i want party

2016-09-15 19:44 GMT+05:30 AYUSH | Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in>:

>
>
> जोहार !
>
> परवा UNDRIPs ला दहा वर्ष झाले या बद्दल, दिल्ली येथे आदिवासी समन्वय मंच
> तर्फे आदिवासींच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने राष्ट्रपतींची भेट घेऊन आदिवासीं
> समस्या बद्दल लक्ष वेधले. त्या बद्दल सगळ्यांचे अभिनंदन, या निमित्ताने
> आदिवासींच्या हक्का बद्दल पुन्हा राष्ट्रीय पातळीवर चळवळ मजबूत करण्यास
> हातभार लागेल.
>
>
>
> *आज आदिवासी*
>
> एका बाजूने देश वेग वेगळ्या स्वरूपात विकासाची फळे चाखतो आहे, आदिवासी समाज
> मात्र दिवसेंदिवस त्याचे स्वावलंबन/स्वायत्तता/स्वाभिमान/अस्मिता यांच्या
> समोर आव्हानाना तोंड देत आहे. हे होताना जल जंगल जमीन जीव तर गमावतो आहेच
> सोबत प्राथमिक गरजा पण सहज पूर्ण करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. (समस्यांची
> यादी सुरवात केली तर येथे जागा पण अपुरी पडेल). आज अशिक्षित/उच्च शिक्षित,
> बेरोजगार/नोकरदार, शेतकरी/उद्योजग, बालके/वयोवृद्ध, राजकीय नेते/अधिकारी,
> विद्यार्थी/युवा, इत्यादी प्रत्येक आदिवासीला विविध समस्यांना सामोरे जावे
> लागते आहे. बहुतेक जण आपली वयक्तिक/कौटुंबिक जबाबदारी आणि महत्वकांक्षा पूर्ण
> करण्यात व्यापलेले आहेत. पण  हे सगळे करताना समाजा समोरील आव्हाने आणि संकटे
> या साठी मुळापासून कायमची उपाय योजना करण्या साठी समाजातून एकत्रित पण
> प्रयत्न होणे आवश्यक आहेत.
>
>
>
> *गरज आहे*
>
> देश भरातील आदिवासी संघटनांना सोबत आणून आदिवासी समन्वय मंचाने आदर्श उभा
> केला आहे. आदिवासी हित हे ध्येय ठेवून अभ्यासपूर्ण सर्वसमावेशक स्वावलंबी/
> स्वायत्त/पारदर्शी/आक्रमक असेच प्रत्येक क्षेत्रात कार्य करणाऱ्या प्रणालींचे
> संघटन करून अशीच जागरूकता समाजा साठी कार्य करणाऱ्या प्रत्येक संस्था/संघटना/
> ग्रुप/कार्यकर्ते/नेते/समर्थक यात करूया. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने हे
> करण्यात सहभाग घेतला तर नक्कीच आपल्या समाजा साठी तसेच पर्यावरण/निसर्ग याना
> चांगले भविष्य देऊ शकू. स्थानिक/राज्य/देश/आंतराष्ट्रीय पातळीवर असलेले विविध
> आदिवासी हक्क या बद्दल जागरूकता करून समाज हित प्रथमिकता पुढे आणूया. सध्या
> जल जंगल जमीन जीव रक्षणा साठी या हक्कांच्या आधारे आपल्याना आपला आवाज
> व्यवस्थेत मांडण्यासाठी सर्वदूर प्रयत्न आवश्यक आहेत.
>
>
>
> *जिवंत उदाहरण*
>
> सध्या मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन, मुंबई - दिल्ली इंडस्ट्रियल कोरिओडोर,
> मुंबई वडोदरा, वाढवण बंदर, मुंबई/ठाणे/वसई/विरार साठी धरणे, कार्गो लोह मार्ग,
> विस्तारित महामार्ग, इत्यादी अंदाजे १६ मेगा प्रोजेक्ट मध्ये अक्षरशः
> महाराष्ट्रातील उत्तर सह्याद्री/दक्षिण गुजरात परिसरातील आदिवासी समाज
> अस्तित्वाच्या उंबरठ्यावर आहे. माहिती साठी जिल्हा विभाजन पूर्वी
> महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आदिवासी लोकसंख्या असलेला हा परिसर आहे, सध्या
> अल्पसंख्यांक होऊन आपले सगळे जल जंगल जमीन अस्तित्व गमावतो आहे. (दुर्दैवाने
> या विषयी जागरूकता कमी आहे, कारण पद्धतशीरपणे काही दशका पासून येथे विविध पंथ
> /सांस्कृतिक/मानसिक प्रदूषण करून, व्यसनात गुंतवून तसेच व्यसन सोडवून पण
> समाजाला भूल दिली आहे असे संगीतीतले जाते आहे. खास करून युवा वर्गाला या
> गोष्टींचे गांभीर्य कसे कळणार नाही यासाठी प्रचंड व्यवस्था आहे).
>
> येथील जल जंगल जमीन अस्तित्व, स्वायत्त अर्थव्यवस्था आणि संस्ककृतिक ओळख,
> पारंपरिक ज्ञान याचे जतन करण्या साठी UNDRIPs नक्कीच खूप मोलाची भूमिका पार
> पडू शकेल यात शंका नाही.
>
>
>
> *सोबत प्रयत्न करूया*
>
> या सगळ्यांविषयी आपण योग्य ती जागरूकता करून आपली प्रत्येक चळवळ एकमेकांना
> पूरक आणि मजबूत करूया. आपल्या समाजाचे भविष्य आपल्या हातात आहे याची जाणीव
> मजबूत करूया. ग्रामसभा, पेसा, पाचवी अनुसूची, अनुसूचित क्षेत्र, UNDRIPs
> इत्यादी असलेल्या आदिवासी हक्क यांचा अभ्यास करून प्रशासनावर विविध पातळीवर
> आपला आवाज पोचवून व्यवस्था अधिक प्रभावी करूया.
>
>
>
> *आपल्या माहिती साठी UNDRIPs* चे हिंदी/इंग्रजी तुन माहिती पाठवतो आहोत या
> विषयी अभ्यास करून आपल्या संपर्कात जागरूकता करूया. Lets do it together!
>
> हि फाईल येथून डाऊनलोड करू शकता : https://drive.google.com/file/d/
> 0B9DGQz4oA43gYkVGQ05nQXdlZEE/view?usp=sharing
>
> Jago Adivasi!
>
> www.jago.adiyuva.in
>
>
>
> AYUSHonline team
> www.adiyuva.in
>
> --
> Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/
> ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/
> msgid/adiyuva/CAHMsEBvoTw%2BQ25V1m1_bLz4k%3Dv_W7WnU%
> 3Djtr9HQrk7mb78UUmA%40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBvoTw%2BQ25V1m1_bLz4k%3Dv_W7WnU%3Djtr9HQrk7mb78UUmA%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAFF9zxmOEoR%2Bt9ZvpeUrKt_MMXrN8JyGJwjDSF_oWrEbOHx40Q%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to