|| वयक्तीक : *कंपाऊंड इफेक्ट महत्वाचा* ||

▪️[ *स्थानिक आदिवासी बोली* ]
पहले सगलां कनसरी ना बिया वर रेहे तं बेस जमा करून ठेवीत, संभालूंन ठेवीत.
आथां सगलां कागदाच्या पैसावर काम होय त हलूं हलूं पैसा संभालुन ठेवता आला
पाहज. अडचणीचे वेलस कामाला येय. माना तं नीही फार बेस जमं पण तुम्हीं तर्ही
करून पाहजास व्हिडीओ नांगुन.

▪️[ *साधारण मराठी बोली* ]
बचत खूप महत्वाची आहे, जितक्या लवकर बचत सुरु केली तितका त्याचा कम्पाउंडिंग
परिणामाने खूप मोठा फरक पडतो आणि भविष्यातील अनेक गरजा सहज पूर्ण करण्यासाठी
आवश्यक पूर्तता होऊ शकते. अधिक माहितीसाठी हा व्हिडीओ
https://youtu.be/5uaXq-xDp2g काही शिकता आले तर बघावे, फायनान्सियल जागरूकता
करूया.

▪️[ *दोन शब्द सामाजिक* ]
याच पद्धतीने आदिवासी समाज हितासाठी चालणाऱ्या कामात पण कंपाऊंडिंग इफेक्ट खूप
महत्वाचा आहे. जसे कि विविध क्षेत्रातील विद्यार्थी - युवा - कर्मचारी -
शेतकरी/कामगार - सामाजिक - सांस्कृतिक - वैचारिक - राजकीय चळवळी, आंदोलने
यांचा परिणाम व्यापक स्वरूपात सातत्याने होणे गरजेचे आहे. जी काही सामाजिक
कामासाठी गुंतवणूक होते आहे वेळ/मेहनत/पैसे या माध्यमातून यातील प्रत्येक एकक
अपेक्षित ध्येय्यासाठी एकत्रित कामी आले पाहिजे. जेव्हा जेव्हा शक्य होईल
माध्यमातून हि ऊर्जा संचयित होईल आणि जेव्हा जेव्हा त्याची गरज पडेल तेव्हा
कामी येईल अशी व्यवस्था हवी.

सध्याच्या परिस्थितीत आदिवासी समाजाचे आर्थिक स्वावलंबन खूप महत्वाचे आहे.
नोकरी मिळत असेल तर ती नाही तर व्यवसायाच्या अनेक संधी आपल्या आजूबाजूला आहेत
(हजारो किमी वरून माणसे येऊन येथे व्यवसाय करून आपल्या गावा बंगले वाड्या
बांधत आहेत आरक्षणाशिवाय ☺️). हळू हळू वयक्तिक, कौटुंबिक, पाडा, गाव, तालुका,
जिल्हा, राज्य, समाज या पद्धतीने आर्थिक स्वावलंबसाठी विविध पर्याय तयार
करायला हवे. *रसायन विरहित शेती, वनोपज, वनौषधी, हस्तकला इत्यादी क्षेत्रात
खूप पोटेन्शिअल आहे. या माध्यमातुन मोठ्या प्रमाणावर रचनात्मक कार्याची सांगड
घालून पीक,संकलन, निवड, प्रोसेस, पॅकिंग, सप्लाय, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग या
स्टेजेस मध्ये नियोजनबद्ध काम करून समाजात व्यापक स्वरूपात मोठ्या प्रमाणावर
रोजगार निर्मिती होऊ शकते.*💡

या प्रमाणे गेली १४ वर्ष आयुश मार्फत सातत्याने लहानसा प्रयत्न करीत आहोत,
*आपण हि आपल्या परिसरात आपल्या आवडीनुसार असे उपक्रम सुरु करावे. जेणेकरून अशा
विविध उपक्रमांची सांगड घालून येणाऱ्या भविष्यात आपल्यानां आदिवासी इको सिस्टम
सशक्तीकरणासाठी हातभार लावू शकतो.* आणि या बद्दल समाजात जागरूकता करूया आणि
*जसे जमेल तसे एक एक वेळ/पैसा/मेहनत/विचार/ज्ञान समाज हितासाठी गुंतवून
ठेवूया.* Let’s do it together! जल जंगल जमीन जीव. आदिवासीत्व. जोहार!

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T3LaER--TBvBEhDhimi0rUTLgj6gZ4w_GbzoXnEt336Hg%40mail.gmail.com.

Reply via email to