल्यास या लिंक वर फोटो बघावेत._ [लिंक > https://www.facebook.com/media/set/?set=a.2481530805250327&type=1&l=4223029fa4] > > > > > *थोडक्यात माहिती* - > > आदिवासी समाज हजारो वर्षांपासून जल जंगल जमीन या मूलभूत वास्तविक घटकांसोबत > जगत आला आहे, सामाजिक जीवनात हि नाळ अजूनही जोडलेली दिसते. त्याचा प्रभाव > परंपरा, चालीरीती, संस्कृती, इतिहास, जीवनमूल्य, जडण घडण, दैनंदिन व्यवहार > यावर आहे. > > > > दैनंदिन जगण्यात वास्तविक घडामोडींच्या आधारे तो निसर्ग चक्र, काळ, ऋतू, हवामानात > होणारे बदल यांचा अचूक वेध बांधत असतो. मग मानवी किंवा कोणत्याही जैव, आरोग्य, > औषोधोपचार, सजीव-निर्जीव, वन्यप्राणी, नदी, नाले, ओढे, वृक्ष, सूर्य, चंद्र, > आकाश, वारा या अश्या सर्व घटकांचा थेट संपर्क आणि सहवास असल्याने आदिवासी > समाज यांच्या वार्षिक कालचक्रात आपले जीवन जगत आला आहे > > _आदिवासी समाजात प्रचंड पारंपरिक ज्ञान आहे, जे मौखिक साहित्यातून जतन केले > आहे अनेक पिढ्यांनी प्रत्येक्ष अनुभवून, प्रयोग करून, प्रात्यक्षिक करून > विविध गोष्टीं विकसित केल्या आहेत. कोणत्याही प्रकारचे लिखित दिनदर्शिका किंवा > घड्याळ तंत्र नसतानाही काळवेळ ठरविण्याची कला विकसित केली आहे. लोक बोलतात > आदिवासी समाज ना अस्थिक, ना नास्तिक तो वास्तविक जीवन जगणे पसंत करतो. या > समाजाच्या देवी देवता या समाजाच्या देवी देवता, पूजा अर्चना या सर्व गोष्टी > ह्या वास्तविक निसर्गाशी जोडलेल्या आहेत. उदाहरणार्थ हिरवा देव, कनसरी, हिमाय > देवी, वाघ्या देव, नाराणदेव, झोटिंग देव, सावरा देव, गावदेव, इत्यादी ज्या > निसर्गाशी जोडलेल्या आहेत._ > > साध्या भाषेत बोलायचे झाल्यास आदिवासी समाज निसर्गाची पूजा करतो. म्हणून हा > समाज वास्तविक जीवन जगात असताना निसर्गा सोबत नाते जपून ठेवून आहे, म्हणून > कदाचीत या समाजाला "निसर्ग पूजक समाज" असेही म्हटले जाते. > > > > *कालचक्र* : > > कालचक्र संदर्भात विविध कला कौशल्य अनुभवायास मिळते. दिवसा सावली बघून वेळ > सांगणे. झाडे, पशु पक्षी. किड्या मुंग्यांच्या हालचालीवरून किती, केव्हा, पाऊस > पडणार, थांबणार याचा अंदाज. चंद्र, सूर्य दिशा आकार त्याचा हवामान > वातावरणावर होणारा परिणाम. सजीव-निर्जीव घटकांवर होणारा परिणाम बदल व अचूक वेध > घेण्याची कला आदिवासी समाजात बघायला मिळते. > > > > *भाग एक* - > > जंगल जिथे आदिवासी समाजाचा थेट संबंध पशु, झाडे, वेलींशी येतो. जंगलात > होणाऱ्या घडामोडी, हालचाली संकेतांच्या प्रतीक आहेत. आदिवासी जीवनात जंगलाचे > अमूल्य स्थान आहे. जशे शहरात इंटरनेट/मोबाईल शिवाय जगणे कल्पना करणे कठीण आहे > तसे आदिवासी समाजाचं जीवन च जंगल आहे. म्हणून आदिवासी समाज अनेक पिढयांपासून > जल जंगल जमीनी साठी आग्रही भूमिका घेत आला आहे याला इतिहास साक्षी आहे. > > कालचक्र मध्ये मुख्य आदिवासी वारली कले मध्ये दर्शविलेले मुख्य पावसाळी अनुभव > > १) चार महिने कालावधी मध्ये पावसाची पडण्याची मात्रा, कमी जास्त, चांगलं > वाईट ची लक्षणे ठरविण्यासाठी ठराविक वृक्ष वनस्पती मधील होणारे ठराविक कालावधी > मध्ये बदल होतात. > > उदा. पळस, गुलमोहर, ई वृक्ष > > > > २) पाऊस