चलो त्र्यंबकेस्वर --चलो त्र्यंबकेस्वर _____ चलो त्र्यंबकेस्वर
जय आदिवासी !             जय सेवा !
आदिवासी संघर्ष परिषद म.राज्य व कार्तिकस्वामी आदिवासी बहुउद्देशीय मंडळ , 
नाशिक (म.रा) 
आयोजीत 
45 अनुसूचित जमातीचे - आदिवासीचे  निवासी मार्गदर्शन व चर्चा शिबीर आणि 
 आदिवासी युवा मेळावा 
-------- 20 आणि 21  फेब्रुवारी 2016 ----------
स्थळ :     गजलक्षमी लान्स,  आनंद आखाडा,स्वामीसमर्थ केंद्र समोर ,त्रंबकेश्वर 
,
                       जिल्हा---नाशिक ( महाराष्ट्र) 
आदरनिय/प्रिय बंधू भगिनींनो -जय आदिवासी !  
             आदिवासी संघर्ष परिषद, महाराष्ट्र राज्य व कार्तिस्वामी आदिवासी 
बहुउद्देशीय मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासींची अस्मिता, ओळख  व 
सर्वांगीण विकास यावर आधारित मार्गदर्शन व चर्चा शिबीर आयोजित केले आहे
            आपणास विदित आहे की, सर्वसामान्य आदिवासी समाज अनेक  क्षेत्रात 
संक्रमण अवस्थेतून जात आहे. आजही आदिवासींना आम्ही कोण होतो,काय होतो याची 
स्पष्टशी कल्पना नाही.आदिवासींचा गौरवशाली इतिहास, आदिवासी क्रांतीविरानी 
जल,जंगल व जमीन यासाठी केलेले बलिदान  आजतागायत  जाणीवपूर्वक दडवून ठेवले आहे. 
उच्च कोटीची आदिवासी संस्कृती व कला उपेक्षित व दुर्लक्षित  ठेवली गेली आहे.
             आदिवासीं स्वायत्तता,  कल्याणा व उन्नती यासाठी  सरकारणे अनेक 
 योजना आखल्या ,कायध्या मागुन कायदे केले मात्र  अंमलबजावणीकडे शासनाने ध्यावे 
तितके लक्ष दिले नाही .नियोजन योग्य रीत्या कार्यान्वीत न झाल्यामुळे 
 आदिवासींची शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक  प्रगती झालेली नाही.  आदिवासींसाठी 
असलेल्या कल्याणकारी योजना व कायदे यांच्या कटीबद्द  अंमलबजावणीसाठी  शासन व 
शासनातील नोकरशहा  यांच्यावर  सामाजिक  संघटना , सेवाभावी संस्था  यांनी 
 निवेदने देऊन किंवा मोर्चे /अंदोलने  काढून दबाव  टाकण्याचा प्रयत्न करूनही 
सरकारी यंत्रणा दाद न देता योजनांचा गैरफायदा घेत आहे. 
             सर्वच राजकीय  पक्षाचे नेते  आदिवासींना गृहीत धरून  आदिवासींचे 
 होणारे शोषण व होत असलेला अन्याय यावर मार्ग काढण्यात  त्या त्या  पक्षाच्या 
धोरणामुळे  हतबल झालेले दिसत आहेत. 
             या सर्व  गोष्टीवर विचार विनिंमय -चर्चा  करून पुढील दिशा काय 
ठरवावी यासाठी  त्रंबकेश्वर ,नाशिक येथे  45 आदिवासी जमातींचे  शिबीर  आयोजित 
केले आहे. प्रत्येक जमातिचे प्रतिनिधित्व  असेल. ज्या विषयांवर चर्चा होणार 
आहे ते सोबत जोडले आहेत. सन्मानीय वक्त्यांनी  आपले विषय 2 दिवसात कळयायच 
आहे.वक्ते निवडीचे सर्व अधिकार  अयोजकानी राखून ठेवले आहेत
             महोदय/महोदया, आपणास  सविनय विनंती आहे की आपण या शिबिरात सामिल 
होऊन योगदान ध्यावे. 
मार्गदर्शन व चर्चा शिबीर  समन्वयक
1.बाळासाहेब जाधव  95274 45341    मेल   balasaheb.jadhav389@ gmail.com  
2.विजय घोटे. मो.नं 9623701709.     ईमेल:vijaykumar...@gmail.com.           
      
