*ठाणे : *विविध विभागांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजनांची स्थानिक 
लोकप्रतिनिधी व जनतेला माहिती होऊन त्यांचा लाभ अधिकाधिक गरजूपर्यंत पोहोचावा, 
या दृष्टिकोनातून तालुकास्तरीय गावभेटी योजना कार्यक्रम आखण्यात आला आहे, असे 
प्रतिपादन सहाय्यक जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले. 

ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील बापूगाव येथे आयोजित ‘तालुकास्तरीय 
गावभेटी योजना’ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. जिल्हा 
परिषद बांधकाम समिती सभापती राजेंद्र पागधरे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग 
बेलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. डहाणूचे तहसिलदार महेश सागर, 
गटविकास अधिकारी रमेश अवचार आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

सहाय्यक जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले, ‘प्रशासन आपल्या दारी’ या 
उपक्रमाअंतर्गत तालुकास्तरीय गावभेटी योजना कार्यक्रमाच्या माध्यमातून दुर्गम 
व आदिवासी भागातील जनतेला एकाच ठिकाणी विविध विभागांच्या शासकीय योजनांची ओळख 
व लाभ देण्याचा उद्देश आहे. शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी 
आखलेल्या या कार्यक्रमातून जनतेचे कष्ट, वेळ आणि पैसे वाचणार आहे. स्थानिक 
लोकप्रतिनिधींनी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योजनांची माहिती 
करून घ्यावी व त्यांच्या गावातील अधिकाधिक लाभार्थींपर्यंत या योजनांचा लाभ 
मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. तसेच, विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी 
परस्पर समन्वय साधत यापुढे प्रत्येक पंधरवड्यात मंडळ ठिकाणी अशा कार्यक्रमाचे 
आयोजन करावे. 

डहाणू तहसिल कार्यालयाच्या वतीने ‘प्रशासन आपल्या दारी’ या उपक्रमाअंतर्गत हा 
तालुकास्तरीय गावभेटी योजना कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. बालकनजी बारी 
आश्रमशाळा, बापूगाव, ता. डहाणू येथे झालेल्या या कार्यक्रमात गटशिक्षणाधिकारी 
दर्शना जाधव, तालुका कृषि अधिकारी ईभाड, कृषि अधिकारी भगत, वैद्यकीय अधिकारी 
पाटील, महावितरणचे सहाय्यक अभियंता देवकर यांच्यासह वनविभाग, आदिवासी विकास 
प्रकल्प, एकात्मिक बालविकास प्रकल्प, पशुसंवर्धन विभाग, लघुपाटबंधारे विभाग, 
राज्य परिवहन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हा परिषद बांधकाम समिती सभापती राजेंद्र पागधरे, जिल्हा परिषद सदस्य 
पांडुरंग बेलकर यांनी मार्गदर्शन केले. 

यावेळी मान्यवरांच्या हस्ते तहसील कार्यालयाच्या वतीने विविध दाखले वाटप व 
शिधापत्रिका वाटप, शिक्षण विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना दप्तर वाटप, 
तालुका कृषि विभागाच्या वतीने साग रोपे व स्प्रे पंप वाटप, पं. स. कृषि 
विभागाच्या वतीने भात बियाणे वाटप, आरोग्य विभागाच्या वतीने जननी शिशु सुरक्षा 
योजनेचे धनादेश वाटप, पशुसंवर्धन विभागाच्या वतीने केटली, घमेली व बादली वाटप 
करण्यात आले. तसेच, उपस्थित विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या 
विभागाच्या योजनांची माहिती नागरिकांना दिली. 

प्रास्ताविक व आभार प्रदर्शन तहसिलदार श्री. सागर यांनी केले. या कार्यक्रमास 
सायवन, वेती वरोती, चारोटी, बापूगावचे सरपंच, पंचायत समिती सदस्य यांच्यासह 
परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Ref : http://mahanews.gov.in/Home/MahaNewsHome.aspx 

-- 
-----------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
Group of professionals who want to take initiative to develope tribal 
community, Let us do it together 

Our Online contact points : 
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in 
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in 

Face book profile : www.facebook.com/adiyuva 
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva 
twitter : http://twitter.com/adiyuva 
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.


Reply via email to