AYUSH | विश्वातील पहिले फडापेन, बडापेन, बुडापेन मंदिर वासबोडी, तालुका. काटोल, जि. नागपूर

2014-04-19 Thread AYUSH Adivasi Yuva Shakti


विश्वातील पहिले फडापेन, बडापेन, बुडापेन मंदिर वासबोडी, तालुका. काटोल, जि. 
नागपूर प्रिय आदिवासीनो, वासबोडी जंगलात निसर्ग निर्मित गोड पाण्याचे ३ झरे 
निरंत वाहत आहे. त्याच्या उगम स्थानी आदिवासीच्या सांस्कृतिक मूल्यावर आधारित 
फडापेन, बडापेन, बुडापेन मंदिराची निर्मिती होत आहे. आदिवासीमध्ये ईश्वर, 
मंदिर, मूर्ती पूजा नाही. पण वेळूची सळ, सिहाचे आयाळ व घुंगरू ( वृक्ष, 
प्राणी, संगीत) मोह किंवा साज ( येनाचे झाड) वृक्षावर ठेवून वंदिले जाते, हीच 
आदिवासीची सांस्कृतिक मूल्यावर आधारित निसर्ग पूजा होय. जगातील कोणत्याही 
आदिवासीत धर्म नाही. हिंदू मैथालाजीने पछाडलेल्या डोक्यातील उपज नागपूरच्या 
भूमीतून उदयास आली, त्यातून पोतीनिष्ट आणि विज्ञानाला नाकारलेला धर्म, 
आदिवासीच्या शेकडो गणाला बाजूला सारून (जातीनिष्ट धर्म) आदिवासीवर लादल्या जात 
आहे. सिंधू संस्कृतीच्या उत्खननात सापडलेल्या अवशेष व खापारावरील चित्रावरून 
आदिवासीच्या सांस्कृतिक ओळखीच्या संदर्भाची उखल होते. अलीकडेच सर्वोच्च 
न्यायालयाने फक्त ८ % आदिवासी हेच मूलनिवासी असल्याबाबाचा ऐतिहासिक निर्वाळा 
देवून आदिवासीच्या ओळखीला मान्यता दिली आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या 
व्याख्येनुसार भारतातील आदिवासीची सांस्कृतिक नाळ सिंधू संस्कृतीसी जुडलेली 
असल्याचे स्पष्ट होते. त्या सांस्कृतिक मूल्याच्या कसोट्यावर फडापेन पूर्णतः 
उभा राहतो. अश्या मंदिराचा उगम होत आहे. त्याची वैशिष्टे खालील प्रमाणे 
राहील... १) फडापेन म्हणजे निसर्ग पूजा २) आदिवासीचे सर्व आडनावे प्राणी, 
वृक्ष्यावर आधारित आहे. तेच त्यांचे टोटेम होय. ३) फ़डापेन, लींगो, हिरासुका, 
जन्गो, काली कंकाळी, द्वारा आदिवासी सांस्कृतिक मूल्यांना जोपासले त्याचा 
इतिहास मांडून नव्या पिढीला ओळख करून देण्यात येईल. आदिवासी योध्ये, शहीद, 
राजे यांचा इतिहास उपलब्द्ध केल्या जाईल. ४) त्यासाठी आदिवासी लैब्ररि 
उभारण्यात येईल. ५) आदिवासीचे संगीत, नृत्य, लोकगीते, जतन करण्यासाठी शासनाची 
मदत घेण्यात येईल. ६) आदिवासी वैभव जन्य अवषेशाचे संकलन व जतन करण्यात येईल. 
अ) आदिवासी सांस्कृतिक आधारित वार्षिक जत्र भरविण्यात येईल. ब) जत्रामध्ये 
विविध संस्कृती जतन करणारे साहित्य, पुस्तके, फोटो, चित्रे उपलब्द्ध राहील. ड) 
नैसर्गिक मुल्याचे जतन करणारे विश्वव्यापी साहित्य निर्माण करण्यात येईल. इ) 
सांस्कृतिक मूल्याच्या आधारावर सर्व आदिवासींना एकत्र बांधणारा विश्वव्यापी 
प्रकल्प आहे. यामध्ये सर्व आदिवासी बांधवाना सहभागी होता येईल. ट्रष्टचे 
साधारण सभासद नामीनल फी भरून होता येईल. ट्रष्टचे भाग भांडवल मध्ये सहभागी 
होण्यास शेयर घेतायेईल. फडापेन मंदिर ऐवजी दुसरे नामकरण करण्यात येणार आहे. हे 
मंदिर आदिवासीचे पर्यटक म्हणूनउभे होत आहे. या बाबत आपले काही मत असेल तर जरूर 
मांडा. त्याचा प्राध्यान्याने विचार होईल. धन्यवाद ! 
मडावी लटारी कवडू ( Latari 
Madavihttps://www.facebook.com/latari.madavi?hc_location=timeline
)  नागपूर 
९४२२१९१०७२ ९४०५९०००१०