3.एकनाथ भोये. मो नं.8975439134   मेल: ekbh...@gmail.com 
4. प्रभाकर फसाटे 9923867525)
4 राजेश गायकवाड 9405529733     
  आदिवासी संघर्ष परिषद, म. राज्य. आयोजित मार्ग दर्शन व चर्चा 
                      शिबीर  कार्यक्रम पत्रिक 
            शनिवार , दिनांक 20 फेब्रुवारी ,2016 (  पहिला दिवस ) , 
 रविवार ,दिनांक 21फेब्रुवारी ,2016 (  दुसरा दिवस )

1.संस्कृती दर्शन मिरवणूक     1.क्रांतिकारकांचे पूजन  व मिरवणूक   
                                           (वेळ 10.00  ते 11.00 )           
   

2.i) शिबीराची प्रस्तावना ii) स्वागतपर  प्रस्तावना 
  iii) अध्यक्षीय व्याख्यान  iv)आभार प्रदर्शन(वेळ. 11.00 ते 11.30)
3.अ) आदिवासींचा गौरवशाली इतिहास.                                           
         
    ब) आदिवासी संस्कृति व कला- जतन, संवर्धन व  दस्तावेजीकरण
   क) आदिवासींचे पारंपरिक ज्ञान व कौश्यल्य अर्थात  बौद्धिक  संपदा
        अधिकार व त्यावर आधारित रोजगार
    ड) आदिवासींचे परंपरागत कायदे , धार्मिक व सामाजिक प्रथा 
4.अ) आदिवासींचे राजनैतिक व सामाजिक नेतृत्व -             
     ब) सुशिक्षित शहरी आदिवाशींचे समाजासाठी योगदान व केडर  कॅम्प
     क) निवेदने, मोर्चे, आंदोलने, उपोषणे व त्यापुढील दिशा  ई. संबधी 
5.अ) आदिवासी भागात बिगर आदिवासींचा शिरकाव व त्यामूळे  होणारे
        धर्मांतर, शोषण व मनुष्यबळ स्थलांतर .
6.अ)"आदिवासी विकास महामंडळ", शबरी आदिवासी वित्त व विकास
     मंडळ व आदिवासी विकास विभागांमार्फत  मार्फत राबविण्यात
     येणाऱ्या   योजना
    ब)आदिवासी उपयोजना, अर्थसंकल्प
7.अनुसूचित जमातीसाठी  असलेले संविधानिक मूलभूत अधिकार 
8.अ ) अ . ज.च्या भोगवटादारांनी  अनधिकृत रित्या हस्तांतरित
    केलेल्या भोगवटयाच्या पुन: स्थापना बाबत नियम 1969.
   ब) महाराष्ट्र अनुसूचित जमातींना  जमिनी प्रत्यार्पित  करण्यासाठी
      अधिनियम , 1974        
  क) अ ज. च्या व्यक्तींनी  बिगर आदिवासी  व्यक्तीकडे     भोगाधिकार 
       हस्तांतरित करणे  नियम , 1975
 ड) महाराष्ट्र प्रकल्प बाधीत व्यक्तींचे पुनर्वसन  कायदा, 1999.
   इ) मुंबई , जमीन अधिग्रहण नियम , 1948 , 
   ई) भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता
    राखण्याचा हक्क  अधिनियम, 2013 
9)वन हक्क कायदा, 2006 व नियम 2008 आणि 2012. 10)जातीचे प्रमाणपत्र देणे व 
त्याच्या पडताळणीचे विनियमान अधिनियम
    , 2000 व नियम 2003.        
11) आदिवासी कवींचे  कविता वाचन :   
                            प्रमुख वक्ते 
मा . डॉ. श्री. विनायकजी तुमराम,  मा.डॉ.श्री. माधवजी सरकुंडे ,  मा. डॉ.श्री. 
संजयजी लोहकरे , मा. डॉ. श्री. मधुकरजी कोटनाके  मा डॉ.श्री. राजेशजी  धनजकर , 
मा.डॉ.श्री. पद्माकरजी सहारे ,मा डॉ.श्री. चंद्रकांतजी कोकाटे , मा. डॉ.श्री. 
भौमिक देशमुख , मा.अड श्री. राजेंद्रजी मरसकोल्हे , मा.श्री. विष्णूजी 
 कऱ्हाळे , मा श्री. कुंडलिक केदारे   , मा डॉ श्री.सतिशजी पाचपुते  मा .श्री. 
प्रकाशजी थवील , मा श्री.प्रदीपजी भोये , मा.श्री. निवृत्तीजी अवारी, 
मा.डॉ.श्री. हनुमंतजी रिठे , मा.डॉ. जालिंदर घिगे  मा. श्री. कृष्णकांतजी 
भोजने, मा. श्री. मा.अड. श्री. दत्तुजी पाडवी ,प्रवीण जी धांडे  मा श्री. 
सचिनजी सातवी मा श्री. वीरेंद्रजी वळवी मा.श्री. युवराजजी लांडे ,मा 
.श्री.शांतारामजी राऊत, मा.श्री.  तुळशीरामजी   खोटरे ,मा.श्री. प्रशांतजी 
 बोडखे  मा .श्री. धनराजजी जाधव, , मा.श्री. माधवजी धोंडीराम, मा.श्री. 
माहेशजी टोपले ,मा.श्री. धीरजजी पाटेकर .  

  (प्रत्येक  विषयाचा वक्ता , दिनांक व  वेळ   नंतर  जाहीर केले जातील. )

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/1ed6ddf1-cfc5-4418-a5dc-4d81fde8e932%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to