Rahul Shengal<https://www.facebook.com/rahul.shengal.7?hc_location=timeline>

आज महाराष्ट्रात २५ आदिवासी आमदार व ४ आदिवासी खासदार आहेत.यातील बहुतेक आमदार 
व खासदार २० ते ३० वर्षाँपासुन आमदार व खासदार आहेत तर काही मंञी आहेत.परंतू 
आजही आदिवासीँची परिस्थिती अत्यंत हालाखिची आहे. सरकार दरवर्षी हजारो कोटी 
रुपये आदिवासीँच्या विकासासाठी मंजूर करते व खर्च करते परंतु आदिवासी आजही 
जिथे होते तिथेच आहेत मग हा पैसा जातो कुठे व याला जबाबदार कोण ? हा मोठा 
प्रश्न आहे. आज ज्यांना आपण आपल्या विकासासाठी निवडुन दिले आहेत ते आदिवासी 
राहिले नाहीत तर ते आज काँग्रेस,रा.काँ.,शिवसेना, भा.ज.प.,मनसे,व इतर पक्षांचे 
गुलाम झाले आहेत ही सत्य परिस्थिती आहे. आदिवासीँसाठी त्यांच्या विकासासाठी 
हक्कांसाठी लढणार कोणीच राहिलेल नाही. आजही आदिवासीँसाठी जे लढलेत ते युगपुरुष 
भगवान बिरसा मुंडा,आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे,क्रांतिवीर भागोजी नाईक, 
आदिवासीँचे कैवारी आदिवासी भुषण डाँ. गोविँद गारे आजही आदिवांसीँपासून खूप दूर 
आहेत याचा खेद वाटतो. आज जर आपल्याला विकास करायचा असेल तर आपल्याला 
स्वकर्तृत्वावर उभ रहाव लागेल. आपल्याला एकमेकांचे सोबती व्हावे लागेल. 
एकमेकांना मदत करा, पुढे जाणारॅला नेहमी मदत करा व त्याला एक सांगा तु जेव्हा 
मोठा होशील तेव्हा ज्या जातीमुळे व मातीमुळे मोठा झाला तिला व तुला मदत 
करणारॅला आदिवासीला कधी विसरु नकोस.आज मी तुझा सारथी झालोय उद्या तू दुसरॅचा 
आधार हो. अस जर झाल तर आदिवासीँचा विकास व प्रगती नक्की होईल अशी आशा बाळगतो. 
जय आदिवासी...!