-- 
---
Big Achievement! : Soon Tribal Community will get Intellectual Property Rights 
for Warli Art, Its in final Stage now (know more at www.warli.in)

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
AYUSH | adivasi yuva shakti group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/c6f59374-1495-4e36-a6ec-6ea6b08c2cfc%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.


AYUSH | Re: मानसीकता बदलण्याची गरज आहे||

2014-04-19 Thread AYUSH Adivasi Yuva Shakti


विनाशाचे बीज पेरण्याचा हंगाम म्हणजे निवडणुकाम्हणून या काळात एक सामाजिक 
चळवळ म्हणून आपण आपल्या तत्त्वांशी एकनिष्ठ राहिले पाहिजे.

हा असा काळ की ज्यात स्वार्थी माणसे जोडली जावून निस्वार्थी प्रामाणिक 
कार्यकर्ते दुरावण्याचा धोका अधिक असतो.

कोणत्याही प्रकारे आपलाच फ़ायदा साधणारी ही मंडळी समाजमनात जातीय असो वा 
धार्मिक, पक्ष असो वा पक्षाचा झेंडा यांच्या नावाखाली सामान्य माणसाच्या मनात 
दरी निर्माण करतात. खरी खोटी आकडेवारी सांगुन जगण्यात एक प्रकारचे विष कालवतात.

नेहमी साथ देणारी माणसे जेव्हा आपल्या पेक्षा दुसरा झेंडा घेवुन मिरवतात, 
तेव्हा ती आपल्या मनापासून दुरावतात. म्हणून एक माणूस म्हणून आपण मतदान नक्की 
करावे. ते आपले कर्तव्यच आहे. पण या निवडणुकीची हवा डोक्यात जावू देवू नये. 
आपली माणसे दुरावली जावू नयेत याची काळजी घेणे गरजेचे आहे.

शेवटी एकच निवडणुका नैतिकतेने होणे अपेक्षित असताना त्या आज सर्वस्वासाठी होत 
आहेत हेच दुर्दैव आहे.

आदिवासी विकासाचा जाहिरनामा हरवलेला असताना आपण आपल्याच माणसांसोबत वैचारिक 
असोत वा राजकीय मतभेद बाळगु नयेत. पांढरपेशे राजकारण कधीही आदिवासी समाजाला 
न्याय मिळवुन देणार नाही. त्यासाठी आपणच आपल्या पातळीवर एकी साधुन विकास 
हक्काने करून घेतला पाहिजे. सरकार कधीही प्रभावीपणे आदिवासी विकासाची 
ध्येयधोरणे मांडणार नाही. आपणच आपल्या ताकदीने विकासाचे मुद्दे प्रभावीपणे 
मांडणे आवश्यक आहे. त्यासाठी राजकीय झेंडे आपल्यामध्ये अडथळा ठरू नयेत.