कोणत्या महिन्यात, कोणत्या दिवशी पडेल याचा अभ्यास हा प्राणी-पक्षी, कीड > मुंग्यांच्या गतिविधी हालचाली यांच्या अभ्यासावरून सांगण्याची कला > > उदा. चहिय पक्षी, मुंग्यांमधील शारीरिक व हालचालीत बदल इ > > > > ३) पाऊस ठराविक कालावधी नंतर कधी आणि कोणत्या दिवसानंतर थांबेल हे मुंग्या, > पोटाऱ्या > पक्षी, भोरडा पक्षी चे अंडी पिल्लू घरट्यातच सोडून जाणे, खेकड्याच्या ठराविक > आवाज, यांच्या आवाज आणि हालचालीतील बदलावर ठरवण्याची कला > > > > *भाग दोन* > > पावसाळ्यात लागवड करण्याची पद्धती निसर्ग चक्र व समाजातील उत्सव बघायला > मिळतात. पेरणी, खणणी, आवणी, कापणी, झोडणी, असा चक्र नंतर समाजात उत्सव हा > मोठ्या प्रमाणावर साजरा जातो. असाच उत्साह हा तारपा नाच या सामूहिक नृत्यातून > एकत्र येऊन साजरा केला जातो. तारपा हे वाद्य निसर्गातील ठराविक घटकांपासून > तयार केले जाते. परंतु हे वाद्य खूप परिश्रमांनी, कौशल्याने शिकता येते. हे > वाद्य वाजवणाऱ्यास तारपकरी असे संबोधित केले जाते. त्याच्या वाजवण्याचा तालावर > महिला पुरुष पेरण करून नाचत असतात. हे दृश्य डोळे दिपवणारे असून एकता आणि > समतेचे प्रतीक आहे. > > > > *भाग तीन* > > थंडी ते उन्हाळा दरम्यान मधमाशी च्या माश्या आणि पोळे मधाचा गरा या सर्व > घटकातील होणारे बदल अनुभवायास मिळतात. > > सिमग्या नंतर तलाव, नदी या मधले पाण्याची पातळी खालावण्याचे होणारे परिणाम > आणि त्याचा अंदाज > > > > *भाग चार* > > चंद्राचा बदलता आकार, चंद्र पृथ्वी मधील गुरुत्वाकर्षणामुळे होणाऱ्या > समुद्राच्या भरती ओहोटी वर पावसाळी पाण्याचा अंदाज बांधणी. दरम्यान जलचर प्राणी, > मासे, पक्षी, यांच्या जगण्यात होणारे बदल, बदल हवामान आणि त्याची लक्षणे > > > > जोहार ! > > .......................................................... > > *कन्सेप्ट आणि कलाकार* : संजय दा पऱ्हाड, राजेश दा मोर, संदेश दा गोवारी, संदेश > दा राजड, निलेश दा राजड, मंगेश दा कडू, संजय दा रावते, संदीप दा भोईर, कल्पेश > दा गोवारी > > *३D आर्ट आणि थीम* : विक्रम अरोरा & Team > > *सहकार्य* : QUEST (Quality Evaluation for Sustainable Transformation) - > आदिवासी > विकास विभाग > > > > _________________________________ > > चलो पारंपरिक ज्ञान जतन करूया, Lets do it together! > > -- > Learn More about AYUSH online at : > http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. > To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. > Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit > https://groups.google.com/d/msgid/adiyuva/4dbdc6db8a58f6696a3461351afd4eff%40mail.gmail.com > <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/4dbdc6db8a58f6696a3461351afd4eff%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> > . > For more options, visit https://groups.google.com/d/optout. > -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAFabgDWE-qEtMKoYQDOz1x4W2DZjtudw2XFHD%2B6kK5WQK7XTjQ%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.