On Wednesday, July 3, 2013 11:24:19 PM UTC+5:30, AYUSH activities wrote:
>
>
> Rahul Shengal<https://www.facebook.com/rahul.shengal.7?hc_location=timeline>
> "दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये" अस हिंदित सुंदर वाक्य आहे. हे वाक्य 
> आदिंवासीँसाठी खूप महत्वाच आहे अस मला वाटत ,कारण आदिँवासीँना कोणापुढे झुकाव 
> हे कळाल असत तर आज आदिँवासीँची परिस्थिती अत्यंत बिकट व हालाखिची नसती. आज 
> महाराष्ट्रात २५ आदिवासी आमदार ४ आदिवासी खासदार व बरेच क्लास १ व २ पोस्टचे व 
> इतर प्रशासकिय आधिकारी आहेत. मग आदिवासी विकासाच्या बाबतीत मागे का ? 
> त्यांच्या ह्या परिस्थिला जबाबदार कोण? आज आदिंवासीँच्या जीवावर मोठ्या 
> झालेल्या राजकीय नेत्यांनी, प्रशासकीय आधिकाऱ्‍यांनी आदिंवासीँकडे मागे वळूण 
> पाहिलेच नाही तर उलट आदिंवासीँसाठी येणारा सरकारी पैसा व त्यांच्या जमिनी 
> बळकावण्याचे काम केले. त्यामुळे आदिवासी जिथे होते तिथेच राहिले हे माञ 
> कोट्याधीश झाले ही वस्तुस्थिती आहे. आजही आदिवासी युवक, तरूण व सुशिक्षित 
> आदिवासी बांधव आपल्या मुळ संस्कृतीपासून दुरावत चाललाय तसेच काहीँना तर आपण 
> आदिवासी असल्याचीच लाज वाटतेय ही सत्य परिस्थिती आहे. पारतंञ्य भोगल्याशिवाय 
> स्वातंञ्याची, अपमान झाल्याशिवाय मानाची व स्वाभिमानाची, पराजित झाल्याशिवाय 
> विजयाची या सर्व गोष्टींची किँमत व महत्व कळत नाही तसेच आदिवासीपन 
> भोगल्याशिवाय आदिवासीँच्या हालाखिच्या जीवनाची व बिकट परिस्थितीची जाणीव होत 
> नाही हे पण तितकच खर व सत्य आहे. त्यासाठी आदिवासी युवकांनी व आदिवासी 
> सुशिक्षित समाज बांधवांनी आपला इतिहास व आपली संस्कृती जाणून घेऊन जोपासली 
> पाहिजे कारण इतिहास घडवणारी माणस इतिहास विसरू शकत नाहीत व इतिहास विसरणारी 
> माणसं इतिहास घडवू शकत नाही हा एक इतिहास आहे अस प्रा. नितीन बानगुडेँनी म्हटल 
> आहे. आदिवासी युगपुरूष भगवान बिरसा मुंडा, आद्य क्रांतिकारक रागोजी भांगरे, 
> क्रांतिवीर भागोजी नाईक, आदिवासीँचे कैवारी आदिवासी भूषण डॉ.गोविँद गारे यांचे 
> जीवनचरिञ, विचार व कार्य जाणून घेऊन ते आदिवासी बांधवांपर्यँत पोहचवण्यासाठी 
> आदिवासी तरूणांनी व सुशिक्षित आदिवासी बांधवांनी प्रयत्न केले पाहिजेत. 
> यापासून बोध घेऊन आदिवासी युवकांनी व सुशिक्षित आदिवासी बांधवांनी आदिवासीँचा 
> विकास करण्यासाठी मदत करावी. आदिवासीँचा विश्वास संपादन करून आदिवासी समाज 
> जोडावा. कारण विश्वासावरच हे जग चालत असतं. अस जर झाल तर "आदिवासीँना जोडायला, 
> नराधमांना फोडायला, दुनिया झुकवायला व इतिहास घडवायला...! वेळ लागणार नाही. जय 
> आदिवासी...!
>
> On Wednesday, July 3, 2013 11:13:44 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti 
> wrote:
>>
>> Rahul Shengal<https://www.facebook.com/rahul.shengal.7?hc_location=timeline> 
>>
>> "नारायणगाव नावाचा देश"...! "भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे माझे 
>> बांधव आहेत...! ही आपल्या सर्व भारतीयांची, भारत मातेची प्रतिज्ञा आहे. या 
>> प्रतिज्ञेनूसार सर्व भारतीय समान असून सर्वाँना आपली सामाजिक, 
>> आर्थिक,शैक्षणिक,सांस्कृतिक प्रगती करण्याचा समान हक्क आहेत परंतू हे 
>> प्रतिज्ञेतील समानतेचे तत्व, विचार आदिवासीँसाठी नाहीत असे मला वाटते कारण 
>> महाराष्ट्र सरकार,सर्व आदिवासी आमदार व खासदार यांनी विषेश प्रयत्नातून 