Lets do it together.
AYUSH | adivasi yuva shakti

https://www.facebook.com/adiyuva1?fref=nf

On Thursday, April 17, 2014 11:15:52 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti 
wrote:

 फक्त आज आपल्या मनाचे ऐका... फक्त आज स्वाभिमान जपा...

 फक्त आज समाजाचा विचार करा  आज प्रामाणिकपणे पुढाकार घ्या...कारण आज 
 नाही तर कधीच नाही... आपल्या एका चुकीने अस्तित्व नष्ट करनारांचे चोचले 
 पुरवले जाणार आहेत . राखीव जागा असुनही आमच्या तोंडाला पाने पुसली. 
 आमच्या 
 गरिबिच्या नावाखाली यांची घरे भरली आजह़ी आम्ही वंचित निराधारच 
 आहोतआता हे जाती-पातीच्या भिंती तोड़ण्याची म्हणजे आमच्या सर्वनाशाची बोली 
 बोलत आहेत. खरच यांना आम्हाला समान पातळीवर पाहायचे आहे. तर यांचा 
 नीच कावा का अजुनही आम्हाला भोगतो आहे. मी शिकलोमी मतदान केले 
 येवढ्यावर थाम्बण्याचि ही वेळ नाही मित्रांनो माझा माय-बाप जो आज असहाय 
 आहेसंभ्रमात आहेत्याला धोका समजावून सांगण्याची आपली जबाबदारी नव्हे 
 काय अरे आता कुठे आमच्या विकासाचा अंकुर फुटू पाहतोय आता कुठे 
 आमच्यात जागृतिची पालवी फुटू पाहतेय. आणि अशात हे परिवर्तनाच्या 
 नावाखाली आम्हाला पायदळी तूडवू पाहत आहेत म्हणून तोड़ हे गुलामिचे 
 साखळदंडसोड हां मला काय त्याचे असा दुराभिमान मी तर माझ्या गावात 
 100% प्रयत्न करतोयसुरु आहेतकाहींनी ऐकलेही!! म्हणजे आपण 
 प्रामाणिकपणे समजावले तर अडाणी माणसेह़ी साथ देतात गरज फक्त यासाठी 
 पुढाकार घेण्याची... आखिर...डर तो हमेशा पढ़े लिखो से ह़ी लगता है!! ...चला 
 तर आदिवासी भविष्यासाठीच आज मी मतदान करणार...जपाल ना हां विश्वास !! 



 https://lh4.googleusercontent.com/-Jwvn4TawIE4/U1ATPplRL3I/3Z0/pKYuo7pJ-sk/s1600/matadan.gif





 On Tuesday, April 15, 2014 9:26:02 PM UTC+5:30, SACHiNe SATVi wrote:

 ज्या देशात पाणपोई वर ठेवलेला ग्लास साखळीने बांधावा लागतोमंदीराच्या 
 बाहेर पाटी लावावी लागते पादञाने बाहेर सोडा...रेल्वे स्टेशनवर तिकीट खीडकीत 
 सुचना लिहावी लागते रांगेत उभा रहा...दवाखान्यात लिहावे लागते शांतता 
 राखासरकारी कार्यालयात भितींवर थुंकु नका पन लोक त्या सुचनेवरच 
 थुंकतातत्या देशात पंतप्रधान,मुख्यमंञी व खासदार बदलुन काय फरक पडणार 
 आहे..जिथे लोक स्वत:ला बदलुन घेऊ इच्छीत नाहीत...तिथे राजकारण्याकडुन काय 
 आपेक्षा ठेवायच्या.मानसीकता बदलण्याची गरज आहे||



-- 
---
Big Achievement! : Soon Tribal Community will get Intellectual Property Rights 
for Warli Art, Its in final Stage now (know more at www.warli.in)

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
AYUSH | adivasi yuva shakti group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/d7427e7a-1778-42eb-8c3c-88e513b46538%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.