विकासाचा प्रत्येक रस्ता आदिवासिंच्या ऊरावरुन जातोय यासारखे दुसरे दुर्दैव
नाही.

राजकारणी, सरकारी अधिकारी, जमीनदार, भांडवलदार या सर्वांच्या स्व विकासाचे मुळ
आदिवासिंच्या गरिबित आहे. आपला स्वार्थ साधण्यासाठी आदिवासिंच्या गरीबी
उच्चाटनासाठी ते प्रयत्न करत नाहित...फक्त कागदी घोड़े नाचवुन विकासाचा आव आणत
आहेत.

विकासाच्या बाबतीत सुस्त अजगरासारखा सुस्तावलेला आदिवासी विकास विभाग जोरात
हलवून कामाला लावणे सर्वाधिक गरजेचे आहे. लाचारीला खतपाणी घालणारे अधिकारी या
खात्यातून हाकलणे आता काळाची गरज बनले आहे. साधी गोष्ट आहे गेल्या चार
महिन्यांपासून राज्यातील अनुदानित आश्रमशाळा कर्मचा-यांचे पगार झालेले नाहित.
पगाराविना त्या कर्मचा-यांवर काय वेळ आली असेल हे जाणणारा एकही संवेदनशील
अधिकारी या विभागात नसावा यासारखे दुर्दैव नाही.

कर्मचा-यांचे दुःख यांना समजत नसेल तर आदिवासींचे दुःख यांना कधी आपलेसे
वाटणार ? खरच मनापासून हे विकासाच्या योजना राबवनार का ? की ज्याचा वशिला
त्यालाच योजनांचा फ़ायदा ? अशा अनेक बाबी ज्या आदिवासी विकासात अडथळा बनुन आहेत
त्या समूळ नष्ट करणे गरजेचे आहे.

सर्वात मोठे दुर्दैव म्हणजे कळसुबाई शिखरावर रोपवे झाला पाहिजे असे म्हननारे
आदिवासी विकास मंत्री मधुकरराव पिचड हे आपल्या स्वताच्या आश्रमशाळेतील
पगाराच्या समस्या सोडवू शकत नाहित.....तर मग कोणता विकासाचा रोप वे साधणार
आहेत?

आदिवासी विकास विभाग सुस्त पडलाय त्याला जागे करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची
गरज आहे.

जागो युवा...भागो नहीं बदलो !!!

Lets do it together.
Ayush ! Adivasi yuva shakti

-- 
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for 
"Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it 
together!

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBu4nXtLuTBNuuBvKPRd-NxoRzXcq_siFcfp-brpt5G%2BLw%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to