२००५-२००८ हा कालखंड देशात युथ फॉर इक्वॅलिटी नावाच्या महाहरामखोर (याहून
चांगला शब्द वाचकांनी अपेक्षित धरावा) अवलादींनी गाजवला होता. देशभर
आरक्षणाविरुद्ध असंतोष निर्माण करण्याची सुपारी घेतलेले अनेक महाभाग याच्या
मागे होते.गुजरातमध्ये घडलेल्या दंगलीनंतर सुरु झालेल्या धार्मिक ध्रुवीकरणाला
काटशह देण्यासाठी या देशातल्या सुपारीबाज सरकारने हा मुद्दा ऑर्केस्ट्रा केला
होता.
समाजमाध्यमांवर एकच एक मुद्दा रोजच्या रोज लोकांच्या मनावर बिंबवला जात होता
तो म्हणजे आरक्षणामुळे देशातल्या फार मोठ्या वर्गावर अन्याय होतो. गुणवत्ता
डावलली जातेय आणि योग्य उमेदवार ,विद्यार्थ्यांची जागा अयोग्य उमेदवाराला,
विद्यार्थ्याला दिली जातेय.ह्या मुद्द्यासाठी मीडिया चॅनेल्सवर रोजच्यारोज
महाचर्चा घडत होत्या, दिल्लीला चाललेलं आंदोलन रोज लाईव्ह टेलिकास्ट होत होतं
, मध्येच सत्ताधारी ,कधी विरोधी पक्षातले चमकेश नेते कॅमेऱ्यासमोर जाऊन
आंदोलनकर्त्यांची लाल करत. सोशल मीडियावर टोकाच्या विसंगत पोस्टचा भडीमार केला
जाई.सगळं व्यवस्थित प्लॅन केलं होतं.
या कालखंडात दहावी बारावीला असणारी ,सीईटीचा अभ्यास करणारी मुले या प्रकाराने
बावचळून गेली होती.आमच्यासारखे चळवळे आरक्षणामागची वैचारिक भूमिका मांडून या
सर्व राक्षसी प्रोपोगंड्याचा तोकडा प्रतिकार करीत होती. मी कित्येकदा कॅंम्पस
मध्ये उभा राहून आरक्षण विरोधकांचे बौद्धिक घेतलेय. गेटबाहेरच्या कट्यावर उभे
राहून हे आंदोलन कसे दिशाभूल करतेय हे घसा फाटेस्तोवर सांगितलेय.बहुजन
,आदिवासी मुलांवर होणारा अन्याय, जातीवादाचे जुने-नवे रूप,आरक्षणाची गरज
,त्यामागची भूमिका आणि संघर्ष हे सगळं सांगायचो. खोट्या जात प्रमाणपत्रावर
प्रवेश घेऊन गरिबांचे हक्क मारणाऱ्यांविरुद्ध,अनुशेष ठेवत जागा
विकणाऱ्यांच्याविरुद्ध,जातीवरून होणाऱ्या मानहानी आणि रॅगिंगच्या विरोधात आवाज
उठवायचो.अनेक जण यावर हुज्जत घालायचे.असं नसतंच,आता कोणी जातीयता नाही पाळत
वगैरे जस्टिफिकेशन्स द्यायचे. जनरल कॅटेगरीच्या मुलांना कसा त्रास होतो
याच्याबद्दल तावातावाने बडबड करायचे.
  यादरम्यान त्या आंदोलनाचा टीव्हीवर पाहिलेला एक प्रसंग माझ्या मनावर कोरला
गेला आहे. दिल्लीच्या एम्स किंवा तत्सम महाविद्यालयात एमबीबीएस च्या दुसऱ्या
किंवा तिसऱ्या वर्षाला असणाऱ्या आरक्षित प्रवर्गातून आलेल्या मुलीची
प्रतिक्रिया मला आठवते कि ती जरी आरक्षित प्रवर्गातील असली तरी तिला वाटते कि
आरक्षण काढून टाकायला हवे कारण जनरल कॅटेगरीवर अन्याय होतोय वगैरे वगैरे.
  आज डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येबाबत वाचले तेव्हा मला हे सारे जुने दिवस
, त्यावेळचे सगळे अनुभव आठवले.
डॉ. पायल तडवी आणि मागच्या अनेक वर्षांत घडलेल्या शैक्षणिक संस्थांमधल्या ,
कामावरच्या ठिकाणी जातीवरून झालेल्या अत्याचार-अन्यायामुळे झालेल्या
आत्महत्यांना कोण जबाबदार आहेत याचे उत्तर स्पष्ट आहे - जबाबदार ते लोक आहेत
ज्यांनी युथ ऑफ इक्वॅलिटीला-इंडिया अगेन्स्ट रिझर्वशेन सारख्या वायझेडना
जोरदार सपोर्ट केला, स्वतः आरक्षित प्रवर्गातले असतानाही आरक्षणाला विरोध
केला, आरक्षित वर्गातील विद्यार्थी- उमेदवारांच्या गुणवत्ता तपासल्या.
जातवास्तव नाकारून शोषकांच्या नॅरेटिव्ह्सन बळी पडत स्वतःच्या समाजबांधवांच्या
हक्काना पायदळी तुडवत स्वतःच्या वैयक्तिक हितसंबंधांना महत्व देत इथल्या
आरक्षण समर्थकांचा आवाज,चळवळ क्षीण केली. आरक्षण विरोधकांत बहुतांश असे लोक
आहेत ज्यांनी स्वतः कधीतरी आरक्षणाचा लाभ घेतलाय. यांची स्वतःची पोटे
भरली,यांना त्यांच्या सामाजिक बांधिलकीची,नैसर्गिक कर्तव्याची जाण नाही.
डॉ. पायल तडवी यांची हि आत्महत्या , नव्हे संस्थात्मक हत्येला जबाबदार जेवढे
युथ फॉर इक्वालिटी सारखे दांभिक लोक , इंडिया अगेन्स्ट रिझर्व्हेशन सारखे सोशल
मीडिया हॅन्डल्स जबाबदार आहेत त्याहून जास्त जबाबदार त्यांची तळी उचलून धरत
आपल्या लोकांच्या हितसंबंधाच्या आड येत शोषकांच्या बाजूने उभे राहणारे आरक्षित
प्रवर्गातील आरक्षणविरोधक लोकही आहेत !

- भावेश लोखंडे

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAJM9EQGOMAZuBRfRzRq%3DmcJcLjc06SXJiQ_Yu2Bo_Af75T8pUg%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to