|| *बेस रेहा, संभाल करा... रोग इधेल आहे* ||

▪️ *[आदिवासी बोली भाषा]*
_रोगाचीं कोंबडी दसीं भलतीं मानसां मरताहांत, बिज्यांचा तं हिसोब पन नीहीं.
बेस रेहां बाजारांत, बीजें गावांत जात होवींस मास्क/फडका बांधजांस हांव.
गर्दीत नोकों जयजांस, दूरूच रेहजास. *जे काहीं नियम होव तसाच करजांस. आजारी
पडाल तं दवाखान्यात जायजा. करोनाचा टोचजत होवां त घिजास. बेस रेहा*_

▪️ *[साधी मराठी बोली]*
करोनामुळे जगभरात अकाउंटेड अनअकाउंटेड लाखो मृत्यू होत आहेत, अनेकांचे रोजगार
गेलेत, सगळे विस्कळीत झाले आहे. तब्येतीची खूप काळजी घ्या, *जे काही नियम आहेत
ते पाळावे. लस मिळत असेल तर त्वरित घ्यावी. आहार, आरोग्य वेवस्तीत ठेवावे.
काळजी घ्या.*
_________________________
 ▪️ *[.... थोडे अवांतर, आणि इतर]*
या निमित्ताने माणूस म्हणून आपल्या विकासाच्या दिशेचा विचार करणे महत्वाचे
वाटते. वेळ मिळाल्यास एक माहितीपट पट आहे पर्यावरण/निसर्गाबद्दल संवेदनशील
असणाऱ्यांनी नक्कीच वेळ काढून बघावे. १९३७ पासून सध्या पर्यंत आणि येणाऱ्या
वर्षात आपल्या पृथ्वी/निसर्गात होणारे बदल आणि पर्यावरणासाठी आवश्यक
उपाययोजनांसाठी त्यांच्या वयक्तिक अनुभवातून खूप छान पद्धतीने महतीपट बनवला
आहे. "David Attenborough: *A Life on Our Planet"*

▪️ट्रेलर (२ मिनिटे, इंग्रजी)
https://youtu.be/64R2MYUt394
The film addresses some of the biggest challenges facing life on our
planet, providing a snapshot of global nature loss in a single lifetime.
With it comes a powerful message of hope for future generations as
Attenborough reveals the solutions to help save our planet from disaster.

▪️पूर्ण माहितीपट (84 मिनिटे, इंग्रजी)
https://www.netflix.com/watch/80216393?source=35
 ..............................................................
_हजारो वर्षांपासून कधी नव्हे इतके गेल्या २०० वर्षात आपण माणसांनी निसर्ग आणि
पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात संतुलन बिघडवले आहे. आणि त्याचे परिणाम या
पृथ्वीवरच्या सगळ्या जीवश्रुष्टीवर होतो आहे. (अधिक माहितीसाठी खूप चांगल्या
प्रतीचे अनेक माहितीपट शृंखला "Our planet" या नावाने नेटफ्लिक्स वर बघावी).
निसर्ग नियमा प्रमाणे आपल्याना विकासाची आणि जीवनशैलीच्या व्याख्या ठरावाव्या
लागतील. आपल्याना रिवर्स लँड ग्रबिंग करून, जमिनी निसर्गाच्या हाती दिल्यास
पुर्वव्रत होऊ शकेल, फक्त *माणसांनी अहंभाव आणि स्वार्थीपणा सोडून ग्रहाचा
विचार करणे हितकारक राहील. आणि हे आपण आदिवासींच्या जीवनशैलीचाच भाग आहे, चलो
या बद्दल जागरूकता करूया.*_ Lets do it together! जल जंगल जमीन जीव .... जोहार
!

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T3XTdsMzth-_ea%3DuCZSAJnqPsZwfftaB_cRrst%2Be7XXqA%40mail.gmail.com.

Reply via email to