|| *वयक्तीक अनुभव : स्वयंचलित वाहन* ||
स्टेटस वर विडियो बघावा... 🙏 [ *स्थानिक आदिवासी भाषा* ] हाफिसातले कोरियन मित्रांचे हारी हिंडाय जाधेल होतुं. मस्त भलतं डोंगर डोंगर नय भलती झाडी मस्त वाटला. त्याची गाडी भलती भारी होती. तो मस्त ऑटोमॅटिक वर टाकून आमचे हारी गोष्टी करी. मोबाईल वर गाणी निवडी, मेसेज करी, गाडी ऑटोमॅटिक चालत रेहे, वलना घेय, वेग वाढावी, कमी करी, मोहरपचे गाडी पायसी अंतर ठेवी, रस्त्यावर गती रेहेले थोडा वेग करी. सगला ऑटोमॅटिक. टोल नाका हो ऑटोमॅटिक, गती नियमा पेक्षा जास्ती वाढवली त दंड हो ऑटोमॅटिक. तो सांगत होता का तो आजारी होता त यी गाडी चालवाया भलता सोप्पा, गाड्याला हात लावायची गरज हो नीही. *ठिकाण कोठ जायचा त्या टाकला का गाडी ऑटोमॅटिक जाय, रस्ता निवडी, पोचल्यावर आपले डेवलुं का पार्किंग हो ऑटोमॅटिक करी गाडी त्याचे त्याच.* काही वरसान सगलीकड अस्या गाड्या चालतील. मी रस्त्याचे आजू बाजूचे डोंगर नांगत नांगत भलता काही तरी डोक्यात येत होता. आपले कड चा आठवला हलूं हलूं चक्रा हिंडाया लागलीं .... [ *साधारण मराठी भाषा* ] ऑफिस च्या सहकाऱ्यासोबत १२० किमीवर नामी आयलँड वर फिरायला गेलो होतो. तो सम वयाचा असल्याने खूप मैत्रीपूर्ण अनेक विषयावर चर्चा होते. ३ महिने आमच्या सोबत भारतात होता तेव्हा अगदी सगळ्याच विषयावर चर्चा व्हायची. शेती, अन्न, जीवन, तंत्र्यज्ञान, प्रदूषण, पर्यावरण, सुरक्षा, देश, जग, राजकारण, समाजकारण, धर्म, हिंसा इत्यादी वर तो त्याची मत मांडायचा आमची मते जाणून घ्यायचा. एकंदरीत अनेक दृष्टिकोन आणि अनुभव ऐकायला मिळतात. तो त्याची गाडीत आम्हाला घेऊन गेला. जेनेसिस G८० मॉडेल बसल्यावर खूप अद्यावत आणि लग्झरी फिचर असलेली. कुठे जायचे ते ठिकाण टाकल्यावर अंदाजे किती वेळ लागेल किती किलोमीटर वैगेरे वैगेरे डिस्प्ले वर दिसते तसेच रस्त्यावर असलेले स्पीडब्रेकर इत्यादी पण नकाश्यावर अद्यावत केलेलं दिसले. असो हे तर सामान्य फिचर आहेत. अधिक सविस्तर येथे ( https://www.genesis.com/kr/en/luxury-sedan-genesis-g80.html ) *या गाडीत स्मार्ट क्रूझ कंट्रोल, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग इत्यादी अनेक फिचर असल्याने रस्त्यावर गाडी सुरु ठेवून तो क्रूझ कंट्रोल वर ठेवून गाडी ऑटोमॅटिक जात होती. स्टिअरिंग, अक्सिलेटर, ब्रेक काहीच करायची गरज नाही, ऑटोमॅटिक गाडी चालत राहते. रस्त्यावर दुसरी गाडी असेल तर सुरक्षित अंतर ठेवते, वळणे घेते, ब्रेक लावते, गती वाढवते, रस्त्याच्या गती लिमिट नुसार गती अड्जस्ट करते, इत्यादी इत्यादी आणि तो ड्रायवर सीट वर बसून आमच्या सोबत गप्पा गोष्टी करत होता, मोबाईल वर काम करत होता.