>> भारतातील महाराष्ट्र राज्यात नारायणगाव (ता. जुन्नर) हा नवा देश निर्माण केला 
>> आहे व आणखी काही देश तयार करण्याचे काम जोरात चालू आहे ,त्याबद्दल त्यांचे 
>> हार्दिक आभार व अभिनंदन .या नविन देशांच्या प्रतिज्ञा काय आहेत हे जाणुन 
>> घेण्याचा आपण प्रयत्न करूया. आजही अकोले तालुक्यातील दुर्गम भागातील बरेच 
>> आदिवासी रोजगाराच्या शोधात दरवर्षी ऊन्हाळ्यात नारायण गावाला जातात व एस.टी. 
>> स्टँडच्या एका कोपऱ्‍याला येवुन सरळ रांगेत भर ऊन्हात बसतात. काही वेळाने मोठ 
>> मोठे शेतकरी, बागाईतदार, व्यापारी येतात व आपल्या गरजेनुसार हवी असलेली २, ३, 
>> ५ माणसे घेऊन जातात. जो पर्यँत आपल्याला कोणी कामासाठी घेऊन जात नाही तोपर्यँत 
>> हे माझे आदिवासी बांधव त्या स्टँडवर राहतात. मग २ दिवस लागू द्या कि आठवडा कि 
>> महिना ते तिथेच राहतात. त्याचं कोणाला घेण देण नसत. ना समाजाला, ना आम्हाला. 
>> हा प्रकार खुलेआम चालु असतो पण कोणी काही बोलत नाही. पूर्वी जसा अमेरिकेत 
>> गुलामांचा बाजार भरायचा तसा आज भारतात पण भरतोय,फरक फक्त इतकाच आहे की तिथे 
>> निग्रोँ लोकांची विक्री व्हायची इथे आदिवासी विकले जात आहे हीच मोठी शोकांतीका 
>> आहे. आदिवासीँच्याच वाटेला का येतय असं हालाखीच, दुखाःच जीवन ? का आम्ही माणूस 
>> नाही ? आमच काय चुकलं चुकल ? आम्ही काय गुन्हा केला ? आमच इतकच चुकल की आम्ही 
>> तुमच्यावर आपला माणूस विश्वास ठेवुन तुम्हाला भरगोस मतांनी निवडून दिल. तुम्ही 
>> आम्हाला काय दिलं तर विश्वासघात व अठरा विश्व दारिद्र्य. असे असंख्य प्रश्न व 
>> त्यांची उत्तरे मनात दाबून ठेवून आजही आपल्याला या गुलामगिरीतून सोडवण्यासाठी 
>> एखादा तरी गुलामांचा कैवारी अब्राहम लिंकन जरुर येईल या आशेवर व विश्वासावर 
>> आजही ते आपलं आयुष्य, जीवन जगत आहेत. त्यांना गरज आहे आधाराची कारण त्यांना 
>> आधार देणार त्यांच असं या जगात कोणीच राहिलेल नाही ना भगवान बिरसा मुंडा, ना 
>> आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे, ना क्रांतिवीर भागोजी नाईक, ना आदिवासीँचे 
>> कैवारी आदिवासीभूषन डॉ.गोविँद गारे कोणीच नाही. तो आधार त्यांना देण्याचं व 
>> त्यांचा आधार होण्याचं काम आदिवासी तरुणांना व सुशिक्षितीत आदिवासी बांधवांनाच 
>> कराव लागेल. त्यांची यातुन सुटका करण्यासाठी आदिवासी युवकांनी तरुणांनी व 
>> सुशिक्षित आदिवासींनीच पुढाकार घ्यावा लागेल. आजही अकोले तालुक्यातील भोजदरी 
>> गावात एम.आय.डिसी व्हावी हा प्रस्ताव गेल्या २० ते ३० वर्षाँपासून प्रलंबित 
>> आहे याला जबाबदार कोण ?आज नारायणगाव नारायणगावापर्यँत मर्यादित राहिले नसून तर 
>> कोकणात पण असे देश तयार होण्यास सुरवात झाली आहे. हे थांबवावच लागेल व ते आपणच 
>> थांबवू शकतो व थांबवणारच...! अशी आशा बाळगतो...! जय आदिवासी...!
>>  
>

-- 
-----------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
Group of professionals who want to take initiative to develope tribal 
community, Let us do it together 

Our Online contact points : 
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in 
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in 

Face book profile : www.facebook.com/adiyuva 
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva 
twitter : http://twitter.com/adiyuva 
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/2b860323-5100-41c0-97c8-d539eb063b2a%40googlegroups.com.


Reply via email to