* ऑटोमोबाईल मध्ये जुनीच टेक्नॉलॉजी आहे आमच्या सगळ्यांसाठी हा पहिला अनुभव होता त्यामुळे सगळेजण खूप कौतूकाने अनुभव करत होतो. वाहन क्षेत्रात अनेक कंपन्या ऑटोनॉमस गाड्या विकसित करण्यासाठी गुंतवणूक करत आहेत. ह्युंदाई मध्ये ५ पातळीवर ऑटोमोमस वाहन विकसित केले जातेय. सध्या विकसित केलेली ऑटोनॉमस बस ऑफिस च्या परिसरात टेस्टिंग साठी लवकरच सुरु करण्यात येईल. वाहन क्षेत्रात हि मोठी क्रांती असेल. अधिक माहिती साठी येथे वाचता येईल ( https://www.hyundaimotorgroup.com/TechInnovation/Autonomous/Roadmap.hub). त्या वेळेस काढलेले फोटो माझ्या स्टेटस वर बघता येतील [ *थोडे सामाजिक* ] आदिवासी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक चळवळी/संस्था/संघटना/ग्रुप आहेत. अनेक दशकांपासून काम करत आहेत, ते पाहता अनेक प्राथमिक प्रश्न सहज सुटायला हवे होते. पण तसे होताना दिसले नाही. कारण यातील बहुतेक गोष्टी कोणत्या तरी राजकीय, वयक्तिक, गोष्टींवर अवलंबून होते. त्यामुळे ठराविक काळानंतर त्यातील प्रभाव कमी होत गेला किंवा निष्प्रभ झाले, अशी अनेक उदाहरणे अनुसूचित क्षेत्रात आहेत. *प्रभावी नेतृत्वाची फळी तयार करून विश्वसाचे वातावरण तयार करण्यात कमी पडलो असावे कदाचित.* *समाजातील प्राथमिकतेने सोडविण्याचे प्रश्न शोधून कायमस्वरूपी सोडविण्यासाठी प्रभावी प्रणाली तयार करायला हवी आणि त्यात वयक्तीक/ठराविक राजकीय/आर्थिक स्वार्थ वर अवलंबून न ठेवता प्रामाणिक पणे आदिवासी समाज हित हि दिशा ठेवून विविध काम करण्याच्या पद्धती आणि समन्वयन करून स्वावलंबी व्यवस्था तयार करावी.* आणि या साठी आवश्यक मानव निर्मिती, व्यवस्था, वातावरण तयार करणारी प्रणाली उभी व्हायला हवी. कारण माणसे येतील जातील, संस्था/संघटना येतील जातील. आपला समाज आहे आणि उद्या हि राहील. ८० च्या दशकात सुरु झालेली आदिवासी विद्यार्थी चळवळ नंतर राजकारणात स्थिरावल्यावर विद्यार्थी चळवळ गायब झाली. दर ५-१० वर्षांनी पुन्हा पुन्हा आदिवासी विद्यार्थ्यांना चळवळ उभी करावी लागते. आणि तिचे स्वरूप फक्त ५-१० वर्षच चालते. पुन्हा पुन्हा चाकाचा शोध लावावा लागतोय, आपली सगळी ऊर्जा त्याच कामात पुन्हा जातेय. सध्या पण अनेक सामाजिक चळवळीतून राजकीय चळवळीत प्रवेश करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे, एकंदरीत त्यासाठीच काही जण सामाजिक चळवळीत येतात. असो पण *त्याचे परिणाम सामाजिक चळवळ खिळखिळी करण्यात होऊ नये हि प्रामाणिक अपेक्षा.* एक उदाहरण, डॉ सुनिल पऱ्हाड यांनी डॉक्टर असून पूर्ण वेळ आदिवासी सामाजिक कामासाठी देता यावा यासाठी आपली नोकरी/व्यवसाय सोडून पूर्ण वेळ सामाजिक चळवळीला जोडून घेतले. आणि हे सगळे कोणताही वयक्तिक / राजकीय स्वार्थाशिवाय विविध माध्यमातून रूट लेव्हल ला गेली अनेक वर्ष पालघर/ठाणे जिल्ह्यात हजारो युवकांना सामाजिक चळवळीशी जोडलेय. *ते आणि त्यांचे सहकारी अशी अनेक उदाहरणे समाजात जास्तीत जास्त तयार व्हायला हवेत जेणेकरून आदिवासी समाज हिताची चळवळ राजकीय हातातले बाहुले बनण्यापेक्षा स्वावलंबी पद्धतीने आदिवासी समाज सशक्तीकरण होण्यास कामी येईल* असे वाटते. *तुम्हाला काय वाटते कळवावे, तुमचे मत जाणून घेण्यास उत्सुक.* जोहार! -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAB4%3Dxgah2sYjjymiqKdrNmAyqWqoYXxkbF0kEYB%2B06gd9%2BsogA%40mail.gmail.com.